पुरुषांना मनातल्या गोष्टी मो��्याने बोलायचा चॉईस नसतो. सगळं फक्त साठत राहतं. सरणावर पुरुषाला मणभर लाकूड जादाच लागत असावं कदाचित. आयुष्यभर आतून जळत रहायचं, पण साली एक धग बाहेर आली तर शपथ.आणि लोक म्हणतात भोग स्त्रीच्या नशिबी.सगळेच जळत असतात,प्रत्येकाची धग वेगवेगळी.A big hug guy's🤗
भ्रष्टाचाराचा कहर अवकाळीच्या मदतीतून लाच
अतिवृष्टीने पिचलेल्या बळीराजाला आता सुल्तानी कारभाराचेही फटके बसत आहेत. सर्व गमावून बसलेल्या शेतकऱ्याच्या खात्यात शासनाकडून मदतीचे पैसे जमा होत आहेत. मात्र भ्रष्ट सरकारी बाबू या मदती��रही डल्ला मारत आहेत.
डॉक्टर भगिनी अजून मेली नाही.. तिचं चारित्र्यहनन करून.. ते कार्य अजून सुरू आहे.
सत्तावळू त्यासाठी अविरतपणे राबत आहेत.. महिला आयोगही त्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करत आहे.. मुख्यमंत्र्यांच्या छत्रछायेखाली सगळं सुरुय म्हणूनच म्हणतात 'महाराष्ट्र आता थांबणार नाही'..❤️
#महाराष्ट्र
आजुन कारखान्यांनी ऊसदर जाहीर केला नाही, तो पर्यंत उसाला तोड आल्या.🏭
ऊस जाऊन दर जाहीर झाल्यानंतर मग शेतकऱ्याला बिल मिळणार!💵
त्यात पण सरकार १५₹ प्रति टन कट करणार व कारखाना वजनात काटा मारणार.🥲
खरंच शेतकऱ्याला कोणीच वाली नाही,गोड ऊसाची कडू कहाणी.🙏🏻👨🏻🌾
#ऊस#दर#कारखाना#सरकार
आधी बीड आणि धनंजय मुंडे, आता फलटण आणि रणजितसिंह निंबाळकर. ठिकाण बदलेल, नेत्याचं नाव बदलेल. बाकी चित्र काही वेगळे नाही. सर्वत्रच अशी स्थिती आहे. अगदी सरसकट सर्वत्र. मी नेहमी म्हणतो, एकतर आपण योगायोगानं जिवंत आहोत किंवा व्यवस्थेच्या दृष्टीने आपण निरुपद्रवी आहोत, म्हणून जिवंत आहोत.
फलटण मध्ये पीडित डॉक्टर सोबत जे झाले, ते एकाच वेळी भेदभावाचे अनेक पदर उलगडून दाखवणारे आहे. ज्यामध्ये जेंडर, जात, प्रदेश या सगळ्याची सरमिसळ झाली आहे. त्यासंदर्भात येणार्या प्रतिक्रिया देखील त्याच अंगाने येत आहेत. शेवटी एका व्यक्तीला आत्महत्या करण्यास भाग पाडले गेले, हे विसरू नका!
कालपर्यंत जाती-धर्माच्या नावाखाली गावकुसात घडणार्या असंख्य घटनांसारखीच घटना, आज सर्वोच्च न्यायालयात घडली. कालही त्यावर काही ठोस होत नव्हते, आजही होण्याची शक्यता नाहिये. जाती-धर्माच्या दुराभिमानाने आपल्या समाजाने उलटा प्रवास कधीच सुरू केलाय आणि आपण सर्व हतबल होऊन तो बघतोय...
मराठवाड्यातील भाषा कशीही असली तरी ती आमच्या कडील वेगवेगळ्या नेत्यांच्या बोलण्यात येते तशी नक्कीच नाहीये. सरंजामी आणि जातीय आयाम असलेली भाषा ही काही संपूर्ण मराठवाड्याची भाषा नाहिये. अर्थात हा काही फक्त भाषेचा शिमगा चालू नाहिये, ही संकुचित जातीय कफुंची देखील अभिव्यक्ती आहे.
#निरीक्षण
पंजाबमध्ये पूर आला..कोणाला काही पडलेली नव्हती..
पण..ती माहिती जगापर्यंत पोचवायची जबाबदारी आधी तिथल्या मातीतल्या सेलिब्रिटी लोकांनी आणि नंतर इतरत्र राहणाऱ्या सामान्यांनी ��ेतली..!
आता..मराठवाड्यात पूर आला..किती सेलिब्रिटींचे व्हिडिओ..रिल आणि ट्विट आले..?!😑