महाराष्ट्रात हे काय सुरू आहे आणि पालिका कुठे आहे
@mybmc@mybmcWardS#पवई तलाव #jvlr#मुंबई
अस्वच्छता, तलाव दूषित करणे प्रकार सुरू असून इतके उघड दिसत असताना कारवाई नाही?
अंधश्रध्दाच्या नावाखाली' धर्माच्या नावाखाली महाराष्ट्रात सांस्कृतिक अतिक्रमण देखील या परप्रांतीयाकडून सुरू आहे,
हे फक्त रोजगार व्यवसायासाठी नाही आलेत हे कब्जा/ ताबा मिळवायला आलेत.
प्लॅस्टिक बंदी असताना इतके प्लास्टिक पाण्यात/तलावात सोडलेले आहेत
कोणाचेही नियंत्रण नाही.
@TawdeRitu@ashwinibhide
#लोंढेआवरा #महाराष्ट्रवाचवा
#मराठीएकीकरणसमिती
"No nation can be grateful at the cost of its liberty" हे उद्गार आहेत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. नोव्हेंबर १९४९ ला भारतीय राज्यघटनेचा मसुदा सादर करताना त्यांनी हे अतिशय महत्वाचे उद्गार काढले होते.
एखाद्या नेत्याच्या आंधळ्या भक्तीसाठी किंवा त्याच्या तऱ्हेवाईक वागण्याला खतपाणी घालण्यासाठी या देशाची स्वातंत्र्य, अभिव्यक्ती ही मूल्य अजिबात पणाला लागता कामा नयेत.
हे वाक्य आज पुन्हा म्हणावं लागतंय. कारण मोदी आणि शाह या जोडीच्या मनात आणि डोक्यात अत्यंत पराकोटीची हुकूमशाही बसली आहे . या हुकूमशाहीच्या जोरावर या जोडीने देशातील सगळ्या यंत्रणांना काबीज करून जी सत्ता मिळवली. आणि जी सत्ता फक्त मूठभर उद्योगपतींच्या हितासाठी राबवली जात आहे. सत्तेच्या या मस्तीला विरोध केला, त्याच्या विरोधात निदर्शनं केली म्हणून, जर आंदोलकांना चिरडलं जाणार असेल आणि त्यांना अटक केली जाणार असेल तर, त्यांच्या या बेबंदशाहीला या देशातून खालपासून वरपर्यंत उखडूनच काढलं पाहिजे !
या देशांत आंदोलनं करायचीच नाहीत? तुम्हाला प्रश्न विचारायचेच नाहीत ? आंदोलन करणं हा अधिकार हिरावून घेणारे तुम्ही कोण ? भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन ३ ऑक्टोबरपासून दिल्लीत आंदोलनं सुरु आहेत. दिल्ली पोलिसांना हाताशी धरून हे सरकार फक्त आंदोलकांना चिरडत होतं असं नाही तर हे आंदोलन कव्हर करणाऱ्या महिला पत्रकारांचा पण छळ करत होतं.
आज दिल्लीत आंदोलनं होतील या भीतीने दिल्लीत मेट्रो सेवा बंद केलीत, रस्ते अडवलेत, इंटरनेट सेवा बंद केली आहे, बस सेवा थांबवली आहे, आंदोलकांना विमानातून उचलून नेलं जात आहे. ही कोणती पद्धत ? देशातील २०,३० वर्षांचे तरुण तरुणी अस्वस्थ आहेत, त्यांना त्यांचं भविष्य दिसत नाहीये, म्हणून ती शांततेत रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत आणि तुम्ही त्यांनाच चिरडायचा प्रयत्न करताय? जगभर मोदी जाऊन आमच्या देशात लोकशाही आहे हे आता कोणत्या तोंडाने सांगणार आहेत ? ही असली लोकशाही?
मला समजत नाही या ज्ञानेश कुमारबद्दल इतकं प्रेम का ? ज्ञानेश कुमार आणि त्या आधीचे निवडणूक अधिकारी हे तुमचे सत्ता काबीज करण्याचे मार्ग आहेत म्हणून ? निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे, त्याच्या प्रमुखाने काही गोंधळ घातला असेल तर त्याचा राजीनामा व्हायलाच हवा. तसंच संपूर्ण निवडणूक यंत्रणा ही प्रामाणिक आणि पारदर्शक असायला हवी या मागणीत गैर ते काय ? माझ्या मताचा अधिकार काढून घेतला जातोय, किंवा माझं मत कुठे आणि कोणाला जातंय हे मला समजत नाहीये. आणि त्यातून माझ्या मताचा अपमान होतोय हा राग व्यक्त करण्याचा अधिकार पण नसावा ? का वरच्या दोघांना भीती आहे की ज्ञानेश कुमारला राजीनामा द्यायला लागला आणि त्याने माझे मतचोरीचे करवते धनी कोण हे जर सांगितलं तर आत्तापर्यंतचं सत्तेचं सगळंच बिंग फुटेल म्हणून!
भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ (१) (अ) आणि (ब) यानुसार नागरिकांना शांततेत निदर्शनं करण्याचा पूर्ण अधिकार आहे. हा अधिकार तुम्हाला का चिरडायचा आहे ? काल तर चक्क माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील विचारलं, माशी मारायला हातोडा कशाला वापरताय ?. बरं आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि सोडून दिलं असं सहसा महाराष्ट्रात पोलीस डिपार्टमेंट करतं. आणि हे करताना नागरिकांच्या संविधानिक अधिकारांना धक्का बसणार नाही हे पाहतात. पण इथे दिल्लीत तर महिला पत्रकार ज्या हे आंदोलन कव्हर करत होत्या, त्यांच्या तक्रारी आहेत की पोलिसांनी स्थानबद्ध केल्यावर त्यांचा छळ केला म्हणून. जर आंदोलन कव्हर करणाऱ्यांचा छळ होत असेल तर आंदोलकांना नीट वागवतील याची काय खात्री ?
या देशातील तरुणांनी तुम्हाला झुकवलं आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला लावला हा राग अजून शमला नाहीये असं दिसतंय. अण्णा हजारे आंदोलनाच्या वेळेस मोदी-शाह गुजरातमध्ये आंदोलनं होऊ देत होते कारण ती फायद्याची होती. पण त्याच गुजरातमध्ये त्यांनी सत्तेच्या काळात त्यांच्या सरकारच्या विरोधातील अनेक आंदोलनं चिरडली. थोडक्यात हे बेगडी आणि दुटप्पी आहेत हे स्पष्ट दिसतंय.
नेटफ्लिक्सवर एक डॉक्युमेंट्री आहे, How to Become a Tyrant (tyarant म्हणजे जुलमी शासक ) ही डॉक्युमेंट्री बहुदा अमित शाह रोज गांभीर्याने बघत आहेत असं दिसतंय. त्यापेक्षा ज्या गुजरातमधून तुम्ही येता त्याच राज्यातून आलेल्या महात्मा गांधींनी शांततेतली केलेल्या आंदोलनांबद्दल आणि स्वातंत्र्य चळवळीबद्दल जरा वाचा. अर्थात यांच्याकडून मी अपेक्षा का बाळगतोय हेच समजत नाही ! असो . . .
प्रति,
श्री. देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
सस्नेह जय महाराष्ट्र,
महाराष्ट्रात अतिवृष्टीने जो धुमाकूळ घातला आहे, त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे अवगत असालच. महाराष्ट्राचा असा कुठलाही भाग शिल्लक राहिलेला नसेल जिथे अतिवृष्टीने नुकसान केलं नसेल. आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलल्यावर, लक्षात आलं आहे की, कित्येक ठिकाणी जमीन पूर्णपणे खरवडून वाहून गेलेली आहे. मे महिन्याच्या मध्यात जो पाऊस सुरु झाला आहे, त्याने जवळजवळ उघडीप घेतलीच नाहीये त्यामुळे, शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली आहे...
त्यामुळे सरकारने खालील सूचनांचा विचार करावा.
१) कुठल्याही निकषांच्या चौकटीत न लावता, सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा. एकरी ७ आणि ८ हजार रुपये इतक्या तुटपुंजी नुकसान भरपाईने काहीही होणार नाही. त्याऐवजी एकरी किमान ३० हजार रुपये नुकसान भरपाई घोषित करा. कारण आता शेतकऱ्याची घडी बसायला किमान १ वर्ष लागेल.
२) गेल्या काही वर्षातल्या बेफाम उधळपट्टीने, राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झालेली असली तरी, सरकारने हात आखडता घेऊ नये. वेळेस केंद्राकडे पाठपुरावा करावा आणि मदतीचं पॅकेज केंद्राकडून मिळवावं. केंद्र सरकारने बिहारला असं पॅकेज या आधी दिलं आहेच त्यामुळे महाराष्ट्राला द्यायला काही हरकत नसावी. आणि त्यासाठी दिल्लीचा जो काही पाठपुरावा करावा लागेल तो करावा. फक्त स्वतःच्या वैयक्तिक तक्रारींसाठी किंवा घटक पक्षातील संघर्षासाठी आम्ही दिल्लीत जातो असं चित्र न दिसता, सरकारमधले सगळे पक्ष राज्यासाठी पण दिल्लीत धाव घेतात हे पण राज्याला दिसू दे.
३) अशा आपत्तीचा पहिला फटका बसतो तो मुला-मुलींच्या शिक्षणाला. एकाही मुलाचं शिक्षण बंद होणार नाही. त्याला लागणारी वह्या-पुस्तकं मिळतील आणि अशा परिस्थितीत सहामाही परीक्षा देताना मुलांच्या मनाची काय स्थिती असेल याचा सरकारने विचार करून काही कृती तात्काळ करावी. हिंदी भाषा लादताना दाखवलेली चपळाई आणि आग्रहीपणा इथे पण दिसेल अशी अपेक्षा.
४) या अशा आपत्तीनंतर रोगराई प्रचंड वाढते त्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग सतर्क राहील हे देखील सरकारने पहावं. जिल्हा रुग्णालयांपासून ते आरोग्य केंद्रांपर्यंत, सगळीकडे औषधांचा तुटवडा पडणार नाही हे सरकारने पहावं.
५) अशा संकटानंतर कर्जाच्या हप्त्यासाठी सुरु होणारा बँकांचा तगादा हा फारच तापदायक विषय असतो. एकतर बँकांना योग्य ती समज सरकारने आत्ताच द्यावी, अन्यथा आमचे महाराष्ट्र सैनिक ती देतीलच.
सरकारने बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे हे सरकारचं कामच आहे. पण त्याची जाहिरातबाजी ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. त्यामुळे या सगळ्या मोहापासून दूर राहून सरकारने, प्रशासनाने आता एकरी किमान ३० ते ४० हजाराची मदत घोषित करावी आणि शेतकरी आणि त्याचं कुटुंब पुन्हा उभं राहील हे पहावं.
आपला
राज ठाकरे
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
अखेर महाराष्ट्र शासनानं पहिलीपासून तिसरी भाषा लादलीच. ती ही "हिंदी. मागच्या शासननिर्णयातील "अनिवार्य" हा शब्द काढून "सर्वसाधारण" असा शब्द घेतला आहे.. हा कावा मराठी माणसानं ओळखला पाहिजे. आता आपलं मराठीपण टिकवायचं तर मोठी लढाई लढावी लागेल. जय महाराष्ट्र ! सोबतचा शासननिर्णय नीट वाचा.
#मराठी #शिक्षण
https://t.co/B8NFl11qDl…
प्रत्येक मराठी माणूस जर का असाच जागा झाला, तर परप्रांतीयांना आपल्याबद्दल बोलायचीही हिंमत होणार नाही...!
राजकारण्यांवर भरवसा ठेवून काही उपयोग नाही. अर्धे हिंदीचे तर अर्धे गुजरातचे लाळपुशे झालेत. हे स्वतःच्या स्वार्थासाठी, सत्तेसाठी मायमराठीलाही संपवून टाकतील.
#म#मराठी
False commitments by @Flipkart, order was support to deliver in 24 hours and now it is more than 50 hours. No proper response from the customer care. Is the @Flipkart going to pay the penalty of delay in the delivery. Parcel was to be delivered in Mumbai was in the Mumbai hub now
The parcel is in Surat, is the Mumbai hub shifted to Surat, how pathetic service is this, better i could have ordered by Amazon as they deliver the parcel with in given time.@flipkartsupport
महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री त्यांच्या संगनमताने सुरू आहे का सर्व??
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
उद्या मराठी माणसाचा त्रास होतोय म्हणून महाराष्ट्र सोडावा यासाठी देखील याचिका होईल ना
@mieknathshinde कित्येक मार्केट आधीच बंद केलेत कित्येक ठिकाणी मराठी माणूस देशोधडीला लावला.
गुजरातमध्ये #HSRP नंबर प्लेटसाठी 160 रुपये तर महाराष्ट्रात 531 रुपये का?
दोन्ही राज्यात नंबर प्लेट देणारी कंपनी एकच, पण तरीही महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये वेगवेगळे रेट का?
गुजरातच्या कंपनीसाठी महाराष्ट्राची लूट का?
सरकार यावर उत्तर देईल का?
@Dev_Fadnavis#HSRPScam | #Maharashtra | #जनतेचीलूट |
सर @Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
लोढा सांगतील तसेच वागले पाहिजे असा नियम आहे का?
@RVikhePatil
ही जागा बळकावण्याचे कारण काय?
नक्की कोणासाठी सुरू आहे हे?
असे वेगळं काय असणार जिमखाण्यात जे समजानुसार वाटण्या सुरू आहेत?
मग एक है तो सेफ है चे काय झालं?
असे जातीवर का?
मराठी कोणी वापरायची? @IncomeTaxMum
मुंबई मराठी भाषिक आहे इथे मराठीत कारभार करावा. मराठीचा प्रचार प्रसार व्हावा
जानेवारी महिन्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आहे मोठा कार्यक्रम ठेवा
@AjitPawarSpeaks@nsitharaman
मराठी राज्यात मराठी सोडून हिंदी लादणाऱ्या संस्थांवर कार्यवाही व्हावी
भाजप हरयाणा जिंकला, कश्मीर हरला, महाराष्ट्र-झारखंडमध्ये तसेच घडले; ईव्हीएमवर संशय नको म्हणून असे निकाल लावले जातात का? शरद पवार यांनी घेतली शंका
#shardpawar