शेतीत यशस्वी व्हायचं असेल तर धाडस, नवनवीन प्रयोग आणि योग्य नियोजन याला पर्याय नाही. अवघड पिकं लावण्याचं शिवधनुष्य प्रतिकूल वातावरणात उचलणं म्हणजे गंमतीचं काम नाही. शेवटी प्रत्येक गोष्ट यशस्वी होण्यासाठी नशिबाची साथ महत्त्वाची असते. ठरलोय आज सक्सेसफुल..! ✌
@drrohinispatil मॅम, अक्कलकोट येथे झालेल्या महिलांच्या आरोग्याविषयी कार्यक्रमात तुम्ही दिलेली माहिती खुपचं उपयुक्त होती. ग्रामीण भागातील अनेक महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. तुमचे मार्गदर्शन, टिप्स निश्चितच त्यांच्यासाठी उपयोगी ठरतील. या जनजागृतीसाठी मनःपूर्वक धन्यवाद.
@msrtcofficial@Kalyanshetti_S दादाश्री, डेपो व्यवस्थापकांना याबाबतचे कठोर निर्देश देऊन बसस्थानक परिसरातील अवैध वाहतूक कायमस्वरूपी बंद करावी हीच नम्र विनंती. जेणेकरून पुढे अशी दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये.
@msrtcofficial अक्कलकोट बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आजही अवैध वाहतूक सुरू आहे. नुकत्याच झालेल्या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तरीही परिस्थितीत सुधारणा दिसत नाही. कृपया तात्काळ कारवाई करून प्रवासी व भाविकांच्या सुरक्षिततेची खात्री करावी.
अक्कलकोट येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मंदिराजवळील "गणराज गौरव भवन" या अतिथी गृहाचे मालक तथा आमचे बालमित्र @Ameya_Bag अमेयजी बाग आपणास वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा.. 💐🎂👍
@Kalyanshetti_S दादा, अक्कलकोट तालुक्यात २०२५ वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.. तरीसुद्धा फक्त नदीकाठच्याचं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजुर झाली आहे. पिकविमा मंजुर होऊन शेतकऱ्यांना भरपाई मिळावी याबाबत तुम्ही वारंवार पाठपुरावा करून पिक विमा मंजुर करून द्यावा हिच अपेक्षा. 🙏
आजपासून राज्यात जनगणनेच्या पहिल्या टप्प्यास सुरुवात होत असून, यावेळी प्रथमच नागरिकांसाठी ‘स्व-गणना’ हा डिजिटल पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही प्रक्रिया जनगणना अधिक जलद, अचूक आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
मी अक्कलकोट मतदारसंघातील सर्व नागरिकांना विनम्र आवाहन करतो की, दिनांक १ मे ते १५ मे या कालावधीत आपण https://t.co/9sbHE1BOGh या अधिकृत पोर्टलवर जाऊन स्वतःची डिजिटल जनगणना पूर्ण करावी. या प्रक्रियेमुळे प्रशासनास माहिती संकलन अधिक सुलभ व वेगवान पद्धतीने पूर्ण करण्यास मदत होईल.
स्व-गणना पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक नागरिकास ११ अंकी SE (Self Enumeration) युनिक आयडी प्राप्त होईल. हा आयडी जतन करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. पुढील टप्प्यात जेव्हा जनगणना अधिकारी (प्रगणक) घरोघरी भेट देतील, तेव्हा हा युनिक आयडी त्यांना सादर करणे अनिवार्य असेल, ज्यामुळे पडताळणी प्रक्रिया सुलभ व जलद होईल.
दिनांक १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत जनगणना अधिकारी घरोघरी भेट देऊन ‘घरगणना’ प्रक्रिया पूर्ण करतील. ज्यांनी स्व-गणना केलेली नाही, त्यांची माहिती अधिकारी प्रत्यक्ष नोंदवून घेतील.
आपण सर्वांनी या डिजिटल जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य करावे, ही विनम्र विनंती.
#राष्ट्रीयजनगणना2026 #स्वगणना #डिजिटलभारत #अक्कलकोट #नागरिकसहभाग #प्रशासनसहकार्य #CensusIndia #DigitalCensus
@msrtcofficial@PratapSarnaik रितेशनं, ST ज्या हाॅटेल आणि धाब्यावर थांबतेय, तिथं जाऊन जेवण करावं, स्वच्छतागृहाचा वापर करावा, गळक्या, सीट मोडलेल्या गाड्यांमधून उन्हातान्हात तासभर उभा राहिल्यावर स्टॅडींग प्रवास करावा. एसटीचा हा चेहरा पुढे आणून यात थोडेफार बदल होण्यासाठी प्रयत्न करावा. @Riteishd@PratapSarnaik
@nitingodbole@PadmakarTillu हो करेक्ट सर.. तेव्हा नगरपालिकेमध्ये प्रशासक असल्यामुळे स्वच्छता नसावी. यंदा नगरपालिकेमध्ये बऱ्याच प्रमाणात युवक नगरसेवक व नगराध्यक्ष देखील युवा आहेत. या सर्वांच्या इच्छाशक्तीमुळे अक्कलकोट लवकरच स्वच्छ व सुंदर होणार आहे..
@nitingodbole@PadmakarTillu तुमचा हा मेसेज मी तातडीने नगरपालिकेस कळवितो. पुढच्या वेळेस जेव्हा आपण याल या तेव्हा आमचे अक्कलकोट पुर्णपणे बदललेले दिसेल हे मात्र नक्की.. 🙏👍
@nitingodbole@PadmakarTillu सर तुम्ही अक्कलकोटला कधी आलेला.? शहराचे आरोग्य सभापती स्ट्रीक्टली ॲक्शन मोडवर आहेत. परंतु सध्या शहरात वाटर लाईन, ड्रेनेजचे काम चालु असल्याने शहरात खड्डे आणि धूळ आहे.. तुम्हास झालेल्या त्रासाबद्दल मी एक अक्कलकोटचा नागरीक या नात्याने आपली क्षमा मागतो. १/२ ⬇️
@Ameya_Bag@raghav_chadha@JPNadda@PrakashAbitkar
Respected Hon. Health Minister,
An official ATAGI advisory reports counterfeit rabies vaccine (Abhayrab®) in circulation in India. This poses a serious risk to public safety. Kindly look into this issue urgently and ensure strict action.
#HealthSafety