मा.@mpsc_office@bhimanwar चांगल काम करता करता अचानक हे ONLINE परीक्षा कश्याला? सरळसेवा साठी संख्या कमी असते तिथं ठीक होत पण स्पर्धा परीक्षेत का?नॉर्मलायझेशन मुळे तर सगळी वाट लागली म्हणून तुमच्याकडे सर्व पद आले तर तुम्ही तिकडेच निघाले.4 लाख विद्यार्थी आणि ऑनलाइन परीक्षा चुकीच आहे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, सदर पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार असून गुणांचे समानीकरण करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी विविध निवड मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या संगणक आधारित परीक्षा व समानीकरण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव फारसे समाधानकारक नसल्याने, ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची व्यापक भावना आहे.
विद्यार्थ्यांची ही भावना मी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, उद्या दि. 26 जून रोजी सकाळी 11:00 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे सारथी कार्यक्रमानिमित्त मा. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी मी मा. मुख्यमंत्री महोदय यांचेशी देखील या विषयावर चर्चा करणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी मी स्वतः उपलब्ध असेन.
#MPSC #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #महाराष्ट्र
उपजिल्हाधिकारी पदाच्या 150 जागा बेकायदेशीर रित्या सरकार भरणार आहे.
अशा प्रमोशनसाठी जागा जाणे हे खूप भयंकर आहे. यासाठी लवकरच MPSC च्या विद्यार्थ्यांनी आवाज उठवणार आहेत
@cbawankule हा निर्णय रद्द नाही झाला तर स्पर्धापरीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल
राज्यसेवा आणि संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2024 जून महिन्यात होणे खूप गरजेचे आहे
कारण लाखो उमेदवारांची पूर्व परीक्षा पावसाळ्यात घेणे अवघड असते
या नियमाने ही परीक्षा ऑक्टोबर महिन्यात जाईल
मंत्रालयातील बाबूंनी तातडीने सुधारीत मागणीपत्रक देणे खूप गरजेचे
पण मनावर घेतो कोण?