काल भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला विश्वचषक स्पर्धेत जेतेपदावर नाव कोरलं. यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे मनापासून अभिनंदन... या आधी २ वेळा विजेतेपदाची हातातोंडाशी आलेली संधी निसटली होती पण यावेळेस मात्र दैदिप्यमान कामगिरी करत त्यांनी विश्वचषक खेचून आणला...
भारतीय महिला क्रिकेटला असंच यश मिळत राहील हे नक्की आणि यातूनच देशांत महिलांमध्ये क्रीडा संस्कृती अधिक खोल रुजेल आणि फक्त क्रिकेटच नाही तर सर्व खेळांमध्ये भारतीय महिलांचं राज्य दिसेल...
पुन्हा एकदा महिला भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन !
#WomenInBlue
#CWC25 #Final #INDvSA
माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या
कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या...
हा माणूस जे काही बोलतो ते त्याचे समर्थक सोडा विरोधकही शब्द अन शब्द कान देऊन ऐकतात. त्याचं राजकारण काय, विचार काय हे आज नाही कळणार कदाचित पण भविष्यात नक्की कळेल, इतिहासात डोकावून पहा त्याचे दाखलेही मिळतील.
काही जणांना अर्ध्या हळकुंडाने पिवळं होण्याची सवय लागली आहे.
ठाकरे 🔥
"राजसभा"
एक महाराष्ट्रसैनिक म्हणून माझी खूप इच्छा आहे की गुढीपाडव्याच्या सभे नंतर हे भैये आणि मराठी भैये ज्या प्रकारे महाराष्ट्रात हैदोस घालत आहेत!
१ मे महाराष्ट्र दिना दिवशी राजसाहेब ठाकरे ह्यांनी मराठी माणसासाठी मराठी भाषेसाठी अजून एक सभा घ्यावी!
#RajThackeray#Marathi
राज ठाकरेंच्या मराठी मुद्द्यावरील आंदोलनाला देशभरातून विरोध होतोय. याचा अर्थ मराठीची सक्ती त्यांना मान्य नाही. जर हे बाहेरचे लोक विचारधारेच्या पलीकडे जाऊन मराठीविरोधात उभे राहत असतील, तर महाराष्ट्रातील आपली माणसं मराठीसाठी एकत्र का येत नाहीत?
#RajThackeray#Marathi
जेव्हा जेव्हा मनसे मराठीबाबत आंदोलन छेडते, तेव्हा तेव्हा पक्ष बिक्ष बाजूला सारून सामान्य मराठी माणसाकडून त्याला पाठिंबा मिळतो, मूक का होईना समर्थन मिळतं कारण तो मराठी माणूस रोज हिंदीचा अतिरेक, मराठीला नकार देतानाची परप्रांतीयांची अरेरावी, तुच्छतेची वागणूक सहन करत असतो.
#marathi
राज ठाकरे यांच्या भाषणातून मराठी माणसाचा विचार आणि तळमळ ज्या ताकदीने व्यक्त होते, तसे इतर कोणाच्याही भूमिकेतून दिसत नाही. भविष्यात मराठी माणूस आणि मराठी भाषेसाठी कोणी निकराने लढा दिला याचा मागोवा घेतला गेला, तर पहिले नाव राज ठाकरे यांचेच घ्यावे लागेल.
#गुढीपाडवामेळावा२०२५
तुम्ही राजसाहेबांचे समर्थक असाल किंवा नसाल, तरी आजचं शिवतीर्थावरील भाषण शांततेत ऐका. मराठी माणसांसाठी आणि धर्म रक्षणासाठी राजसाहेबच हवेत ही भावना तुमच्यात दृढ झाल्याशिवाय राहणार नाही.. विचार करा! तुम्ही साथ दिली तर जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र नक्कीच घडेल..
सध्याच्या द्वेषपूर्ण राजकीय व सामाजिक परिस्थितीत राज ठाकरेंचं आजचं भाषण बहुतांशी तर्कसंगत होते. बाकी ठाकरी बाणा होताच. ती जरब कायम आहेच! 🗞️
@RajThackeray@mnsadhikrut
औरंगजेबाची कबर तिथेच राहुदेत. त्याच्या बाजूला असलेली सजावट काढा आणि तिथे फलक लावा 'आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला.' - Raj Thackeray ❤️
Beat this! कबरीचं राजकारण, त्यातून येणारे धार्मिक तणाव सगळ्यांचा तुकडा पडला!
मनसे गुढीपाडवा मेळावा 🚩
आजवर पाहिलेलं किंवा ऐकलं गेलेलं एक अत्यंत प्रभावशाली भाषण. खरंतर, जे मुद्दे राष्ट्रीय पातळीवर विचार करण्यास आवश्यक आहेत, तेच मुद्दे आजच्या सभेत मांडले गेले. खरा महाराष्ट्र धर्म देशासमोर सुस्पष्टपणे मांडला गेला.
@RajThackeray@mnsadhikrut
राज ठाकरे यांचे भाषण ऐकत होते.
अप्रतिम !
सगळे मुद्दे अतिशय सुंदर मांडले. तो प्रत्येक मुद्दा मांडण्याची खरंच गरज होती.
चांगल्या राज्यकर्त्यांमध्ये जे गुण हवेत, ते ह्या व्यक्ती मध्ये आहेत, ते फक्त कृतीत येत नाहीत. आले, तर त्याचे स्वागत.
मी अनेक वेळा त्यांच्यावर टीका केली आहे, पण आजच्या भाषणाची प्रशंसा मी नक्कीच करेन.
खरं बोलायला हिम्मत लागते, जी त्यांच्यामध्ये नक्कीच आहे.
तुर्कीच्या राज्यघटनेत तुर्कीला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केले. इस्लामला राज्य धर्माचा दर्जा काढून टाकला
सध्याच्या टर्कीच्या अध्यक्षांनी पण मवाळ धर्म स्वीकारला. आज टर्कीला ५ कोटी लोकं भेट देतात. विचार करा किती सुंदर देश बनवला असेल.
#RajThackeray#गुढीपाडवामेळावा२०२५
राज ठाकरेंच्या भाषणात एका गोष्टीचं कायम कौतुक वाटत, जे कोण बोलू शकत नाही ते राज ठाकरे बोलतात. त्यांच बोलणं हे राज्यातील राजकीय परिस्थितीचे आणि समस्यांचे योग्य असे अवलोकन असते. मराठी माणूस आणि मराठी भाषेच्या बद्दल या माणसाची तळमळ कायम प्रामाणिक वाटते.
#RajThackeray#गुढीपाडवा