Every student raising their voice for the rights of NEET aspirants has our unwavering support.
A dedicated Legal Assistance Email has been set up to support students facing any legal challenges.
[email protected]
WE WILL NOT LET INJUSTICE PREVAIL.
Maharashtra Navnirman Sena stands firmly with every student, providing legal support and standing by you in your fight for justice.
#MNSAdhikrut #NEET #Protest #LegalHelp
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला मुंबईत देखील विद्यार्थी आंदोलन करून पाठींबा देत आहेत. हे आंदोलन काल चिरडण्याचा प्रयत्न सरकारने काल करून पाहिला. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्याला विरोध केला. आज याच विद्यार्थ्यांनी राजसाहेबांची भेट घेतली. मागे २०१६ ला जेंव्हा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर NEET परीक्षेमुळे अन्याय होत होता तेंव्हा राजसाहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलून त्या विषयात तोडगा काढायला लावला होता. या आंदोलनात देखील राजसाहेबांनी तोडगा काढावा अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे.
#MNSAdhikrut
“विद्यार्थ्यांना तुम्ही हात तर लावून दाखवा, आम्ही आहोत त्यांच्या पाठीशी. त्या सर्व विद्यार्थ्यांना घाबरण्याची काहीच गरज नाही. तरुण रक्त चिघळले आहे त्यामुळे ते सरकारला जाब विचारत आहे.”
श्री. अमित राजाहेब ठाकरे
नेता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
केंद्र सरकारने शनिवार १८ जुलै २०२६ ला सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात भरती केलं. सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी वाटून त्यांना रुग्णलयात दाखल केलं असं सरकारचं म्हणणं आहे. सरकारने त्यांना ज्या पद्धतीने फरफटत नेलं त्यावरून सरकारला वांगचुक यांची काळजी नव्हती हे नक्की. त्यानंतर काल आंदोलकांवर केलेला बेफाम लाठीचार्ज, हे पाहून हे सरकारच मानसिक रुग्ण झालं आहे आणि त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे असं दिसतंय. आम्ही रास्त मागण्यांसाठीची आंदोलनं कशी चिरडतो हे जगाला दाखवण्याची आणि ती कशी चिरडली हे आपल्याला स्वतःला आजूबाजूच्या इतर राष्ट्राध्यक्षांच्या कोणत्याच भाषा येत नसताना फक्त कॅमेऱ्यासाठी गडगडाटी हास्य करून जगभरातील राष्ट्राध्यक्षांना ते सांगण्याची हौस सध्या सत्ताधीशांना जडली आहे .
मुळात धर्मेंद्र प्रधान कोण लागून गेले की ज्यांचा राजीनामा घेणं हे सरकारला स्वतःच अपयश वाटत आहे ? मणिपूर पेटलेलं असताना त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना बिरेन सिंग यांना पण याच सरकारने असंच अभय दिलं होतं. बरं हे दोघे असतील किंवा यांच्यासारखे इतर असतील त्यांच्याबद्दल वरच्या दोन सत्ताधीशांना शून्य प्रेम आहे. आम्ही काय करायचं हे कोणी सांगायचं नाही, मग ते विरोधी पक्षांनी पण नाही आणि जनतेने तर नाहीच नाही. कारण तुमच्या मतांवर आम्ही थोडी निवडून येतो. आम्ही निवडून येतो ते सगळ्या यंत्रणा, मतदार याद्यातील गोंधळ आणि अर्थात ईव्हीएमच्या जोरावर. मग विद्यार्थ्यांना कोण विचारतं.
काल पंतप्रधान हा मुद्दा सोडून सगळं बोलले.इंग्रजीत एक शब्दप्रयोग आहे, 'लेम डक' प्रेसिडेंट. म्हणजे ज्या पंतप्रधानांचा किंवा राष्ट्राध्यक्षांचा शेवटचा कार्यकाळ सुरु असतो ते पंतप्रधान हे निवांत असतात, जगभर दौरे करतात, आणि त्यांचा प्रभाव कमी झालेला असतो आणि त्यांचा उत्तराधिकारीच सगळा कारभार हाकत असतो. सध्या मोदींची अवस्था अशी झाली आहे असं दिसतंय. मोदींच्या मनात या सगळ्याबद्दल समजा कृती करण्याची इच्छा जरी असली तरी उत्तराधिकारी होण्याच्या स्पर्धेत असलेली शक्ती त्यांना दुर्लक्ष करायला भाग पाडत असावी. अर्थात मोदी पंतप्रधान असताना विद्यार्थ्यांचं आंदोलन निर्दयीपणे चिरडलं गेलं हे इतिहास लक्षात ठेवेलच ! तशीच प्रतिमा व्हावी अशी कोणाची इच्छा असेल आणि मोदी त्याला बळी पडणार असतील तर मग प्रश्नच संपला !
माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे. ती 'परीक्षा पे चर्चा' इत्यादी करता ना मग आता विद्यार्थ्यांशी चर्चा करा. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. धर्मेंद्र प्रधान आणि सरकारचा इगो यापेक्षा या देशातील विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्वाचा आहे.
आणि सरकारने हे देखील समजून घ्यावं की हे आंदोलन फक्त विद्यार्थ्यांचं, एका परीक्षेपुरतं नाही आहे. लोकांच्या मनात सरकारच्या कारभाराबद्दल राग आहे, ज्या पद्धतीने एकाच उद्योगपतीला मोठं केलं जात आहे, त्याच्या घशात संपूर्ण देश घातला जात आहे, ज्या पद्धतीने महागाईने कळस गाठला आहे, जंगल तोडून कंत्राटदारांच भलं केलं जात आहे , शहरच्या शहर विकासाच्या नावाखाली गुदमरली आहेत, रुग्णालय खच्चून भरली आहेत , अशा अनेक गोष्टींच्या विरोधातील हा आक्रोश आहे. गृहखात्याच्या आदेशावरून आंदोलकांना जसं निर्दयीपणे मारलं जात आहे आणि तरीही आंदोलक मुलं-मुली इंचभर हलत नाही आहेत यावरून एक नक्की की हे धैर्य एका मुद्द्यावरच्या रागातून नाही तर देशातील एकूणच परिस्थितीतून आलेल्या नैराश्यातून आहे. त्यामुळे सरकारने निर्दयीपणा सोडून समजूतदारपणा दाखवावा.
लोकपाल विधेयकाच्या आंदोलनातून मिळवलेली सत्ता विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून जायला लागणार हे निश्चित ! २०१८/१९ पासून मी जनतेला सांगत होतो की मी काय या सरकार बद्दल बोलतोय हे तुम्हाला आज नाही कळणार पण ज्या दिवशी तुमच्या दरवाजावर अन्यायाची टकटक होईल तेव्हा मी काय सांगत होतो हे समजेल ! आज सर्वांच्याच दरवाजावर टकटक सुरू झाली आहे !
या सगळ्यात विद्यार्थ्यांनी जो संघर्ष उभा केला आहे त्याचं मनापासून कौतुक. शेजारच्या श्रीलंकेत २०२२ ला विद्यार्थ्यांनी असंच आंदोलन उभं केलं होतं. २०११ चं अरब स्प्रिंग, नेपाळ मध्ये देखील तेच. ही सगळी अगदी ताजी उदाहरण आहेत. जय प्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचं आंदोलन उभं केलं त्याचा पाया हा पण विद्यार्थ्यांच्या असंतोष होता. आज आपल्या देशातील विद्यार्थ्यांच्या या धैर्याला पण सलाम !
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या आंदोलनाला, या मागण्यांना पाठींबा आधीपासून होता आणि यापुढे राहील. खरतर निट सारख्या परिक्षांनाच आम्ही पहिल्यांदा विरोध केला होता, विनाकारण केंद्राने या इतकी वर्षे चालू असलेल्या पद्धतीत ढवळाढवळ करू नये पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हेच खरे !
मोदी,
मोदी,
मोदी,
असे परदेशात NRI मोदींसाठी ओरडतानाचे दृश्य आपण टेलिव्हिजन वर पाहत असतो. आपल्याकडील काहींना ते खरे वाटायचे, मात्र वास्तव वेगळे आहे. ते आता ऑस्ट्रेलियाच्या मिडियाने समोर आणले.
सध्या मोदी हे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. तिथे चार्टर विमानाने भाड्याने माणसे आणून त्यांना मोदी, मोदी असे बोंबलायला लावले गेले. ऑस्ट्रेलिया च्या मीडियाने ह्यावर एक रिपोर्ट केला. परदेशी मिडिया मोदींना उघडे पाडायला लागली आहे , आपली मिडिया तसे लवकर करणार नाही. #Modi
सेवा वारी
वारीच्या प्रत्येक पावलात
तुमच्या सेवेची साथ
'पुणे प्रथम – सेवावारी २०२६' अंतर्गत उपलब्ध सर्व सेवा, सुविधा आणि महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तसेच विविध उपक्रमांमध्ये नोंदणी करण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://t.co/vI31aw2xUv
#Wari#SevaWari #PunePratham #PMCCare #PuneCityUpdates
प्रति
श्री. देवेंद्र फडणवीस,
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही तो पसरू देताय?
देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन अस्मानाचा फरक होता. महाराष्ट्रच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं ! पण गेल्या काही वर्षांत आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय हे आता स्पष्टपणे जाणवत आहे !
तुमचा एक आमदार आणि पदाधिकरी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये. एक फार प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही पण कधी ऐकलं असेल, 'Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely' पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे.
कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं, आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेंव्हा होतात आणि त्यावर जेंव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही, तेंव्हा मात्र तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते.
मी गेली ३७ वर्ष राजकारणात सक्रिय आहे. या काळात महाराष्ट्रात एखाद्या नेत्याकडून प्रमाद घडला, चूक झाली तर तो स्वपक्षाचा आहे म्हणून त्याच्या चुकांवर त्यावेळच्या राज्यातील नेत्यांनी कधी पांघरूण घातलंय असं झालं नाही. बाळासाहेब असोत, पवार साहेब असोत की प्रमोदजी असोत किंवा कोणीही असोत, म्हणून महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे अशी देशभर प्रतिमा होती.
आज तुम्ही हा आपला आहे ना मग त्यांनी काहीही केलं तरी घाल त्याला पाठीशी सुरु केलं आहेत. याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं वाटत नाहीये का ? तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करत आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात त्यांना तुम्ही काही बोलत नाही .
( बोलला असता तर परत त्यांची तीच चूक करायची हिम्मत झाली नसती पण ते तसेच वागत आहेत यावरून समजतंय की तुम्ही त्यांना काहीच समज देत नाही आहात) तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे?
तुमच्याकडून म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही संकेतांची अपेक्षा कायम असते. मग तो कुठल्या का पक्षाचा का असेना. त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि यांत सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील.
खरंतर असं बेफाम वागणाऱ्यांकडून तुम्ही राजीनामे घ्यायला हवेत. पण तुम्ही ते का करत नाही आहात माहित नाही. वेडंवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या म्हणजे सगळेच सुतासारखे सरळ येतील.
तुम्ही सुज्ञ आहात. तुमच्याकडून अपेक्षा आहेत.
राज ठाकरे ।
भावपूर्ण श्रद्धांजली सोनमताई ...
नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली येथील राजमाता जिजाऊ माता-बाल रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या इंजेक्शनमुळे घणसोली येथील आठ महिन्यांची गर्भवती सौ. सोनम करण डोंगरे आणि त्यांच्या गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत वेदनादायी घटना घडली ...
आज त्यांच्या राहत्या घरी जाऊन कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली व त्यांना धीर दिला. सोनम डोंगरे आणि जग पाहण्यापूर्वीच वैद्यकीय व्यवस्थेच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झालेल्या त्यांच्या निष्पाप बाळाचा हा बळी असून, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणार नाही, असा ठाम शब्द कुटुंबीयांना दिला ...
पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मनसे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील ...
सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात आज इगतपुरी संवाद दौऱ्यादरम्यान असंख्य कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेत जाहीर प्रवेश केला.
सर्व नवप्रवेशित कामगारांचे मनःपूर्वक स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
#MNSAdhikrut
दुर्दैव 😢
महाराष्ट्र विधानसभेचे सर्वोच्च पद असलेले विधानसभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकरांकडूनच मराठी भाषेचे वाभाडे..
इतरांकडून काय अपेक्षा करावी !
@rahulnarwekar#rahulnarwekar#mnsadhikrut
पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना, विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्या आधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी ?
नार्वेकरांनी हा प्रस्ताव स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असता कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली, हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही. बरं अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर, दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाट्टेल तसं मराठी वाचून दाखवत होते त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहित आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहित आहेत.
भाजपने जी काही खोगीरभरती सुरु केली आहे त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणे अशी झाली आहे.
सभागृहात नक्की कोण उपस्थित होतं माहित नाही पण अनेक ज्येष्ठ आमदार इथे असणार हे नक्की त्यांच्यापैकी एकानेही विरोध दर्शवला नाही ? सभागृहात श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित होते का माहित नाही, पण असते तरी मला वाटत नाही त्यांना काही फरक पडला असेल. गुलाबी आंखे जो तेरी देखी सारखी अनेक गाणी ( स्वतः निर्माण केलेल्या बेसुरात) म्हणणाऱ्या फडणवीसांना आज आपल्या राज्यात विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्याचं गांभीर्य काय असतं हे समजायला हवं होतं ! पण त्यांच म्हणणं सोपं आहे, सांगितलेली फोडाफोडीची कामं होत आहेत ना बरोबर , अधिवेशनाचा उपचार पूर्ण होत आहे ना ? बस झालं. दीनदयाल मंगेशकर म्हणो की दीनानाथ चौहान म्हणो काय फरक पडतो. शोकप्रस्ताव पण एक उपचारच आहे जो पार पडला. महाराष्ट्रातील आधीच्या, आताच्या पिढ्या हे पाहात आहेत आणि हे रेकॉर्ड झालेले सभापतींचे भाषण पुढच्या पिढ्या पाहतील याचं भान आणि जाणीव दोन्हीही नाही ? माणूस शिक्षित असला पाहीजे पण त्यापेक्षा तो सुज्ञ असला पाहिजे याची जाणीव मुख्यमंत्री सभापतींना करून देणार आहेत का नाही ?
आणि श्री. एकनाथ शिंदेंना पण याच्याशी घेणंदेणं असण्याचं काहीच कारण नाही. मराठी भाषेबद्दलच्या अभ्यासाचं त्यांचं विमान पंन्नास हजार फुटावरून चाललंय म्हणून त्यांचा पण दूर दूर पर्यंत संबंध नाही ! ही अवस्था आहे आज आपल्या महाराष्ट्राची. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाला समोरच्या कागदावर लिहिलेलं मराठी वाचता येत नाही, ते सभागृह मराठी भाषेविषयी काय आस्था बाळगणार किंवा मराठीची गळचेपी होत आहे म्हणून काय कारवाई करणार?
या सभागृहाला अध्यक्ष म्हणून गणेश वासुदेव माळवणकर लाभले जे पुढे लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. नार्वेकर ज्या अलिबागमधून येतात त्या अलिबागचे दत्तात्रय काशिनाथ कुंटे विधानसभेचे अध्यक्ष होते, अरुणभाई गुजराथी होते, बाळासाहेब भारदे होते, अगदी आत्ता आता अध्यक्ष असलेले दिलीप वळसे पाटील होते. अशी अध्यक्षांची परंपरा कुठे आणि सध्याची काय ही अवस्था ? कधीकधी विधिमंडळाच्या कामकाजाचं चित्रण समोर येतं ते ऐकावंसं आणि बघावसं पण वाटत नाही इतकं सुमार पद्धतीने सुरु आहे.
आपल्या भाषेची गळचेपी ही हिंदी लादून केंद्राकडून सुरु आहे, ती राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांकडून सुरु आहे आणि राज्याच्या विधिमंडळाकडून पण सुरु आहे याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं, चीड येते.
काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि त्यावर एकाही सदस्याने ब्र देखील न काढून या शोकप्रस्तावाला जणू संमतीच दिली. मराठी माणसाने विचार करावा की काय पद्धतीची माणसं आणि सरकार आपण निवडून देत आहोत.
महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषेला रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी त्यावर आपला बेजबाबदार बुलडोझर फिरवल्याबद्दल आणि शब्दशः धिंडवडे काढणाऱ्या या वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध !
राज ठाकरे ।
नवी मुंबईतील डान्सबार विरोधात मनसे आक्रमक!
या डान्सबार मध्ये विक्षिप्त अंगप्रदर्शन केलं जात, राज्यभरातील विविध गुन्हेगार या डान्सबार मध्ये बसतात, गुन्ह्यांचे षडयंत्र इथे रचले जातात, ही गुन्हेगारांची केंद्र नष्ट झाली पाहिजे - मनसे प्रवक्ते, योगेश चिले.
#मनसे@chileyog
एकीकडे शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर एका विशिष्ट समाजाचा झेंडा लावला जातो, तर दुसरीकडे त्याच समाजाच्या चौकाचं उद्घाटन केलं जातं. मुंबईत मराठी अस्मितेचा मुद्दा तापलेला असताना, असे निर्णय घेऊन मराठी माणसाच्या भावना दुखावल्या जात आहेत का? महापौरांच्या स्वतःच्या वॉर्डमध्येच मराठीचा साधा उल्लेख नसलेल्या चौकाचं उद्घाटन होतं, यावर महापौरांची भूमिका काय? किरीट सोमय्या आणि पराग शाह यांच्या प्रभावाखाली मराठी अस्मितेशी तडजोड केली जात आहे का? महापालिकेच्या नियमांनुसार प्रत्येक चौक, रस्ता किंवा कोणतेही सार्वजनिक ठिकाणी होणारे काम हे मराठीत व्हायला हवे असे अनिवार्य असताना महापौरांना याचा विसर पडलाच कसा? महापौरांनीच जर महापालिकेचे नियम पाळले नाहीत तर कोण नियमाचे पालन करील?
सत्तेतील नेत्यांनी जनभावना समजून घेण्याची गरज आहे. मराठी माणसाचा सन्मान राखायचा असेल, तर अशा निर्णयांपासून अंतर ठेवावं; अन्यथा जनतेचा रोष सहन करावा लागेल.
#aaplayashwant #marathi #maharashtra #thinkmayormadam
छत्रपती संभाजीनगर येथे मनसेचा जिल्हा पदाधिकारी "नवसंकल्प मेळावा" उत्साहात संपन्न!
मनसे नेते श्री. बाळा नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटन मजबुती, आगामी ग्रामपंचायत निवडणुका आणि सन्मा. राजसाहेब ठाकरे यांचे विचार घराघरात पोहोचविण्याचा निर्धार करण्यात आला.
नव्या जोमाने, नव्या उमेदीने... जय महाराष्ट्र!
🚩 जय मनसे! 🚩
#MNS #RajThackeray #जयमहाराष्ट्र #जयमनसे