काल हरलो, पण सत्य घेऊन हरलो...
गाजर देऊन जिंकलो असतो...
पण पुन्हा मराठी माणसाने कुणा नेत्यावर विश्वास ठेवला नसता....
आणि अजून एक सांगतोय,
उद्या जिंकणार पण सत्य घेऊनच जिंकणार......
या पुढील वाटचाल खडतर जरी असली तरी ठाम आहे...
- #राज_साहेब_ठाकरे●@RajThackeray
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र सैनिकांशी संवाद साधला.
१) सर्वप्रथम माझ्या महाराष्ट्र सैनिकांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा. मी आज तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलो आहे. बाकी मला जो दांडपट्टा फिरवायचा आहे तो मी आपल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात फिरवणार आहे.
२) आज महाराष्ट्रात जे काही सुरु आहे, जो महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे त्यात फक्त मतं, त्यातून सत्ता मिळवणे आणि ही दोन्ही मिळवण्यासाठी तुमची आपापसात भांडणं लागली पाहिजेत, तुम्ही एकमेकांची डोकी फोडली पाहिजेत जेणेकरून तुम्ही विभागलेले रहाल आणि यांना यांचा स्वार्थ साध्य करून घेता येईल यासाठीच सगळं सुरु आहे.
३) कालच जागतिक महिला दिन साजरा झाला. शुभेच्छा दिल्या गेल्या. पण माझ्या मते महिला दिन हा जिजाऊ साहेबांच्या नावाने ओळखला गेला पाहिजे. जिजाऊ साहेब लहान असताना त्यांचे वडील मुघलांकडे चाकरी करत आहेत हे त्यांना पाहवलं नाही, लग्न झाल्यावर आपला पती मुघलांकडे चाकरी करतोय हे त्यांना पाहवलं नाही, त्यांनी आपल्या पतीला बंड करायला लावलं. त्यांच्या मनात स्वराज्य नावाची कल्पना अगदी पहिल्यापासून होती आणि ती कल्पना त्यांनी आपल्या मुलाकडून म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांकडून ती वास्तवात आणून घेतली. या सगळ्याच्या मागे एका स्त्रीची प्रेरणा होती. हे आपण विसरतो. महाराष्ट्राला कर्तृत्ववान स्त्रियांची एक मोठी परंपरा आहे पण हे आपण आज विसरलो आहे.
४) पक्षाला १९ वर्ष पूर्ण झाली. आज असंख्य पक्षांना, प्रश्न पडतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जय पाहिला पराजय पाहिला पण तरी या पक्षातील माणसं एकत्र कशी राहतात ? याला दृष्ट लागू नको दे
५) सध्या जे राजकीय फेरीवाले आलेत की जे आज या फुटपाथवर, कोणी डोळे मारले की त्या फुटपाथवर. असले फेरीवाले मला पक्षात नको आहेत. आपली संघटना आजसुद्धा राज्यभर पसरली आहे त्याची अजून बांधणी करायला हवी. पक्षातील गटाध्यक्षाला त्याच्या घरच्यांना वाटलं पाहिजे की त्याची काळजी पक्षातील लोकं घेत आहेत. त्याच्याशी कोणीतरी बोलतंय. म्हणून पुढच्या २ दिवसांत पक्षातील नेत्यांपासून ते गटाध्यक्षांपर्यंत प्रत्येकाची कामं, त्याची आचारसंहिता हे घेऊन येत आहे. आणि हो माझी आचारसंहिता पण त्यात असणार आहे. दर १५ दिवसाला प्रत्येकाचं काम तपासलं जाणार आहे आणि त्याची यंत्रणा पण लावली आहे. आणि कोणी कामचुकारपणा करत असेल तर त्याला पदावर ठेवणार नाही.
६) मध्यंतरी मुंबईतल्या मेळाव्यात काही पदाधिकारी हजर नव्हते. त्या गैरहजर पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यातल्या काहींनी कारणं सांगितली की कुंभ मेळ्याला गेलो होतो. मी त्यांना म्हणलं इतकी पापं करता कशाला की जी धुवायला गंगेत जावं लागतं. आमचे बाळा नांदगावकर कमंडलूमधून गंगेचं पाणी घेऊन आले. इतक्या लोकांनी अंघोळ केल्यावर गंगा कशी स्वच्छ राहील. असलं पाणी कोण पिणार ? श्रद्धा समजू शकतो पण या देशातील एक नदी स्वच्छ नाही, नदीला आपण माता म्हणतो पण त्या नदीला आपण स्वच्छ ठेवत नाही. राजीव गांधी असल्यापासून गंगा साफ होणार असं ऐकतोय पण पुढे
काय झालं ? अंधश्रद्धेतून माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी बाहेर यावं.
७) पुढच्या काही दिवसांत प्रत्येकाला त्याच्या जबाबदाऱ्या दिल्या जातील, त्याचं नीट पालन झालंच पाहिजे. आणि येत्या ३० मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी वाजतगाजत गुलाल उधळत शिवतीर्थावर या.
#वर्धापनदिन२०२५
रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मनापासून अभिनंदन करतो! टीम इंडियाला खूप खूप शुभेच्छा! 🇮🇳🏏🏆
@BCCI@ImRo45#TeamIndia#ICCChampionsTrophy#INDvsNZ
भाजपच्या हिंदुत्ववादी समर्थकांनी खालील प्रश्नांची उत्तरे द्यावी..
१. मशिदीवरील भोंगे अजून का बंद झालेले नाहीत ?
२. गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे अजून का निघालेली नाहीत ?
३. औरंग्याच्या कबरीस निधी केंद्र सरकार का देत आहे ?
४. आई समान नद्या अजून अस्वच्छ का आहेत ?
रोहित शर्मा च्या अप्रतिम फलंदाजी आणि कर्णधार म्हणून केलेल्या कामगिरी मुळे आपण #ChampionsTrophy2025 जिंकलो... 🔥🔥♥️😍🏆 यात वाटा आहे सुरवातीला कमाल गोलंदाजी केलेल्या वरुण, कुलदीप, अक्षर आणि जडेजा यांची आणि नंतर श्रेयस, हार्दिक आणि KL राहुल ची महत्वाची फलंदाजी.. 🙏🏻🙏🏻
राज ठाकरे काय चुकीचे बोलले नाही.
अंदाभक्त चा तोंडावर चपराक मारली आहे. खर गोष्टी न सांगता फकत कंगारावळा गिरीश महाजन, दरेकर करत आहेत.
@rubabdarmanase@RajThackeray
काँग्रेस व्हाया शिवसेना प्रवास केलेल्या संजय निरूपम किंवा आपणच हिंदुत्वाचे तारणहार आहोत असा गैरसमज असणाऱ्या तुषार भोसले सारख्या लोकांनी राजसाहेब ठाकरेंना हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता नाही. बाकीचे बिळात लपून बसतात त्यावेळी हिंदुत्वासाठी आक्रमक भूमिका त्यांनी घेतलेली आहे. न पटणाऱ्या गोष्टींची कुठलीही तमा न बाळगता विरोध करण्याचं धारिष्ट त्यांच्यात आहे. प्रबोधनकार ठाकरेंचा त्यांना वारसा आहे.
गंगा नदीला मातेचा दर्जा देताना त्यातील अस्वच्छ पाणी, करोडो लोक त्यात उतरल्यानंतर ते अपायकारक झालं हे वास्तव आहे. राजसाहेब ठाकरेंनी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक ओळखण्याचं आवाहन केलंय.... पण अशा लोकांच्या मेंदूत ते शिरणार नाही !
सुसमाअक्का राज ठाकरे अधूनमधून नाही तर नेहमीच खरं बोलतात. पण तुमच्या सारख्या नटद्रष्टाना आपल्या बाजूने बोलल्यावर चांगलं आणि विरोधात बोलल्यावर वाईट वाटतं.
असो राज ठाकरे शेवरी प्रबोधनकारांचे नातू आहेत,आपल्या धर्मातील चुकीच्या पद्धतींना सुधारण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात.
#हिंदुत्व
आज ज्या प्रकारची आग राजसाहेबानी लावली आहे, मला पूर्ण खात्री आहे ह्या भक्तांच्या कार्यालयात असेच काही घडत असेल!
ज्या प्रकारची आग लागली आहे खाली,मी खात्री ने सांगतो आज कैलास जीवन खूप विकले गेले असणार!
#RajThackeray#Mumbai#Maharashtra
जो मार्ग लोकहिताचा आहे, जो मार्ग येणाऱ्या पिढीच्या भवितव्यासाठी योग्य आहे, त्याच मार्गावर माझा नेता जाती धर्माच्या पलीकडे जाऊन प्रबोधन करतो.
राजसाहेब याआधीच म्हणाले होते "मी धर्मांध नाही, मी हिंदू धर्माभिमानी आहे"
#मराठी#हिंदू
मी हिंदू धर्माभिमानी 🚩
धर्माचा ठेका फक्त भाजपनेच घेतलाय अस कोणी सांगितलय….???
“जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात धर्मावर संकट आलंय तेव्हा फक्त एकटा राज ठाकरे त्याविरोधात उभा राहिलाय”
भाजपचे भक्तांनी इथे सोशल मीडियावर फुशारक्या मारण्यापलीकडे धर्मासाठी काय केलंय हे त्यांनी आधी सांगावं !!!
#RajThackeray
राज ठाकरे राजकीय फायदा-तोटा न बघता चुकीच्या गोष्टींवर हातचं राखून कधीच बोलत नाही, मग त्याचा कधी डाव्यांना त्रास होतो तर कधी उजव्यांना..!!
पण आजच्या काळात खरं बोलणारा हा शेवटचा 'राजकीय' नेता राहिलाय, हे सर्वांनी लक्षात ठेवावं.
Love you Raj Thackeray ❤️
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात, ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत सदानंद मोरे सरांचं भाषण आवर्जून ठेवलं होतं. आपण कोण होतो, आपण काय पराक्रम करून ठेवला आहे, याचं भान मराठी जनता विसरली आहे असं मला अनेकदा वाटतं. आपला इतिहासच जर आपण विसरलो तर वर्तमानात आपण काय कामगिरी करणार? म्हणूनच सदानंद मोरे सरांना मराठी माणसाच्या कामगिरीचा लेखाजोखा थोडक्यात मांडावा अशी मी विनंती केली आणि त्यांनी देखील त्याला मान्यता दिली.
सरांचं हे भाषण आवर्जून प्रत्येकाने ऐकावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. इतिहासकार जदुनाथ सरकारांनी त्यांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत असं लिहिलं होतं की मरहट्टे (एकूणच सर्व मराठी समाज ) अफाट पराक्रमी आहेत, त्यांनी त्यांच्यातल्या काही गोष्टी बदलल्या तर पुढील १०० वर्षात हा समाज हा जगातील सगळ्यात वैभवशाली समाज असेल. मराठी माणसांच्यात पुन्हा एकत्र येऊन काहीतरी भव्य उभं करण्याची जिद्द निर्माण व्हावी असं मला मनापासून वाटतं. त्यामुळे हे भाषण नक्की ऐका, त्यातून प्रेरणा घ्या.
#वर्धापनदिन२०२५
कालच जागतिक महिला दिन साजरा झाला. शुभेच्छा दिल्या गेल्या. पण माझ्या मते महिला दिन हा जिजाऊ साहेबांच्या नावाने ओळखला गेला पाहिजे...श्री.राजसाहेब ठाकरे
#RajThackeray@mnsadhikrut