राज्यसेवा परीक्षा २०२३ जागावाढीसंदर्भात आज पाठपुरावा केला असता "माझ्या विनंतीवरून उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांनी दिलेल्या सूचनेनुसार सामान्य प्रशासन विभागाने संबंधित सर्व विभागांना पुनश्च एकदा पत्र लिहून विज्ञापित २९५ पदांव्यतिरिक्त अतिरिक्त पदे रिक्त असल्यास त्यासंदर्भातील मागणीपत्र १ ऑगस्टपर्यंत सादर करण्याची विनंती केली असल्याची" माहिती मला मिळाली.
रिक्त पदांबाबत संबंधित विभागांकडून काय माहिती येते यावरच अंतिम निर्णय निर्भर असला तरीही माझा माझ्या पातळीवर पाठपुरावा सुरुच राहील. #MPSC