नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविल्याची बातमी म्हणजे जळगाव, नाशिकसह खान्देशातील शेतकरी बांधवांसाठी आश्वासक पाऊल आहे. या प्रकल्पाला यापूर्वीच महाराष्ट्र शासनाची प्रशासकीय मान्यता व निविदाप्रक्रिया देखील झाली असल्याने आता प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.
हा मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला राज्यात प्रत्यक्ष गती देण्यासाठी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
तसेच केवळ चर्चेपुरता मर्यादित राहिलेला हा विषय आपल्या जलसंपदा मंत्री पदाच्या कार्यकाळापासून प्रत्यक्ष पाठपुरावा करून मार्गी लावण्यासाठी खऱ्या अर्थाने चालना देणारे जलसंपदा मंत्री श्री.गिरीशभाऊ महाजन यांचेही खूप खूप आभार!
नार-पारचे पाणी गिरणा धरणात उपलब्ध झाल्यानंतर गिरणा-मन्याड नदीजोड प्रकल्पालाही मोठी चालना मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे गिरणा-मन्याड खोऱ्यातील शेती, पिण्याचे पाणी आणि औद्योगिक विकासाला मोठा आधार मिळू शकतो.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार!
खान्देशच्या पाण्यासाठीचा हा प्रवास आता अधिक ठोस दिशेने पुढे जात आहे!
#NarParGirna #RiverLinkProject #Khandesh #Jalgaon #GirishbhauMahajan #WaterForKhandesh
@Dev_Fadnavis@girishdmahajan
चाळीसगाव तालुक्याचा कोहिनूर हिरा, माझे आधारस्तंभ, जळगाव जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा लोकप्रिय आमदार मा. श्री. मंगेशदादा चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🎂
@mlamangeshbjp@Off_mangeshC@PratibhaMangesh
नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा.ना.श्री. गिरीषभाऊ महाजन यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि गिरीषभाऊंच्या प्रदीर्घ प्रशासकीय व विकासाभिमुख अनुभवातून नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच नवी गती आणि दिशा मिळेल, असा विश्वास आहे.
@girishdmahajan
#GirishMahajan #Nashik #NashikDistrict #BJP4Nashik #BJP4Maharashtra
महाराष्ट्र नवी भरारी घेतोय कोणामुळे तर देवाभाऊंमुळे ! निर्णय धाडसी, नियोजन दूरदृष्टीचं आणि ध्यास फक्त नवमहाराष्ट्राचा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
#HBDDevaBhau@Dev_Fadnavis
भारतीय लोकशाहीचा काळा अध्याय Black Day २५ जून
भारतीय इतिहासातील काळा दिवस काँग्रेस सरकारने स्वार्थासाठी बळकावली सत्ता म्हणूनच झाली लोकशाहीची हत्या !
आणिबाणी दिवस
#SamvidhanHatyaDiwas#DarkDaysOfEmergency#Emergency
राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची अचूक भरपाई मिळावी तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने न्याय मिळावा, यासाठी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहिलो व केळी बागायतदार शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मा.मुख्यमंत्री महोदयांकडे मांडल्या.
यावेळी मा. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानीची अचूक आकडेवारी मिळविण्यासाठी आगामी काळात कृषी विभाग व आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी संयुक्तरित्या ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश दिले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान अचूकपणे नोंदविणे शक्य होईल तसेच पीक विमा कंपन्यांकडून भरपाई देताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
विशेषतः जळगाव जिल्ह्यातील केळी पिकांच्या नुकसानीबाबत विमा कंपन्यांनी स्थानिक प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यांची सखोल पडताळणी करावी. यासोबतच रियल टाइम डाटा, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटरचा डाटा तसेच सॅटेलाइट डाटाचा वापर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश मा. मुख्यमंत्र्यांनी दिले.
यावेळी विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास न देता, झालेल्या प्रत्यक्ष नुकसानीनुसार मदत द्यावी, शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी विमा कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देत असते याची जाणीव ठेवून शेतकरी संकटात असताना कोणतीही अडवणूक न करता नियमानुसार तत्परतेने मदत वितरित करावी, अशा स्पष्ट सूचनाही देण्यात आल्या.
या बैठकीस मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीशभाऊ महाजन, कृषिमंत्री श्री. दत्तात्रय भरणे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. गुलाबरावजी पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री श्री. मकरंद जाधव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे, रोहियो मंत्री श्री. भरत गोगावले, आमदार श्री. अमोल जावळे, आमदार श्री. चंद्रकांत पाटील, तसेच मी उपस्थित होतो.
याशिवाय मुख्य सचिव श्री. राजेश अग्रवाल, मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव श्री. लोकेश चंद्र, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, कृषी विभागाचे सचिव श्री. परिमल सिंह, कृषी आयुक्त श्री. सूरज मांढरे, जळगाव जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महायुती सरकार राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येतील.
#Maharashtra #DevendraFadnavis #BananaFarmers #GirishMahajan
@Dev_Fadnavis@mieknathshinde@girishdmahajan@bharanemamaNCP@GulabraoRPatil@SanjayRupadhyay@ibharatgogawale
1/2
चाळीसगांव तालुक्यातील सोलर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध समस्यांच्या अनुषंगाने गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी संघर्ष समितीमार्फत आवाज उठविला जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या शंकांचे निरसरण मी दिलेल्या निवेदनानुसार आज राज्याचे महसूलमंत्री ना.श्री.चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. सदर बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्स माध्यमातून उपस्थित राहून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा तसेच प्रकल्प उभारणीत पर्यावरण विषयक नियमांचे उल्लंघन, अनियमितता झाली असल्यास त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. मा.महसूलमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांची बाजू समजून घेत याबाबत तात्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जळगाव यांना दिल्या.
#Chalisgaon #SolarProject #ShetkariHit #FarmerJustice #Maharashtra
@cbawankule
आमदार मंगेश दादा चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक, कार्यतत्पर आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्व.
मा. श्री. सागर दादा सूर्यवंशी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
@mlamangeshbjp
महाराष्ट्र राज्याचे आरोग्यदूत,
जनतेच्या प्रत्येक संकटात धावून जाणारे संकटमोचक,
विकासदृष्टी असलेले कर्तृत्ववान जलसंपदा मंत्री,
मा. नामदार श्री. गिरीषभाऊ महाजन साहेब
यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! 🎂💐
@girishdmahajan@OfficeofGM@mlamangeshbjp