प्रिय
@UberFacts@Uber@UberSoc@Uber_Support@uber
आज मी सोबतच्या फोटोत असलेल्या ड्रायव्हरसोबत प्रवास केला.मी त्याच्याशी मराठीत बोललो.तो हिंदीतच बोलत राहिला.ते सुद्धा उद्धटपणाने .
तुमच्या सेवेत तुम्ही मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय हिंदू आणि मुसलमान भरती केले आहेत.
या सगळ्यांना महाराष्ट्र सरकारचा मराठीसक्तीचा नियम लागू आहे का नाही? तुमच्या लोकांना तुम्ही वागण्याबोलण्याच्या पद्धती शिकवता की नाही?
मूर्ख सरकारने @MahaDGIPR एक वर्षाची सवलत दिली आहे.
पण त्याआधी तुम्ही तुमच्याकडे काम करणाऱ्यांचं अधिवास प्रमाणपत्र (domicile certificate) तपासलं होतं का ?
नसेल तर असा माणूस मुंबईत उबर कसा चालवू शकतो?
मी त्याच्याशी फक्त वाद घातला आहे.पण त्याचं वागणं पाहता एखादा प्रवासी त्याला रट्टे देईल.
तोवर तुम्ही काही कारवाई करणार आहात का?
@PratapSarnaik मीरा- भाईंदर आणि घोडबंदर रस्त्यावरच्या जमिनींच्या व्यवहारातनं मोकळे झाला असाल तर ज्या खात्यासाठी तुमची नेमणूक झाली आहे ते करू शकाल का?
मराठीसक्तीवर तुमच्यासारखा गुवाहाटीचा लाभार्थी काही करू शकेल अशी अपेक्षा नव्हतीच.
पण तुम्ही भय्यांपुढे लाळ गाळलीत म्हणून मराठी लोक गप्प बसतील असं नाही.
@ShivSenaUBT_@OfficeofUT@uddhavthackeray@RajThackeray@mnsadhikrut@mnsreport9
तुम्ही महाराष्ट्राला गृहीत धरत आहात का?
@JioHotstar चालू क्रिकेट सामन्यांत आपण आठ भाषांचा समावेश केला त्यामध्ये मराठी भाषा कुठेही पहायला मिळाली नाही का बरं? मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही मराठी भाषा समाविष्ट का केली नाही? तुम्हाला चिंधी भाषेचा वापर वाढवायचा आहे का ? #म
एक तप झालं.
बरोब्बर १२ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी आपला "विकास आराखडा" महाराष्ट्राला सादर केला.
ह्यावर काम करणाऱ्या गटात काम करण्याची मिळालेली संधी हा एक संपन्न अनुभव होता. साधारण सहा वर्ष आणि साडे-चार महिन्यांच्या ह्या कामातून एक वेगळी दृष्टी मिळाली ..
#महाराष्ट्र #विकासआराखडा
ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद (?) वदवतायंत. असो ,
गेले २ दिवस ज्ञानेश कुमार हे गप्प झालेत आणि त्यांना बोलतं करणारे पण कुठेच दिसत नाहीयेत. ज्ञानेश कुमार यांच्यासारख्याना हाताशी धरून आपण कसे सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलोत हे भारतीय जनता पक्ष सांगत होतं हे लक्षात आलं असेल. आणि यासाठी त्यांनी २०२५ पासून एसआयआर हे नवं अस्त्र हाती घेतलं आहे.
एसआयआरमध्ये काय घोळ झालेत आणि यावर निवडणूक आयुक्तच बोलत आहेत हे बघितल्यावर, एकच पर्याय दिसतो तो म्हणजे ही एसआयआरची संपूर्ण प्रक्रियाच रद्द केली गेली पाहिजे. आणि यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही मागणीच आहे की आत्ता झालेलं एसआयर पूर्ण रद्द करा, त्यात कसे घोळ झाले याची निष्पक्ष चौकशी करा आणि नव्याने ही प्रक्रिया करा.
तसेच , यापुढे सर्व निवडणुका व्होटिंग मशिनवर न घेता पुन्हा बॅलेट पेपरवरच घेण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन मोठं आंदोलन उभं केलं पाहिजे !
तरच इतक्या वर्षांच सत्तेचं सत्य बाहेर येईल !
काल इंडिगोच्या विमानाने प्रवास केला.
इंडिगो ही माझी तशी पहिली चॅाईस कधीच नसते. परंतू हल्ली सर्वच एअरलाईन्स एअर इंडियाला आदर्श मानून प्रवासाला लागल्याने “मग दुसरा काही पर्याय असेल तर सांगा” या विवेकी , सर्वमान्य व सर्वदूर पोहचलेल्या फिलोसॅाफीमुळे इच्छा असो की नसो त्यानेच प्रवास करावा लागतो.
खरं तर वीसेक वर्षांपूर्वी ज्यांनी एअर इंडीया, जेट एअरवेज, काही वर्षांपूर्वी विस्तारा आणि सार्वकालीन - सर्वश्रेष्ठ किंगफिशर एअरलाईन्सने प्रवास केलाय त्यांनाच खरा राजेशाही विमानप्रवास म्हणजे काय ते ठाऊक आहे.
कधीकधी तर वाटते आजच्या पिढीला हे कळावे म्हणून श्री श्री श्री विजय मल्ल्यांना भारतात बोलावून पुन्हा एकदा किंगफिशर एअरलाईन्स चालू करू द्यावी. लोकांना नक्की बेस्ट एअरट्रॅव्हल काय असतो तो तरी एकदाचा कळेल.
बाकी त्यांच्या भानगडी हा वेगळा विषय. पण किंगफिशर म्हणजे भारतीय हवाई प्रवासाला पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं असं माझं ठाम मत आहे. यावर पुन्हा कधीतरी सविस्तर चर्चा करूया.
तर मुळ विषयाकडे येतो. विषय आहे इंडिगोच्या विमान प्रवासाचा आणि त्यांनी प्रवासात दिलेल्या खाद्यपदार्थांचा.
चार - साडेचार तासांचा आंतरराष्ट्रीय प्रवास. विमान सूरू झाल्या झाल्या एअरहोस्टेसने पाण्याची बाटली दिली. मी नेहमीच्या सवयीने लेबलं पाहिलं - Blue Fire नावाची पाण्याची बाटली. मग उत्सुकता म्हणून त्याचा बॅाटलिंग प्लांटचा पत्ता पाहिला. तो पत्ता होता, हिमाचल प्रदेशचा.
थोड्या वेळाने कुकीज आणि रेडीमेड मसाला चहा दिला. त्याच्या कुकीजचा डबा मला नेहमीच आवडतो. (कुकीज पेक्षा). त्याचाही मॅनुफॅक्चरींग ॲड्रेस पाहिला. तो निघाला थेट तामिळनाडूचा.
पुढे काही मिक्स ड्रायफ्रुट्स दिले. त्याच मॅन्युफॅक्चरिंग होतंय बंगलोरला, कर्नाटकात. शेवटी एक छोटीशी मिठाईची वडी दिली. ती बनलेली होती दिल्लीत.
विमानात जेवण म्हणून जे दिलेलं ते रेडी टू इट प्रकारातलं होतं. ते ही चौकशी केल्यावर कळालं की ते ही तामिळनाडूमध्येच बनतंय. विशेष म्हणजे इंडीगोचा तो जूना आणि मोठा सप्लायर आहे.
एक काळ होता जेंव्हा भारतीय विमानसेवेत अशा खाद्यपदार्थांमधे मुंबई आणि दिल्लीची जवळपास मक्तेदारी होती. आता ती तशी जवळपास मोडीत निघालीये.
या पारंपारिक “हब ॲंड स्पोक” मॉडेलला इंडिगोच्या “पॉईंट टू पॉंईट” बिझनेस फिलॉसॅाफीने ने सर्वच बाजूंनी धक्का दिलाय. आता आंतरराष्ट्रीय प्रवासात मात्र त्यांनी मध्यम मार्ग स्विकारून हायब्रिड मार्ग स्वीकारला आहे असं एकंदर दिसतंय. त्याचाही त्यांना फायदाच होतोय.
आता मुद्दा क्रमांक दोन. येत्या काळात भारतात विमान प्रवास अजून वाढेल. ( काही तज्ञांच्या मते बुलेट ट्रेन किंवा अजून काही फास्ट ट्रेन्स सूरू झाल्या तर विमान प्रवास थंडावेल वगैरे वगैरे) पण मला तसं वाटतं नाही. ज्या पद्धतीची आपली लोकसंख्या आहे, भारताची भौगोलिक रचना आहे, त्याप्रमाणे यात नक्कीच प्रचंड वाढ अपेक्षित आहे. तसेच या खाद्यपदार्थांची विक्री तसेच पर्यायाने उत्पादनही खूप वाढेल. या सोबतच अजूनही याच्याशी संबंधीत अनेक उद्योग वाढतील.
महाराष्ट्रातील अनेक तरूणांनी या क्षेत्रात उतरायला हवं. Clear पाण्याचा ब्रॅंड असो किंवा पेपरबोट किंवा असे बरेचशे कन्झ्युमर ब्रॅंड्स जे अशाच प्रकारचा व्यवसाय करत मोठे बनलेत. त्यांचा आदर्श आपण घ्यायला हवा.
या सर्व व्यावसायिक प्रोसेसमधे प्रचंड कष्ट लागतात. दररोज जवळपास फायनलचीच परिक्षा द्यावी लागते. “स्पर्धा परीक्षांसारखं एकदा पास की आयुष्यभर पास” असं काही सुखावह आयुष्य नक्कीच नाही. पण जर यश मिळालं तर “मागची पुढची सगळी ब्लडलाईन - तुमच्यावर गर्व करेल” हे मात्र नक्की. दुसरं तुम्ही तुमच्या कमावलेल्या पैशांचा वापर चांगल्या गोष्टींसाठी अभिमानानं करू शकाल.
या क्षेत्रात फक्त व्यवसायच नाही तर नोकरीच्या खूप संधी आहेत. त्यासाठीची स्किल्स शिकली तरी चांगल्या पगाराची महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर सहज नोकरी मिळू शकते. फुड टेक्नॉलाजी, सेल्स, मार्केटिंग, इंजिनियरींग, प्रोसेस ऑटोमेशन, तसेच लोअर अन मिडल मॅनेजमेंटमधे अनेक ठिकाणी तुम्हाला संधी मिळू शकते.
बाकी या प्रवासात तरी मला महाराष्ट्रातलं काहीच मिळालं नाही ही खेदाची बाब वाटली. नवी मुंबई एअरपोर्ट सूरू होत असल्याने इकडे आजूबाजूला अशा प्रचंड इंडस्ट्रीज आता येऊ घातल्यात. तीच काय आशादायी बाब.
त्यामुळे यात आपल्या मराठी मंडळींनी लक्ष घालायला हरकत नाही. (जयंत्या, सण, उत्सव यासाठी वर्गणी किंवा खडी रेती सिंमेट दम देऊन विकण्यापेक्षा) पुर्ण तयार, दर्जेदार, कायमस्वरूपी, अधिक मानाचा असा शाश्वत उद्योग कधीही चांगला.
त्याच विमानात टिश्यू पेपर दिलेला त्यावरच वाक्य या लेखाचा शेवट करताना - दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम।
आता विचार आणि कृती आपल्याला करायची आहे.
प्रति,
मा. श्री. अमित शहा
केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार
नवी दिल्ली.
सस्नेह जय महाराष्ट्र !!
विषय : महाराष्ट्राच्या भूमीवर आयोजित हिंदी राजभाषा संमेलनात महाराष्ट्राच्या राज्यगीताचा सन्मानपूर्वक समावेश करावा तसेच नवी मुंबईतील "महाराष्ट्र भवन" व "मराठी भाषा भवन" उपकेंद्र बांधकाम पूर्णत्वाची निश्चित तारीख जाहीर करावी याबाबत.
महोदय,
नवी मुंबईत वाशी येथे आयोजित करण्यात येत असलेल्या अखिल भारतीय "हिंदी राजभाषा संमेलनाच्या" निमित्ताने आपण महाराष्ट्रात येत आहात. देशाच्या विविध भाषा, संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करणे ही भारतीय संघराज्याची आणि संविधानाची मूलभूत भावना आहे. परंतु एकाच राज्यात दोन वेळा हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या या संमेलनात हिंदीचा सन्मान करताना ज्या महाराष्ट्राच्या भूमीवर हा कार्यक्रम होत आहे, त्या महाराष्ट्राच्या मातृभाषेचा, अस्मितेचा आणि सांस्कृतिक ओळखीचा सन्मान होणे हीदेखील तितकीच आवश्यक बाब आहे.
हिंदी ही भारतातील एक व्यवहाराची भाषा आहे, हे आम्ही मान्य करतो; महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधताना महाराष्ट्राच्या राज्यगीताला स्थान देणे हा कोणत्याही भाषेचा अपमान नसून महाराष्ट्राच्या भूमीचा आदर आहे. म्हणूनच या संमेलनाच्या अधिकृत कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यगीत समाविष्ट करून त्याचा सन्मान राखला जावा.
याच पार्श्वभूमीवर दुसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आम्ही आपल्या निदर्शनास आणून देत आहोत तो म्हणजे आपण नवी मुंबईतील ज्या कार्यक्रमासाठी वाशी येथे येत आहात त्या परिसरात विविध राज्यांची भवने दिमाखाने उभी आहेत त्यांच्या माध्यमातून त्या-त्या राज्यांच्या नागरिकांसाठी त्यांची संस्कृती, प्रशासन, उद्योग, पर्यटन आणि सामाजिक ओळख मांडण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु कार्यक्रमापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महाराष्ट्र भवनच्या राखीव भूखंडावर प्रत्यक्ष काम सुरु होण्यास अनेक वर्ष गेली. मुळातच तो भूखंड विकण्याच्या मानसिकतेत असलेल्या सिडको प्रशासनाचा डाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलनाच्या माध्यमातून हाणून पाडला गेला त्यामुळेच आज महाराष्ट्राच्या भूमीवर महाराष्ट्राचे स्वतःचे भव्य ‘महाराष्ट्र भवन’ उभे करण्याचे स्वप्न महाराष्ट्रातील जनतेला पाहता येत आहे.आपण देशाचे गृहमंत्री म्हणून महाराष्ट्रात येत असताना या प्रश्नाकडे केवळ एका इमारतीच्या बांधकामाचा विषय म्हणून पाहू नये. इतर राज्यांची भवने तत्परतेने उभी राहिली परंतु महाराष्ट्र भवनचे प्रत्यक्ष काम सुरु होण्यास इतका विलंब का लागला हा प्रश्न वारंवार महाराष्ट्राच्या जनतेला पडत आहे. महाराष्ट्र भवन म्हणजे महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यातील येणाऱ्या सर्वसमावेशक घटकासाठीची ओळख, महाराष्ट्राची संस्कृती, मराठी भाषा, कला, साहित्य, उद्योग, पर्यटन आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या अभिमानाचे केंद्र असणार आहे. त्यामुळे त्याचे बांधकाम पूर्ण होण्याची उत्सुकता साहजिकच आमच्या मनात आहे.
तिसरा आमच्या जिव्हाळयाचा आणि अस्मितेचा प्रश्न म्हणजे ऐरोली येथील मराठी भाषा भवन उपकेंद्र. विशेष म्हणजे महाराष्ट्रात हिंदी भाषा संमेलन आयोजित करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारची यंत्रणा, नियोजन आणि प्रशासकीय क्षमता वापरली जाऊ शकते परंतु ज्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याच मराठी भाषा भवन उपकेंद्राची जागा असून देखील वीट रचता येऊ नये हे गंभीर आहे. जर त्या संदर्भात देखील आपण पुढाकार घेवून त्याच्या भूमी पूजनाच्या कार्यक्रमाचा निर्णय जाहीर केला तर मराठी अभिजात भाषेचा प्रचार व प्रसार होण्याचे ते केंद्र बनेल आणि इतर भाषिक लोकांचा मराठी शिकण्याचा मार्ग सुकर होईल.
म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी स्पष्ट आहे हिंदी संमेलन घेऊन हिंदीचा सन्मान करताय पण महाराष्ट्रात येताना मराठीचाही सन्मान करा. हिंदी भाषेचा उत्सव साजरा करा पण महाराष्ट्राच्या राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्याचा मोठेपणही दाखवा.त्याच बरोबर महाराष्ट्र भवन आणि मराठी भाषा भवन उपकेंद्राच्या नावाने वर्षानुवर्षे सुरू असलेली प्रतीक्षा आता संपवा.
त्यामुळे आपण या संमेलनाच्या व्यासपीठावरून महाराष्ट्राच्या जनतेसमोर घोषणा करावी की नवी मुंबईतील महाराष्ट्र भवन संपूर्ण बांधून लोकार्पण कधी होणार व मराठी भाषा भवन उपकेंद्राच्या राखीव भूखंडावर प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार, भूमिपूजन कोणत्या तारखेला होणार आणि कोणत्या निश्चित कालमर्यादेत पूर्ण होणार. ‘लवकरच’ किंवा ‘लवकरच पूर्ण होईल’, ‘प्रक्रिया सुरू आहे’ अशा सर्वसाधारण उत्तरांपेक्षा महाराष्ट्राला आता निश्चित तारीख आणि निश्चित कालमर्यादा ह्याची स्पष्टता हवी आहे.ती आपण द्याल ही अपेक्षा.
गजानन श्रीकृष्ण काळे
राज्य प्रवक्ता / शहर अध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
नवी मुंबई
आदरणीय अमित शहाजी आपण वाशी नवी मुंबईत
हिंदी भाषा संमेलनाला येतच आहात ...
तर कृपया आपल्या संपूर्ण कार्यक्रमात
जय जय महाराष्ट्र माझा हे " राज्यगीत "
आवर्जून एकदा तरी लावावे ...
सोबत वाशी येथे अजूनही अपूर्ण अवस्थेत असलेले
" महाराष्ट्र भवन " तर ऐरोली येथे अजूनही कामाला सुरुवात न
झालेले " मराठी भाषा भवन" उपकेंद्र कधी पूर्ण होणार
याची तारीखही जाता जाता जाहीर करावी अशी समस्त महाराष्ट्राच्या
वतीने आग्रहाची विनंती ...
पश्चिम बंगाल मध्ये भाजप चा मुख्यमंत्री मंदिरात मासे,मटन खातोय ?
इथे राजसाहेब फक्त मटण हंडी बोलले की झोंबतय भाजपवाल्याना ...
काय खायचे,काय नाही खायचे याचा
शहाणपणा फक्त महाराष्ट्रात आणि मराठी माणसाला शिकवणार ...
पश्चिम बंगाल,आसाम ,गोवा मध्ये गुडगे टेकणार ...
Nothing disgusting and shameful about it. When building societies refuse to give flats to non-vegetarians, that is shameful. When there are no non-veg restaurants between Walkeshwar and Marine Drive in Mumbai, save maybe one, then that is surprising.
You eat what you want; we eat what we want.