देशातील सर्व खेळाडूंचे प्रेरणास्थान महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#sportsday
नेर येथे आज दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप शिबिर पार पडले. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहण्याचा मा��ा प्रयत्न आहे. कृत्रिम अवयव आणि इतर साधने यांच्या मदतीने अपंग व्यक्तीचे जीवन सुकर करण्यात आपण खारीचा वाटा उचलू शकलो याच समाधान नक्कीच आहे. असे शिबिर मतदारसंघात आपण सातत्याने राबवत असतो कारण जास्तीत जास्त दिव्यांगांना याचा लाभ व्हावा. शिबिराला मोठ्या संख्येने आलेल्या दिव्यांगांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
नेर येथे विदर्भातील संत परंपरेत अग्रभागी असलेले संत श्री नगाजी महाराज सभागृहाच्या भव्य इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहून भविकांशी संवाद साधला.
महाराष्ट्रासह संत परंपरेचा मोठा वारसा आपल्या विदर्भाला लाभला आहे. अध्यात्माला लोकशिक्षणाची जोड देत समाजाला जागरूक आणि दिशा देण्याचे कार्य संतांनी केले. त्यांचाच वारसा, विचार आणि उपदेशाने आपण आपले जीवन आनंदमय करण्याचे काम करत आहोत.
अध्यात्म, आरोग्य, शिक्षण, शेती, सहकार, कला, क्रीडा, रोजगार आणि स्वयंरोजगार यासह मतदारसंघातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी मी कटिबध्द आहे. जनविकासाची अनेक कामे पूर्णत्वास आली आहेत. काहींचे कामे सुरू आहेत. अनेक कामे मंजूर झाली असून लवकरच त्याचे देखील काम सुरू होणार आहे. आपली साथ, ��हकार्य आणि आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी राहिल्या��े मी हे करू शकलो. आगामी काळात देखील आपण अशीच साथ आणि आशीर्वाद द्यावा अशी आशा बाळगतो.
आज किन्ही, यवतमाळ येथे महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी मेळावा मुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस जी आणि मा. ना. अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला.
यावेळी उद्य���ग मंत्री उदय सामंत, आमदार भावना गवळी, आमदार अशोक उईके, आमदार मदन येरावार, आमदार संदिप धुर्वे, आमदार नामदेव ससाणे, आमदार इंद्रनील नाईक, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाडक्या बहिणी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
दारव्हा येथे श्री राधाकृष्ण मंदिरात गोकुळाष्टमी निमित्त संगीतमय शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
प. पुं. ह.भ.प सुदर्शनानंदजी महाराज व्यास यांच्या अमोघ वाणीतून सुरू असलेल्या कथेला उपस्थित होतो.यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दहीहंडी निमित्ताने आजचे कार्यक्रम
(मंगळवार, दि. 27 ऑगस्ट 2024)
वेळ : दु. 12.00 वाजता : जांबोरी मैदान, वरळी
वेळ : दु. 12.30 वाजता : स्वातंत्र्यवीर सदकांत ढवन मैदान, भोईवाडा
वेळ : दु. 1 वाजता : श्रेयस सिग्नल, ���ाटकोपर प.
वेळ : दु. 1.40 वाजता : टागोर नगर, विक्रोळी पू.
वेळ : दु. 2.30 वाजता : भिवंडी, ठाणे
वेळ : दु. 3.10 वाजता : संकल्प चौक, ठाणे
वेळ : दु. 3.35 वाजता : वर्तकनगर, ठाणे
वेळ : संध्या. 4 वाजता : हिरानंदानी मेडोज्, ठाणे
वेळ : संध्या. 4.45 वाजता : अशोकवन, दहिसर
वेळ : संध्या. 5.10 वाजता : देवीपाडा मैदान, बोरीवली पू
वेळ : संध्या. 5.40 वाजता : आर. एम. भट्टड रोड, बोरीवली
वेळ : संध्या. 6.05 वाजता : सप्ताह मैदान, कांदिवली
@Dev_Fadnavis
#Maharashtra #Mumbai #DahiHandi
इ. १२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !
#HSC#Congratulations
यवतमाळ येथे आचार्य श्री. महाश्रमणजी यांचे सुशिष्य मुनिश्री अहृतकुमारजी यांची भेट घेत आशीर्वाद घेतला. संत - महंतांच्या भेटीतून कायमच ज्ञानाच्या गोष्टी शिकायला मिळतात.
आज यवतमाळ येथे दिग्रस विधानसभा क्षेत्रातील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची आढाव�� बैठक पार पडली. यवतमाळ - वाशिम लोकसभा युवासेना अध्यक्ष विशाल गणात्रा यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या या बैठकीला उपस्थित राहून युवा सहकाऱ्यांशी संवाद साधला.
ऊर्जा, दिशा आणि गतीचा अनोखा मेळ म्हणजे पक्षाचा युवा कार्यकर्ता, जमिनीशी नाळ आणि नेत्याच्या गळयातील माळ म्हणजे युवा कार्यकर्ता असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली युव��ांना केंद्रित ठेवून अनेक योजना राबविल्या जात आहे. यामध्ये कौशल्य प्रशिक्षण, उद्योजकता विकास आणि व्यवसायाला चालना देणारे उपक्रम आहे.
आपल्या विधानसभा क्षेत्रात देखील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी अभ्यासिका, क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावंतांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन, उद्योग आणि व्यवसायात उभारी घेऊ पाहणाऱ्या युवा वर्गासाठी विविध योजनांच्या माध्यमातून मदत ��रण्यात येत आहे. महिला/ युवतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आपण गारमेंट क्लस्टर सुरू केले आहे. या पुढेही युवा वर्गाला सक्षम करण्यासाठी आपले सातत्याने प्रयत्न सुरूच राहणार आहे.
आपल्या सर्व युवा सहकाऱ्यांनी जास्तीत जास्त युवक - युवतींपर्यंत पोहचून त्यांना सरकारच्या योजनांची माहिती देत लाभ मिळवून द्यावा असे आवाहन केले.
@mieknathshinde