ज्येष्ठ समाजवादी विचारवंत साथी पन्नालाल सुराणा यांच्या निधनाने आपण एक सव्यसाची संपादक, कृतिशील समाजसेवक गमावला आहे.
साथी सुराणा यांचा व्यासंग दांडगा होता. शिक्षण, शेती, बेरोजगारी या विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले. त्यांची राजकीय व सामाजिक कारकीर्द बिहार येथे जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून सुरू झाली. धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथे ‘आपले घर’ या संस्थेच्या माध्यमातून लातूरच्या भूकंपात निराधार झालेल्या मुलांसाठी त्यांनी केलेलं कार्य प्रेरणादायी आहे. एक पत्रकार, संपादक, समाजसेवक म्हणून ते नेहमीच आम्हाला आदरणीय होते. पन्नालालजींना भावपूर्ण श्रद्धांजली.
It was a truly delightful experience to revisit my five decades in journalism and public life during my interaction with young Tareq Wahab of “A New Chapter” magazine for their cover story on me. Reflecting on the journey of the Lokmat Group, the launch of Lokmat in Chhatrapati Sambhajinagar, my bold decision to introduce the English daily Lokmat Times from this historic city, and my humble contribution to the region’s development as an MLA and minister, was both enriching and deeply nostalgic.
Whatever I have been able to achieve is solely because of the unwavering support of the warm and large-hearted people of Marathwada and my colleagues in Team Lokmat.
Interestingly, Tareq’s father, Siraj Wahab - an exceptionally bright and dynamic Managing Editor at Arab News, Jeddah - began his journalistic journey as my colleague at Lokmat Times, Chhatrapati Sambhajinagar in the late 1980s. His wife, Dilshad Wahab, the owner-publisher, has launched this beautifully crafted English magazine, which perfectly meets the city’s long-felt need for a quality periodical.
My sincere thanks to Dilshad and her team at “A New Chapter” for featuring me on the cover. Wishing the magazine a successful and inspiring journey ahead.
@ANewChapterMag@sirajwahab@DilshadWahab@LokmatTimes_ngp
भारताची राजधानी नवी दिल्ली ही जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी आहे. आसाममधील बर्नीहाट हे जगातील सर्वात प्रदूषित शहर आहे तर जगातील सर्वात जास्त २० प्रदूषित शहरांपैकी तब्बल १३ भारतात आहेत. याशिवाय जगातील सर्वात जास्त प्रदूषित देशांमध्ये भारताचा नंबर पाचवा आहे.
आयक्यु एअर या कंपनीने प्रकाशित केलेल्या अहवालातून या धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. ही आकडेवारी खिन्न करणारी आहे. वाहनांचा वाढता वापर, कारखान्यांतून सोडला जाणार धूर, वृक्षतोड, अयोग्य कचरा व्यवस्थापन आदीमुळे प्रदूषण वाढतेय आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे प्रयन्त अपुरे पडत आहेत, हेच इथे स्पष्ट होते होते. आरोग्यावर याचे होणारे परिणाम भयंकर आहेत. हा विषय गंभीरपणे घेऊन दुरगामी उपाययोजना करण्याची गरज आहे, हेच हा अहवाल सांगतोय.
#AirPollution
#AirQuality
#WorldAirQualityReport
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याची हमी देणारे भारतीय संविधान लागू झाले तो आजचा आनंदाचा दिवस 'लोकमत'च्या माझ्या सर्व सहकाऱ्यांसमवेत ध्वजवंदन करून साजरा केला. भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो.
आप सभी को 76 वें गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं। संविधान के प्रति कटिबद्ध हमारा लोकतंत्र और अधिक मजबूत हो। हम सब भारतीय जात- पात , धर्म इत्यादि के भेद मिटाकर विकसित राष्ट्र का निर्माण करें ! जय हिंद।
नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी उपस्थित राज्याचे मंत्रिमंडळ तसेच विधिमंडळाच्या सदस्यांसाठी 'लोकमत'तर्फे काल रात्री स्नेहभॊजन आयोजित करण्यात आले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदेजी, अजित पवारजी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेजी, चंद्रशेखर बावनकुळेजी, चंद्रकांत पाटीलजी, अतुल सावेजी, संजय शिरसाटजी, पंकजाताई मुंडे, मेघनाताई बोर्डीकर, योगेश कदमजी, यांच्यासह सर्व मंत्री, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते आ. अंबादास दानवेजी, आ. अमित देशमुखजी, आ. सत्यजित तांबेजी, सर्व पक्षीय आमदार आवर्जून उपस्थित होते. सभागृहातील गरमागरमी, कटुता विसरून सर्व एकत्र आले.
विधिमंडळातील माझ्या अनेक जुन्या सहकाऱ्यांची खूप दिवसांनी भेट झाली.
गप्पा, हास्यविनोद रंगले.
राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिकजी, पोलीस महासंचालक रश्मी शुकलाजी यांच्यासह राज्यातील अनेक सनदी अधिकारी या स्नेहभोजनाला उपस्थित होते.
उत्तररात्रीपर्यंत चाललेला सोहळा अविस्मरणीय ठरला.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@cbawankule@ChDadaPatil@rahulnarwekar @RamShindeMLA @save_atul@Pankajamunde@SanjayShirsat77@iYogeshRKadam@MeghnaBordikar@ssaunik@iambadasdanve@amitdesh@satyajeettambe@vijayjdarda@devendarda@rishidarda@karandarda@lokmat