मा. देवेंद्र फडणवीस - ‘महाराष्ट्राचे गाजर मंत्री’ 🥕?
विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी आंदोलनाची भूमिका घेताच पुन्हा मेगाभरतीचे गाजर दाखवले जाते, असा विद्यार्थ्यांचा अनुभव आहे. फोटोमधील बातमी २०२४ सालची ��हे आणि अशा स्वरूपाच्या मेगाभरतीच्या घोषणा यापूर्वीही झाल्या आहेत. केवळ घोषणा आणि माध्यमांतील बातम्यांवर विश्वास ठेवण्याऐवजी विद्यार्थ्यांना आता हवे आहे:
१. अधिकृत रिक्त पदांची संख्या
२. पदनिहाय जाहिराती,
३. निश्चित भरती वेळापत्रक
आणि
४. प्रत्यक्ष नियुक्त्या.
वर्षानुवर्षे भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारी अनिश्चितता आणि मानसिक तणाव गंभीर बाब आहे. म्हणूनच हा प्रश्न विचारला जात आहे, विद्यार्थ्यांना पुन्हा गाजर दाखवायचे आहे की प्रत्यक्ष रोजगार द्यायचा आहे?
मा. देवेंद्रजी,
🥕 ‘गाजर मंत्री’ म्हणून उपरोध होऊ नये असे वाटत असेल, तर घोषणा नकोत, ठोस भरती करा!
@INCHarshsapkal @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar
#गाजरमंत्री
#मेगाभरती
#विद्यार्थीआंदोलन
#रोजगार
#JobsForYouth
#युवांचा_आवाज
#StudentProtest
#RojgarNyay
#YouthForJobs
#MaharashtraYouth
ही आहे विद्यार्थ्यांच्या एकजुटीची ताकद आणि #विद्यार्थी_एकजुटीचा_Impact!
२६ तारखेपासून आंदोलन करण्याची काल सकाळी विद्यार्थ्यांनी घोषणा करताच सरकारने काल संध्याकाळी ६५ हजार पदभरतीच्या हालचाली सुरू केल्या. परंतु केवळ कागदोपत्री घोडे हलवून चालणार नाही, तर प्रत्यक्षात पदभरतीची जाहिरात काढून कृती हवी आहे.
भ्रष्ट अध्यक्षांचा राजीनामा, ७० हजार पदांच्या मेगाभरतीला सुरुवात आणि १०० रुपयांत वर्षभर परीक्षा या मागण्यांसाठी २६ सप्टेंबर रोजी होणारे आंदोलन अभूतपूर्व असेल....ही एकजूट अशीच राहू द्या. विद्यार्थ्यांची हीच एकजूट सरकारला विद्यार्थ्यांच्या ��ागण्या मान्य करण्यास भाग पाडेल.
#MPSC #विद्यार्थी_एकजूट #पदभरती #विद्यार्थी_आंदोलन
28 तारखेला गुन्हे दाखल होऊन तब्बल 17 दिवस उलटून देखील पुणे मनपा पेपरफुटी प्रकरणात एकाही गुन्हेगाराला महाराष्ट्र पोलीस अटक करू शकले नाही. याचा अर्थ महाराष्ट्र पोलिस सक्षम नाहीत किंवा गुन्हेगाराला पाठीस घाल��्याचे काम सुरू आहे???
@CPPuneCity @CMOMaharashtra
@DGPMaharashtra
पुणे महानगर पालिका कनिष्ठ अभियंता परीक्षा घोटाळ्याप्रकरणी २८ ऑगस्टला गुन्हे दाखल होऊन तब्बल १७ दिवस उलटले, तरी या प्रकरणातील एकाही आरोपीला महाराष्ट्र पोलिस अटक करू शकलेले नाहीत असे समजते.
हे जर खरं असेल तर मग प्रश्न गंभीर आहे,
महाराष्ट्र पोलीस आरोपींपर्यंत पोहोचू शकत नाहीत, की कोणाच्या दबावामुळे कारवाईला जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे? जर आरोपी खुलेआम फिरत असतील, तर कायदा कुणासाठी आहे?
सरकारने तातडीने उत्तर द्यावे आणि सर्व आरोपींना अटक करून निष्पक्ष तपास करावा ही विनंती.
@CPPuneCity@INCMaharashtra@DGPMaharashtra@CMOMaharashtra@PMCPune
@BhayandarMira मधील अभियांत्रिकी संवर्गाची परीक्षा होऊन जवळ जवळ एक वर्ष होत आला अद्याप निकाल जाहीर झाला नाही, नक्की कुणाच्या दबावाखाली प्रशासन काम करत आहे?
@PratapSarnaik साहेब आपण या विषयात जातीने लक्ष द्यावे ही नम्र विनंती आणि प्रलंबित निकाल व नियुक्ती देण्यात यावे यासाठी आदेश करावे ही नम्र विनंती @CMOMaharashtra@mieknathshinde@Shivsenaofc
आज विद्यार्थी आणि शिक्षक संघटना यांना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब @Dev_Fadnavis यांनी दोन तासांपेक्षा जास्त वेळ देऊन सर्वांच्या मागण्या ऐकून घेतल्या, सर्वप्रथम याबाबत मुख्यमंत्री साहेबांचे खूप खूप आभार.
परंतु एक नम्र विनंती आहे की ज्या काही गोष्टी आजच्या चर्चेत ठरलेल्या आहेत त्याबाबत कृपया लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी जेणेकरून भविष्यात विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येणार नाही.....!
#MPSC
मा. फडणवीस साहेब,
आतापर्यंत राज्यात अनेक प्रकरणात SIT स्थापन झाल्या, खारघर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण, डॉ. संपदा मुंडे प्रकरण, संतोष देशमुख प्रकरण, महादेव मुंडे प्रकरण, घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण, भंडारा बलात्कार प्रकरण, सुशांतसिंग राजपूत प्रकरण अशी असंख्य प्रकरणे आहेत ज्यामध्ये SIT स्थापन तर झाली पण त्याचं पुढं काय झालं, काय तपास केला? याचा कुणालाच काही ताळमेळ नाही. त्यामुळं MPSC पेपरफुटी प्रकरणात केवळ SIT नेमणं म्हणजे वेळ मारून नेण्याचा प्रकार असून ही बाब विद्यार्थ्यांनाही मान्य आहे.
आपल्याला विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर तत्काळ राज्यपाल महोदयांच्या माध्यमातून महामहीम राष्ट���रपतींना आयोगाच्या अध्यक्षांवर कारवाई करण्याची विनंती सरकारने करावी. राष्ट्रपतींकडून प्रक्रिया सुरू झाली तर कारवाई पूर्ण होईपर्यंत राज्यपाल आयोगाच्या अध्यक्षांना निलंबित करू शकतात. ही प्रक्रिया फारच कठीण वाटत असेल तर मित्राला राजीनामा देण्याचा सल्ला द्यावा. मित्राचा सल्लावजा शब्द ते नक्कीच खाली पडू देणार नाहीत.
@Dev_Fadnavis
#MPSC #MPSCPaperLeak
#StudentsDemandJustice
1/n
@prajytnair Sir, for thousands of aspirants, this is not just a recruitment process. It represents years of preparation, family sacrifices, financial pressure and sleepless nights.
Today, we are not asking for sympathy. We are asking you to hear us and ensure justice.
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे #MMRDA#PMC परीक्षांमध्ये झा��ेल्या गैरप्रकारच्या बाबत तसेच इतर अभियांत्रिकी उमेदवारांच्या मागण्यांच्या बाबत जिल्हाधिकारी यांना विद्यार्थ्यांनी निवेदन दिले.
#MPSC_आक्रोश_मोर्चा
PMC JE भरतीसाठी उमेदवार आज पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत.
IBPS अहवालातच modus operandi स्पष्ट नसल्याचे नमूद आहे, FIR व पोलीस तपास सुरू आहे.मग नियुक्त्यांची घाई कशासाठी?
संपूर्ण सत्य समोर येईपर्यंत नियुक्त्या स्थगित करा!उमेदवारांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका.
@navalMH@prajytnair
CJP महाराष्ट्रातील MPSC विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आणि उद्या पुण्यात होणाऱ्या त्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देईल.
CJP stands with the MPSC students of Maharashtra and will support tomorrow’s protest in Pune.
@RahulGandhi विद्यार्थी बंधू-भगिनींनो तयारीला लागा…
सोमवारी तुमच्या हक्काच्या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा….
आज रस्त्यावर उतरला नाही तर कायम रस्त्यावर रहावं लागेल आणि घोटाळे करणारे महत्त्वाच्या पदांवर जाऊन तुमच्या डोक्यावर बसतील.
म्हणूनच जिंकण्यासाठी हक्काचा लढा लढू आणि न्याय मिळवू
महाराष्ट्र ���ें हजारों छात्र सड़कों पर हैं, शांतिपूर्ण तरीके से आंदोलनरत हैं - इसकी वजह सिर्फ एक परीक्षा या भर्ती नहीं, पूरे सिस्टम से टूट चुका भरोसा है।
चाहे वो केंद्र की हो या राज्य की, BJP सरकार से हर छात्र त्रस्त है। पेपर लीक, रुकी हुई भर्तियां, शिक्षा की असहनीय लागत, हॉस्टल में अमानवीय हालात, ज़हर जैसा खाना, DBT में धोखाधड़ी...
...और अब MPSC जैसी संवैधानिक संस्था पर कब्ज़ा कर उसकी विश्वसनीयता बर्बाद कर दी है।
अपने सफल भविष्य के लिए छात्रों की हर मांग जायज़ है। सरकार उनकी आवाज़ सुनकर तुरंत कार्रवाई करे - वरना न्याय मिलने तक ये छात्रों की गूंज बढ़ती ही जाएगी।
#ChhatronKiGoonj
@RahulAsks आपण एक उत्तम पत्रकार आणि आपल्या पत्रकारितेत आपण कधीही एक पत्रकार म्हणून " Judgemental" होत नाहीत, दोन्ही बाजू जनतेच्या समोर ठेवणे हाच एक पत्रकार म्हणून तुमचा वेगळा गुण आहे. सध्या #MPSC मधील पेपरफुटी बाबत आपण करत असलेले episode सर्वजण बघत आहेतच.
👉 परंतु आपणास एक विनंती आहे की मागील अनेक वर्षांपासून "ऑनलाईन" परीक्षेत म��हणजेच #TCS #IBPS मध्येही मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झालेले आहेत, नुकत्याच झालेल्या पुणे मनपा आणि @MMRDAOfficial परीक्षेत देखील मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झालेला आहे , सर्व अभियांत्रकी उमेदवारांच्या वतीने आपणास विनंती आहे की कृपया आपण याबाबत देखील एक स्वतंत्र बातमी द्यावी किंवा अभियांत्रिकी उमेदवारांची बाजू मांडवी.
सर्वात पहिले अध्यक्ष आणि सचिव यांनी ऋषिकेश गांगुर्डे यांची माफी मागितली पाहिजे.
ज्यावेळी अध्यक्ष महोदय यांच्यावर आरोप केले जातात त्यावेळी ते वैयक्तिक वाटतात परंतु " तो नापास झाला म्हणून त्याला re exam पाहिजे" हे आरोप वैयक्तिक नव्हते का ?
@bhimanwar
#MMRDA#MPSC#PMC
पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांचा शासनाच्या परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी केवळ समित्या नेमून चालणार नाही. निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळबद्ध चौकशी CBIमार्फत किंवा मा. उच्च न्यायालयाच्य�� देखरेखीखाली करण्यात यावी, ही विद्यार्थ्यांची ठाम मागणी आहे.
केंद्राचा पेपरफुटीविरोधी कायदा महाराष्ट्रात केव्हा लागू होणार? याचे शासनाने तातडीने स्पष्टीकरण द्यावे.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी बोलणारे मंत्री, आमदार व खासदार या गंभीर प्रकरणात किती ठोस पाठपुरावा करतात, हे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी पाहत आहेत.
आश्वासनांपेक्षा आता विद्यार्थ्यांना कृती, पारदर्शकता आणि न्याय ह���ा आहे!
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
@BJP4Maharashtra @Shivsenaofc @INCMaharashtra @NCPspeaks @ShivSenaUBT_ @VBAforIndia
फसवणुकीने भरलेली #PMC_JE_Scam परीक्षा रद्द करण्यात यावी, या म��गणीसाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष श्री. धनंजय शिंदे यांच्या नेतृत्वात व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले.
या परीक्षेत ग���रप्रकार झाल्याचं सिद्ध झालं असून आणि याप्रकरणी सखोल चौकशीची गरज असल्याचं चौकशी अहवालात स्पष्टपणे नमूद केलेलं तरीही सखोल चौकशी करण्यापूर्वीच महापालिका प्रशासन या परीक्षेतून निवड झालेल्यांना नियुक्त्या देण्याची घाई का करतंय? त्यासाठी कुणाचा दबाव आहे का? प्रामाणिकपणे अभ्यास करुन विद्यार्थी परीक्षा देतात आणि परीक्षेत गैरकृत्य करणाऱ्या रॅकेटच्या माध्यमातून भलत्यांचीच निवड केली जाते, हे विद्यार्थ्यांनी अजून किती दिवस खपवून घ्यायचं?
भरती प्रक्रियेतील पारदर्शकता, निष्पक्षता आणि विद्यार्थ्यांचा विश्वास अबाधित राखण्यासाठी, ही परीक्षा रद्द करून पारदर्शक पद्धतीने नव्याने आणि निष्पक्ष परीक्षा घेणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या या न्यायाच्या लढाईत कॉंग्रेस पक्ष नेहमीच विद्यार्थ्यांसोबत आहे.