मुंबई महानगरपालिकेच्या “अभियंता” पदासाठी जर पदविका (Diploma) नंतर (Degree) पदवी केलेले उमेदवार पात्र असतील तर १२ वी पास झाल्यानंतर ४ वर्षांची अभियांत्रिकी पदवी परीक्षा पास झालेल्या पदवीधरांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे.
महानगर पालिका या पदवीधरांचा हक्क डावलू शकत नाही.
@AUThackeray@mybmc @degree_holders @Mpsc_Andolan
#degreeforBMCJE
ऊर्जामंत्री साहेब ,ज्यांच्यामुळे तुम्ही ऊर्जामंत्री झालात त्यांना ऊर्जा खात्यामध्ये नोकरी हवी आहे त्यासाठी परीक्षा घ्या आणि जॉइनिं�� द्या.
ITI Exam लवकर घ्या,GATE ची सक्ती रद्द करा.आमचं काम करा तरच आम्ही सुद्धा तुमचं निवडणुकीत काम करू
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@iambadasdanve
मा. देवेंद्रजी,
ऊर्जा खात्याच्या अंतर्गत असलेल्या महापारेषण व महावितरण कंपन्यांमधील भरतीच्या जाहिराती निघून अनेक महिने उलटूनही परीक्षा होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या परीक्षा लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे.
महावितरण जाहीरात क्र. 7/2023 AE या पदासाठी Gate परिक्षेची 10% जास्त गुणांची अट शिथिल करणे, या पदासाठी महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करणे, #ITI विद्युत सहाय्यक पदासाठीचा 3 वर्ष कंत्राटी पद्धत रद्द करावी आदी विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्या आहेत.
कृपया या मागण्यांकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती!
@Dev_Fadnavis@iambadasdanve@AAPMaharashtra
@degree_holders @Mpsc_Andolan
#MSEB_EXAM_DATE_DECLARE
#No_GATE_For_MAHADISCOM
#DhananjayShinde
@VitthalKan19912 काही झालं तरी आजचा आजच तारखा जाहीर करा किंवा आमचा कुटुंब बाणा एकही मतांची अपेक्षा आणि तुम्ही परत त्या खुर्चीवर बसण्याची अपेक्षा सोडा ..
मुलांचा भविष्याशी खेळणाऱ्या अशा सरकारचा जाहीर निषेध
@CMOMaharashtra@Ajit PawarSpeaks @Dev_Fadnavis@kendre_sahadev@mieknathshinde
मा. देवेंद्र जी,
गेल्या ८ दिवसांतील आपले धार्मिक कार्यक्रम उरकले असतील तर राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे सुद्धा लक्ष द्यावे.
आपण मंत्री असलेल्या वीज मंत्रालयाच्या अखत्यारीतील महाराष्ट्र राज्य महापारेषण व महावितरण या संस्थांच्या भरतीच्या जाहिराती निघून अनेक महिने उलटून गेले आहेत. या परीक्षा लवकरात लवकर घेण्याचे आदेश द्यावेत ही विनंती.
तसेच उमेदवारांच्या पुढील महत्त्वाच्या मागण्या पूर्ण होणे गरजेचे आहे.
१. महावितरण जाहीरात क्र. 7/2023 AE पदासाठी GATE परिक्षेची १०% जास्त गुणांची अट शिथिल करणे
२. या पदासाठी महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करावे.
३. #ITI विद्युत सहाय्यक पदासाठीचा ३ वर्षांचा कंत्राटी पद्धतीचा कालावधी रद्द करावा
कृपया या मागण्यांबाबत आपण स्वतः लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
@degree_holders @MSEB_Engineers@Mpsc_Andolan
#महापारेषण व #महावितरण भरतीच्या जाहिराती निघून अनेक महिने उलटूनही परीक्षा होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी असून या परीक्षा लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे. महावितरण जाहीरात क्र. 7/2023 AE पदासा���ी Gate परिक्षेची 10% जास्त गुणांची अट शिथिल करणे तसेच या पदासाठी महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करणे, #ITI विद्युत सहाय्यक पदासाठीचा 3 वर्ष Contract Period रद्द करावा, या विद्यार्थ्यांच्या आग्रही मागण्या आहेत. ऊर्जामंत्री साहेबांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी, ही विनंती…!
@Dev_Fadnavis
#MSEB_EXAM_DATE_DECLARE
#No_GATE_For_MAHADISCOM
संदर्भ : आप महाराष्ट्र /२०२४/२७०८०४
प्रति,
मा. देवेंद्र फडणवीस
ऊर्जामंत्री, महाराष्ट्र राज्य
विषय: महावितरण मधील विद्युत अभियंता पदभरती संदर्भातील उमेदवारांच्या मागण्यांबाबत.
महोदय,
वरील विषयाच्या अनुषंगाने आपणास विनंती करण्यात येत आहे की महावितरण मधील "विद्युत अभियंता पदभरती" मध्ये ऊर्जा विभ���गाने टाकलेल्या अटी/शर्तीमुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण झाल्याची भावना आहे. उमेदवारांच्या मागण्या पुढीलप्रमाणे.
१. GATE परीक्षेची सक्ती रद्द करावी.
२. "स्किल इंडिया" च्या आधारे मेरिटनुसार नियुक्त झालेल्या ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनिंग अप्रेंटिस (Graduate engineer Training Apprenticeship) विद्यार्थ्यांनी आयुष्यातील एक वर्ष महावितरण मध्ये विना वेतन काम केले आहे. अशा विद्यार्थ्यांना अनुभवाच्या आधारावर महावितरण पदभरती मध्ये प्राधान्य मिळावे.
३. कनिष्ठ अभियंता पदांची जागवाढ
४. महाराष्ट्र शासनाची पदभरती असल्याने अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात यावे.
या पत्राद्वारे आपणास विनंती करण्यात येत आहे कि विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा व त्यांना न्याय द्यावा.
धन्यवाद,
@Dev_Fadnavis
संदर्भ : आप महाराष्ट्र /२०२४/२७०७०१
प्रति,
मा. एकनाथ शिंदे,
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य.
विषय : मुंबई महानगरपालिकेतील रिक्त अभियंता पदांची ताबडतोब भरती करण्��ाबाबत.
महोदय,
बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता संवर्गाची ६७१+ पदे रिक्त आहेत. तसेच एकूण ८४९० पदांची भरती प्रक्रिया मे २०२३ अखेर पूर्ण कारण्याचे निर्देश आपण स्वतः दिले होते. याबाबत आपल्या खात्यांतर्गत नगरविकास विभागाने सर्व महानगरपालिकांना ३१ मे २०२३ पूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनपत्र जारी केले होते. परंतु आपल्या निर्देशाला मुंबई महानगर पालिकेने जुमानले नाही अशी र��ज्यातील जनतेमध्ये चर्चा आहे. मुंबई महानगरपालिकेने आपण दिलेले निर्देश न पाळण्याच्या कृतीचे अजिबात समर्थन होऊ शकत नाही.
आपणांस या पत्राद्वारे विनंती आहे कि आपण स्वतः या बाबत लक्ष घालून ��ुंबई महानगरपालिकेला लवकरात लवकर कनिष्ठ अभियंता (स्थापत/यांत्रिकी व विदयुत) तसेच दुय्यम अभियंता (स्थापत/यांत्रिकी व विदयुत) या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे आदेश देऊन बेरोजगार युवकांना न्याय द्यावा.
धन्यवाद,
@mieknathshinde
#MPSC #DhananjayShinde