MPSC विद्यार्थ्यांवर टीका करणाऱ्या मॅट्रिक पास राजकीय विचारवंतांना विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत, हेही माहीत नाही!
मागण्यांवर चर्चा एकाचीही नाही. पण सिंहासनाशी जवळीक असल्यामुळे प्रत्येक आंदोलन राजकीय वाटणार!
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार?
विद्यार्थ्यांच्या सत्याग्रहाला १ ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली. त्या दिवशी इंदुलाल कॉम्प्लेक्सजवळ पेपरफुटी समोर आणणारा ऋषिकेश गांगुर्डे याच्यासह ओमकार पाटील, गजानन शेळके, सोमनाथ चव्हाण आणि संकेत कणसे उपस्थित नसताना, ते गावी असतानादेखील त्या दिवशी इंदुलाल कॉम्प्लेक्सजवळ पोलिसांना कसे दिसले?
विद्यार्थ्यांचे वर्णन करताना प्रमोद पाटील यांचे लिंग महिला दाखवले आहे, तर प्रियांका चौधरी यांचे लिंग पुरुष दाखवले आहे. FIR मध्ये इतक्या चुका?? हे सर्व पाहता, FIR करणारा अधिकारी पेपर फोडून आला की काय, असा प्रश्न पडतो…
असो, वरून मालकाचे आदेश ऐकून पोलीस वागायला लागले की असेच होते. हे विद्यार्थ्यांवरील सरकारचे दबावतंत्र आहे. पण या दबावाला विद्यार्थी घाबरणार नाहीत. हे सर्व गुन्हे जामीनपात्र असून, वकिलांची मोठी फौज आम्ही उभी केली आहे. त्यामुळे सरकारने असे खोटे गुन्हे दाखल करण्यापेक्षा भ्रष्ट भीमनवारला पदावरून हाकलावे. तो सरकारचा जावई आहे का?
खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा!
@Dev_Fadnavis
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #MPSCProtest #विद्यार्थ्यांना_न्याय_द्या #खोट्या_FIR_रद्द_करा #राजीनामा_झालाच_पाहिजे
@Shivendraraje11 राजे जरा ते kal viral झालेलं मार्क लिस्ट baga की का भाजप च्या सगळे लोकांनी ठरवले आहे गरीब गरीब राहूनच मारायचा आणि तुम्ही लुबाडून लोकांन मोठे व्हायचे
MPSC मार्फत घेण्यात आलेल्या 'ड्रग इन्स्पेक्टर' परीक्षेचा पेपर फुटल्याचे आम्ही यापूर्वीच पुराव्यांसह सिद्ध केले आहे. या घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आधीच तीव्र असंतोष असताना, आता 'गट-ब' (कम्बाईन) परीक्षेबाबतही अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेत निवड झालेला मुख्य आरोपी विजय किंगर याला कम्बाईन पूर्व परीक्षेत १०० पैकी तब्बल ९० गुण मिळाले आहेत, जे अत्यंत संशयास्पद आहेत. ड्रग इन्स्पेक्टर पेपरफुटीतील दोन मुख्य आरोपी विजय किंगर आणि साजिद सांदे या दोघांनाही गट-ब मुख्य परीक्षेच्या पेपर-१ (भाषा) मध्ये अगदी एकसारखे १२८.५० गुण मिळाले आहेत! हा निव्वळ योगायोग कधीच असू शकत नाही.
आयोगाच्या या अनास्थेमुळे आणि वाढत्या भ्रष्टाचारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आले आहे. MPSC चे संपूर्ण शुद्धीकरण केल्याशिवाय हे गैरप्रकार थांबणार नाहीत आणि सामान्य विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची संधी मिळणार नाही.
आपली ही लढाई व्यवस्था बदलण्याची आणि हक्क मिळवण्याची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच पालक आणि सामान्य नागरिकांनीही मोठ्या संख्येने या सत्याग्रहाच्या लढ्यात सहभागी व्हावे आणि विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा द्यावा!
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
#MPSCProtest #MPSCPuneProtest #MPSCStudentSatyagraha
📢 या टेलिग्राम #ॲडमिन ची चौकशी करण्यात यावी.
केंगर च्या जवळील आणखी कोण कोण लागलं होतं या परीक्षेमध्ये त्याची सखोल चौकशी करावी.💰
मोठे मासे गाळाला लागण्याची शक्यता.. 🐠
@MumbaiPolice आपण सांगितल्याप्रमाणे आपल्याला पुरावे दिले असून कारवाई कधी होईल?
@RRPSpeaks@Dev_Fadnavis
अजूनही सरकार आणि आयोगाला जाग येत नसेल तर आंदोलन मुंबई कडे घेऊन जावे लागेल. लवकरात लवकर राजनामा घ्यावा. आत्ता फक्त अध्यक्ष नको तर सर्व सदस्य आणि इतर कर्मचारी यांचे राजनामे घेऊन JAIL मध्ये जातील याची व्यवस्था करावी
@mpsc_office@bhimanwar@CMOMaharashtra@RRPSpeaks@RahulGandhi