MPSC ची तयारी करणाऱ्या परांडा तालुक्यातील (जि. धाराशिव) विद्यार्थी प्रथमेश देशमुख याने पुण्यात आत्महत्या केल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. गेल्या काही काळात पेपरफुटीसह विविध गैरप्रकार होत असल्याने एक स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये डावलल्याची भावना निर्माण होत असून यातूनच त्यांची वर्षानुवर्षे केवळ परीक्षा देण्यातच जातात. त्यातच कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळी परिस्थितीमुळं आईवडील मुलांना शिक्षणासाठी पैसे देऊ शकत नाहीत. अशा वेळी लाखो विद्यार्थी उधार-उसनवार करुन पुण्यासारख्या शहरात अभ्यास करतात पण परिस्थितीमुळं हे पैसे परत करता न आल्याने आर्थिक ताण वाढतो आणि स्वाभिमानालाही ठेच लागते मग यातूनच ते आत्महत्येसारखा मार्ग अवलंबतात, हे अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारने याची गंभीर दखल घेऊन भ्रष्ट अधिकाऱ्यांची तातडीने एमपीएससीतून हकालपट्टी करुन तिथं स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी आणि आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नाची राख केल्याबद्दल त्यांच्या कुटुंबालाही भरीव आर्थिक मदत द्यावी.
@Dev_Fadnavis
मा.@mpsc_office@bhimanwar
औषध निरीक्षक पेपर फोडून मिळवला, पण नुसत्या पेपरफुटीने निवड होणार नव्हती. अंतिम निवडीसाठी मुलाखतीत किमान 41% गुण आवश्यक होते. मग पेपरमध्ये काहीच येत नसलेल्या उमेदवारांना मुलाखतीत 41%+ गुण कसे मिळाले?
हे गुण मिळाले नसते तर पेपर फोडूनही त्यांची निवड झाली नसती. मग मुलाखतीत आवश्यक गुण मिळतील, असे आश्वासन कोणी दिले?
मुलाखत मॅनेज झाली का? आयोगातील कोणत्या “सदस्याची” भूमिका होती? याची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे.@CMOMaharashtra@maha_governor@satejp@INCHarshsapkal
#MPSC #DrugInspector #पेपरफुटी
जबाबदारी झटकण्यासाठी जानेवारी २०२६ मध्ये पेपर फुटल्याचे आपण सांगत आहात, पण मुळात पेपर विद्यार्थ्यांना २० मार्च २०२६ रोजी म्हणजेच परीक्षेच्या दोन दिवस आधी मिळाला होता. त्यामुळे आपण कधी शपथ घेतली आणि कधी पदभार स्वीकारला याचा विषयच येत नाही.
आपण म्हणत असल्याप्रमाणे जानेवारी २०२६ मध्ये पेपर फुटला असेल तर परीक्षेच्या दोन महिने आधीच पेपर फुटला ही बाब अत्यंत गंभीर नाही का ? परीक्षेच्या दोन महिने आधी पेपर फुटला असतानादेखील मार्च मध्ये पेपर घेतलाच का? दोन महिने आयोग झोपा काढत होता का ?
कर्णिक घोटाळ्यासारखेच हे प्रकरण असून आपण जो विश्वासघात केलाय ना त्यामुळे अभ्यास करावा की करू नये ? या द्विधा मनस्थितीत आज विद्यार्थी आले आहेत, लायब्ररीतसुद्धा बसण्याची कोणाची मानसिकता राहिलेली नाही. संवैधानिक पदाची, आयोगावरच्या विश्वासाची, विद्यार्थ्यांच्या भवितव्याची आपल्याला खरंच काळजी असेल तर तत्काळ नैतिकता दाखवत स्वतःहून राजीनामा द्या आणि लाखों विद्यार्थ्यांवर उपकार करा.
राहिला विषय वैयक्तिक आणि राजकीय आरोपांचा, त्यासंदर्भात मी अजून एक टक्का देखील बोललेलो नाही, जेव्हा बोलायला सुरुवात करेल ना तेव्हा आपणच काय तर आपला पाठीराखा असलेल्या सरकारला सुद्धा परवडणार नाही कारण मी पुराव्याशीवाय बोलत नाही.
#MPSC #पेपरफुटी
'पेपरफुटी आणि सावळागोंधळ' ही राज्यातील प्रत्येक भरती परीक्षेची ओळख बनली आहे. आज हायकोर्टाच्या टायपिंग परीक्षेतही हाच प्रकार घडला. लॉगिन न होणे, की-बोर्ड बंद असणे आणि टायपिंग सॉफ्टवेअर न चालणे या तांत्रिक त्रुटींसह पेपरफुटीमुळे राज्यात विविध ठिकाणी संतप्त विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. आम्ही सर्वजण या विद्यार्थ्यांसोबत आहोत. ही सदोष परीक्षा तातडीने रद्द करून फेरपरीक्षा झाली पाहिजे आणि या संपूर्ण गोंधळाला जबाबदार असलेल्यांवर आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
@Dev_Fadnavis
#पेपरफुटी
2 वर्षांपूर्वी सर्व सरळसेवा @mpsc_office द्वारे घेऊ असे शासनाने 18 जुलै 2024 रोजी जाहीर केले होते. त्यानुसार आयोगाने या महिन्यात सरळसेवेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम जाहीर करावा. @bhimanwar सर तुमच्याकडून अपेक्षा आहेत. मनावर घ्या.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
मुख्यमंत्री महोदय ,
विद्यार्थ्यांचा केवळ आणि केवळ ऑफलाईन परीक्षेवरच पूर्णत: विश्वास आहे. विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे तो म्हणजे ऑनलाइन आणि नॉर्मलाइझेशन मधून होणारे घोळ! विद्यार्थ्यांची कुठलीही मागणी नसताना, यूपीएससी सह बहुतांश राज्ये ऑफलाईन परीक्षा घेत असताना आपले सरकार ऑनलाईनसाठी इतके आग्रही का ?
दोन दिवसांपूर्वी आपण विद्यार्थ्यांना ‘कुठलीही शिफ्ट न करता एकाचवेळी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जात नाही तोपर्यंत ऑनलाइन परीक्षा न घेण्याचा’ शब्द दिला होता. आज मात्र एकाच वेळी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात तुम्ही ब्र सुद्धा उच्चारलेला नाही.
एकाच शिफ्ट मध्ये एकाचवेळी परीक्षा घेण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर एका वर्षात उभारले जाणार नाही, हे माहीत असताना सुद्धा ऑगस्ट २०२७ ची टाइमलाईन देण्याचे कारण काय ? आयोगाने दिलेल्या लिंकवर क्लिक करताच TCS च्या साईटला लिंक जाते याचा अर्थ काय ? तसंच कुठलही कारण नसताना, कोणाचीही मागणी नसताना बळजबरीने ऑनलाइन परीक्षा लादण्यामागील कारणे काय? या प्रश्नांची उत्तरे न कळायला विद्यार्थी दुधखुळे नाहीत .
त्यामुळे ऑगस्ट २०२७ काय ऑगस्ट २०४७ उजाडला तरी कोणालाही विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन परीक्षा बळजबरीने लादू देणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
महाराष्ट्र राजपत्रित व अराजपत्रित सेवा गट अ गट ब गट क पूर्व तसेच मुख्य परीक्षा एकच पूर्व व एकच मुख्य एकाचा दिवशी घ्यावी Offline (OMR) वर घेण्यात यावी पणOnline व Normalization आमचा स्पष्ट विरोध आहे @mpsc_office@bhimanwar@RRPSpeaks#mpscexamoffline
@bhimanwar एक प्रामाणिक प्रश्न. खरंच एवढी मोठी भरती होणार असेल तर ती ऑफलाईन होऊ शकत नाही का? आम्ही शेतकऱ्याची पोर आहे साहेब. आम्ही कसे पैसे जमा करून Mpsc ची तयारी करतो आम्हालाच माहिती. तुमच्या एका निर्णयामुळे आम्ही,आमचे घर किती हतबल झाले आहे. माणूस म्हणून एकदा विचार नक्की करा😓
मा.@bhimanwar@mpsc_office ही परीक्षा 23 सप्टेंबर 2025 ला घेतली होती..अजून निकाल नाही याच कारण म्हणजे ऑनलाईन पेपर असून सुद्धा मुंबई मध्ये तुमच्यातील काही लोकांनी पेपर फोडला म्हणे बरोबर का? जे ऐकलं ते सत्य आहे का?8 महिन्यापासून निकाल नाही उमेदवार संख्या केवळ 1000-2000 तरीही अस का?
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करा
आज विधानपरिषदेमध्ये MPSC ची ऑनलाईन CBT परिक्षा विद्यार्थ्यासाठी Computer Based Torture ठरणार असल्याने ती रद्द करावी अशी मागणी केली. या परीक्षेमुळे नॉर्मलायझेशन, सर्व्हर डाऊन, पेपरफुटी, परीक्षा केंद्रांवरील गैरव्यवहार आणि तांत्रिक अडचणी येणार आहेत. UPSC सह अनेक राज्यांमध्ये स्पर्धा परीक्षा ऑफलाईन होत असताना महाराष्ट्रात ऑनलाईनचा हट्ट का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच सरकारने सर्व सरकारी भरती परीक्षांसाठी 'वन टाइम परीक्षा फी' लागू करून विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करावा अशी मागणी केली.
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇
https://t.co/X0BRMCjGLC
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन परीक्षा पद्धतीला विरोध असून ऑफलाईन परीक्षा घेण्याची त्यांची मागणी आहे. यासंदर्भात आमदार रोहितदादा पवार हे उद्या (मंगळवार दि. ३० जून) पुण्यात पत्रकार संघात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
@RRPSpeaks
मा.@mpsc_office@bhimanwar चांगल काम करता करता अचानक हे ONLINE परीक्षा कश्याला? सरळसेवा साठी संख्या कमी असते तिथं ठीक होत पण स्पर्धा परीक्षेत का?नॉर्मलायझेशन मुळे तर सगळी वाट लागली म्हणून तुमच्याकडे सर्व पद आले तर तुम्ही तिकडेच निघाले.4 लाख विद्यार्थी आणि ऑनलाइन परीक्षा चुकीच आहे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, सदर पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार असून गुणांचे समानीकरण करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी विविध निवड मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या संगणक आधारित परीक्षा व समानीकरण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव फारसे समाधानकारक नसल्याने, ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची व्यापक भावना आहे.
विद्यार्थ्यांची ही भावना मी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, उद्या दि. 26 जून रोजी सकाळी 11:00 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे सारथी कार्यक्रमानिमित्त मा. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी मी मा. मुख्यमंत्री महोदय यांचेशी देखील या विषयावर चर्चा करणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी मी स्वतः उपलब्ध असेन.
#MPSC #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #महाराष्ट्र
मा.@mpsc_office@bhimanwar OPTING OUT गैरप्रकार बाबत आपण कारवाई करणार आहात या आश्वासना साठी धन्यवाद...आता लवकरच निर्णय जाहीर कराल अशी अपेक्षा...
तसेच , पुढारी news चॅनल @pudharionline@kirantajne आपण या बातमीला लावून धरल्या बद्दल आणि आयोगा पर्यंत पोहोचल्या बद्दल धन्यवाद...🙏
क्लर्क OPTING OUT साठी 8 लाखाची मागणी....@mpsc_office@bhimanwar MPSC प्रतीक्षा यादी जाहीर न करण्याच्या निर्णयाचा आर्थिक लाभ उचलणारी टोळीचा सुळसुळाट...8 लाखात क्लर्क क्या बात है.... महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे पाहून आनंद होत असेल तुम्हाला ?
@pudharionline@MahaDGIPR
सर्व नोकरभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत जाण्यास सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा मॅडम यांचा मोलाचा वाटा आहे.
येत्या काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोग देशातील क्रमांक एकचा लोकसेवा आयोग होईल याबाबत शंका नाही.
धन्यवाद मॅम 💐💐
संयुक्त पूर्व परीक्षा 2025 संदर्भातील संपूर्ण गोंधळ सरकारने जाहिरात वेळेत न काढल्यामुळे निर्माण झाला आहे. आयोगाच्या नियोजनाअभावी आणि विलंबामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वयाचे गणित बिघडले असून, याची संपूर्ण जबाबदारी शासनावरच येते. शांततेत आंदोलन करणाऱ्या परिक्षार्थिंची मागणी न्याय्य असून त्यावर दडपशाहीचा वापर करून नये तसेच होऊ घातलेली 4 तारखेची पुर्व परिक्षा सरकारने पुढे ढकलावी.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office