महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 द्वारे लेखापाल, लेखापरीक्षण अधिकारी व कर निर्धारण इ. पदे भरण्यात येत असून रिक्त पदांच्या तुलनेत कमी पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या विषयाकडे सभागृहात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे सरकारचे लक्ष वेधले. #WinterSession
मा. एकनाथ शिंदे साहेब,
#नगरविकास विभागाची #लेखापाल आणि #करनिर्धारणची परीक्षा नुकतीच पार पडली आहे. लेखापालसाठी ३५७ जागा रिक्त असताना जाहिरात केवळ २४७ जागांची तर करनिर्धारण साठी ९८४ हून अधिक जागा रिक्त असताना केवळ ५७९ जागांची जाहिरात काढण्यात आली. वास्तविक ५ वर्षानंतर ही परीक्षा होत असल्याने तसेच १०० % जागा भरण्यास मान्यता असल्याची बाब लक्षात घेऊन सर्वच पदांची जाहिरात काढणे अपेक्षित होते. परंतु संपूर्ण रिक्त पदांची जाहिरात न काढल्याने लेखापालची १०६ आणि करनिर्धारणची ४०५ जागा अद्यापही रिक्त आहेत.
त्यामुळे या संपूर्ण जागा भराव्यात, अशी विद्यार्थ्यांची रास्त मागणी आहे. तरी विद्यार्थ्यांच्या या मागणीचा विचार करुन नगरविकास खात्याच्या या पदांसह शासनाच्या इतर सर्व विभागांच्या २.५ लाख रिक्त जागा भरून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही विनंती!
@CMOMaharashtra@mieknathshinde
नगरपरिषद भरती 2023 मधील आठ संवर्गातील सरळसेवेसाठी रिक्त असणार्या सर्व पदांचा समावेश या जाहिरातीत करण्यात यावा. नगरपरिषद संवर्गातील अनेक पदे रिक्त आहेत. त्यानुसार जागा वाढीचा निर्णय घेण्यात यावा ही विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks