आज #पुणे जिल्ह्यासाठी #रेडअलर्ट दिलेला असून पुढील ३ ते ४ तासांत जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ५०-६० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे-जिल्हा प्रशासनाचे आवाहन
हे हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला
यांच्या पक्षाला शून्य जागा मिळाल्या एवढेच नाही तर स्वतः उपमुख्यमंत्र्यांचे डिपॉझिट जप्त झालं आहे
मागच्या वेळी स्वतःच्या विधानसभा मतदारसंघात 92 हजार मतं मिळवून जिंकले होते, यावेळी अवघी 7 हजार मते.. पाचव्या क्रमांकावर
2019 ला भाजप विरोधात प्रचार करून 10 जागा जिंकल्या, किंग मेकर ठरले, नंतर सत्तेसाठी भाजपसोबत गेले
पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर सरकारमधून बाहेर
महाराष्ट्रात कुणाचा दुष्यंत होईल?
खरंच शरद पवार जातीयवादी आहेत का?
शरद पवारांमुळे ज्यांचे राजकारण वाढले, शरद पवारांनी ज्यांना राजकारणात संधी दिली, मदत केली अशा अनेक लोकांची यादी इथे देतोय.
अरुण गुजराथी
मधुकर पिचड
लक्ष्मणराव ढोबळे
छगन भुजबळ
प्रफुल्ल पटेल
हसन मुश्रीफ
सुनील तटकरे
विमलताई मुंदडा
अमोल कोल्हे
बाबाजानी दुर्रानी
फौजिया खान
नवाब मलिक
ख्वाजा बेग
जयदत्त क्षीरसागर
मदनलाल बाफना
जितेंद्र आव्हाड
मनोहरराव नाईक
गणेश नाईक
सचिन अहिर
विजयकुमार गावित
नरहरी झिरवाळ
दिलीप सोपल
सुधाकर परिचारक
गुरुनाथ कुलकर्णी
उदय सामंत
दीपक केसरकर
हेमंत टकले
वसंत डावखरे
राम पंडागळे
राम शेंडगे
सुमंत गायकवाड
जयदेव गायकवाड
रामराव वडकुते
प्रकाश गजभिये
मिलिंद कांबळे
ना धों महानोर
लक्ष्मण माने
उषा दराडे
रमेश बंग
जयराम पंचबुद्धे
धर्मराव आत्राम
जगदीश वाळवी
सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे
संजय बनसोडे
विनय कोरे
राजकारण ज्यांना अलिकडच्या काळात कळू लागलं असे लोक शरद पवारांवर जातीवादाचा शिक्का मारतात. त्यांच्यासाठी शरद पवारांनी पन्नास वर्ष काय केले आहे याची काहीच कल्पना त्यांना नसते, पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यानंतर आपल्या पक्षाचे पहिले प्रदेशाध्यक्ष ओबीसी नेमले. पक्षाची जी काही बॉडी होती, त्यात इतर जातीतील जास्त लोकांना संधी दिली गेली. वर दिलेल्या यादीनुसार एवढे राजकारणी आहेत ज्यांचे राजकारण शरद पवार यांच्यामुळे पुढे आले, यादी फक्त राष्ट्रवादी स्थापन केल्यापासूनची आहे. ही सगळी लोकं शरद पवारांचे उपकार मानतात, अशी राज्याच्या राजकारणात असणारी आणि होऊन गेलेली अनेक नावे आहेत. मला जेवढी नावे मिळाली तेवढी इथे टाकली आहेत, जिल्हा पातळीवर पाहिले तर असे अजून खूप नावं पुढं येतील. ही सगळी लोकं शरद पवारांमुळे उभा राहिलेली आहेत. बाकी विरोधी पक्षातील लोकांना केलेली मदत तो भाग तर खूप मोठा आहे. तुम्हाला दिसेल कि सगळ्या जातसमूहातील लोकांना शरद पवारांनी राजकीय प्रतिनिधित्व दिले आहे, आमदार, खासदार केलं आहे. जे लोकांतून निवडून येऊ शकत नाहीत त्यांना परिषदेत संधी दिलेली आहे.
शरद पवारांनी साहित्यिक, कलाकार यांना मदत तर केलीच पण त्यांना राजकीय संधी हि दिली. जसे उपरा ही कादंबरी ज्यांनी लिहिली ज्या लेखकाने स्वतः ला उपरा समजले त्या उपराकार लक्ष्मण माने यांना विधानभवनाचे दार शरद पवारांनी दाखवले. किंवा कवी ना धों महानोर असतील, साहित्यिक रामदास फुटाणे जे शिंपी समाजाचे होते त्यांनाही साहेबांनी विधानपरिषदेवर संधी दिली. वंचित घटकातील व्यक्तींना जितकी संधी पवार साहेबांनी दिली आहे तितकी इतर पक्षात कुणीही दिली नसेल. नुसते राजकीय प्रतिनिधित्व नव्हे तर शरद पवारांनी सत्तेची भीडभाड न ठेवता मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा निर्णय घेतला, महाराष्ट्रात मंडल आयोग त्यांनी लागू केला, महिला आरक्षणाचा निर्णय असेल किंवा आणलेले महिला धोरण असेल या मागील हेतू हा वंचित घटकाला न्याय देणे हाच होता. शरद पवारांनी इतकचं केलं असे नाही तर रामदास आठवले यांच्यासारख्या वंचित घटकातील मात्र चळवळीत असणाऱ्या व्यक्तीला जनतेतून निवडून आणण्याचे काम सुद्धा केलं, त्यामुळे आठवले हे कधीही शरद पवारांना नावे ठेवत नाहीत त्यांचे ऋणच व्यक्त करतात. आजच्या पिढीला पवार साहेबांचे काम माहित नाही, त्यामुळे ते असा प्रश्न विचारतात की शरद पवार यांनी काय केलं? मराठे म्हणतात आमच्यासाठी शरद पवारांनी काय केलं ? इतर म्हणतात पवारांनी आमच्यासाठी काय केले? शोधले तर सापडेल पवारांनी तुमच्यासाठी काय केलेय, तसे शरद पवार हा माणूस एका जातीत बांधला जाऊ शकत नाही. त्यांनी आपल्या आयुष्यात सर्व जातीच्या लोकांना न्याय देण्यासाठी अहोरात्र संघर्ष केला, मेहनत घेतली. आताच्या पिढीला हे माहिती नाही, याची जाणीव नाही.
@AjitPawarSpeaks भाजपच्या एका गुजराती केंद्रीय मंत्र्याला महाराष्ट्रातून तिकीट मिळते आणि तो गुजराती भाषेत त्याचे आभार मानतो हे मराठी धोरणाला घातक नाही का?