मिसिंग लिंकवर durability चेक करण्यासाठी खड्डे पडले होते, मग आज durability चेक करण्यासाठी दरड कोसळली आहे का?
मिसिंग लिंकच्या कामात केवळ दलाली आणि भ्रष्टाचाराची लिंक झाल्याने सुरक्षाच मिसिंग झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसात पुण्यापासून मुंबईपर्यंत पावसाने या नतभ्रष्ट सरकारच्या पोकळ दाव्यांची पोलखोल करत या भ्रष्ट सरकारचे काळे कारनामे उघड केले आहेत. या नतभ्रष्ट सरकारला जनता माफ नाही करणार!
#MissingLink #MissingSuraksha
#जनतेच्याजीवाशीखेळ #SafetyFirst #InfrastructureFailure
राज ठाकरेंनी फक्त आमिर खान च्या लग्नाला हजेरी लावली…
भक्तांनो तुमच्या सरकार मधील किती मंत्र्यांचुआ दोन दोन बायका आहेत याची यादी टाकू का…??
कित्येकांच्या तर बिन लग्नाच्या आहेत…
त्या अमिर ने तर रीतसर लग्न केलाय सर्वांसमोर !!!
Drama is never ending with the bjp. Instead of doing this drama with a whole host of officials and photographers, the Mayor should be focussed on running the city.
Let’s hope she doesn’t call these people Bangladeshi and doesn’t see a conspiracy in Mumbaikars out of work or a stroll on a rainy day
अवघ्या दोन महिन्यांपूर्वी मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालेल्या मिसिंग लिंक प्रकल्पावर आता खड्डे पडू लागले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची ही अवस्था पाहून खरंच आश्चर्य वाटतं!. उद्घाटनाच्या वेळी विकासाची मोठी आश्वासने देण्यात आली, मात्र प्रत्यक्षात अवघ्या दोन महिन्यांतच रस्त्याची गुणवत्ता आणि कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा विकासाचा नमुना आहे की निकृष्ट कामाचे प्रदर्शन, याचे उत्तर संबंधित प्रशासनाने जनतेला द्यावे.
१ तारखेपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. १ तारखेला चेंबुरमध्ये शाळेच्या बसवर झाडपडून एका चिमुकल्याचा जीव गेला, तर काल एक माणूस उघड्या मॅनहोलमध्ये पडून मेला...ह्यांच्या मृत्यूला महापालिका प्रशासनच जबाबदार आहे. मुंबईत ११०% नालेसफाई झाले म्हणत क्रेडिट घेणाऱ्या महापौर ह्या २ मृत्यूचं क्रेडिट घेणार आहेत का? मुंबई जलमय झाल्यावर लोकांचे जीव गेल्यावर त्यावर असूरी हसणारे अमित साटम ह्या कुटुंबांची जबाबदारी घेणार आहेत का? किरिट सौमय्या नको तिथे आधी हजर असतात, आज मुंबईकरांच्या मदतीला हजर आहेत का?
अनेकदा लोकांनी आणि महापालिकेत आमच्या पक्षाच्या नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला सुचना करुनही जर ह्यांनी काही ठोस पाऊलं उचलली नाहीत...तर मुंबईच्या आजच्या स्थितीला हेच जबाबदार आहेत. ह्यांना कोणती शिक्षा करावी?
Since July 1, Mumbai has been witnessing relentless heavy rainfall. On July 1, a young child lost their life after a tree fell on a school bus in Chembur. Yesterday, another person died after falling into an open manhole. These tragic deaths raise serious questions about civic preparedness and accountability.
The municipal administration cannot simply claim credit for "110% desilting" while remaining silent when lives are lost. If there is credit to be claimed for the city's preparedness, should there not also be accountability for these preventable tragedies?
When Mumbai was waterlogged, some leaders appeared dismissive instead of addressing the suffering of citizens. Will they now take responsibility for the families who have lost their loved ones? Those who are often quick to appear in front of cameras—are they standing with Mumbaikars in this moment of crisis?
Citizens and our party's corporators have repeatedly raised concerns and alerted the municipal administration about civic infrastructure and monsoon preparedness. If those warnings were ignored and no concrete action was taken, then the administration must answer for Mumbai's current condition.
The people of Mumbai deserve accountability—not excuses. Those found responsible for negligence should face appropriate action under the law, and such failures must never be allowed to repeat.
#shamelessBJP #FailedBJPGovernance #MNSAdhikrut
@AmeetSatam@TawdeRitu@KiritSomaiya
प्रति
श्री. देवेंद्र फडणवीस,
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही तो पसरू देताय?
देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन अस्मानाचा फरक होता. महाराष्ट्रच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं ! पण गेल्या काही वर्षांत आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय हे आता स्पष्टपणे जाणवत आहे !
तुमचा एक आमदार आणि पदाधिकरी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये. एक फार प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही पण कधी ऐकलं असेल, 'Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely' पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे.
कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं, आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेंव्हा होतात आणि त्यावर जेंव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही, तेंव्हा मात्र तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते.
मी गेली ३७ वर्ष राजकारणात सक्रिय आहे. या काळात महाराष्ट्रात एखाद्या नेत्याकडून प्रमाद घडला, चूक झाली तर तो स्वपक्षाचा आहे म्हणून त्याच्या चुकांवर त्यावेळच्या राज्यातील नेत्यांनी कधी पांघरूण घातलंय असं झालं नाही. बाळासाहेब असोत, पवार साहेब असोत की प्रमोदजी असोत किंवा कोणीही असोत, म्हणून महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे अशी देशभर प्रतिमा होती.
आज तुम्ही हा आपला आहे ना मग त्यांनी काहीही केलं तरी घाल त्याला पाठीशी सुरु केलं आहेत. याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं वाटत नाहीये का ? तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करत आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात त्यांना तुम्ही काही बोलत नाही .
( बोलला असता तर परत त्यांची तीच चूक करायची हिम्मत झाली नसती पण ते तसेच वागत आहेत यावरून समजतंय की तुम्ही त्यांना काहीच समज देत नाही आहात) तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे?
तुमच्याकडून म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही संकेतांची अपेक्षा कायम असते. मग तो कुठल्या का पक्षाचा का असेना. त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि यांत सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील.
खरंतर असं बेफाम वागणाऱ्यांकडून तुम्ही राजीनामे घ्यायला हवेत. पण तुम्ही ते का करत नाही आहात माहित नाही. वेडंवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या म्हणजे सगळेच सुतासारखे सरळ येतील.
तुम्ही सुज्ञ आहात. तुमच्याकडून अपेक्षा आहेत.
राज ठाकरे ।
"आम्ही चार किरणांचीही आस का धरावी?
जे कधीच नव्हते आमचे त्याची वाट का पहावी?"
(पक्षात येतानाच जे स्वार्थ आणि बेईमानीचा कीडा घेऊन येतात त्यांच्या जाण्याचे दुःख का करावे)
वादळं पण मराठीत पेला, ऊन अंगावर घ्यायचं आहे तर ते पण मराठीत घ्या... एका रंगमंचावरच्या सादरीकरणात सादरकर्त्यानी मराठी रसिकांना केलेलं कळकळीच आवाहन.. महाराष्ट्रात हेच आवाहन गेली २० वर्ष जीव तोडून श्री. राज ठाकरे करत आहेत. हे आवाहन करायची वेळ या प्रांतावर आली हे दुर्दैव पण हे आवाहन करण्याची पुन्हा पुन्हा उर्मी मिळते ती मात्र श्री. राज ठाकरे यांच्यामुळेच...
#MNSAdhikrut #MNVSAdhikrut
There is no proper accounting of the funds and jewelry received as donations in the *hundi* (offering box) of the Shri Ram Temple in Ayodhya, and there is a distinct possibility of embezzlement. The Special Investigation Team (SIT) probing the matter confirmed this in its preliminary report, and some accused individuals were arrested. I had wanted to write about this since the news first broke, but I was waiting to see how the case unfolded and what lay beneath the headlines.
The country's Prime Minister, Shri Narendra Modi, has maintained his characteristic silence on this issue. It is not just Shri Narendra Modi; not a single minister in the Bharatiya Janata Party (BJP) government has uttered a word about it. Do those who ascended the throne of power in the name of Lord Ram feel nothing about this embezzlement? Has the constant stealing of MPs, MLAs, and office-bearers from other parties made them so habituated to theft of donations made by devotees at the Lord's doorstep? Or is Lord Ram being pushed back into exile because in 2024 people rejected the BJP in Ayodhya?
When the Ram Temple was built in Ayodhya, crores of Hindus across the country experienced immense joy. Hindus had harbored a deep sense of anguish since, Centuries ago, a mosque had been erected after demolishing the temple at the birthplace of the ‘Maryada Purushottam’ (the Ideal Man). In the 1980s, the Vishwa Hindu Parishad and other organizations launched the Ram Janmabhoomi movement. Hindus across the nation rallied behind this movement to uphold their cultural and religious identity. Ordinary Hindus provided financial support. ‘Kar Sevaks’ offered their service, and countless even sacrificed their lives for the cause. The memory of their bodies floating in the Sarayu River remains vivid to this day.
This movement did not belong to any single organization, nor was it solely the Bharatiya Janata Party's (despite their claims to the contrary); Shiv Sainiks participated in large numbers. Indeed, they were at the forefront. Yet not a single leader at the time, not even Balasaheb, sought to claim credit for this movement of Hindu resurgence.
Eventually, the Supreme Court delivered its verdict, clearing the path for the construction of the Ram Mandir at the site of the mosque. However, when the time came for the ‘Pran Pratishtha’ (consecration) of Ram Lalla, the Prime Minister performed the rituals alone; no one else was present in the sanctum sanctorum. If you claim exclusive rights over the deity, do you not also bear the responsibility to address the misappropriation of funds and to reassure the people?
Fundamentally, the Ram Mandir in Ayodhya belongs to the crores of Hindus, Sadhus, saints, and Kar Sevaks of this country. When people offer money, jewelry, or gold, whether as a donation or an act of faith, those offerings carry the scent of hard-earned sweat and are imbued with the sanctity of devotion. Countless women devotees, when they offered gold and jewelry, may have parted with their personal assets passed down through generations. This was an expression of gratitude by devotees who believed that everything they possessed was due to the grace of Shri Ram.
However, there is one thing I fail to understand: it is said that life is infused into the stone idols of our gods and goddesses during their consecration. Why, then, do the celestial weapons held by these deities - such as swords, bows and arrows, maces, and the chakras - not deal with these monsters of men? Or has the ‘stone’ been infused into the devotees themselves? I believe this incident has once again made devotees realize that the offerings made with such faith do not reach the deity but instead line the pockets and fill the bellies of the trustees and priests. Worship the gods and goddesses, certainly, but do not worship these trustees or those who engage in politics through this medium, and do not place any offerings in their hands.
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या हुंडीत जमा होणारे दान, देणगी स्वरूपात येणारा निधी, दागदागिने यांचा कुठलाही धड हिशोब राखला जात नाहीये, आणि त्यात अपहार झाल्याची स्पष्ट शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्याचा तपास करणाऱ्या एसआयटीनेच त्यांच्या प्राथमिक अहवालात याची पुष्टी केली, काही आरोपी पकडले गेले.
बातमी आलेल्या दिवसापासून यावर काही लिहावं असं वाटत होतं परंतू प्रकरण कसं पुढे सरकतंय आणि बातमीच्या ओळींमागे काय लपलंय ते जरा पहात होतो .
या विषयवार देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी त्यांचं प्रसिद्ध मौन बाळगलं आहे. श्री. नरेंद्र मोदीच काय पण भारतीय जनता पक्षाचे सरकारमध्ये मंत्री पदावर असलेली एकही व्यक्ती अवाक्षर काढत नाहीये. प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊन जे सत्तेच्या सिंहासनावर आरूढ झाले त्यांना या अपहाराविषयी काहीच वाटत नाही ? दुसऱ्या पक्षाचे खासदार, आमदार, पदाधिकारी यांची पळवापळवी करता करता या सगळ्याची इतकी सवय झाली किंवा मन कोडगं झालंय की देवाच्या दारात झालेल्या भक्तांच्या दानाच्या पळवापळवीचं पण काही वाटणं बंद झालं आहे का ? का अयोध्या ज्या लोकसभा मतदारसंघात येतं तिथेच २०२४ मध्ये भाजपला लोकांनी नाकारले म्हणून रामाला पुन्हा वनवासात ढकललं जात आहे?
अयोध्येत राममंदिर उभं राहिलं तेंव्हा या देशातील कोट्यवधी हिंदूंना परमोच्च आनंद झाला होता. आपल्या मर्यादापुरुषोत्तमाच्या जन्मस्थानाच्या जागी देऊळ पाडून, काही शतकांपूर्वी तिथे मस्जिद उभारली गेली. पुढे अनेक शतकं हिंदूंच्या मनाला या गोष्टीचा खेद होता. पुढे १९८० च्या दशकांत विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटनांनी रामजन्मभूमी आंदोलन उभं केलं. आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक अस्मितेसाठी देशातील हिंदू या आंदोलनाच्या मागे उभा राहिला. सामान्य हिंदू माणसांनी या आंदोलनाला आर्थिक बळ दिलं, करसेवकांनी सेवा दिली, इतकंच काय असंख्य करसेवकांचा जीव यांत गेला. शरयू नदीत तरंगणारी त्यांची शवं आज देखील स्मरणात आहेत.
हे आंदोलन कुठल्या एका संघटनेचं नव्हतं किंवा फक्त भारतीय जनता पक्षाचं नव्हतं (जरी त्यांचा तसा दावा असला तरी ), त्यात शिवसैनिक पण मोठ्या संख्येने सहभागी होते, इतकंच नाही तर अग्रेसर होते. पण हिंदू पुनुरुत्थानासाठी झालेल्या आंदोलनाचं श्रेय आपण घ्यावं असं त्यावेळच्या एकाही नेत्याला वाटलं नाही, अगदी बाळासाहेबांना पण वाटलं नाही.
पुढे सर्वोच्च न्यालयालयाने निवाडा दिला. मशिदीच्या जागी राम मंदिर उभारायचा मार्ग मोकळा झाला. पण मंदिरात जेंव्हा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेची वेळ आली तेंव्हा मात्र पंतप्रधानांनी एकट्याने त्याची पूजा केली. तेंव्हा गाभाऱ्यात मात्र इतर कोणीही नव्हतं. जर देवावर तुमचा विशेषाधिकार असेल तर त्याच देवाच्या हुंडीतल्या अपहाराबद्दल बोलण्याची, लोकांना आश्वस्त करण्याची तुमची जबाबदारी नाही का ?
मुळात अयोध्येतील राममंदिर हे या देशातील कोट्यवधी हिंदूंचं, साधू संतांचं आणि करसेवकांचं आहे. इथे देणगी म्हणून किंवा श्रद्धा म्हणून लोकं जेंव्हा पैसे किंवा दागिने, सोनं अर्पण करतात तेंव्हा त्या पैशाला कष्टाच्या घामाचा गंध असतो आणि श्रद्देचं कवच असतं. सोनं, दागिने अर्पण करताना असंख्य महिला भक्तांनी त्यांच्याकडे चालत आलेलं स्त्रीधन अर्पण केलेलं असू शकतं. जे काही आहे ते श्रीरामामुळे आहे या भावनेतून भक्तांनी दाखवलेली ही कृतज्ञता.
परंतु मला एक गोष्ट समजत नाही की या आपल्या सर्व देवी देवतांच्या मुर्त्यांची प्रतिष्ठापना करताना म्हणे त्यात प्राण फुंकले जातात आणि मग प्रतिष्ठापना झाल्याचे सांगतात. त्या आमच्या देवी देवतांच्या हातात तलवारी, धनुष्य बाण, गदा, चक्र वगैरे शस्त्रं जी असतात तेच या नराधमांचा बंदोबस्त का नाही करत ? की या प्राण असलेल्या भक्तांमधे दगड फुंकला आहे ? आपण श्रद्धेने दिलेले दान देवाला न जाता विश्वस्त आणि पुजाऱ्यांच्याच खिशात आणि घशात जातं हे पुन्हा एकदा या निमित्ताने भक्तांना समजलं असेल असं मी मानतो ! देवी देवतांची पूजा करा पण या विश्वस्तांची आणि या मार्गाने राजकारण करणाऱ्याची पूजा करू नका आणि कोणतही (दान ) या लोकांच्या पदरात टाकू नका !
🚨 हे काम की फक्त जनतेच्या डोळ्यात धूळफेक? सत्य जाणून घ्या!
"नालेसफाईतील भ्रष्टाचार लपवण्यासाठी आणि जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ही सर्व कामे सुरू आहेत.
दोन दिवसांपूर्वी पहिल्याच पावसात पाणी साचल्यामुळे महानगरपालिका swd विभागाचे AE श्री राम टेके साहेब आणि सब-इंजिनिअर श्री अडसूल साहेब यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली होती. त्यावेळी काही तांत्रिक अडचणी निदर्शनास आल्या आणि त्यानुसार काम सुरू करण्यात आले.
सुरुवातीला नाल्यातील पाणी मोटरच्या सहाय्याने पाईपद्वारे मुख्य रस्त्यावरील चेंबरमध्ये सोडण्यात येत होते. मात्र तेथून पाणी पुढे वाहून जात नसल्याने ते रिव्हर्स होऊन पुन्हा नागरिकांच्या घरांमध्ये शिरत होते. त्यामुळे आता तो पाईप रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या नाल्यात सोडण्याचे काम सुरू आहे.
मात्र, सध्या घटनास्थळी एकही संबंधित अधिकारी उपस्थित नाही. केवळ कामगारांच्या भरवशावर हे काम सुरू आहे.
विशेष म्हणजे, कंत्राटदाराच्या सुपरवायझरने स्पष्टपणे सांगितले की, फ्लो जास्त झाला तर हा ताडपत्रीचा पाईप टिकणार नाही. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी "तू असं का सांगितलंस?" अशी विचारणा केल्याचे या लाईव्ह व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकू येते.
यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, ही कामे खरोखर कायमस्वरूपी उपाय म्हणून केली जात आहेत की फक्त जनतेला दाखवण्यासाठी काहीतरी काम सुरू असल्याचा आभास निर्माण केला जात आहे?
जनतेच्या करातून येणारा पैसा योग्य आणि टिकाऊ कामांवर खर्च झाला पाहिजे. तात्पुरते उपाय करून नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे थांबले पाहिजे.
संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
#राजसाहेबांचाभानुशाली
@RajThackeray@amitrthackeray@narendramodi@AmitShah@Dev_Fadnavis@mieknathshinde@ShivSenaUBT_@OfficeofUT@mybmc@AshwiniBhide@mybmcInfra@mybmcWardL@mnsadhikrut@mnsreport9@mnsRepost
फुटीने फक्त आकडे बदलू शकतात, सत्तेची समीकरण बदलू शकतात... पण निष्ठा नाही, हे आज धाराशिवकरांनी दाखवून दिलं.
गद्दारांच्या उरावर भगवा रोवल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही!