राजकारण हे दंडाच्या बळावर नाही, बुद्धीच्या कसरतीवरच करावं लागतं!
स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांनी पुरोगामी महाराष्ट्राचं स्वप्न मांडलं अन् पवार साहेबांनी याच यशवंत विचारांचा वारसा आणि वसा समर्थपणे जोपासला.
महाराष्ट्राचे चालतं बोलतं विद्यापीठ!
जन्मदिनाच्या शुभेच्छा साहेब❤️💐
#शरदपवार
मित्रहो,
ठाणे, शास्त्रीनगर येथील छोट्याशा चाळीत राहणाऱ्या विजय गुजर यांचे घर काल शॉर्टसर्किटमुळे पूर्णपणे जळून खाक झाले. ते स्वतः रिक्षाचालक असून त्यांची मुलं शिक्षण घेत आहेत.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण त्यांच्या आयुष्यभराचा संसार एका क्षणात नष्ट झाला, जमवलेल्या सर्व कुटुंबपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. आज या कुटुंबास पुन्हा उभं राहण्यासाठी आपल्या मदतीची खूप गरज आहे.
आपण शक्य असेल ती आर्थिक मदत, वस्तूरूप मदत किंवा इतर कोणतीही मदत करू शकता. कृपया मला मेसेज, कॉमेंट किंवा फोन करून कळवा. तुमची अगदी छोटी मदत सुद्धा या कुटुंबासाठी नवी सुरुवात ठरू शकते. तसेच ठाणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांना सुद्धा विनंती करतो की आपल्या परीने या कुटुंबाला मदत करावी 🙏🏻
@CMOMaharashtra@mieknathshinde@Awhadspeaks@Dev_Fadnavis@JadhavMns@mnsadhikrut
दशकं जातात विकासकामांचं वेड असणारा एक लोकनेता घडायला. सध्याच्या किळसवाण्या राजकारणात लोकहिताच्या किंवा महाराष्ट्र पुढे जावा या भावनेने काम करणारे नेते बोटावर मोजण्याइतके दुर्मिळ झालेत. अजितदादांचं अकाली निधन राज्याचं प्रचंड राजकीय नुकसान करणारं आहे. महाराष्ट्राला आज सुतक लागलंय.
नेते नावाला विरोधात, प्रत्यक्षात सगळे मिलीभगत. सामान्य माणसाने यातल्या कोणाचीही लफडी बाहेर काढायला जावीत तर बळी मात्र त्याचाच. पोलीस आणि व्यवस्था नेहमीच सत्तेच्या हातातले बाहुले. विचारधारा वैगेरे लसूण मानणारे कोणी ऐनवेळी साथ देत नाही. घोडा लागतो तो सामान्य माणसाच्या आयुष्याला. 💔
सांगलीतील पर्यटकांनी सांगितले, ड्रायव्हरने जीव वाचवला..गाईड आणि स्थानिकांनी मदत केली..जेवण दिले..
धर्मांध दहशतवादी बळी घेतात पण सामान्य जनता मात्र माणुसकी दाखवते! माणुसकी जिंकलीच पाहिजे! #माणुसकी#pehalgam#Maharashtra
हा आहे सैयद हुसैन शाह...पहेलगाम मध्ये पर्यटकांना घोड्यावर फिरवण्याच काम करणारा. दहशतवादी हल्ला झाला तेव्हा त्याने हे आपले पाहुणे आहेत. या 'मासुम' पर्यटकांना मारू नका अशी विनंती दहशतवाद्यांना केली. पण तरीही दहशतवादी ऐकत नाही म्हंटल्यावर सैय्यद दहशतवाद्यांच्या अंगावर चालून गेला आणि त्यांच्या हातातली रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात दहशतवाद्यांनी सैय्यद हुसेन शाह ला गोळी मारून त्याची हत्या केली. पहेलगामच्या मृतांमध्ये हा ही एक "कश्मिरी"...
@prash_dhumal गाळे सुधा देत नाहित हे लोकं.
गुजरात वरून बक्कळ भांडवल आणतात, जागा घेतात, residential सोसायट्या बांधतात.
आपल्याच राज्यात, आपल्याच गावात मोठे होतात. आणि आपल्याला यांच्याकडून अडचण झालीच तर आपले पुढारी सुधा ह्यांच्याच बाजूने उभा राहतात.
@ivaibhavk नाशिक मध्ये पण एक सोसायटी आहे, तिथं गुजराथी मारवाडी सोडून कोणालाच फ्लॅट ना विकत दिला ना भाड्याने राहून देतात.
यांचा किराणा, औषधे, ई गृहोपयोगी वस्तू सुधा हे जातीतल्या च माणसांकडून घेतात. वरून आपल्याला सांगतात त्याच्याकडे फ्रेश माल असतो तिथूनच घेत जा.
तमाम महाराष्ट्रायिन लोकांना अचंबित करणारे जनमत महायुतीला मिळाले आहे, हा निकाल सर्वांना अचंबित करणारा आहे. कारण विजयाचा जल्लोष भाजपच्या कार्यकर्त्यांत फारसा दिसला नाही. त्यांनाही हे सगळं अनपेक्षित असावं. या निवडणुकीत जे ५-१० हजारांच्या फरकाने येणार होते ते ३०-४० हजारांच्या फरकाने आले आहेत. लोकांनी इतकं भरभरून प्रेम दिलं आहे तर तो जल्लोष का दिसत नाही हा साधा प्रश्न आहे. लोकांचा कौल आहे म्हणावं तर लोकांत कौल दिल्याची भावना नाही, की त्याचा विजयी जल्लोष नाही. पण हा जनमताचा कौल आपण स्वीकारला पाहिजे.
महाराष्ट्राच्या आजवरच्या राजकीय इतिहासात असा एकतर्फी निकाल कधी लागला नाही. महायुतीचे नेते, कार्यकर्ते, त्यांच्यासाठी झटणाऱ्या इतर संघटना आणि त्यांचे मतदार यांचे अभिनंदन. जनमताचा हा कौल मोठ्या मनाने मान्य, महाराष्ट्र राज्य हे विरोधीपक्ष मुक्त झाले. पुढील पाच वर्ष विरोधाला कोणी शिल्लक ही राहिले नाही, हीच काय ती चिंतेची बाब. पण जनतेने आपल्यावर राक्षशीप्रेम दाखवले आता त्यांच्या अपेक्षांवर आपण पूर्ण उतराल अशी अपेक्षा, जाहीरनाम्यातील इतर गोष्टी नाही पण २ कोटी महिलांना २१०० रुपये पुढील पाच वर्ष मिळतील हे तरी आम्ही पक्के समजतो.
विरोधी पक्ष हरला नसून महाराष्ट्राचे मूळपण हरले, इथले महापुरुष, विचार, संस्कृती हरली. फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांवर संघाच्या विचारांनी मात केली. राजकीय व्यभिचाराला राजमान्यता महाराष्ट्र देईल अस कधी वाटल नव्हत. पण आता सत्तेत असल्यावर काहीही करा अन् निवडणूक तोंडावर पैशांच्या योजना काढून पुन्हा निवडून या ही रीत पडली. महाराष्ट्रा सारख्या राज्यात ही स्थिती व्हायला नको होती. पण असा पायंडा पडल्याने आता हे काही लवकर बदलणार नाही.
मला तसे दोन लोक फार आवडतात, एक एमएस धोनी अन दुसरे शरद पवार, दोघांच्या ही कारकिर्दीचा शेवट गोड झाला नाही याचे शल्य कायम मनाला बोचत राहील. मला व्यक्तिश शरद पवार या व्यक्तीबद्दल वाईट वाटले. इतकं काही करूनही शेवटच्या राजकीय लढाईत महाराष्ट्राने त्यांना साथ दिली नाही. यशवंतरावांचा शेवटचा काळ जसा गेला तोच काळ शरद पवारांच्या वाटेला येऊ नये अशी प्रार्थना.
तसा मी जातीय चष्म्यातून कधी लिहीत नाही पण मराठा समाजाचे महाराष्ट्रातील राजकारणावरचे प्रभुत्व संपले. आता जे काही मराठा नेते आहेत ते हुजरे मराठे. महाराष्ट्र मराठेत्तर राजकारण्यांच्या हातात गेला. साहित्य, कला, संस्कृती, माध्यमे इथे मराठ्यांना फारसी आत्मियता नव्हती इथे अल्पसंख्याक हे होते. मराठ्यांचा प्रभाव असणारे राजकारण हेही त्यांच्या हातून निसटले असून राजकारणातील त्यांची सत्ता ढासळली. आता कोणी देशपातळीवरच्या राजकारणात प्रभाव टाकेल असा नेता या समाजाचा नाही. २०१४ पासून असंख्य पराभव पाहिले पण कालचा शरद पवारांचा पराभव प्रचंड जिव्हारी लागला, त्यामुळे कुठतरी थांबावे म्हणतो.
काही चुकल असेल तर क्षमस्व!🙏
ब्रेकिंग
शिर्डीत विखे पाटील यांच्या कॉलेजमधील बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी मतदान केले? लोणी येथील अहिल्याबाई होळकर मतदान केंद्रावर या विद्यार्थ्यांना उमेदवार प्रभावती घोगरे काकीनी प्रश्न विचारले,पण त्यांच्याकडे उत्तर नाही! निवडणूक आयोग काय करत आहे?