मा.@AjitPawarSpeaks
दादा.
सस्नेही नमस्कार,
राज्यकर निरीक्षक #STI पदाच्या 2024 मध्ये फक्त 209 पदाची भरती होत आहे RTI माहितीच्या आधारे रिक्त पदांची संख्या पाहता पदसंख्येमध्ये भरघोस वाढ करावी ही विनंती.🙏
रिक्त पदे जवळपास:-963
धन्यवाद 🙏🌱
#Combine_जागावाढ_2024
राज्यसेवा २०२४ परीक्षेमध्ये DySP, तहसीलदार यांसारखी महत्वाची अनेक पदे रिक्त असूनही जाहिरातीत या पदांचा समावेश करण्यात आलेला नाही. उपजिल्हाधिकारी पदाच्याही केवळ ७ जागा आहेत. 'कम्बाईन गट ब आणि गट क' परीक्षेतही PSI पदाच्या फक्त २१६ जागांचा समावेश आहे.
नोकरभरतीचे केवळ गाजर दाखवून सरकार महाराष्ट्रातील तरुण पिढीची अक्षरशः थट्टा करत आहे. दुसरीकडे कंत्राटी भरतीही सर्रासपणे राबवली जात आहे. प्रत्येक विभागात हजारो जागा रिक्त असताना शासनाने पदभरतीबाबत संवेदनशीलपणे आणि सकारात्मकपणे विचार करायला हवा. सरकारने राज्यसेवा तसेच कम्बाईन परीक्षेच्या जागांमध्ये वाढ करून सुधारित जाहिरात काढावी, ही विनंती आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office@mieknathshinde@Mpsc_Andolan@AjitPawarSpeaks
#combine_2024_जागावाढ
#राज्यसेवा_जागावाढ_2024
PSI पदाचा मागोवा...
मंजूर पदे :- 9845
भरलेली पदे :- 6886
रिक्त पदे :- 2959
गृहमंत्री महोदयांनी मनावर घेतले तर 2024 साठी ही जाहिरात 4 आकडी होऊ शकते.
@Dev_Fadnavis
2024 जाहिरातमध्ये फक्त PSI 216 जागा आले आहेत पण PSI जागे चे 441 चें मगणीपत्रक पाठवले आहेत , STI 209, ASO 55, SR चे तर 0 जागा आहेत, तरी मा @Dev_Fadnavis , @mieknathshinde@ajitpawarspeaks यांनी जागा वाढ करून ही जाहिरात आत्तापर्यंतची सर्वात मोठी जाहिरात करण्यात यावी अशी विनंती.
राज्यसेवा तर्फे ज्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्या जागांची यादी बघितल्यानंतर राज्यसेवा आयोग नेमक काय करत आहे हेच कळत नाहीं.
राज्यसेवेच्या मागील परिपत्रकात PSI पदासाठी 441 जागांची भरती करण्यात येणार होती.त्या जागा कमी करून केवळ 216 जागांची भरती आता करण्यात येणार आहे.शिवाय DYSP,तहसीलदार सारख्या महत्वाच्या पदांच्या तर जागाच काढण्यात आलेल्या नाहीयेत.ही क्रूर थट्टा आहे त्या लाखो विद्यार्थ्यांची जे,ही परिक्षा पास होण्यासाठी दिवस रात्र एक करत आहेत.
शिवाय राज्यसेवेची ही होणारी परीक्षा Objective Pattern नुसार शेवटची परीक्षा आहे, त्यामुळे राज्य शासनाने यात लक्ष घालत 2024 च्या जाहीरातीमध्ये सर्वच्या सर्व पदे कसे भरता येतील याकडे लक्ष देत,विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून द्यावा..!
प्रत्येक विभागात हजारो जागा रिक्त असताना हे सरकार काहीच जागा भरणार आहे.माझी राज्य सरकारला आणि राज्यसेवा आयोगाला विनंती आहे की,राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करू नका...!! त्यांना न्याय द्या..त्यांना त्यांच्या हक्काच्या जागा द्या..!
#राज्यसेवा
🔸 महाराष्ट्र संयुक्त अराजपत्रित परीक्षा 2024
गट -ब व गट - क दोन्ही जाहिराती तब्बल 8 महिने विलंबाने प्रसिद्ध झाल्या.
👉मा.मुख्यमंत्री @Dev_Fadnavis
महोदय, आपल्या गृहखात्याने PSI च्या
441 जागांच्या #MPSC कडे पाठविलेल्या मागणीपत्रकाला कात्री लावून त्याला 50% पेक्षा कमी केले. इतिहासात पहिल्यांदा असा प्रकार PSI पदासाठी झाला आहे.
यावर सहानुभूतीपूर्वक विचार करून पदसंख्येत वाढ करण्यात यावी.
👉 मा. @cbawankule साहेब आपल्या विभागाच्या दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक या संवर्गाचा गट -ब जाहिरातीत समावेशच नाही.तात्काळ मागणीपत्रक पाठविण्यासंबंधीचे निर्देश आपण द्यावेत.
👉 @AjitPawarSpeaks दादा
गट -क जाहिरातीत Excise S.I .ची
पदे लवकरात लवकर समाविष्ट करण्यात यावीत व यासोबतच अत्यल्प पदांच्या STI ( गट -ब) च्या पदसंख्येत वाढ करण्यात यावी.
👉 मा. @PratapSarnaik साहेब
AMVI सहायक मोटार वाहन निरीक्षक
या संवर्गाचे एकही पद गेल्या काही वर्षापासून भरले गेले नाही.
2024 च्या जाहिरातीत या संवर्गाचे जास्तीत जास्त्त पदभरती कशी होईल
याची आपण गांभीर्याने दखल घ्यावी.
"4 लाख उमेदवारांतर्फे "मी आपल्या सर्वांना नम्रपणे या सर्व पदभरती व जागावाढची मागणी करत आहे.
@mieknathshinde@CMOMaharashtra@NANA_PATOLE@ssaunik
🔸 मा.@mpsc_office@Drsuvarnas ma'am
👉 1. महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त राजपत्रित परीक्षा 2023 अंतर्गत 'स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा' होऊन जवळपास एक वर्ष होत आहे. अद्याप निकाल जाहीर न करण्याचे कारण काय?
एकतर निकाल तात्काळ जाहीर करण्यात यावा किंवा विलंबाची कारणे प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट करावीत.
परीक्षार्थ्यांनी अजून किती संयम ठेवायचा ? जास्तीत जास्त तीन महिन्यात निकाल अपेक्षित असताना त्याच्या 4 पट कालावधी झाला. नेमका
निकालाचा "पत्ता " हरवला कुठे?
#MPSC
#Civil
👉 2. महाराष्ट्र संयुक्त अराजपत्रित परीक्षा
2023 अंतर्गत लिपिक व कर सहायक 7000 पेक्षा जास्त पदांसाठीचा अंतिम निकाल #Typingskilltest
प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे जाहीर करता येत नाही.
आतापर्यंत सुनावणीच्या 9 तारखा झाल्या.
अजून किती महिने "तारीख पे तारीख"
मिळणार आहे?
#MPSC ला हे प्रकरण लवकरात लवकर मिटवण्यासाठी कसलीच जबाबदारी घ्यायची नाही काय?
पूर्व परीक्षा होऊन 20 महिने उलटले.
उमेदवारांच्या संयमाचा बांध सुटत आहे.
या सर्व उमेदवारांच्या वतीने मी आपणास नम्रपणे विनंती करत आहे,
येत्या सुनावणीस आपल्याकडून 100% सहकार्य देऊन याचा काय तो सोक्षमोक्ष लावून टाकावा व अंतिम निकाल जाहीर करावा.
मा. @mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@ssaunik
मेगाभरतीचा महाघोटाळा
👉 राज्यसेवा 2024 जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा असून देखील तुटपुंज्या जागा काढल्या.
35 संवर्गापैकी सर्व महत्वाचे संवर्ग चक्क गायब आहेत.
मुलांना उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक, तहसीलदार, मुख्याधिकारी होण्याचा अधिकार नाही का?
सतत 7 महिने पाठपुरावा केल्यानंतर मोजून 7 उपजिल्हाधिकारी पदे समाविष्ट केली.
या 7 मध्ये OBC सहित NT-C,NT-D व इतर प्रवर्गासाठी शून्य जागा.
👉 संयुक्त अराजपत्रित गट - ब व गट - क साठी जाहिरात दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध केली.
सरकारने मागणीपत्रक वेळेवर न पाठवल्यामुळे जाहिरात तब्बल 9 महिने उशिरा प्रसिद्ध झाली.
त्यामुळे हजारो उमेदवारांचे वय उलटून गेले. परिणामी त्यांना परीक्षेचा अर्ज भरता येणार नाही.
@Dev_Fadnavis महोदय,
ह्या वय उलटून गेलेल्या उमेदवारांचं काय करणार आहात? त्यांच्या नुकसानाला फक्त आणि फक्त आपण जबाबदार आहात.
PSI च्या तुटपुंज्या जागांचे मागणीपत्रक पाठवायला तब्बल 9 महिने उशीर करून काय साध्य केले?
@AjitPawarSpeaks दादा
STI साठी फक्त 206 जागांचे मागणीपत्रक पाठवले.
त्यातही ST category साठी चक्क शून्य जागा???
हाच का आपला सामाजिक न्याय???
👉 जलसंपदा विभाग जाहिरात का प्रसिद्ध झाली नाही?
👉 BMC सहित इतर मनपा जाहिरात कुठे हरवल्या आहेत???
👉 1000 रुपये फीच्या नावाखाली लुटले, अर्ज भरून घेतले तरी कित्येक परीक्षेच्या तारखा अद्याप जाहीर केल्या नाहीत.
आचारसंहिता लागणार आहे माहित असतानाही या गोष्टी का विचारात घेतल्या नाहीत?
👉 ज्या परीक्षा घेतल्या त्यांचे निकाल जाहीर केलेले नाहीत.
👉 ज्यांचे निकाल जाहीर केले त्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत.
👉 प्रलंबित शिक्षक भरतीच्या दिलेल्या आश्वासांचे काय झालं? पाळणार आहेत की नाही?
शिक्षणसेवकांच्या समस्यांबाबत काही निर्णय घेणार आहेत की नाही?
👉 आम्ही यापूर्वी वेळोवेळी ह्या गोरगरीब उमेदवारांसाठी मागणी केली आहेच.
सरकार संवेदनशील नाहीच.
आपल्याकडे काही तास उरले आहेत.
अजूनही सांगतोय ह्या सर्वांना न्याय द्या.
👉 #MPSC सहित सर्व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना जबाबदारीने सांगतोय काँग्रेस पक्ष कायम आपल्या पाठीशी होता, आहे आणि असेल.
जिथे जिथे ह्या महायुतीने तुमच्यावर अन्याय केला त्या प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्ष आपल्याला न्याय देण्यासाठी कटीबद्ध आहे.
मुख्यमंत्री शिंदे साहेब, तुम्हाला बहीण प्रिय आहेत.त्यांना मासिक भत्ता.लाडके भाऊ बेरोजगार आहेत
त्यांना तुमच्याच विभागाची,नगरपरिषद गट क आणि ड भरती काढत नाही.कृपया लवकर आदेश द्या. खूप उपकार होतील साहेब.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@TV9Marathi@abpmajhatv
आम आदमी पक्षातर्फे स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या पुढील मागण्यांसाठी उद्या मुंबईत मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. नागरिक आणि उमेदवारांना विनंती ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की सहभागी व्हावे.
प्रमुख मागण्या :
१. स्पर्धा परीक्षा विद्यार्थी :
अ. राज्यसेवा आणि कम्बाईन गट "ब" व गट "क" जागवाढ
ब. सरळसेवा भरती परीक्षा शुल्क रु. १०० इतके असावे.
क. कृषी सेवा परीक्षा २०२१ व २०२२ पास होऊन पात्र ठरलेल्या ४१७ अधिकाऱ्यांना ताबडतोब नियुक्त्या मिळाव्यात.
ड. २०२२ व २०२३ च्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील सर्व उमेदवारांना एकत्रित opting out ची संधी देण्यात यावी.
इ. MPSC ने घेतलेल्या विविध परीक्षांचे निकाल ताबडतोब जाहीर करून नियुक्ती प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करणे.
२. ग्रामविकास विभाग :
अ. आरोग्य सेवक ५०% (पुरुष) पदाची नियुक्ती ताबडतोब देण्यात यावी.
ब. आरोग्य परिचारिका परीक्षा पास होऊन मेरिटमध्ये आलेल्या GNM व BSc उमेदवारांना ताबडतोब नियुक्ती देण्यात यावी.
३. बृहन्मुंबई महानगर पालिका भरती : आगामी लिपिक, अभियंता व इतर पदांच्या भरतीमध्ये राज्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांना समान संधी देण्यात यावी.
४. कोरोना योद्धा :
कोरोना १९ दरम्यान आरोग्यसेवेसाठी विविध पदावर काम केलेले कंत्राटी कर्मचारी, अधिकारी यांच्या नोकरभारतीबाबत मागण्या.
५. आदिवासी बांधवांच्या हक्काच्या १२,५०० जागांची पदभरती प्रक्रिया ताबडतोब सुरु करण्यात यावी.
६. राज्य सरकारच्या विविध खात्यांतील पद भरतीच्या जाहिराती तात्काळ काढण्यात यावी. वरील मागण्यांसाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातून बेरोजगार येणार आहेत.
@Dhananjay_AAP @Dev_Fadnavis@AAPMaharashtra@AUThackeray@mieknathshinde@DrSEShinde@RRPSpeaks .
मा. देवेन्द्रजी,
गृहविभागास PSI भरती च्या २७०० पदांपैकी कमीत कमी १५०० जागांची जाहिरात काढण्याचे आदेश द्यावेत हि नम्र विनंती.
@Dev_Fadnavis@DGPMaharashtra
PSI भरती 2024
राजकीय वातावरण बघता जाहिरात 251 किंवा 441 जागांची आल्यास सरकारला परवडणारे नाही.
रिक्त जागांची संख्या बघता 1000+ जागा 2024 साठी आल्याच पाहिजेत.
@Dev_Fadnavis@Devendra_Office
मा. देवेंद्र जी,
कंबाइन गट “ब” व गट “क” च्या जाहिरातीत विद्यार्थ्यांना एकूण १५००० जागांची अपेक्षा असताना कंबाईन गट ब पदासाठी फक्त २५६ जागा आणि गट क पदासाठी १३३६ जागांचे मागणी पत्र पाठवले आहे. गृहखात्याने PSI पदासाठी मागणी पत्र पाठवले नाही त्यामुळे विद्यार्थी वर्गामध्ये फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे.
आपण विद्यार्थ्यांचा लाखो “विश्वासघात” करणार नाही असे आम्हाला वाटते. कृपया PSI पदाच्या २७०० पैकी कमीत कमी १५०० जागा आयोगाकडे पाठवाव्यात तसेच विद्यार्थ्यांच्या अपेक्षेप्रमाणे एकूण १५००० जागांची जाहिरात प्रसिद्ध व्हावी ही विनंती.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@Devendra_Office@Mpsc_Andolan@mpsc_office@AAPMaharashtra