माननीय महोदया, आपल्या लाडक्या बहिणी योजना KYC करण्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहे तरी आपण सर्व्हर व्यवस्थित करून लाडक्या बहिणींना सहकार्य करावे
कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणजे मा.ना.एकनाथरावजी शिंदे साहेब,मा.शिंदे साहेबांनी त्यांच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत संगणकपरिचालका सारख्या अनेक सामान्य घटकांना न्याय देण्याचे काम केले,अनाथांचे नाथ त्यांनी कार्य केले,त्यांचा कार्यकाळ राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सदैव स्मरणात
कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो... देवी लक्ष्मी चरणी हीच प्रार्थना.
कोजागिरी पौर्णिमेच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.#संगणकपरिचालक
राज्यातील हजारो संगणक परिचालकांना महायुती सरकारचा दिलासा..!!
मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील संगणक परिचालकांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला. या अंतर्गत सर्व संगणक परिचालकांना नियमित स्वरूपात मानधन मिळावे यासाठी वार्षिक ३३६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे राज्यातील आता २० हजारांहून अधिक संगणक परिचालकांना ग्रामपंचायत स्तरावरून १० हजार रुपये मासिक मानधन मिळणार आहे. यामुळे त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
गेल्या १३ वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांना जे मानधन मिळत आहे ते विहित वेळेत मिळावे अशी त्यांची मागणी होती. त्यांचे मानधन मिळण्यात काही अंशी दिरंगाई होत होती. तसेच त्यांच्या इतर काही प्रमुख मागण्या ही शासन दरबारी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले होते. याच मागण्यांसह राज्यस्तरीय संगणक परिचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माझी शिवसेना जनसंवाद दौऱ्या दरम्यान नुकतीच जालना येथे भेट घेतली होती. यावेळी त्यांच्या सर्व मागण्या समजून घेत त्याबाबत शासन स्तरावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांना यावेळी दिले होते. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महोदयांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दर्शवत त्यांच्या मानधनासाठी भरीव निधीची तरतूद करून राज्य मंत्री मंडळ बैठकीत निर्णय जाहीर केला. त्यांच्या इतर ही मागण्यांबाबत शासनाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असा विश्वास आहे. तर या भरीव आर्थिक तरतुदीसाठी मुख्यमंत्री महोदयांसह उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेबांचे खूप खूप आभार..!!
#DrShrikantEknathShinde #shivsena
@DrSEShinde खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब आपले खूप खूप धन्यवाद💐💐💐 ग्रामपंचायत संगणकपरिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन ही मागणी पूर्ण करून न्याय द्यावा 🙏🏻🙏🏻🙏🏻#संगणकपरिचालक
संगणक परिचालक संघटनेतील सदस्यांनी यावेळी भेट घेतली. गेल्या १३ वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन देण्याची मागणी प्रलंबित आहे. या मागणीबाबत मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन यावेळी त्यांना दिले. गितले.
@mieknathshinde मा साहेब #संगणकपरिचालक यांच्या वाट्याला काहीच नाही का जो गाव पातळीवर शासनाचा आणि नागरिकांमधील दुव्याचे काम करतो त्या व्यक्तीविषयी आपल्याला काहीच तळमळ नाही गेली 13 ते 14 वर्ष हा आपल्या शासनाशी बांधील आहे तरी त्याच्या वाट्याला अपयशच का?
आपणास "अनाथाचे नाथ एकनाथ "असे म्हणतात .
महाराष्ट्राचा पहिला "कॅन्सर केअर हॉस्पिटल ऑन व्हील्स"
उद्या महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत समर्पित करतोय.
आपणा सर्वांची साथ असू द्या 🙏
दरवर्षी कमीत कमी ३०० कॅन्सरग्रस्त रुग्णांचे प्राण वाचविण्याचे ध्येय पुढे ठेवले आहे.
#cancer#care#support#maharashtra
@CMOMaharashtra@mieknathshinde साहेब ग्रामीण भागातील, शेतकरी कुटुंबातील तरुण युवक, युवतींना आपण राजकीय भावना बाजूला ठेवून आम्हाला न्याय मिळवून द्यावा हीच नम्र विनंती, सर्वसामान्यांचे सरकार याची प्रचिती येऊ द्या. 7000 रुपयांत कसे पोट भरायचं ?