१० फुटाच्या अंतरावर शाळा असून येथे मोठ्या प्रमाणात कचरा साठला असतो..तसेच काही लोक या ठिकाणी अनधिकृत वास्तव करत आहेत.बाजूलाच खेळाचे मैदान सुद्धा आहे या प्रकरणात तातडीने लक्ष घालून कार्यवाही अपेक्षित आहे.@mybmc@MumbaiPolice@CPMumbaiPolice@mybmcWardKE@jogeshwarieast
सस्नेह जय महाराष्ट्र,
सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगरसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की.
आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे.
बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच.
तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही सांगतो एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही.
लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया ! ! !
आपला नम्र
राज ठाकरे
@MumbaiPolice@CPMumbaiPolice सामाजिक माध्यमांवर करण्यात येणाऱ्या तक्रारी ची साधी दखल सुद्धा घेतली जात नाही का? या साठी पण कोणता विशिष्ठ दिवस राखून ठेवला आहे का? इथे मानवी मूल्यांचे हणण होत नाही का?
जोगेश्वरी न्यू सिमेंट यार्ड जवळ पश्चिम रेल्वे ने कंत्राट दिलेल्या पे अँड पार्क टेंडर च्या मालकाला जागा आंदण म्हणून देण्यात आली आहे का ? गरजे पेक्षा जास्त जागेत गाड्या लाऊन वसुली चालू आहे.@drmbct@rpfwr1@PiyushGoyal
निवडणुकीच्या काळात रात्री धंदे लावणाऱ्यांवरच कारवाई करण्यात येते मग रोज वनराई पोलिस ठाणे यांच्या हद्दीतील इतर दिवसातील १२ नंतर लागणारे अनधिकृत धंदे का बंद होत नाहीत. @MPLodha
जोगेश्वरी मेट्रो स्थानका खाली खांबा क्र ५२७/५२८ या मध्ये अनधिकृत पणे रात्रीच्या सुमारास व्यवसाय करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही..@MumbaiPolice@CPMumbaiPolice@DGPMaharashtra किती दिवस अनधिकृत फेरीवाल्यांना पाठीशी घालणार ? ,@mybmc@mybmcWardPS
गोरेगाव पूर्व येथे मागील ३ तासापासून वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.. मुंबई ट्रॅफिक कंट्रोल यांना माहिती देऊन सुद्धा अद्याप स्थिती जैसे थी तैसे आहे. जोगेश्वरीच्या पोलिस निरीक्षक यांचा मोबाईल बंद असून अनेक लोकांना नाहक त्रास होत आहे.स्थानिक नागरिकांच्या तक्रारी दुर्लक्ष केल्या जात आहेत
@mybmc नागरिकांच्या तक्रारी न हाताळता परस्पर तक्रार क्लोज केली जाते..फक्त सोशल मीडियावर दाखवण्या पुरत्या कारवाई केली जाते का?@mybmcWardPS सहाय्यक मलनिःसारण अधिकारी स्वतःच्या मर्जीने रिमार्क देतात का?
"Guess कर मुंबईकर!" मध्ये काल शनिवारी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे, ‘ऑगस्ट क्रांती मैदान’
"Guessकर मुंबईकर!" मध्ये @snehalkumar07 यांनी सगळ्यात आधी आणि अचूक उत्तर दिल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन!
"Guess कर मुंबईकर!" मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद!
भेटूया पुढच्या शनिवारी नव्या प्रश्नासोबत!
#मुंबई #Mumbai #MyBMC #GuesskarMumbaikar
#Guessकरमुंबईकर #शनिवारचासवाल #ShaniwarchaSawal
#Saturday #Quiz #SaturdayQuiz
#MumbaikarVibe
#माझीमुंबई
#बृहन्मुंबईमहानगरपालिका #OldMumbai #MumbaiHeritage #MumbaiHistory #History #Heritage
#Mumbaikar #MumbaiCity #MyMumbai
@MumbaiPolice@CPMumbaiPolice@mybmc संबंधित व्हिडीओ मध्ये दिसणाऱ्या व्यक्ती वर आणि एकूणच विशिष्ट समाजावर कारवाई का होत नाही आहे? महाराष्ट्रात फक्त मराठी माणसानं विरुद्धच कारवाई होणार का? यांनी कितीही कायदे पायदळी तुडवले तरी अजून ही गुन्हे दाखल होत नाही..#दादर#stopfeedingpigeon
@Pratik4521 @Rajbhasha_ ईव्हीएम यंत्रात घोटाळा होत आहे त्या प्रकरणात अनेक विरोधी पक्षांनी त्यांची भूमिका मांडली आहे पण याचे उत्तरदायित्व फक्त विरोधी पक्ष किंवा राजकीय पक्षाचं आहे का? या बाबतीत या लोकशाही चे मालक ( जनता) का व्यक्त होत नाही.निवडणूक आयोगाकडे एक email करूच शकतो ना प्रत्येक जण.
@Rajbhasha_ @Pratik4521 भाजप सध्या एका विशिष्ट समाजासाठी काम करत आहे..याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकीत त्यांना भोगावे लागणारच आहेत..पण या वेळी मराठी मतदारांनी १००% संख्येने उतरून मतदान केले पाहिजे प्रत्येक वेळी आपलीच माणसं टाळाटाळ करतात मतदान करायला..