विद्यार्थ्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागला !
'महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) परीक्षा-२०२०' मधील एकूण २१७ उमेदवारांपैकी न्यायप्रविष्ट असलेल्या EWS प्रवर्गातील २१ जागा वगळून इतर प्रवर्गातील १९६ शिफारस प्राप्त उमेदवारांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन, त्या संदर्भातील विविध विभागांची बैठक घेऊन त्यावर सकारात्मक तोडगा काढला.
गेल्या दोन वर्षापासून SEBC उमेदवारांना EWS प्रवर्गात समावेश करण्याचा शासन निर्णय रद्द झाल्याने शिफारस प्राप्त उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित होता. या प्रश्नाचा सतत पाठपुरावा केला आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावला. गेल्या दोन वर्षापासून प्रल��बित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने आज या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यासंदर्भात आज मंत्रालयात काही उमेदवारांनी भेट घेतली, पुष्पगुच्छ देऊन आभार मानले आणि पेढे भरवून आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांच्या चेहर्यावरचा आनंद बघून मनाला समाधान मिळालं.
विद्यार्थ्यांना येणार्या अडचणी सोडविण्यासाठी महायुती सरकार तत्पर अ��ून, विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीर उभं आहे. अशी भावना व्यक्त करत उपस्थित उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते.
#Mumbai #Mantralaya #Students #CivilExamination #Engineering #Candidates #EWS #SEBC #RavindraChavan #PWD
धन्यवाद माननीय सा.बां.विभाग मंत्री @RaviDadaChavan जी आपल्या पुढाकारामुळे स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षा 2020 मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सा. बां.विभागामध्ये वर्ग 1 पदावर रखडलेले नियुक्तीचे आदेश निर्गमित केल्याबद्दल खूप आभार#MPSC
विरोधी पक्ष नेते मा.विजय वडे्टीवार यांनी स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा -२०२० च्या १९६ उमेदवारांचे (EWS प्रवर्ग वगळून) ०२ ऑक्टोबर पासून सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनाची दखल घेत @ABPNews ला दिलेली प्रतिक्रिया.
सरकार कधी देणार नियुक्ती?
#MPSC#MES2020#PWD#WRD
#90%Joining
MPSC अभियांत्रिकी सेवा २०२० मधील न्यायप्रविष्ट १०% EWS प्रवर्ग सोडून बाकीच्या ९०% उमेदवारांना नियुक्ती देणे शक्य आहे.उत्तीर्ण विद्यार्थी घ��� दार सोडून हलाखीच्या परिस्थितीत आंदोलन करत आहेत,शासनाने ही बाब गांभीर्यानी घेऊन नियुक्तीचा मार्ग मोकळा करावा ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
@RRPSpeaks MPSC अभियांत्रि��ी सेवा २०२० मधील न्यायप्रविष्ट १०% EWS प्रवर्ग सोडून बाकीच्या ९०% उमेदवारांना नियुक्ती देणे शक्य आहे.उत्तीर्ण विद्यार्थी घर दार सोडून हलाखीच्या परिस्थितीत आंदोलन करत आहेत,शासनाने ही बाब गांभीर्यानी घेऊन नियुक्तीचा मार्ग मोकळा करावा ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
@RRPSpeaks (४/n) तरी मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा विभागाचे मंत्रिमहोदय यांनी बेरोजगार अभियंत्यांना नियुक्ती देऊन त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करावा अन्यथा स्वप्नील लोणकरने मागील वर्षी नियुक्ती मिळत नसल्याने आत्महत्या केली त्याची पुनरावृत्ती नक्कीच होईल
@RRPSpeaks (३/n)
याविषयी विविध आमदार, मंत्रिमहोदय तसेच मा. उपमुख्यमंत्री, मा. मुख्यमंत्री यांनादेखील वेळोवेळी निवेदने दिली असून नियुक्तीसाठी अद्याप कोणतीही पावले उचलली गेलेली नाहीत. यामुळे आधिकारी होऊनही शेतमजुरी, मेंढपाळीची वेळ विद्यार्थ्यांवर आलेली आहे.
https://t.co/jllEJxsafB
@RRPSpeaks (२/n) मा. उच्च न्यायालयाने ९०% उमेदवारांना नियुक्ती देणेबाबत स्पष्टपणे निर्देशित केलेले असताना देखील सरकारकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे बेरोजगार युवा अभियंत्यांविषयी सरकारची अनास्था दिसून येते. सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा व सामान्य प्रशासन यांची एकमेकांकडे टोलवाटोलवी सुरू आहे.
@RRPSpeaks (१/n) महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२० मधील न्यायप्रविष्ट १०% EWS प्रवर्ग सोडून बाकीच्या ९०% उमेदवारांना नियुक्ती देणे शक्य आहे. परंतु अनेक वेळा निवेदने, भेटी देऊनही कुठलीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी २ ऑक्टोबर पासून आंदोलन सुरू केलेले आहे.