महाराष्ट्रात मराठीच पाहिजे आणि असणार, पण याचा आग्रह धरला तर मराठी माणसालाच माफी मागावी लागत असेल आणि तरीही मराठी माणूस जागा होणार नसेल, आणि तरीही मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या पक्षाला जर मतदान करणार नसेल तर काय करायचं ? बघा आणि थंड बसा असं मराठी माणसाने ठरवूनच टाकलं आहे का ?
#मुंब्रा
#मराठी #राज_ठाकरे
#महाराष्ट्र_नवनिर्माण_���ेना
#MNSAdhikrut
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र,
सर्व प्रथम सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा ! कालगणनेत या वर्षाला एक महत्व आहे , कारण या शतकातील, पाव शतक संपायला आलं. माणसाच्या आयुष्यातल्या जवळपास प्रत्येक क्षेत्रांत इतके प्रचंड बदल झालेत की २५ वर्षांपूर्वीच आयुष्य हे वेगळं युग वाटावं.
या २५ वर्षांच्या कालखंडात आपला पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्याची स्थापना झाली, तो स्थिरावला, पक्षाने अनेक चढउतार पाहिले. आणि हे सगळं आपल्या सगळ्यांना खूप काही शिकवून गेलं.
या २५ वर्षांत जरी खूप बदल झाला असला तरी अनेक गोष्टी तशाच राहिल्यात, मुंबईसारख्या महानगरात जी महाराष्ट्राची राजधानी आहे, तिथे मराठी माणसाला असुरक्षित वाटणं. तरुण मुलामुलींच्या हाताला काम न मिळणे पण त्याच वेळेस बाहेरच्या राज्यातून येणाऱ्यान नोक���ीच्या संधी मिळणं. बेरोजगाराला जात नसते, पण त्याला ती जात जाणवून देऊन, जातीजातीत भांडणं लावणं. शेतकऱ्यापासून ते सर्वच कष्टकऱ्यांच आयुष्य महागाईने होरपळून निघणं. आणि या आणि इतर प्रत्येक समस्येच्या वेळेस लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आठवण होणे, पण नेमकं मतदानाच्या वेळेस पक्षाचा विसर पडणे.
पण ठीक आहे, हे स्वीकारून आपण आता काही बदलांसकट पुढे जायला हवं. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभेचे निकाल लागल्यानंतर मी काही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालो, पण मुद्दाम राजकीय भाष्य टाळलं. नक्की काय घडलं यावर माझं मंथन सुरु आहे आणि लवकरच मी या सगळ्यावर सविस्तर बोलेन. पण महाराष्ट्र सैनिकांना माझं आवाहन आहे की जे घडलं ते विसरून जा. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पुढे काही आठवड्यातच मराठी माणसांविरोधात दंडेलशाही सुरु झाली, आणि त्यावेळेस म���ाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दणका द्यावा अशी अपेक्षा व्यक्त झाली आणि जे आपण केलं देखील. मुळात मराठी माणूस हा फक्त मतदानासाठी वापरला जातोय हे वास्तव अधोरेखित झालं. त्यात महिलांविरोधात अत्याचार वाढतच आहेत. राज्यातले दोन समाज जे दोन्ही मराठी भाषिक, पण त्यांच्यात संघर्ष पेटला आहे. आणि महागाईने लोकं होरपळली आहेत.
असं असताना महाराष्ट्र सैनिकांनी स्वतःच्या मनातील खंत आता बाजूला ठेवली ��ाहिजे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण काहीच करत नाही, त्यामुळे या सगळ्यात आता कृती करण्याची जबाबदारी आपलीच आहे. मी मागे म्हणलं तसं मराठीवर कोणी हल्ला केला तर मराठी म्हणून आणि हिंदू माणसाच्या गळ्याला नख लावलं तर हिंदू म्हणून मी अंगावर येईन, ते आपण करत आहोतच.
पण राज्यात महिलांच्यावर जे अत्याचार होत आहेत, त्याच्यासाठी एक संपर्क कक्ष पक्षाच्या कार्यालयात सुरु करा. महिलांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नसतील तर त्याचा पाठपुरावा करा. आणि तरीही काही घडलं नाही तर हात मोकळे सोडून अत्याचार करणाऱ्या त्या नराधमाना चांगलं फोडून काढा.
महागाईने होरपळलेल्याना दिलासा द्यायला हवा, यासाठी साठेबाजी होत नाहीये ना, हे पाहून त्याची सूचना संबंधित खात्याना करा आणि त्याच्या जोडीला शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दुवा बनण्याचा प्रयत्न करा.
थोडक्यात आपल्या शाखा, कार्यालयं पुन्हा एकदा लो��ांसाठी खुली करा. आणि हो, हे सगळं करताना सोशल मीडिया आपल्या कामाच्या प्रचार प्रसारासाठी वापरायचा आहे पण सोशल मीडिया तुम्हाला वापरत नाहीये ना, त्याच्या अधीन जात नाही आहोत ना हे पहा.
लवकरच मी सविस्तर बोलेन, त्यात अधिक व्यापक दिशा तुम्हाला देईनच. तोपर्यंत नवीन वर्षासाठी आणि पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करण्यासाठी शुभेच्छा !
राज ठाकरे ।
@RetweetMarathi मराठी भैय्यांचा कुठला पक्ष नसतो. ते काँग्रेस, राष्ट्रवादी समर्थकही असतात आणि भाजप, सेनेचे समर्थकही असतात. एक गोष्ट शाश्वत असते, ती म्हणजे ते राज ठाकरेंचे विरोधी असतात.
सस्नेह जय महाराष्ट्र,
कल्याणमध्ये एका मुजोर अमराठी माणसाने मराठी माणसाला, मराठीपणावरून अर्वाच्य शिव्या देत, जबर मारहाण केली. अशीच मुजोरी काही दिवसांपूर्वी गिरगावमध्ये एका अमराठी माणसाने दाखवली. तिकडे त्याला महाराष्ट्र सैनिकांनी जागच्या जागी प्रसाद दिला. कालच्या प्रकरणानंतर पण माझे महाराष्ट्र सैनिक कल्याणमध्ये प्रसाद द्यायला गेले होते. कल्याणच्या घटनेत कोणीतरी शुक्ला नावाचा माणूस होता, महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्रद्वेषी शुक्ला , गुप्तपणे राहत आहेत. मध्यंतरी गिरगावमध्ये घडलेली घटना असो की ही कल्याणमधली, प्रत्येकवेळेला हे असले महाराष्ट्रद्वेषी मराठी माणसाचा कणा तपासून बघत असतात आणि अजून किती तुम्हाला वाकवता येईल हे बघत असतात. बरं असं पण नाही की महाराष्ट्रा बाहेरून इथे आलेले सगळेच महाराष्ट्रद्वेषी आहेत. आज कित्येक पिढ्या इथल्या मातीत मिसळून राहिलेले असंख्य अमराठी माणसं आहेतच. पण ही जी महाराष्ट्रद्वेषींची नवीन पिलावळ इथे गेले काही वर्ष वळवळायाला लागली आहे, ज्या���चा डोळा इथल्या जमिनीवर आहे, त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे. मराठी माणसा आता तरी जागा हो, अन्यथा हे तुमच्या पायाखालची जमीन कधी खेचतील आणि कधी तुम्ही नेस्तनाबूत व्हाल हे समजणार पण नाही !
कल्याणमध्ये जे घडलं त्यावर तिथले खासदार, आमदार हे व्यक्त होत नाहीत किंवा मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा म्हणून पाठपुरावा करत नाहीत, हे का घडतं ? कारण याच नाही एकूणच सर्व आमदार खासदारांनी मराठी जनतेला पुरतं ओळखलं आहे. यांना थोडीफार आमिषं दाखवा की हे करतात मतदान आम्हाला ! मी गेली अनेक ��र्ष जे नेहमी तुम्हाला सांगतोय की या सर्वांनी तुम्हाला गृहीत धरलं आहे.
आणि अशी घटना घडली की सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दरवाजे ठोठवावेसे वाटतात, कारण तेंव्हा खात्री असते की इतर पक्ष तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत. मात्र मतदानाच्या वेळेला मात्र हाच मराठी माणूस इतर पक्षांच्या दरवाजावर जाऊन टकटक करतो !
अर्थात आमच्यासाठी मराठी माणूस हा सगळ्यात महत्वाचा आहे, त्यामुळे आम्ही ���ाहीही झालं तरी धावून जाणारच ! 'लाडकी बहीण'च्या नावाखाली मतं मागणाऱ्यांना माझा प्रश्न आहे की, ज्यांना मारहाण झाली त्या व्यक्तीची बायको, आई, बहीण ही तुमची लाडकी बहीण नाही का ? मंत्रिपदं महाराष्ट्राची उपभोगणार परंतू त्याच भूमिपुत्राला तुमचा आधार नसणार ! तुम्हाला तुमचा मराठी बांधव सोडून हे असले मुजोर जास्त जवळचे का वाटतात ? तुमची ही लाचारी कशातून येते ते मला माहित नाही आणि तुमची लाचारी तुम्हाला लखलाभ....
हिंदू म्हणून आज आपण एकत्र आलं पाहिजे हे ठीक आहे, पण हिंदू म्हणून एकत्र येताना, प्रत्येक राज्यात तिथली भाषा, तिथली स्थानिक माणसं , तिथली संस्कृती यांना चिरडण्याचा प्रयत्न होता कामा नये. हिंदूत्व आम्ही देखील पुजतो परंतू हिंदूना एकत्र आणायच्या नावाखाली मराठी माणसाच्या किंवा इतर राज्यातील कुठच्याही स्थानिक माणसाच्या गळ्याला नख लगणार नाही हे देखील आपण पाहिले पाहिजे !
मी स्पष्ट सांगतो की या कल्याण प्रकरणात आरोपीना अटक करा, त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा. आणि जर सरकारला जमत नसेल, ��र मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका.
मी नेहमी म्हणतो की पोलिसांवर माझा विश्वास आहे, त्यांनी या विश्वासाला सार्थ ठरावं. बाकी सरकारने पण हे असले प्रकार परत होणार नाहीत यासाठी ठोस कारवाई करावी.
राज ठाकरे ।
महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या आणि अविश्वसनीय असे बहुमत घेऊन भाजप, शिवसेना -शिंदे गट,
महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांनी काल शपथ घेतली तर महाविकास आघाडीच्या आमदारानीही आज शपथ घे��ली.शपथविधी दरम्यान अनेकांनी संविधानाला स्मरून, ईश्वरास साक्ष ठेवून, अल्लाला याद करून शपथा घेतल्या पण अनेकांनी अभिजात मराठीचा गळा घोटला. 106 हुतात्म्याच्या बलिदानाला मातीमोल करत हिंदी, उर्दू, सिंधी, इंग्रजी भाषेत शपथा घेत असताना मतांसाठी मराठी अस्मितेच्या गप्पा मारणारे दोन्ही शिवसेनेचे शेपट्या कापलेले वाघ निमूटपणे महाराष्ट्राच्या राज्यभाषेचा हक्क डावलताना निमूटपणे बघत होते.
2009 साल�� मनसे आमदार कै. रमेश वांजळे यांनी अब्बूमियाच्या कानाखाली काढलेला संयुक्त महाराष्ट्राचा नकाशा आजही अब्बूमियाला चांगलाच आठवत असेल.हाच प्रकार दक्षिणेकडच्या राज्यात खपवून घेतला गेला असता का..?
दिल्लीश्वरांच्या पायावर लोटांगण घालत महाराष्ट्रातले राजकारण याआधी महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते चालवत होते, तीच परंपरा भाजपचे नेतेही चालवत आहेत.
महाराष्ट्राची भाषिक अस्मिता, महाराष्ट्राचा भूगोल यांच्याशी तडजोड करून महाराष्ट्र���च्या दैदीप्यमान इतिहासाला कलंक फासण्याचे काम करताना यांना लाजही वाटत नाही.
दक्षिणेतील राज्य आपल्या द्रविड अस्मितेची नाळ घट्ट पकडून केंद्रातील सरकारला आव्हान देत असताना महाराष्ट्रातील देशव्यापी पक्षाचे नेते दिल्लीश्वरांचे लांगुलचालन करत होते, पण आता स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी, मंत्री पदे मिळवण्यासाठी राज्यपातळीवरील पक्षाचे नेतेही दावणीस बांधून घेत असतील तर येणाऱ्या काळात महाराष्ट्राचे नेतृत्व कोणाच्या हातात द्यायचे ? असा प्रश्न महाराष्ट्रप्रेमी जनतेच्या मनात येण��� रास्त आहे.
हेमंतकुमार कांबळे
प्रवक्ता -महाराष्ट्र नवनिर्माण सेना
@mieknathshinde
@ShivSenaUBT_
@BJP4Maharashtra
@AjitPawarSpeaks
@mnsadhikrut
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील, तळेगाव गावातील बातमी धक्कादायक आहे. गावातील एकूण शेतजमीनीपैकी, जवळपास ७५% शेतजमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला आहे... यामुळे १०३ शेतकऱ्यांचं जगणंच धोक्यात आलं आहे. यावर जरी राज्य सरकारने सांगितलं असलं की आम्ही कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, तरी हे पुरेसं नाही.
प्रश्न हा या जमिनीपुरता नाहीये, वक्फ बोर्ड गेली कित्येक वर्ष मनमानी कारभाराने लोकांवर जी दहशत बसवतंय त्याला चाप कसा बसवणार हा आहे ?काही महिन्यांपूर्वी संसदेत वक्फ कायद्यात सुधारणा सुचवणारं विधेयक केंद्रसरकारने सादर केलं होतं, त्यावर मुस्लिमधार्जिण्या विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घातला. आणि त्यामुळे हे विधेयक संसदीय समितीकडे पुनर्विचारासाठी पाठवलं गेलं. या सुधारित विधेयकावर महाविकास आघाडीतील पक्षांची भूमिका ही विरोधाची होती, हे वेगळं सांगायला नको. पण मुळ���त सुधारणा म्हणजे नक्की काय आहेत हे थोडक्यात समजून घेऊया...
१) एखादी मालमत्ता वक्फ बोर्डाची आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार काढून घेतला जाणार आहे; वक्फ बोर्डाची जी मनमानी सुरु आहे त्यावरून हे किती आवश्यक आहे हे तुमच्या लक्षात येईल.
२) एखादी मालमत्ता वक्फ प्रॉपर्टी आहे का सरकारी जमीन आहे याचा निवडा पूर्वी वक्फ ट्रिब्युनलकडून केला जायचा आणि त्यात जागोजागी अतिक्रमणं केली गेली आहेत. हे नव��न विधेयक जर मंजूर झालं तर जिल्हाधिकारी हा यापुढे निवाडा करेल
३) वक्फ बोर्डावर मुस्लिम महिलांचा समावेश असला पाहिजे आणि तसंच मुस्लिमेतर समाजाचं पण प्रतिनिधित्व असलं पाहिजे
४) आणि कुठल्याही वक्फ बोर्डाच्या कारभाराचे ऑडिट करण्याचा अधिकार कॉम्प्ट्रोलर आणि ऑडिटर जनरलला राहील
५) आणि यापुढे एखाद्या व्यक्तीला त्याची संपत्ती वक्फ बोर्डाला द्यायची असेल तर त्याला पूर्वीसारखं बोली करार न���ही तर लेखी करार करावा लागेल, ज्याने त्याला कायदेशीर चौकट मिळेल.
या सुधारणांमध्ये विरोध करण्या��ारखं काहीही नाही. श्री.नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात ३७० कलम हटवणं, तिहेरी तलाकवर बंदी आणणं, राम मंदिर उभारणी अशी पावलं उचलली होती. ज्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अभिमान होता. आणि त्यातूनच आम्ही २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींना पाठींबा दिला होता. माझी केंद्र सरकारला विनंती आहे की विरोधकांच्या कुठल्याही विरोधाला बळी न पडता, शक्यतो संसदेच्या या अधिवेशनातच हे विधेयक मंजूर करून घ्यावं. आणि हो, राज्य सरकारने पण, अहमदपूर तालुक्यातील तळेगावमध्ये शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही, त्यांच्या जमिनी वक्फच्या घशात जाणार नाहीत हे पहावं...
यानिमित्ताने देशातील एकूणच वक्फ बोर्डांना पण एका गोष्टीची जाणीव मला आज करून द्यायची आहे ती म्हणजे स्वातंत्र्यानंतर विनोबा भावेंनी 'भूदान चळवळ' सुरु केली जिच्यात लाखो एकर जमीन देशातील हिंदूंनी, सरकारला परत केली होती जेणेकरून भूमिहीनांना कसण्यासाठी जमीन मिळेल.
हा जसा भूमिहीनांसाठी ��ेलेला त्याग होता तसाच तो देशासाठी केलेला त्याग पण होता. असा त्याग किंवा मनाचा मोठेपणा वक्फ बोर्डानी पण दाखवावा.. सतत कुठे ना कुठे लोकांच्या जमिनीवर ताबा सांगायचा यापेक्षा वक्फ बोर्डाने स्वतःच्या ताब्यातील जमिनी सरकारला परत करून स्वतःच राष्ट्रीयत्व दाखवून द्यावं.
राज ठाकरे ।
गारवा पून्हा वाढलाय, आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे सकाळचे ऊन अंगावर घ्याय��ा बसलोय. माझ्याच सोसायटी मध्ये राहणारे रा. स्व. संघांचे सक्रिय कार्यकर्ते मला म्हणाले " येताय का आज गोकुळ आनंद दहिसर ते कांदिवली "बांगलादेशीकडून हिंदुवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात मानव साखळी उभारतो आहोत.
त्याना म्हंटल 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन झाली आणि पहिल आंदोलन झाले बांगलादेशी विरोधात. मुंबईतील रेशनिंग ऑफिसला घेराव घालून रेशनिंग कार्डचा पासपोर्ट सारखं उपयोग करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना रेशनिंग कार्ड वाटप होऊ नये म्हणून आंदोलन करणाऱ्या मुंबईतील जळपास 678 महाराष्ट्रासैनिकांवर केसेस दाखल झाल्या. कांदिवली रेशनिंग कार्यालयाला टाळे ठोकले म्हणून माझ्यासह 18 जणांवर गुन्हा दाखल झाला.
आज मुंबईतील प्रत्येक रस्त्यावर हातगाडी घेऊन फिरणारे फेरीवाले कोण आहेत ते तपासा, बांगलादेशी अलगद हातात सापडतील, त्याना हातगाड्या भाडे तत्वावर पुरवणारे कोण आहेत? त्यांना संरक्षण देणारे कोण आहेत? याची माहिती सरकारने घ्यावी. आता तर हिंदुत्ववादी आणि राष्ट्रप्रेमी सरकार राज्यात आणि केंद्रात आहे.
फक्त तोंडदेखल हिंदुत्व भाजप आणि शिवसेनेने दाखवू नये रजा अकादमी च्या मोर्च्या दरम्यान झालेल���या हिंसाचाराला राज ठाकरे नावाच्या मर्दाने महाप्रचंड मोर्चा काढून उत्तर दिले ��ोते.त्यावेळी भाजप, शिवसेना मिठाची गुळणी घेऊन गप्प बसले होते.
अविश्वस्नीय असे बहुमत मिळाले आहे, सत्तेची सर्व केंद्र, अधिकार तुमच्याकडे आहेत, आता करून दाखवाच... नाहीतर हिंदुत्वाच्या आणि राष्ट्रप्रेमाच्या बाता मारू नका.
हेमंतकुमार कांबळे
प्रवक्ता -महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@BJP4Maharashtra
@mnsadhikrut
@namdevwrites तुला काय या प्रसंगी देखील वाघनख्या, कोथळा असली भाषा अपेक्षित होती?
कुठल्या प्रसंगी कसं व्यक्त व्हावं, याविषयीचा शिष्टाचार माहित नाही ?
तुम्ही लोकं द्वेषानं, मत्सरानं इतके विचारहीन झाला आहात, की एक माणूस म्हणून जगणं देखील विसरला आहात... समाजात, कुटुंबात कसे वागता देव जाणे!
तुम्ही अधिकाऱ्यांना खुशाल प्रोत्साहन द्या,
आमच्याशी जर कोणी हिंदीत बोललं तर आम्ही 'प्रसाद' नक्की देऊत!
���साच आगाऊपणा करत राहिलात तर हिंदीत बोलणं दूरच, कोणी हिंदी भाषिक कर्मचारी जरी सरकारी कार्यालयात दिसला, तर बदडून काढायची मोहिम हाती घ्यावी लागेल.
महाराष्ट्रात मराठीच!!!
@gokhale75 म्हणूनच म्हटलो विषय संपला. आता एकदा धडा मिळाला आहे, पुन्हा पुन्हा तो विषय डिवचण्यात काही अर्थ नाही. बाकी, राजकीय पटावर काही वेगळे निर्णय घेतले किंवा निवडणूक हरलो म्हणून पक्षाचा कार्यक्रम खोळंबलेला नसतो. त्यामुळे दोन विषय जोडणे व्यर्थ आहे, असा आशय होता.
@brizpatil मराठी अस्मिता आम्हाला मातेच्या जागी आहे, धर्म पित्याच्या जागी.
एकावर प्रेम कर��्यासाठी दुसऱ्याला सोडून द्यायची गरज नसते.
सतत दळभद्री राजकारणावर डोकं खाजवून ज्यांचे मेंदू बधीर झाले असतील, त्यांना हा विषय कळत नसेल तर दोष त्यांचा आहे. उगाच कळत नाही त्या विषयावर अक्कल पाजळू नये.
"भाजपचं सरकार आलंय, मारवाडीत बोल"; दुकानदाराचा हट्ट,मनसैनिकांनी दिला चोप
मारवाडीत बोलायचं, मराठी भाषेत बोलायचं नाही, असं दुकानदाराने म्हटलं होतं.
#Girgaon#Marathi#MNS
https://t.co/GosoWdtQoj
@PradeepjSamant जे कोर्टाचा आदेश पाळू शकत नाहीत त्यांच्यावर आक्षेप नाही.
पण आम्ही कायदा हातात घ्यावा अशी अपेक्षा?
आणि महाशय, आमच्या तुकाराम महाराजांनी देखील दोहे लिहिले आहेत. तुमच्या दृष्टीने मग तेही मराठीद्रोही का?
अस्मिता हा तुमच्यासारख्या संकुचित लोकांचा विषय नाहीये. नको तिथे डोकं लावू नये.