@vishwajeetkadam लोकांच्या उदरनिर्वाहाची चि��ता योग्य आहे पण उद्योगधंदे कारखाने यातून जनतेला जास्त उत्पन्न मिळेल. जमीन काही सरकार फुकट घेत नाही. विकासाला विरोध नाही म्हणता मग विकासाचे मुद्दे किती मांडलेत?
@satejp शक्तिपीठ आणि पूर याचा काहीही संबंध नाही. नाल्यांवरच्या अतिक्रमणांमुळे 2019 साली पूर आल्याचे तज्ज्ञ सांगतात.राजकारणाकरता अफवा पसरवणे, लोकांच्यात भीती निर्माण करणे आणि विकासाला विरोध करायचे महापाप तुम्ही करताय ते ताबडतोब बंद करा. पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत🏴🏴
सांगलीसोडून प्रत्येक जिल्ह्याच्या विकासाबाबत बैठका होतात, सांगलीच्या विकासाकरता सरकार नेमके काय करत आहे, आमचे विमानतळ,ड्रायपोर्ट सरकार दरबारी का रखडले आहे याबद्दल एखादे ट्वीट तरी यावे अशी अपेक्षा @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@ChDadaPatil
सोलापूरच्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय; एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाला गती!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे सोलापूर शहरातील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) प्रस्तावित दोन उड्डाणपुलांसह विविध विषयांसंदर्भात बैठक पार पडली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याच्या राज्य सरकारच्या धोरणामुळे सोलापूर शहराच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडणार आहे. ₹1020.50 कोटी खर्चाच्या चारपदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन सोलापूरच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.
सोलापूरचे ध���रणात्मक वाहतूक केंद्र म्हणून महत्त्व अधिक बळकट होणार
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जुना पुणे नाका ते बोरामणी नाका या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वरील सुमारे 9.660 किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणारा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सोलापूर शहराभोवती प्रभावी वाहतूक वर्तुळ तयार होईल. 6 प्रवेश आणि निर्गमन मार्गांमुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65, 52, 166 आणि 150 यांच्यात अखंड संपर्क प्रस्थापित होणार असून शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होईल. तसेच प्रादेशिक संपर्कक्षमता वाढून सोलापूरचे धोरणात्मक वाहतूक केंद्र म्हणून महत्त्व अधिक बळकट होणार आहे.
प्रकल्प लवकर मार्गी लागावा यासाठी विविध विभागांनी समन्वयाने कामे करावी.
या प्रकल्पाला 31 मार्च 2025 रोजी स्थायी वित्त समितीची मंजुरी मिळाली असून, राज्य सरकारकडून जमीन संपादनाचा खर्च उचलण्यात येणार आहे. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी आवश्यक प्रशासकीय आणि धोरणात्मक पाठबळ दिले असून, प्रकल्प ल���करात लवकर मार्गी लागावा यासाठी विविध विभागांमध्ये समन्वयाने कामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
या प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठी राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासन, सोलापूर महानगरपालिका आणि संबंधित केंद्रीय विभागांमध्ये समन्वय वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. राज्य सरकारच्या जमिनीचा ताबा तातडीने विनामूल्य देण्यात यावा. रेल्वे व इतर केंद्रीय संस्थांशी समन्वय, तसेच वन विभागाच्या मंजुरीसह सर्व प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
वाहतूक कोंडी कमी होण्याबरोबरच इंधनाची बचत, प्रदूषणात घट आणि उद्योग व व्यवसायाला चालना मिळणार असून सोलापूरच्या सर्वांगीण विकासाला नवी दिश��� मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
सध्या प्रकल्पासाठी आवश्यक 32.02 हेक्टरपैकी 21.51 हेक्टर जमीन उपलब्ध झाली असून उर्वरित 10.51 हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रक्रिया वेगाने सुरू आहे. सरकारी विभागांच्या ना-हरकत प्रमाणपत्रांची पूर्तता, खासगी जमिनींचे संपादन, तसेच आवश्यक वनपरवानग्या आणि इतर प्रशासकीय मंजुरी प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणा कार्यरत असल���याची माहिती यावेळी देण्यात आली.
राज्यात आधुनिक आणि दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर दिला जात आहे. सोलापूर एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
यावेळी मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार देवेंद्र कोठे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis @Jaykumar_Gore @Shivendraraje11 @devendrakothe
#Maharashtra #DevendraFadnavis #FlyoverProject
सांगली मनपाच्या उत्पन्नवाढीकरता हद्दवाढ करून आजूबाजूची काही गावे समाविष्ट करण्याचा विचार ��्हावा.
GSTमुळे आता गावांना करवाढीचा प्रश्न उरत नाही.
10 लाख लोकसंख्येच्या शहरांना मिळणाऱ्या योजना सांगलीत त्यायोगे राबवता येतील.@ChDadaPatil @SudhirGadgil @DrSureshKhade
@rohitrrpatilncp@Dev_Fadnavis धन्यवाद🙏 सांगलीजवळ औद्योगिक क्षेत्र वाढावे, मोठे उद्योग यावेत, वैद्यकीय उपचारांकरता देश-जगभरातून लोक यावेत याकरता कवलापूर विमानतळ, मुंबई-बंगळुरू औद्योगिक काॅरिडाॅरचा सांगली नोड याकरता कृपया पाठपुरावा करा ही विनंती🙏
“मातीला अंतर देऊ नका, माती तुम्हाला अंतर देणार नाही.” आबांचे हे शब्द आजही दिशादर्शक ���हेत.
तासगाव व कवठेमहांकाळ एमआयडीसीच्या पर्यावरणपूरक आणि आर्थिक विकासाच्या दिशेने आज एक निर्णायक पाऊल पडलं. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या संपूर्ण पाठबळाची ग्वाही दिली. डॉ पारीख (इंडो - अमेरिका चेंबर्स ऑफ कॉमर्स) डेलिगेशन्स आणि श्री पुराणिक (जपान इकॉनॉमिक्स अँड ट्रेड कमिटी) डेलिगेशन्स यांनी तासगाव एमआयडीसी जगाशी जोडण्याचा व अमेरिका आणि जपान येथे महाराष्ट्रातील ड��लिगेशन्स घेऊन जात प्रेसेंटेशन्स करण्याबाबत आश्वासित केले.
गेली अनेक वर्ष करत असलेल्या प्रयत्नांना यश येते याचा आनंद आहे.
*दोन कंपन्यांनी सुमारे ₹१,१०० कोटींच्या गुंतवणुकीची स्वारस्य पत्रं सादर केली.*
ही केवळ एमआयडीसी नाही, हे आबांचं स्वप्न आहे, लोकांची एमआयडीसी.
स्थानिक हातांना, जागतिक स्वप्नांची जोड.
#rrpatil #wewillrise #Industrialrevolution
पहिल्यावहिल्या सांगलीचा विकासाचा अनुशेष आहे त्याचे काय? आमचे रखडलेले विमानतळ, ड्रायपोर्ट प्रकल्प हे कधी होणार? चार मुंबई आणि चार नागपूर खुशाल बनवा पण अस्तित्वातल्या शहरांना वंचित ठेवून बनवणे अन्याय आहे🏴🏴 @Dev_Fadnavis@ChDadaPatil
'मन की बात' : विकसित भारताच्या संकल्पाला नवी दिशा
आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा'मन की बात' कार्यक्रम पाहिला.
या संवादामध्ये मोदीजींनी संरक्षण ���्षेत्रात भारताने आत्मनिर्भरतेच्या दिशेने घेतलेली उल्लेखनीय झेप, आंतरराष्ट्रीय योग दिनाचे जागतिक महत्त्व, केंद्र शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा समाजावर होत असलेला सकारात्मक परिणाम तसेच देशभरातील विविध व्यक्ती आणि संस्थांनी राबविलेल्या प्रेरणादायी उपक्रमांचा विशेष उल्लेख केला.
राष्ट्रहित, जनसहभाग आणि सेवाभाव या मूल्यांवर आधारित हा संवाद प्रत्येक नागरिकाला देशाच्या प्रगतीत सक्रिय योगदान देण्याची प्रेरणा देणारा ठरला.
📍२८ जून २०२६ | सांगली
#MannKiBaat #PMModi #ViksitBharat #AtmanirbharBharat #InternationalYogaDay #मन_की_बात
@BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
@rajushetti अफवा पसरवून विकास रोखणे बंद करा. रस्त्यांमुळे महापूर येत नाही तर अनधिकृत नाल्यावरची बांधकामे,रस्त्याकडेचे शेती-व्यावसायिक कामाकरता बेकायदेशीरपणे बुजवलेले चर, प्लॅस्टीक कचरा यामुळे पूर ओसरत नाही. राजकारणाकरता विकास,रोजगार याच्याशी खेळणे बंद करा. सांगलीला शक्तिपीठ गरजेचा आहे.
@niveditapurohit@swanand_b@CMOMaharashtra@Dev_Fadnavis सांगलीचे विमानतळ 65 वर्षापूर्वीपासून आहे. त्याचे विस्तारीकरण करून प्रवासी व कार्गोकरता वापरात आणणे हेच करायचे आहे. कोल्हापूर विमानतळ हे सांगलीचे नाही त्याचा फायदा नाही सांगलीला.कराड,रत्नागिरी,चिपी विमानतळे जवळ दुसरी विमानतळे असताना होतात मग सांगलीसारख्या मोठ्या शहरा��र अन्याय का?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis सगळं जर नागपूरलाच करायचे असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद कशाला हवे? सांगली पुणे ही शहरे महाराष्ट्रातच आहेत. तिथे विमानतळ, ड्रायपोर्ट हे प्रश्न, वाहतूकसमस्��ा जैसे थे च आहेत🏴🏴
@OfSangli