#राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अखेर झालाच, विद्यार्थ्यांच्या एकजुटीचे हे यश आहे. आदरणीय पवार साहेब नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहिले आणि आयोगाकडे पाठपुरावा केला त्याबद्दल साहेबांचे देखील आभार!
#MPSC ने आपली जबाबदारी पार पाडली आता #combine जागावाढीबाबत शासनानेही लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही विनंती!
@Dev_Fadnavis@mpsc_office
@News18lokmat शांततामय मार्गाने चाललेल्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका.
आपल्याच व्हिडिओखाली आलेल्या प्रतिक्रिया पाहून एकदा आत्मपरीक्षण करा.
https://t.co/sXc0yGbn8w
s
combine जागवाढ तसेच राज्यसेवेतील विविध तांत्रिक त्रुटी, sebc आणि ews आरक्षणा संबधी बाबी साठी एमपीएससी मुलांचे आंदोलन चालू आहे......पोरांनी अभ्यास सोडून आंदोलनच करायचे का?
२ वर्षांनंतर आलेल्या add मधे तुटापुंज्या जागा काढून विद्यार्थ्यांवर अन्नाय होतोय...
#combine_जागावाढ
क्लासेसची आंदोलनाला फूस आहे या बातमीत काहीही तथ्य नाही.
12 मार्चपासून विविध समस्यांना सामोरे गेलेल्या विद्यार्थ्यांना शेवटी शांततामय मार्गाने आंदोलन करण्याची गरज पडली आहे.
विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी उभे केलेलं हे आंदोलन आहे.
@CMOMaharashtra@mpsc_office
बातम्यांसाठी पत्रकारांना पैसे दिले जात आहेत अशी खोटी ऑडिओ क्लिप तयार करून आंदोलनाला बदनाम केलं जात आहे.
अशा व्यक्तींचा/प्रवृत्तींचा विद्यार्थ्यांच्या शांततामय आंदोलनाशी काहीही संबंध नाही.
पत्रकारांनी या प्रश्नाशी जबाबदारीने दखल घेऊन जनमत तयार करण्यास आपल्याला सहकार्यच केलं आहे.
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संयुक्त पूर्व परीक्षेच्या (#combine) विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या जागावाढ संदर्भात काल भेट घेतली. ही परीक्षा दोन वर्षांनंतर होतेय. त्यामुळे आयोगाने घेतलेल्या वयवाढीच्या निर्णयाचा फायदा सदर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर, ४८० जागांची म्हणजेच (PSI 216, STI 209, ASO 55, SR 0) ही जाहिरात तुटपुंजी आहे.
अशा परिस्थितीत जागावाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. या सर्व जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने शासनाला आणि आयोगाला देखील जागावाढ करण्यास कुठलीही अडचण असण्याचं कारण नाही. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवणार असून आज दूरध्वनीवर देखील संपर्क साधणार आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, ही देखील विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मी आयोगाच्या अध्यक्षांशी बोललो असता, आयोगाने १५ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पाठवण्यास सांगितले होते. परंतु सदरील बैठक काही कारणास्तव काल होऊ शकली नाही. ही बैठक आज होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिले आहे. यासंदर्भात आयोगाने विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा; सकारात्मक निर्णय घ्यावा.
"पुस्तकं हातात आणि हक्कासाठी रस्त्यावर!"
राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेची तयारी करणारी मुलं सध्या आंदोलनात उतरली आहेत. हा केवळ अभ्यासाचा विषय नाही, हा न्याय आणि विश्वासाचा प्रश्न आहे.
एकीकडे विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यास करा असं सांगितलं जातं, पण दुसरीकडे आयोगाची अनिश्चितता, बेजबाबदार धोरणं, आणि अपारदर्शक प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.
ऑक्टोबर 2023 ला होणारी परीक्षा कोणतंही ठोस कारण न देता जानेवारी 2024 ला पुढे ढकलली गेली होती – तेव्हा आयोगाला काहीच अडचण वाटली नाही. मग आज जेव्हा जाहिरात, पात्रता, वयोमर्यादा, आरक्षण यासारखे अनेक unresolved issues आहेत, तेव्हा का बरं ही आडमुठी भूमिका?
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे राजकीय षडयंत्र म्हणून पाहणं सोपं आहे, पण ही मुलं तुमच्या माझ्यासारखंच सामान्य, मेहनती आहेत – ज्यांनी आयुष्याच्या वर्षं या परीक्षेसाठी झोकून दिली आहेत.
आज जर हे प्रश्न सोडवले गेले नाहीत, तर ही जाहिरात वर्षानुवर्ष न्यायालयात अडकून राहणार – आणि भरकटणार ते या मुलांचं भविष्य.
सरकारने आणि आयोगाने ही ठेवावी – विद्यार्थ्यांच्या संयमाची कसोटी घेणं थांबवा!
प्रश्न परीक्षा घेण्याचा नाही, न्याय देण्याचा आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office@Mpsc_Andolan
विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करून राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ नोटीफिकेशनच्या दिवसापासून कमीत कमी ४५ दिवस पुढे ढकला.
Combine परीक्षेसाठी सर्व संवर्गाच्या जागा सरकारने आयोगाला पाठवाव्या आणि जाहिरातीत जास्तीत जास्त पदे समाविष्ट करावीत.
हे सर्व निर्णय तातडीने घ्या नाहीतर आम्ही पक्ष म्हणून विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरू.
: मा.श्री. हर्षवर्धन सपकाळ
अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी
#MPSC
#Postpone_MPSC_Mains_2024
#Last_Objective_Exam
महाराष्ट्राची तरुण पोरं रात्रंदिवस राज्यसेवेचा अभ्यास करत जीवनाशी संघर्ष करत आहेत. PSI सारख्या पोस्टसाठी जागा रिक्त असताना देखील सरकार जागा जाहीर करत नाही, त्यातल्या त्यात 2024 exam 2025 मधे होऊन सुद्धा तुटपुंज्या जागा. हे फक्त वेळेचं वाया जाणं नाही तर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे.दुसरीकडे, पुण्यात शांततामय मागणीसाठी जमलेल्या MPSC विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई म्हणजे या राज्याच्या संवेदनशीलतेवर एक काळी छाया आहे. शिक्षण, संघर्ष, मेहनत करून प्रशासनात यायचं स्वप्न पाहणाऱ्या या विद्यार्थ्यांवर अन्याय केला जातोय.
राज्यसेवा 2024 चा निकाल दोन वेळा लागतो, सुधारित निकालामुळे अनेक विद्यार्थ्यांचे 45 दिवस वाया जातात, आणि तरीही मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची साधी मागणी सरकार फेटाळते? हे फक्त तांत्रिक बाबी नाहीत, हे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा, संघर्षाचा आणि संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे.महाराष्ट्राच्या जबाबदार नेतृत्वाने याचे भान बाळगत विद्यार्थ्यांना अनुकूल अशी व्यवस्था करायला हवी.
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office@Mpsc_Andolan
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४
सरकार आणि आयोगास ठणकावून सांगतो की,
विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेणे ही तुमची जबाबदारी आहे, कृपा नव्हे! त्यामुळे राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित निकालापासून किमान ४५ दिवसांचा वेळ द्यावाच लागेल. ही केवळ मागणी नाही तर विद्यार्थ्यांचा हक्क आहे. तसेच
कंबाईन परीक्षेच्या सर्व संवर्गाच्या जास्तीत जास्त जागा तातडीने आयोगाकडे नोंद करा आणि जाहिरातीत कमाल पदसंख्या समाविष्ट करा.
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीनुसार होणारी ही शेवटची मुख्य परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांचा आटापिटा सुरू आहे. त्यांच्या भविष्यासोबत खेळू नका..!!
#MPSC
#Postpone_MPSC_Mains_2024
#Last_Objective_Exam