देणार्याने देत जावे... घेणार्याने घेत जावे...
विंदा करंदीकर यांच्या या ओळी अगदी खर्या ठरतात त्या मा. रतनजी टाटा यांच्या बाबतीत. आपल्या अमूल्य योगदानातून आणि सामाजिक बांधिलकीतून उद्योगविश्वासोबतच संपूर्ण जगासमोर दानशूर व्यक्ती म्हणून त्यांनी आदर्श ठेवला.
अशा उत्तुंग आणि असामान्य व्यक्तीमत्वाला आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. उद्योगरत्न पुरस्कारासारख्या सन्मानाची सुरुवात मा. रतनजींपासून झाल्यामुळे या पुरस्काराचा मान आज खर्या अर्थाने वाढला आहे.
सतत राष्ट्रहिताचा विचार करून ते करत असलेलं कार्य आपणा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्यातील प्रत्येकाने देशासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार करायला हवा आणि त्यादिशेने पाऊलं टाकायला हवीत.
मा. रतनजी टाटा यांचे मनःपूर्वक अभिनंदन !
#RatanTata #उद्योगरत्न_पुरस्कार
#BJP #BJP4Maharashtra #BJP4महाराष्ट्र #Maharashtra
#बीजेपी #Dombivali #महाराष्ट्र #RavindraChavan #रविंद्र_चव्हाण
#PWD #डोंबिवली #डोंबिवलीकर
#Dombivli
#NarendraModi #India #PMModi
भारत स्वतंत्र होण्यापूर्वी सातारा, सांगली भागातल्या तब्बल ७०० ते ७५० गावांतील नागरिकांची मोट बांधून क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकारचा यशस्वी प्रयोग करून दाखवला. विविध लोकोपयोगी उपक्रम हाती घेत शिक्षण प्रसार, अंधश्रद्धा निर्मूलन या सामाजिक सुधारणांसाठी अथक परिश्रम केले. क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
#NanaPatil #नाना_पाटील #क्रांतिसिंह #BJP4महाराष्ट्र #Maharashtra
#बीजेपी #Dombivali #महाराष्ट्र #RavindraChavan #रविंद्र_चव्हाण
#PWD #डोंबिवली #डोंबिवलीकर
#Dombivli
#NarendraModi #India #PMModi
ज्यांच्या कविता ऐकून/वाचूनच निसर्गाचा आनंद मिळतो असे महाराष्ट्राचे लाडके निसर्गकवी ना. धों. महानोर यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. साध्या सोप्या शब्दांमध्ये आणि सहज गाता येणाऱ्या चालीमध्ये कविता लिहिण्याची हातोटी त्यांच्याजवळ होती. जैत रे जैत, निवडुंग या चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली गाणी आजही लोकांच्या तोंडावर रुळली आहेत. असा निसर्गकवी आज हरपला. भावपूर्ण श्रद्धांजली !
ठाणे जिल्ह्यातील शहापूर नजीकच्या सरलांबे गावात समृद्धी महामार्गाच्या बांधकामादरम्यान गर्डर आणि लॉंचर कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन या ठिकाणाची पाहणी केली.
या दुर्घटनेत २० मजुरांना जीव गमवावा लागला. अन्य ३ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून हा गर्डर नक्की का आणि कसा कोसळला याची चौकशी सुरू आहे.
या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने ५ लाख रुपयांची तर केंद्र शासनाने २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय हे काम करणाऱ्या दोन्ही कंपन्यांनी प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मजुरांबद्दल आपली सहवेदना व्यक्त केली आहे, असे यावेळी सांगितले.
गेल्या काही दिवसांत राज्यातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला, या पावसामुळे अनेक भागांमध्ये असणारे रस्ते आणि पूल नादुरुस्त झाले. पावसामुळे रस्त्यांवर निर्माण झालेल्या खड्डयांच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता ही कामे झाली पाहिजेत.
याच पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत राज्यातील सर्व रस्त्यांची दुरुस्तीकामे तसेच पुरहानीनंतर रस्त्यांवरील खड्डे भरण्याबाबतच्या कामांचा विभागनिहाय आढावा घेतला.
रस्ते तसेच पुलांच्या दुरुस्तीची कामे तत्परतेने करावी तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांची कामे ठरलेल्या मुदतीत दर्जात्मक पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
रस्ते देखभाल व दुरुस्ती कार्यक्रम, वार्षिक देखभाल दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत करावयाच्या कामांसाठी गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या कंत्राटदारांचीच नियुक्ती करावी. त्याचप्रमाणे कंत्राटदारांनी कामाच्या ठिकाणी आवश्यक प्रमाणात साधनसामुग्री, मनुष्यबळाची उपलब्धता व आवश्यक बाबीची पूर्तता करत असल्याबाबत क्षेत्रीय स्तरावर याचे सनियंत्रण संबंधित अधिकाऱ्यांनी करावे, असेही सांगितले.
या बैठकीला व्हर्च्युअल माध्यमातून विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा पाटणकर-म्हैसकर, सचिव सदाशिव साळुंखे, सचिव दशपुते यांच्यासह कार्यकारी अभियंता, विभागीय अधिकारी उपस्थित होते.
#Monsoon #Rain #Road #Bridge #potholes #PWD #BJP4महाराष्ट्र #Maharashtra
#बीजेपी #Dombivali #महाराष्ट्र #RavindraChavan #रविंद्र_चव्हाण
#डोंबिवली #डोंबिवलीकर
#Dombivli
#NarendraModi #India #PMModi
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्रभूमीत धर्मांध वृत्तीला थारा नाही, हे राज्याचे कणखर गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. धुळे शहरातील टीपू सुलतानचे बेकायदेशीर स्मारक जमीनदोस्त होणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी खुशखबर आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रात अशा क्रूरकर्म्यांचा उदो उदो आम्ही महाराष्ट्रवासी कधीच खपवून घेणार नाही.
#DevendraFadnavis #CMOMaharashtra #हिंदुत्व #महायुतीसरकार #BJP #BJP4Maharashtra #BJP4महाराष्ट्र #Maharashtra #बीजेपी #Dombivali #महाराष्ट्र #RavindraChavan #रविंद्र_चव्हाण #PWD #डोंबिवली #डोंबिवलीकर #Dombivli
सध्याचं जग फार आधुनिक आहे. त्यात शिक्षणपद्धती देखील आधुनिक झाली आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी राबवलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे आज तळागाळातील विद्यार्थ्यालाही सर्व पद्धतीचं शिक्षण मिळत आहे. आज पालघर दौऱ्यावर याची प्रचिती आली.
#Palghar#education#student#BJP
अभिनंदन प्रतीक्षा बागडी!
सांगलीत सुरु असलेल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सांगलीची प्रतीक्षा बागडीने चांदीची गदा पटकावण्याचा मान मिळवला आहे. आपल्या कल्याणची वैष्णवी पाटील उपविजेती ठरली. तुम्हा दोघीनांही पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा!
#PratikshaBagadi
हा आदित्य इतका बदमाश आहे की स्वतःच्या हितासाठी तो कोणालाही विकू शकतो. आजोबांचा पक्ष यांनी रसातळाला नेला, खरा राग सगळ्यांचा ह्याच्यावर आहे तरी हा निर्लज्ज्यासारखा फिरत असतो. चौकशीत माहिती पडेल हा हल्ला यानेच घडवून आणला आहे, स्वतःचं संरक्षण वाढवण्यासाठी, हा एक नंबर नीच आहे.
कुर्यात बटोर्मंगलम्
पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे नातू आणि सचिन दादा धर्माधिकारी यांचे चिरंजीव कु. श्रीयन यांच्या व्रतबंधाला रेवदंडा इथे उपस्थित राहून चि. बटूस आशीर्वाद दिले.
१००% विजय आपलाच !!!
आज मा.श्री.ज्ञानेश्वर म्हात्रेजींनी विधानपरिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. ज्ञानेश्वरजी, विजय आपलाच होणार आहे.
आमच्या सीमावर्ती बांधवांसाठी संपूर्ण महाराष्ट्र शेवटपर्यंत लढणार. कर्नाटकच्या शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करतो.
#BJP#BJP4Maharashtra#BJP4Maha