देशाच्या आजवर झालेल्या कोणत्याही पंतप्रधानाला हिंदुत्वाची भगवी पताका गेल्या सातशे वर्षांपासून अखंडपणे अभिमानाने मिरवणाऱ्या आमच्या वारकऱ्यांचे अन् देहूचे महत्त्व कधीही कळले नाही....ते या प्रधानसेवकास कळले!!!
@narendramodi जी....दिल जीत लिया आपने..जय हिंदूराष्ट्र❤️🚩🚩
तो गडकरी विषय ठीक आहे पण ते ‘प्रमुख आरोपी ’ म्हणून काय लिहिलंय तुम्ही? शुद्धीत आहात का? की स्वतःला न्यायाधीश समजताय? की कुणी षडयंत्रकारी हे x हॅण्डल वापरतोय?@abpmajhatv
नीट घोटाळ्यातील प्रमुख आरोपी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर, आता टोलकरी गडकरी यांचा राजीनामा झाला पाहिजे असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका केली.
#HarshwardhanSapkal#NitinGadkari#DharmendraPradhan #Congress #BJP
(Harshwardhan Sapkal, Nitin Gadkari, Dharmendra Pradhan, Congress, BJP)
@abpmajhatv तो गडकरी विषय ठीक आहे पण ते ‘प्रमुख आरोपी ’ म्हणून काय लिहिलंय तुम्ही? शुद्धीत आहात का? की स्वतःला न्यायाधीश समजताय? की कुणी षडयंत्रकारी हे x हॅण्डल वापरतोय?
मराठीची मागणी केली म्हणून काही रेल्वेच्या tc ने मराठी प्रवाशाला २ तास झाले बंदीस्त (कैद) करून ठेवले आहे, मराठीची मागणी करणे कामात अडथळा केव्हा पासून होऊ लागला..??
मराठी tc ला पुढे करून प्रवाशाला अंधेरी पूर्व @rpfwr1 इथे बंदिस्त केलं आहे.
मराठीची मागणी केल्यावर आता प्रवाशाला नाहक त्रास देणार?
मराठी प्रवाशाला सोडवायला आम्ही मराठी एकीकरण समिती चे पदाधिकारी 4.45ला पोहचतोय अंधेरी पूर्व rpf
@drmbct@WesternRly@grpmumbai यांनी लक्ष घालावे
@MumbaiPolice मराठी माणसाला रेल्वे आता मराठी मागणी केली म्हणून त्रास देतेय
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@samant_uday@LoksattaLive@abpmajhatv@TV9Marathi@pudharionline@ShelarAshish
निर्भय बनो च्या डॉ चौधरी यांना सावरकर यांची नोटीस.
सात्यकी सावरकर विरुद्ध राहुल गांधी या खटल्यामध्ये चुकीची व दिशाभूल करणारी माहिती ते पण खटला कोर्टात प्रलंबीत असताना प्रसारित केल्याप्रकरणी निर्भय बनो आंदोलनाचे सर्वेसर्वा डॉ चौधरी यांना सात्यकी सावरकर यांनी नोटीस पाठवली आहे. जी गोष्ट कोर्टात घडलीच नाही त्याबाबत काँग्रेसी मीडियाने चुकीचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याचाच आधार घेऊन त्यावर नागरिकांची दिशाभूल होणारी माहिती स्वतःच्या सोशल मीडिया हॅन्डल वरून चौधरी यांनी प्रसिद्ध केली जे वास्तविकता बेकायदेशीर आहे असा आरोप झालेला आहे..सावरकर यांनी कोणत्याही प्रकारची माफी मागितलेली नसताना त्यांच्या सरतपासात जे रेकॉर्ड वर आले नाही ते live law नावाच्या पोर्टल ने सुरवातीला छापले व स्वातंत्र्यवीर सावरकर यांची व खटला दाखल करणाऱ्या व्यक्तीची काँग्रेसी मीडियाने बदनामी केली.
डॉ चौधरी यांनी कोर्टात सुरु असलेल्या खटल्यात चुकीची माहिती तर दिलीच वर अनेक बेकायदेशीर कृत्य केल्याने त्यांच्यावर आता अवमान याचिका फेस करण्याची वेळ येणार आहे असं नोटीस वाचल्यावर समजतं. व ही केस इतकी स्ट्रॉंग असू शकते की कोर्ट विविध गोष्टीवर प्रतिबंध घालू शकते. अशा केसेस ना चौधरी घाबरणार नाहीत कारण त्यांना मोठं बॅकिंग आहे. त्यांच्याकडे निष्णात तज्ज्ञ आहेत. पुरोगामी नेते आहेत.
निर्भय बनो ही काँग्रेस ला बळकटी आणणारी चळवळ नसती तर डॉ चौधरी यांनी अशा पोस्ट केल्या नसत्या. कोणाच्याही नादी लागाव कोर्टाच्या जजला व कायद्याला आव्हान देणाऱ्या पोस्ट करू नयेत असं माझं वकील म्हणून स्पष्ट मत आहे. तुम्ही कोर्टात जे घडलं नाही ते खटला सुरु असताना थेट प्रसारीत करता इतकं तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रगल्भ झालं आहे?
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी माफी मागितली नव्हती म्हणूनच राहुल गांधीला कोर्टाने नोटीस काढली ना? तो भिवंडी कोर्टात केस ला हजर राहतो आहे. फक्त पुण्याच्या कोर्टाने सूट दिलेली आहे. पण वकील असतातच.
मग आपण काय लिहतो. काय बोलतो यावर सुशिक्षित माणसं बंधन ठेवणार नसतील तर पुरोगामी चळवळ ब्रिगेडी झाली म्हणावं लागेल. सात्यकी सावरकर जो विनायक दामोदर सावरकर यांचा पणतु आहे तो स्वतःच दाखल केलेल्या खटल्या मध्ये कोर्टात असं कशाला सांगेल की सावरकर यांनी पाच वेळा माफी मागितली होती?याची सरतपास कॉपी न पाहताच मीडिया मधील अनेकांनी बातमी छापली. जसं समर्थ रामदास शिवरायांचे गुरु नाहीत याबाबत प्रचार प्रसार होतो. आता याची सही व शिक्याची कॉपी सावरकर यांच्याकडे आलेली असून एक एक मीडिया हाऊसेसचे बँड वाजणार आहेत. पहिला बँड हा आता पुण्यात वाजला आहे. व यासाठी निर्भय राहून कोर्टात फेऱ्या मारायची वेळ येणार आहे.
सावरकर यांनी नोटीस पाठवली याची फेसबुक पोस्ट का नाही आली?
निर्भय बनो साठी ऍडव्हान्स शुभेच्छा!
सावरकरप्रेमींनी पोस्ट शेअर करावी.
ऍड.हृषीकेश जोशी.
कर्जत रायगड.
#LawAndOrder #justice #Savarkar #freedomfighter #फ्रीडमऑएक्स्प्रेशन
@babaji_rawool@Siya83377032@ManseSpeaks मराठी हिंदू काय अथवा अमराठी हिंदू काय.. आम्ही सगळे सनातनीच. दोन किलो तांदळासाठी झालेल्या बाडग्या .. तू आमच्या धर्मावर बोलायचं नाय, दळभद्री 😀
@ManseSpeaks मग एकदम बरोबर केलं. थोडा झापडवला पाहिजे होता. हिंदू असून हिंदूंच्याच भाषेला विरोध करतो!? नालायका, मग तू हिंदू कसला?? तू तर जिहादी लांड्या.
स्टेडियममधला पाणी कांड! 💦
स्टेडियममध्ये २० रुपयांची पाणीची बाटली २०० रुपयांत विकली जातेय!
मैच पाहताना तहान लागली, आणि एक प्रेक्षक वेंडरकडे जाऊन पाण्याचा दर विचारतो… तर वेंडर म्हणतो २०० रुपयांचे, मेहनत करतोय काहीतरी तरी मिळावं!
अरे भाई, कोणती मेहनत?
कोणताही पर्वत चढून पाणी आणत नाहीयेत ना… तर मग ह्या दरांचा अर्थ काय? पर्वतांवर तर ५० रुपयांतही मिळते आहे, स्टेडियममध्ये २०० रुपये का?
सरकार स्टेडियममध्ये पाणी घेऊन जाण्यावर बंदी घालते आणि मग या वेंडर्स एकत्र येऊन लोकांचा बळी घेतात!
तहान लागली की पैसा खर्च करून पाणी पिण्याचा हा अनुभव नव्हे, तर जबरदस्तीचा खर्च वाटतोय.
स्टेडियममध्ये लोकांसाठी पाणी पुरवठा हा मूलभूत अधिकार असावा, नाहीतर हा “मेहनतीचा दर” फक्त लूट ठरतोय!
मराठी माणसाला घर नाकारण्याची पुनः एक घटना
आमचे मराठी सहकारी रवींद्र खरात यांनी घटना आणली उघडीस
स्वतः घराच्या चौकशीसाठी गेले होते मराठी किंवा मांसाहारी लोकांना घरे दिली जाणार नाहीत फक्त गुजराती जैन मारवाडी ब्राह्मण असाल तर घरे मिळतील.
परवानग्या देणारे झोपलेत का?
#मराठीएकीकरणसमिती
@sakal_hindu_ शंभू छत्रपती हे national hero आहेत त्यांचं नाव न आवडणारे, त्यांचं नाव झाकून ठेवणारे भारतीय आहेत? अशा धर्मांध प्रवृत्तीवर लवकरात लवकर कडक देशद्रोहाची कारवाई करण्यात यावी,अन्यथा cp साहेबांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येईल.
आज अटलजींची १०० वी जयंती. भारतीय जनता पक्षाच्या ज्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल आदर, कुतूहल होतं आणि ज्या नेत्यांनी देखील माझ्याबद्दलच्या स्नेहात कधीही हात आखडता घेतला नाही, त्यात अटलजी हे अग्रणी.
स्व. बाळासाहेबांवरच्या फोटोबायोग्राफ़ीच्या अनावरण सोहळ्याला अटलजींनी यावं यासाठी मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी देखील तात्काळ मान्यता देत, ते या सोहळ्याला आले.
भारतीय राजकारणात काँग्रेसला पर्याय नाहीच असं वाटत असताना, अनेक घटकपक्षांची मोट बांधून, त्यांचे सर्व रागरंग सांभाळून अटलजींनी सरकार चालवलं आणि ते देखील मागच्या शतकाच्या अखेरीस, जेंव्हा भारतात राजकीय, आर्थिक, सामाजिक घुसळण सुरु होती. अशा कठीण परिस्थितीत सरकार चालवत त्यांनी भारतीयांना एक खात्री दिली की काँग्रेसच्या पलीकडे देखील एक राजकीय व्यवस्था या देशाचा कारभार चालवू शकते. आज भारतीय जनता पक्ष जो सत्तेत दिसतोय त्याचा भक्कम पाया अटलजींनी घातला.
साहित्य, संस्कृती, प्राचीन इतिहास अशा विविध विषयांच्या वाचनाने स्फुरलेली अटलजींची वाणी ही जशी मला आकर्षित करते तसंच त्यांच्यातील दुर्दम्य आशावाद देखील मला कायम आकर्षित करत आला आहे. जनसंघ ते भारतीय जनता पक्ष असा प्रवास करत असताना, आणि एकदा तर भारतीय जनता पक्ष २ खासदारांवर येऊन थांबलेला असताना आणि जनता पक्षाच्या सरकारमधला सहभाग सोडला तर जवळपास ४५ वर्ष विरोधी बाकांवर बसून देखील त्यांच्यातील राजकीय आशावाद तसूभर पण कमी झाला नाही...
तत्कालीन सत्ताधाऱ्यांकडून झालेली अहवेलना, आणीबाणीच्या काळात सहन केलेले अत्याचार, हे अटलजींनी सोशिकपणे सोसले, पण सत्तेत आल्यावर त्यांनी कधी सुडाचं राजकारण केलं नाही, की दीर्घकाळ विरोधी पक्षांत बसलो म्हणून जबर राजकीय महत्वकांक्षा जागृत होऊन त्यांनी सत्तेत आल्यावर राजकीय शालीनता सोडली नाही. म्हणूनच काँग्रेसकट इतर सर्व पक्षातील लोकांच्या मनात अटलजींबद्दल कमालीचा आदर होता आणि आजदेखील आहे.
सत्तेत नसताना आणि सत्तेत असताना त्यांच्यातील कलासक्त मन त्यांनी कोमेजू दिलं नाही. राजकरण्याच्या मनात फक्त राजकारणाचा विचार असून उपयोग नाही, तर त्यात कलासक्तता देखील हवी. जी अटलजींच्यात होती. अटलजींचे असे अनेक पैलू मला कायम आकर्षित करत आलेत.
अटलजींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन.
राज ठाकरे ।