PSI भरती 2023
काल सर्व उमेदवारांच्या मुलाखती संपल्यात आता उमेदवारांना गुणवत्ता यादीसह तात्पुरती निवड यादीची प्रतीक्षा आहे.
अर्थात जागा आणि पात्र उमेदवारांची संख्या बघता तात्पुरती निवड यादी आणि अंतिम निवड यादी यात काही फरक पडण्याचे कारण नाही. ऑप्टिंग आउट करूनही नवीन उमेदवारांना संधी मिळण्याची सुतराम शक्यता नाही.
आयोगाने गुणवत्ता आणि निवड यादी तातडीने घोषित करावी ही नम्र विनंती.
@mpsc_office
आदरणीय अध्यक्ष/सचिव
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
विषय:- जाहिरात क्रमांक 70/2023(पोलीस उपनिरीक्षक ,२०२३) अतिरिक्त शारीरिक पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणेबाबत.
PSI 2023 ची मैदानी परीक्षा डिसेंबर महिन्यात पार पडली.परंतु अजूनही मुलाखत वेळापत्रक आलेले नाही.या जाहिराती मधील इतर पदे जसे की STI, ASO, SR यांची joining झाली आहे.तरी@mpsc_office नम्र विनंती की लवकरात लवकर मुलाखत Schedule जाहीर करण्यात यावा.@Drsuvarnas@AbhiPawarBJP@Dev_Fadnavis
आदरणीय फडणवीस साहेब, #पावसाळी_अधिवेशन सुरू असताना #पेपरफुटीचा मुद्दा मांडला असता आपण त्याकडे दुर्लक्ष करून उलट बातम्या देणाऱ्या वृत्तपत्रांवर हक्कभंग आणण्याचा इशारा देऊन पेपर फोडणाऱ्या टोळ्यांची बाजू घेतली होती.
आपल्या त्याच चुकीमुळं पेपर फोडणाऱ्या टोळ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि प्रत्येक परिक्षेत या टोळ्या पेपर फोडायला लागल्या. आता तर पेपर फोडणाऱ्या टोळ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होताच मंत्रालयातून त्यांना सोडण्यासाठी फोन जातात. आपल्या त्या एका चुकीचे परिणाम राज्यातल्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहेत.
आता तर पेपर फोडणाऱ्या टोळ्यांची हिंमत इतकी वाढलीय की ते #MPSC चे पेपर फोडायला लागले आहेत आणि त्यांची नावे गुणवत्ता यादीतही यायला लागली आहेत. यासाठी पेपर फोडणाऱ्या या टोळ्यांना जबाबदार धरायचे की त्यांना अभय देणाऱ्या सरकारला?
शासनाने थोडा #serious पणे विचार करावा, विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याला कळकळीची विनंती आहे की, #राजस्थान #उत्तराखंड या राज्यांच्या धर्तीवर आपल्या राज्यातही पेपरफुटी विरोधात कडक कायदा आणा, जेणेकरुन पेपर फोडण्याची कोणाची हिम्मत होणार नाही!
@Dev_Fadnavis