इथल्या ट्विटरकरांचे मनापासून धन्यवाद!
गेली अनेक वर्षे समाज माध्यमातून #मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून या माध्यमावर आपण सर्वांनी लढा सुरू ठेवला होता! त्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
प्रा. हरी नरके सर यांचेही योगदान विसरता येणार नाही. आज त्यांचीही आठवण येतेय!
सॉरी.. थोडंसं offbeat..!
पण संकर्षण कऱ्हाडे ला तोड नाही. माणसाने किती टॅलेंटेड असावं ह्याच एक उत्तम उदाहरण आहे तो. मी सकाळपासून ऑलमोस्ट ६-७ वेळा ही कविता ऐकली असेन… ऐका तुम्ही पण. 😌🙌🏻🫡
#सहज
💐🙏"आई जिजाऊंच्या मनातील ज्या क्रांतीच्या ठिणगीने विराट वणव्याचे रौद्ररुप धारण करत मायभूमीला स्वातंत्र्याचा मोकळा श्वास व रयतेला हक्काचं स्वराज्य दिलं त्या सह्याद्रीच्या तळपत्या सुर्याला मानाचा मुजरा. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा"🙏💐
#शिवजयंती🚩
आज शिवशंभु राज्याभिषेक दिन.
सन १६८१ साली, संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला होता. संभाजी राजे शिवरायांनंतर स्वराज्याचे दुसरे #छत्रपती झाले
स्वराज्याला धाकलं धनी मिळालं
दिल्ली झाली दीनवाणी । दिल्लीशाचे गेले पाणी ।।
ताराबाई रामराणी । भद्रकाली कोपली ।।
विखुरलेल्या मराठयांना एकत्र आणुन राजाविना ७ वर्ष औरंग्याच्या सैन्याला सळो की पळो करून सोडणाऱ्या राणी ताराबाई यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन...🙏❤️
#महाराणी