काल पुण्यात दिसली तशीच MPSC च्या विद्यार्थ्यांची एकजूट आज छत्रपती संभाजीनगरमध्येही दिसत असून विद्यार्थ्यांच्या या मागण्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आतातरी सरकारने MPSC चे अध्यक्ष आणि सचिवांना पदावरून हटवावं आणि पेपरफुटीप्रकरणात अटक झालेल्या आरोपींच्या कार्यकाळात झालेल्या सर्व परीक्षांची सखोल चौकशी करावी. अन्यथा आज दिसत असलेला विद्यार्थ्यांचा आक्रोश हळूहळू रोषात रुपांतरीत होईल आणि ते सरकारला परवडणार नाही. त्यामुळं सरकारने एमपीएससीच्या परीक्षेत भ्रष्टाचाराची भेसळ करणाऱ्यांना तातडीने खड्यासारखं बाजूला सारून तिथं स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी आणि त्यांच्या इतरही मागण्यांकडं लक्ष द्यावं.
महत्त्वाचं म्हणजे राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांचे असे विराट मोर्चे निघत आहेत. आता लिहून दिलेला मजकूर कॉपी करुन ट्विट करणारे भाजपाचे नेते आणि ४० पैसे कमेंटवर पोट भरणारे बाजारू मोर्चातील या सामान्य परिवारातील मुलांच्या आक्रोशालाही नौटंकी म्हणणार का? मी कालच बोलताना स्पष्ट केलं की, विद्यार्थ्यांचा हा आक्रोश पुण्यापुरता मर्यादित राहणार नाही तर प्रत्येक जिल्ह्यात तो दिसेल आणि आज लगेचच तो छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसला. सरकारने तरीही दुर्लक्ष केलं तर हा आक्रोश थांबेल असं नाही तर यापुढं तो प्रत्येक जिल्ह्यात दिसल्याशिवाय राहणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC_आक्रोश_मोर्चा #MPSC_Protest #छत्रपती_संभाजीनगर #पेपरफुटी
भिमानवार सारखा कोडगा अन बदमाश अधिकारी आजवर पाहण्यात नाही. आयोगाचा अध्यक्ष असून म्हणतो की मी जॉइन व्हायच्या अगोदरच पेपर फुटला होता, पण पेपर ज्या दिवशी झाला त्या दिवशी हाच माणूस अध्यक्ष होता. अध्यक्ष पदाच्या काळात झालेल्या परीक्षांच्या घोटाळ्यांना अध्यक्ष जबाबदार नसतो का? याला कसलीही नैतिक चाड उरलेली नाही.
पुन्हा मग्रूरीने म्हणतोय की पुरावे असल्यावर पद सोडतो. अरे बाबा तुझ्या हाताखालचे अधिकारी जेलात गेलेत, तुझी काही जवाबदारी आहे का नाही? धर्मेंद्र प्रधानचे पण चुकलेच त्याने सुद्धा हेच म्हणायला पाहिजे होते मग. धर्मेंद्र प्रधान काय स्वत पेपर फोडायला गेलेला काय ? अकाउंटेबिलिटी नावाचा काही प्रकार असतो का नाही?
भीमनवारने पत्रकाराना सांगण्यापेक्षा विद्यार्थ्यांसोबत चर्चा करावी. चार विद्यार्थ्यांना सुद्धा याला बरोबर उत्तर देता येणार नाही. हा म्हणतो की पेपर जानेवारीत फुटला, मग याला तो जबाबदार नाही, मग मागचे अध्यक्ष रजनीश शेठ जबाबदार आहेत का? त्यांची चौकशी व्हावी का? पेपर मार्च मधे झाला त्याचा निकाल जुन-जुलै मधे आला, तेव्हा हे महाशयच अध्यक्ष होते. फक्त पेपर नव्हे तर या मुलांना मुलाखतीत ही चांगले मार्क पडलेले आहेत, पेपर बघून टॉप करणाऱ्यांना मुलाखतीत पण कसे चांगले मार्क पाडतील?
MPSC देणाऱ्या सर्व मित्रांना सांगतो, भीमनवार यांचा मागील इतिहास अन कारकीर्द पाहता हा व्यक्ती जोपर्यंत आयोगात असेल तोपर्यंत पारदर्शकता आयोगात राहणार नाही. मला तर देवेंद्र फडणवीस यांचेही काही कळेना, त्यांनी आजवर स्वतःची प्रतिमा जपली आहे पण भीमनवार यांचा राजीनामा घ्यायला त्यांचा हात का आखडला आहे ? फडणवीस साहेब तुम्ही देशाची मोठी स्वप्ने पाहत आहात, गोरगरीब बहुजनांच्या पोरांच्या अन्नात माती कालवायचे पाप करू नका, भीमनवार, आयोगाचे सचिव यांना ताबडतोब हाकलून मनाचा मोठेपणा दाखवा…
@Dev_Fadnavis
राज्यातील लाखों विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा खुन करणाऱ्या #MPSC च्या अध्यक्षांनी तत्काळ राजीनामा द्यावा आणि पेपरफुटीचा योग्य तपास व्हावा यासाठी आज अमरावती येथे विद्यार्थ्यांनी मोर्चा काढत आपल्या भावना मांडल्या. सरकारने वेळीच MPSC च्या गैरकारभाराची दखल घेऊन कठोर पावले उचलावीत, अन्यथा आज अमरावतीत हा मोर्चा झालाय उद्या राज्यभरात यापेक्षा मोठे आंदोलन उभं राहिल्याशिवाय राहणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC #पेपरफुटी #अमरावती #विद्यार्थी_आंदोलन
MPSC पेपर फुटी मध्ये जे आरोपी पकडले ते फक्त मोहरे आहेत, या पेपर फुटीमध्ये अध्यक्ष, सचिव, सदस्य व मंत्रालयातून डेप्युटेशन वर आलेले अधिकारी यांनाही सहआरोपी करून यांची हकालपट्टी करावी. तरच 7 सप्टेंबर रोजीच्या मुलाखती पारदर्शक होतील व मागील परीक्षांची पारदर्शक चौकशी होईल. या चौकशीसाठी SIT नेमणे गरजेचे असतानाही अजूनही सरकार कशाची वाट पाहत आहे. अध्यक्ष, सचिव व काही अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय का? मुख्यमंत्री यावर काहीच का बोलत नाहीत? एक आमदार सोडता विरोधक व सत्ताधारी आमदार, खासदार या पेपर फुटीवर का काहीच बोलत नाहीत?
विद्यार्थ्यांचे भविष्य चोरणाऱ्यांविरोधात विद्यार्थी संविधानिक मार्गाने रस्त्यावर उतरणार मग पोलिसांनी दबाव आणला तरीही आणि लाठीचार्ज झाला तरीही.
मुख्यमंत्री महोदयांनी या विषयात गांभीर्याने लक्ष घालावे ही विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office@mieknathshinde@SunetraA_Pawar
#MPSC पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आणि नाराजीची भावना आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी अनेक विद्यार्थी, सर्व क्लासचालक आणि अभ्यासिका चालक यांना धमकावल्याची माहिती समोर येत आहे. पुणे पोलिसांना विशेषतः पोलीस आयुक्तांना एकच सांगणं आहे, धमक्या द्यायच्या असतील तर कोयता गँगला द्या, बनावट दारू विक्रेत्यांना द्या!
आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांचा नाद करू नका, अन्यथा ही बाब महागात पडेल. हे सर्व स्वाभिमानी मराठी विद्यार्थी आहेत आणि आम्हीही त्यांच्यासोबत आहोत, हे पोलीस प्रशासनाने विसरू नये!
@Dev_Fadnavis@CPPuneCity
#MPSC_विद्यार्थी #पुणे_पोलीस
🚨हजारो स्वप्नं घेऊन #MPSCच्या वाटेवर निघालेला विद्यार्थी आज चक्रव्यूहात अडकला आहे.
ज्यांच्या एका शब्दाने महाराष्ट्राचं राजकारण हलतं,तो सह्याद्री आज गप्प का?
@PawarSpeaks साहेब,विद्यार्थ्यांची ही आर्त हाक ऐका.
MPSC हादरलंय;आता व्यवस्था हलली पाहिजे!
@LoksattaLive@RRPSpeaks
आधीच जाहीर केल्याप्रमाणे उद्या (मंगळवार, दि. १ सप्टेंबर) सकाळी १०:३० वाजता MPSC कार्यालय, बेलापूर, नवी मुंबई..!
यावेळी पेपरफुटीमुळं विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्या अध्यक्षांऐवजी नवीन अध्यक्षांची भेट होईल, अशी अपेक्षा आहे. जर जुनेच अध्यक्ष खुर्चीला चिकटून बसले तर त्यांना भेटण्यात कोणताही रस नाही त्यांच्याऐवजी सचिवांना भेटून विद्यार्थ्यांच्या इतर काही विषयांवर चर्चा करू. अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थ्यांशी चर्चा करून, योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी संविधानिक मार्गाने अंतिम लढा उभारण्याचं नियोजन लवकरच केलं जाईल आणि याचा श्रीगणेशा पुण्यातून होईेल.
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC #पेपरफुटी
मा.@mpsc_office@bhimanwar दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक या पदासाठी 70 लाख रुपये रेट सुरू होता म्हणून ऐकण्यात येत आहे.... हे सर्व पेपर फोडून सुरू होत की उत्तरपत्रिका ब्लँक ठेवून नंतर भरल्या जात होत्या याचा तपास होणे अत्यावश्यक आहे..... परीक्षा कक्षातील CCTV तपासा आणि आयोगातील अधिकारी कर्मचारी यांच्या हालचाली सुद्धा पाहून घ्या.... चांगलाच मोठा चुना लावलेला दिसतोय आयोगातील भ्रष्ट लोकांनी....#पारदर्शकता #MPSC #TRUST @CMOMaharashtra@satejp@INCHarshsapkal
MPSC पेपर फुटी मध्ये आता फक्त अध्यक्ष व सचिवाची हकालपट्टी नाही तर यांच्यासोबत सर्व सदस्य व MPSC मधील सर्व अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष व सचिव यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व परीक्षांची चौकशी व्हायला हवी. जे आरोपी पकडले आहेत त्यांच्या नातेवाईकांची चौकशी व्हावी. @CMOMaharashtra
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या अन्न व औषध निरीक्षक पदभरतीचे पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. MPSC तील 3 अधिकाऱ्यांना अटक देखील झालेली आहे. त्यामुळे आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा. अन्यथा यांच्या राजीनामा साठी मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी तर करणारच आहे. शिवाय MPSC चे अध्यक्ष व सदस्य हे राजकीय संपर्क विरहित असणारेच असावे व सचिव हा मंत्रालय कॅडर चा नियुक्त न करता वरिष्ठ IAS दर्जाचाच असला पाहिजे, यासाठी देखील प्रभावी मागणी करणार आहे. आयोगाच्या सध्याच्या सहसचिव व परीक्षा नियंत्रक यांच्या प्रतिनियुक्ती करिता आयोगाची मान्यता नसताना आयोगाच्या परस्पर मनमानीपणे मंत्रालयातील अधिकारी एकतर्फी पाठविण्याच्या निर्णयाची व यासंदर्भात आयोगाच्या अधिकारी यांनी केलेल्या तक्रारीची सखोल चौकशी करावी तसेच सदर पदावरील व्यक्तीची नियुक्ती नियम बाह्य असल्याने ती तत्काळ रद्द करावी प्रश्न फुटी संदर्भात प्राथमिक जबाबदारी परीक्षा नियंत्रक यांची असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा गरज पडली तर विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावरची लढाई देखील लढू. पण विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे काम नक्की करू.
महाराष्ट्रात सध्या परीक्षा रद्दची लाट सुरू आहे..
आता
मुंबई उच्च न्यायालय भरतीची #TYPING_TEST परीक्षा रद्द करण्यात आली आहे..
राज्य सरकार तरुणांचे प्रश्न सोडविण्यास सपशेल अपयशी.
@narendramodi@RahulGandhi
🚨 MPSC Group B मुख्य परीक्षा 2025 च्या निकालाबाबत विद्यार्थ्याने उपस्थित केलेले गंभीर प्रश्न!
एका विद्यार्थ्याने मला पाठवलेल्या संदेशात MPSC Group B मुख्य परीक्षा 2025 च्या निकालाबाबत काही अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
विद्यार्थ्याचा दावा आहे की
➡️ पहिल्याच प्रयत्नात GS मुख्य परीक्षेत 76 गुण मिळवून संबंधित उमेदवार राज्यात प्रथम आला.
➡️ संबंधित उमेदवार बार्शी येथे राहून अभ्यास करत होता आणि पुण्यात नियमितपणे येत नसल्याचे विद्यार्थ्याचे म्हणणे आहे.
➡️ त्याच्या मोठ्या भावाची 2023 मध्ये STI आणि 2024 मध्ये BDO म्हणून निवड झाल्याचाही उल्लेख या संदेशात आहे.
➡️ छोट्या भावाचे जन्मवर्ष 2000 असून 2025 मध्ये तो थेट राज्यात प्रथम आल्याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
➡️ एवढे मोठे यश मिळूनही गावात साधे अभिनंदनाचे बॅनरही का दिसले नाही, असा प्रश्नही विद्यार्थ्याने उपस्थित केला आहे.
हे आरोप सत्य आहेत, असे मी या टप्प्यावर म्हणत नाही.
पण हजारो विद्यार्थ्यांच्या मनात जर अशा शंका निर्माण होत असतील, तर त्या दुर्लक्षित करून चालणार नाहीत.
MPSC ने या सर्व प्रश्नांची तथ्यांच्या आधारे स्पष्ट उत्तरे द्यावीत. उत्तरपत्रिका, गुणांचे तपशील, मेरिट तयार करण्याची प्रक्रिया आणि संबंधित निवड प्रक्रियेतील आवश्यक कागदपत्रे नियमानुसार पारदर्शकपणे उपलब्ध करून दिली, तर सत्य स्वतः स्पष्ट होईल.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दाबण्याऐवजी त्यांना उत्तरं द्या. पारदर्शकता असेल तर चौकशीची भीती कशाला?
@mpsc_office
अभ्यासिकेत दिवस अन् ढेकणात रात्र काढली
कधी वडापाव मॅगीवर भूक भागवली
कधी परीक्षेच्या तारखा पाहून
कित्येक दसरा अन् दिवाळी
घराची पायरी नाही चढली
अन् AC त बसून पेपर फोडणाऱ्यांनी
पोरांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली.
@degree_holders
@PMCPune@prajytnair@navalMH#PMCJE
🚨 10 लाख #MPSC विद्यार्थ्यांचा सवाल!
परीक्षेतील गंभीर अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा की
@Dev_Fadnavis सरकारने नियमानुसार त्यांच्यावर कठोर निर्णय घ्यावा?
@TV9Marathi
MMRDA भरती परीक्षा : योगायोग की गंभीर प्रश्नचिन्ह?
MPSC ने ड्रग्स इन्स्पेक्टर पदाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. परीक्षा प्रक्रियेबाबत संशय निर्माण झाल्यानंतर संबंधित यंत्रणेने कारवाई केली.
मग MMRDA भरती परीक्षेबाबतही विद्यार्थ्यांच्या मनात गंभीर संशय निर्माण झाला असताना किमान चौकशी करण्याचे औदार्य MMRDA दाखवणार आहे का?
काही उमेदवारांच्या यापूर्वीच्या स्पर्धा परीक्षांतील गुण आणि MMRDA परीक्षेतील गुणांमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे.
उदाहरणार्थ—
▪️ Tushar Funde — BMC SE: 7.5/100 → MMRDA: 200/200
▪️ Aniket Dhere — BMC SE: 8.5/100 → MMRDA: 198.38/200
▪️ Gaurav Yekekar — Nagpur JE: 48/200 → MMRDA: 198/200 (Rank 7)
▪️ Akash Rakhade — PMC JE: 82/200 → MMRDA: 198/200 (Rank 11)
▪️ Yogesh Kumar Kathe — BMC SE: 7.5/100 → MMRDA: 192/200
हे आकडे गैरप्रकार सिद्ध करत नाहीत, पण एवढी मोठी तफावत निश्चितच चौकशीची मागणी करते.
म्हणून MMRDA ने विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी—
➡️ CCTV Footage
➡️ Server Logs
➡️ Login-Logout Records
➡️ IP/Device Mapping
➡️ Response Patterns
➡️ परीक्षा केंद्रनिहाय आणि उमेदवारनिहाय डेटा
यांची स्वतंत्र आणि तांत्रिक चौकशी करावी.
जर सर्व काही नियमानुसार झाले असेल तर चौकशीतून ते स्पष्ट होईल आणि विद्यार्थ्यांच्या मनातील संशय दूर होईल.
आणि जर गैरप्रकार झाला असेल, तर दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
MPSC ने एका परीक्षेप्रकरणी कारवाई केली; MMRDA आता विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार की पारदर्शक चौकशी करून सत्य समोर आणणार?
हजारो विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि सरकारी भरती प्रक्रियेवरील विश्वासाचा हा प्रश्न आहे.
संशय निर्माण झाला आहे, तर चौकशी झालीच पाहिजे!
#MMRDA #MMRDARecruitment #ExamTransparency #RecruitmentExam #MPSC #StudentsJustice
ज्या पद्धतीने औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्याचप्रमाणे @MMRDAOfficial मधील Assistant Engineer पदाच्या भरती प्रक्रियेबाबत उपस्थित झालेल्या गंभीर आक्षेपांचीही स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
विशेषतः भंडारा जिल्ह्यातील किती उमेदवारांची निवड झाली, त्यांची निवड प्रक्रिया काय होती आणि त्यासंदर्भात कोणाची भूमिका होती, याची सखोल पडताळणी करण्यात यावी.
कायमचा पत्ता ठाणे, अहिल्यानगर ,सोलापूर किंवा इतर भागातील असलेल्या उमेदवारांना नागपूर परीक्षा केंद्र का देण्यात आले? एखाद्या विशिष्ट परीक्षा केंद्रातून असामान्य प्रमाणात उच्च गुण मिळविणारे उमेदवार आढळत असल्यास त्याची स्वतंत्रपणे तांत्रिक तपासणी का होऊ नये?
CCTV फुटेज, बायोमेट्रिक नोंदी, सर्व्हर लॉग, परीक्षा केंद्रनिहाय उपस्थिती, प्रश्नपत्रिका वितरण, डिजिटल प्रतिसाद आणि गुणांकन प्रक्रियेची तपासणी करून वस्तुस्थिती समोर आणणे आवश्यक आहे.
म्हणून चौकशी समिती नेमायचीच असेल तर ती उच्च न्यायालयाच्या विद्यमान/निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र व निष्पक्ष पद्धतीने नेमण्यात यावी. अन्यथा आम्हाला अन्यायग्रस्त सुशिक्षित बेरोजगार स्पर्धा परीक्षा उमेदवारांना सोबत घेऊन आपल्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करावे लागेल.
@DrSanMukherjee@MMRDAOfficial@BaliramDoleyINC@NANA_PATOLE@Mpsc_Andolan
#MMRDA_SCAM #AssistantEngineer #Recruitment #ExamTransparency #JusticeForStudents
मा. देवेंद्र जी,
Drug Inspector पेपरफुटी प्रकरणात हॉल तिकीटावर सही करणाऱ्या व्यक्तीला अटक झाली आहे, मग MPSCच्या संपूर्ण परीक्षा व्यवस्थेची चौकशी का होत नाही?
2017 पासून पेपरफुटी, संशयास्पद कट-ऑफ आणि भरतीतील गैरप्रकारांचे गंभीर आरोप आहेत; लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न का?
MPSC अध्यक्ष-सचिवांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा आणि संपूर्ण भरती प्रक्रियेची Court-Monitored SITमार्फत चौकशी करावी!
या सर्व प्रकरणावर तुमचे मौन सूचक आहे. महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही!!!
@INCHarshsapkal@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra