Fair and Transparent exam system is not the favour but the right of every aspirant. Until the investigation completes and report of V. Radha Committee publishes, it would be unjust to hold exam. The perpetrators of leakage system should be punished.
@CMOMaharashtra@mpsc
@BaliramDoleyINC संपूर्ण यंत्रणा पारदर्शक झाल्याशिवाय पेपर घेणे अन्यायकारक आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात तयार झालेले पेपर देऊन परीक्षा घेणे म्हणजे नव्या घोटाळ्याची आवृत्ती ठरेल. त्यामुळे नवीन पेपर तयार करूनच परीक्षा घेणे उचित ठरेल.
@CMOMaharashtra@mpsc_office@rrp
One paper leak can destroy years of hard work for thousands of honest aspirants.
To ensure transparency and fairness, we request govt to order the HON. MPSC to reset the question papers and then conduct the exam.
@CMOMaharashtra@mpsc_office@AbhiPawarBJP@rrp
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पेपरच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार?
MPSC अध्यक्ष भीमनवार यांच्या म्हणण्यानुसार औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर परीक्षेच्या दोन महिने आधीच सेट झाला होता. मग ३ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ चे पेपर नेमके कधी आणि कुणाच्या काळात सेट झाले, हा विद्यार्थ्यांचा रास्त सवाल आहे.
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ चे पेपर निलंबित अवर सचिव अभिजित लेंडवे यांच्या वादग्रस्त कार्यकाळात सेट झाले असण्याची दाट शक्यता आहे. मग या पेपरच्या सुरक्षिततेची हमी आयोग कशी देणार?
औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर सीलबंद अवस्थेत परीक्षा केंद्रावर पोहोचला, तरीही पेपरफुटीचे प्रकरण समोर आले. त्यानंतर निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे.
मग आगामी राज्यसेवा परीक्षेचे पेपर खरंच सुरक्षित आहेत का? विद्यार्थ्यांच्या मनातील ही शंका दूर करण्याची जबाबदारी आयोगाची आहे. घाईघाईने परीक्षा घेऊन हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करण्याऐवजी संपूर्ण पारदर्शकता आवश्यक आहे.
जुने पेपर रद्द करा, न्यायालयीन देखरेखीखाली नव्याने पेपर सेट करा आणि त्यानंतरच राज्यसेवा मुख्य परीक्षा घ्या.
विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रयोग आता बस्स झाले!
#MPSC #StopPaperLeak
@AUThackeray धन्यवाद आदित्यजी...
आपण आमच्या रास्त मागणीला पाठिंबा दर्शवून पारदर्शक परीक्षेची मागणी लावून धरली.. खरंतर पारदर्शक परीक्षेतूनच चांगले आणि प्रामाणिक अधिकारी घडणार आहेत. त्यामुळे येणारी परीक्षेचे पेपर पुन्हा तयार करूनच परीक्षा घेणे उचित ठरेल..
@CMOMaharashtra@AUThackeray
MPSC परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या पुन्हा एकदा राज्यपाल महोदयांसमोर पत्राद्वारे ठेवल्या आहेत.
सातत्याने होणारी पेपरफुटी आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास ह्यावर तोडगा काढणे गरजेचे आहे.
सद्यस्थितीला सरकारकडून विद्यार्थ्यांना फक्त खोटी आश्वासने मिळत आहेत!
@MahebubShaikh20 अटक केलेल्या 2 विद्यार्थ्यांना संयुक्त मुख्य परीक्षा 2025 च्या पेपर 1 मध्ये सारखे मार्क्स आहेत. तसेच पूर्व परीक्षेत सुद्धा जास्त मार्क्स आहेत. त्यामुळे संयुक्त परीक्षा 2025 रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा..
@mpsc_office@cmo@RRPSpeaks@AbhiPawarBJP
अजून चार जणांना अटक…!
Drug Inspector परीक्षेतील गैरप्रकाराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आणखी चार जणांना अटक झाल्याने या प्रकरणातील गंभीरता अधिक स्पष्ट होत आहे.
चक्रव्यूहातील अभिमन्यूपर्यंत तपास पोहोचेल की नाही, हे येणारा काळच सांगेल; पण या प्रकरणाची व्याप्ती निश्चितच मोठी असल्याचे चित्र आहे.
सध्या तपासामध्ये एका कनेक्शनवरच अधिक भर दिला जात असल्याचे दिसते. मात्र दुसरी महत्त्वाची लिंक अद्याप तपासाच्या कक्षेत का जोडली जात नाही? हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला आहे.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आणि परीक्षेच्या विश्वासार्हतेशी संबंधित हा विषय आहे. त्यामुळे तपास एका कनेक्शनपुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण साखळीचा शोध घेणे, प्रत्येक संबंधित व्यक्तीची भूमिका तपासणे आणि सत्य समोर आणणे आवश्यक आहे.
तपास कुठपर्यंत जातो हे महत्त्वाचे नाही; तपास सत्यापर्यंत पोहोचला पाहिजे.
विद्यार्थ्यांना अर्धसत्य नको, संपूर्ण सत्य आणि दोषींवर कठोर कारवाई हवी!
#DrugInspector #MPSC #ExamScam #विद्यार्थी_न्याय #परीक्षा_पारदर्शकता
@RRPSpeaks ज्या प्रमाणे राजकीय मंडळी आधीच्या झालेल्या निवडणुका रद्द करा अशी मागणी करत आहेत.
त्याच प्रमाणे या राजकीय मंडळीनीं विद्यार्थ्यांसाठी लेंडवेच्या काळात झालेल्या 2024/2025/2026 च्या सर्व परीक्षा रद्द व्हावी ही मागणी करावी.
#विनंती
@RRPSpeaks अटक केलेल्या 2 विद्यार्थ्यांना संयुक्त मुख्य परीक्षा 2025 च्या पेपर 1 मध्ये सारखे मार्क्स आहेत. तसेच पूर्व परीक्षेत सुद्धा जास्त मार्क्स आहेत. त्यामुळे संयुक्त परीक्षा 2025 रद्द करून सर्व प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय द्यावा...
@mpsc_office@cmo@RRPSpeaks@AbhiPawarBJP
#MPSC च्या औषध निरीक्षक परीक्षेत पेपर फोडणारे रॅकेट राज्यभर असून, आम्ही स्वतः शंभरहून अधिक नावं दिली होती. परंतु आयोगाने मात्र प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी एकजुटीचा परिणाम दिसत असून, अखेर आज आणखी चार घोटाळेबाजांना अटक झाली आहे. सुरुवातीला एकाच उमेदवाराला फायदा झाल्याचं सांगणारे भ्रष्ट अध्यक्ष आज पुन्हा उघडे पडले आहेत. सत्य दडपण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी सत्य समोर आल्याशिवाय राहत नाही. भ्रष्ट अध्यक्षांचा क्रूर चेहरा समोर आणूच!
विशेष म्हणजे, आज अटक झालेले दोन उमेदवार COMBINE 2025 MAINS च्या मेरिट लिस्टमध्ये देखील आहेत. हा गोंधळ खूप मोठा आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, तत्काळ आयोग बरखास्त करून क्लीनअप करा. विषय गंभीर आहे. कर्णासारखं मैत्रीत आंधळं होऊन दुर्योधनाला पाठीशी घालू नका!
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC #PeperLeak #पेपरफुटी
@RRPSpeaks अटक केलेल्या 2 विद्यार्थ्यांना संयुक्त मुख्य परीक्षा 2025 च्या पेपर 1 मध्ये सारखे मार्क्स आहेत. तसेच पूर्व परीक्षेत सुद्धा जास्त मार्क्स आहेत. त्यामुळे संयुक्त परीक्षा 2025 रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा..
@mpsc_office@cmo@RRPSpeaks@AbhiPawarBJP
@RRPSpeaks हे पकडले गेलेले 2 जण संयुक्त गट ब पूर्व 2025 कसे पास झाले??
त्यांना गट ब पूर्व परीक्षा 2025 चा पेपर मिळालेला असेल तसेच अजून जितक्या परीक्षा ते पास झाले आहेत त्या सर्व पूर्व परीक्षाचे पेपर मिळालेले असू शकतात..
त्या मुळे ड्रग इन्स्पेक्टर प्रमाणे गट ब 2025 पूर्व रद्द झाली पाहिजे
आधी विद्यार्थ्यांच्या मागणीचं काय केलं ते सांगा आणि मगच भरती प्रक्रिया राबवा.
MPSC ही केवळ एक परीक्षा नाही; ती लाखो तरुणांच्या मेहनती, स्वप्नांची आणि भविष्याची आशा आहे. पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि भरती प्रक्रियेबाबत निर्माण झालेले प्रश्न विद्यार्थ्यांचा विश्वास ढासळवत आहेत. त्यामुळे पेपरफुटी व गैरप्रकार रोखण्यासाठी शासनाने काय प्रतिबंधात्मक उपाय केले? विद्यार्थ्यांनी मांडलेल्या तक्रारी व आक्षेपांवर सरकारकडून काय कारवाई झाली? या गैरप्रकारांचा प्रशासकीय पातळीवरील जबाबदारी निश्चित करण्यासाठी काय पाऊल ऊचलण्यात आले ? आयोगावरील विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी सरकारने कोणता कृती आराखडा आखला आहे? याची उत्तरे आधी सरकारने द्यावित आणि मगच भरती प्रक्रिया राबवावी.
@CMOMaharashtra@mpsc_office
@satejp प्रामाणिक आणि जबाबदार अधिकारी घडवण्यासाठी परीक्षा पद्धती सुद्धा पारदर्शक असणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रश्न पत्रिका नव्याने तयार करूनच परीक्षा घेणे उचित ठरेल..
@mpsc_office@CMOMaharashtra@RRPSpeaks@satejp