🗓️ २१ ऑगस्ट २०२६ | 📍 दादर रेल्वे पोलीस वसाहत
सुरक्षित निवास… मजबूत संरचना… पोलीस कुटुंबीयांच्या सुविधांना प्राधान्य!
आज दादर रेल्वे पोलीस वसाहतीला सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), रेल्वे पोलीस वसाहतीचे संबंधित कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांसमवेत भेट देऊन परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी पोलीस वसाहतीतील इमारतींच्या स्ट्रक्चरल कामांची सद्यस्थिती, आवश्यक दुरुस्ती व सुरक्षिततेच्या दृष्टीने करावयाच्या कामांचा आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कामे योग्य पद्धतीने व प्राधान्याने पूर्ण करण्याबाबत चर्चा केली.
आपल्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस बांधवांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षित व सुस्थितीतील निवास व्यवस्था मिळावी, यासाठी आवश्यक पाठपुरावा सातत्याने करण्यात येईल.
पोलीस कुटुंबीयांची सुरक्षितता आणि सुविधा… हीच आपली जबाबदारी !!!
#Dadar #RailwayPolice #PoliceQuarters #PWD #StructuralWork #PublicSafety #Mumbai #Shivsena
📍 #नवी_दिल्ली |
देशाचे आदरणीय पंतप्रधान @narendramodi जी यांची आज त्यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी उपस्थित राहून #शिवसेना खासदारांसह सदिच्छा भेट घेतली. या भेटीत लोकसभेचे संसदीय अधिवेशन, त्यातील कामकाज, शिवसेनेच्या खासदारांची भूमिका तसेच राज्यात सुरू असलेली विकासकामे, केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वय, राज्यातील पाऊसपाण्याची सद्यस्थिती यावर सविस्तर चर्चा झाली.
पंतप्रधान महोदयांनी या भेटीवेळी दाखवलेले आदरातिथ्य, त्यांची आपुलकी आणि राज्याच्या विकासाबाबत घेतलेली सहकार्याची भूमिका पाहता त्यांच्याबद्दलचा आम्हा सर्वांच्या मनातील आदर अधिकच दुणावला.
यावेळी शिवसेना पक्षाचे संसदीय गटनेते खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, रवींद्र वायकर, नरेश म्हस्के, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाघचौरे, संजय दिना पाटील, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि राज्यसभेतील खासदार प्रा.डॉ.ज्योती वाघमारे उपस्थित होत्या.
#NarendraModi #PrimeMinister #NewDelhi #Shivsena #EknathShinde #Maharashtra
@Shivsenaofc@DrSEShinde@MPShrirangBarne@RavindraWaikar@nareshmhaske@SDPatil_16@OmRajenimbalkr@SanjayJadhavPbn
'ड्रग्स मुक्त ठाणे' अभियानासाठी युवासेनेच्या GenZ तरुणांचा पुढाकार...
तरुणांना नशेच्या विळख्यातून बाहेर काढत त्यांच्या सुरक्षित आणि निरोगी भविष्यासाठी कटिबद्ध!!!
#Purveshsarnaik#Yuvasena#DrugFreeThane
आज नवी दिल्ली येथे शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेबांनी प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघातील विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत मतदारसंघात सुरू असलेल्या प्रकल्पांची प्रगती, नागरिकांच्या समस्या, तसेच आगामी काळात राबवायच्या विकासकामांबाबत मार्गदर्शन केलं.
दिल्लीतील प्रत्येक संसदीय अधिवेशनादरम्यान शिंदे साहेब सर्व खासदारांशी संवाद साधतात. प्रत्येक मतदारसंघातील कामकाज, जनतेच्या अपेक्षा आणि विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या बाबींवर ते बारकाईने चर्चा करून योग्य मार्गदर्शन करतात. जनतेशी असलेली बांधिलकी आणि विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्याची त्यांची कार्यपद्धती या बैठकीत पुन्हा एकदा स्पष्ट दिसून आली.
@Shivsenaofc@mieknathshinde@SDPatil_16
#nareshmhaske #EknathShinde #ShivSena #Maharashtra #MaharashtraDevelopment
अमित शहा संसदेत येतील तेव्हा विरोधक पळून जातील...🔥
देशभक्तीवर अमित शाहजी यांना शिकवण्याची गरज नाही...
"हम खून देंगे, लेकिन देश की जमीन का एक इंच भी नहीं देंगे," ही त्यांची भूमिका नक्षलवाद आणि दहशतवादाविरुद्धच्या ठाम लढ्याची साक्ष आहे. वेळ आल्यावर संसदेतही ते प्रत्येक आरोपाला ठोस उत्तर देतील.
@mieknathshinde जी.
राष्ट्रवादी काँग्रेस व उबाठा गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!
मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांवर विश्वास व्यक्त करत दापोली तालुक्यातील विविध गावांतील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (उबाठा) गटातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
वांझळोली गावठाण वाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस व उबाठा गटातील सुरेश पवार, सुनील शिगवण, सुरेश सावंत, संदीप सावंत, श्रीधर डेरे, कमलेश शिगवण, अनिल भितले, सुनील धाडवे, मुकेश फागे, बिजल धाडवे, सुदीप पवार, महेश सावंत, दशरथ सावंत, उमेश डेरे, राजेंद्र बडबे, सचिन सावंत, नितेश धाडवे, राजेंद्र दुर्गवले, संतोष शिगवण, किरण फागे आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
यासोबतच आमखोल गावातील उबाठा गटाचे गावप्रमुख व मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष श्री. नरेश करण, तसेच केळशी जिल्हा परिषद गटातील उबाठा गटाचे पराभूत उमेदवार श्री. गुणाजी गावणूक यांनी विकासाच्या भूमिकेला पाठिंबा देत शिवसेनेचा भगवा हाती घेतला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व प्रवेशकर्त्यांचे भगवी शाल व श्रीफळ देऊन उत्साहात शिवसेनेत स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी पं. स. सभापती श्री. उन्मेष राजे, विधानसभा संपर्कप्रमुख श्री. सुधीर कदम, श्री. सुनील दळवी, जि. प. सदस्य श्री. नितीन दुर्गवले, पं. स. सदस्य श्री. संदीप चिखले, कुणबी सेवा संघ मांदिवली गटाचे अध्यक्ष श्री. गणेश गावणूक, युवासेना उपविभाग अध्यक्ष श्री. कमलेश जाधव, युवासेना सल्लागार श्री. युवराज पावसे, युवासेना सचिव श्री. निलेश तांबे, मांदिवली युवासेना अध्यक्ष श्री. रुपेश बंगाल तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@LahariyaRashmi@Dev_Fadnavis आदरणीय मुख्यमंत्री साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना आपणास उदंड व निरोगी आयुष्य लाभो हीच आमची मनोकामना.
📍 #पंढरपूर |
शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी आषाढी वारीनिमित्त काल पंढरपुरात जिल्हा प्रशासनाने केलेल्या सोयी सुविधांचा आढावा घेतला.
यानिमित्ताने पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या पात्रात केलेल्या सोयीसुविधा, भक्ती सागर येथे वारकऱ्यांसाठी उभारण्यात आलेले आयसीयू सेंटर यांची पाहणी एकनाथ शिंदे साहेबांनी केली. तसेच चंद्रभागा नदीत बोटीतून फिरून ठिकठिकाणी केलेल्या सोयी सुविधांचा आढावा घेतला. येत्या आषाढी एकादशीला वारकऱ्यांना चंद्रभागेत स्नान करतेवेळी कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी सर्व ती दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.
#Shivsena #EknathShinde #pandharpur #pandharpurwari
@ECISVEEP@airnewsalerts@DDNewslive@DDNewsHindi@PIB_India SRA च्या अंतर्गत जी नोंदणी सुरू आहे त्याबद्दल आम्ही नोकरदार वर्ग रविवारी फक्त सुट्टी असते त्यात आमची काही वैयक्तिक कामे हमखास असतात आणि सोमवार ते शनिवार पर्यंत कामावर जाणे आवश्यक असते माझी आपणास एक विनंती आहे की जी नोंदणी तिचा कालावधी कमीतकमी एक महिना वाढवणे गरजेचे आहे.
कारगिल येथील द्रास येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिलो. तसेच कारगिल येथील वॉर मेमोरियलला अभिवादन देखील करण्यात आले. याचे काही संस्मरणीय क्षण..!!
#Shivsena#DrShrikantEknathShinde#kargil