ऑगस्ट २०२७ नंतर MPSC परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय झाला नाही आणि २०२६ मध्ये ७०,००० पदांच्या जाहिराती काढण्याचे आश्वासनही सरकारने पूर्ण केले नाही, तर काँग्रेस पक्ष राज्यभर मोठे जनआंदोलन उभारून विद्यार्थ्यांच्या आणि बेरोजगार युवकांच्या हिताचे निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडेल.
राज्यातील लाखो परीक्षार्थीना "न्याय" मिळवून देण्यास काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे.
@INCHarshsapkal@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office@CongressRojgar@INCMaharashtra
#पदभरती #MPSC #MPSC_Offline
आत्तापर्यंत फक्त घोषणाच झालेल्या आहेत प्रत्यक्षात मात्र विविध प्रशासकीय करणे देऊन "मेगाभरती" प्रक्रिया लांबण्याचे षडयंत्र सुरू आहे, बेरोजगार उमेदवारांचे वाढते वय, ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थिती यामुळे तरुण पिढी प्रचंड नैराश्यात आहे.
#MPSC
सरकार आणि MPSC चे अध्यक्ष बोलतात 2026 मध्ये 50 ते 60 हजार पद भरती होणार.2026 मधील जुलै महिना संपत आला. 2026 मेगाभरतीचे वर्षे नसून फक्त घोषणाचे वर्षे असे विद्यार्थ्यांना वाटत आहे. लवकरात लवकर सरळसेवेची परीक्षा योजना जाहीर करा
@mpsc_office@Dev_Fadnavis@bhimanwar@AbhiPawarBJP
2 वर्षांपूर्वी सर्व सरळसेवा @mpsc_office द्वारे घेऊ असे शासनाने 18 जुलै 2024 रोजी जाहीर केले होते. त्यानुसार आयोगाने या महिन्यात सरळसेवेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम जाहीर करावा. @bhimanwar सर तुमच्याकडून अपेक्षा आहेत. मनावर घ्या.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
सरकार आणि MPSC चे अध्यक्ष बोलतात 2026 मध्ये 50 ते 60 हजार पद भरती होणार.2026 मधील जुलै महिना संपत आला. 2026 मेगाभरतीचे वर्षे नसून फक्त घोषणाचे वर्षे असे विद्यार्थ्यांना वाटत आहे. लवकरात लवकर सरळसेवेची परीक्षा योजना जाहीर करा
@mpsc_office@Dev_Fadnavis@bhimanwar@AbhiPawarBJP
मा. देवेंद्रजी,
मुख्यमंत्री कार्यालयाने जाहीर केलेला निर्णय हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेतल्याचे द्योतक आहे. मात्र, राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची मूळ आणि स्पष्ट मागणी म्हणजे MPSC च्या सर्व परीक्षा ऑफलाइन (OMR) पद्धतीनेच घेण्यात याव्यात, हीच आहे.
ऑगस्ट २०२७ पर्यंत CBT स्थगित करणे हा प्रश्नाचा अंतिम तोडगा नाही. विद्यार्थ्यांच्या मनातील ��ंशय आणि अविश्वास पूर्णपणे दूर करण्यासाठी MPSC ने ऑफलाइन परीक्षा पद्धतीबाबत स्पष्ट आणि कायमस्वरूपी निर्णय घेणे आवश्यक आहे.
गेल्या ९ दिवसांपासून MPSC कार्यालय, बेलापूर येथे सुरू असलेले आमचे साखळी उपोषण मुख्यमंत्री कार्यालयाच्या या घोषणेची दखल घेत आज आम्ही “तात्पुरते स्थगित” करत आहोत.
मात्र, MPSC कडून विद्यार्थ्यांच्या मूळ मागणीनुसार अंतिम निर्णय न झाल्यास, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विद्यार्थ्यांसोबत महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या मार्गाने, अहिंसक व संविधानिक पद्धतीने पुन्हा व्यापक जनआंदोलन उभारेल.
महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील.
जय बापू!
जय भीम!
जय संविधान!
@Dev_Fadnavis @INCHarshsapkal @satejp @VijayWadettiwar @DalviAaba @bhimanwar @mpsc_office @CongressRojgar @CMOMaharashtra
सर्व विद्यार्थ्यांचा ���िरोध असताना कोणाच्या फायद्यासाठी ऑनलाइन परीक्षेचा इतका अट्टाहास?
सर्व व्यवस्था ही नागरिकांसाठी असते ना की स्वतःच्या फायद्यासाठी.
विद्यार्थ्यांचे आयुष्य देशोधडीला लावू नका. परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाइनच झाल्या पाहिजेत. यावर कोणतीही तडजोड मान्य नाही. 😡
#2027 पासून #MPSC च्यापरीक्षा ऑनलाईन होणार असेल तोही निर्णय आम्हाला मान्य नसेल. आम्हाला वेळ नको. तर आम्हाला ही ऑनलाईन परीक्षा पद्धतच नको. 2045 पासून सुद्धा नको.रस्त्यावर उतरावे लागेल. त्याशिवाय पर्याय नाही.
@mpsc_office@Dev_Fadnavis@bhimanwar@RRPSpeaks@AbhiPawarBJP
MPSC ऑनलाईन परीक्षा ऑगस्ट 2027 पासून घे��ार हा आपला निर्णय म्हणजे "आजचे मरण उद्यावर ढकलणे"
MPSC मार्फत एकाच दिवशी एकाच वेळी संपूर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याइतपत इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत नाही तोपर्यंत परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घ्याव्या. यावर फेरविचार करावा
@CMOMaharashtra
मुख्यमंत्री महोदयांनी विद्यार्थ्यांचा आवाज ऐकून संगणकाधारित (CBT) परीक्षा ऑगस्ट २०२७ पर्यंत स्थगित करण्याची सूचना दिली, हा महारा��्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा, विविध विद्यार्थी संघटनांच्या सातत्यपूर्ण लढ्याचा, राज्यभर उभारलेल्या आंदोलनांचा आणि काँग्रेस पक्षाने MPSC मुख्यालय, सीबीडी बेलापूर येथे सलग ९ दिवस चालविलेल्या ऐतिहासिक आंदोलनाचा पहिला मोठा विजय आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, विधान परिषद सदस्य सतेज (बंटी) पाटील य��ंनी हा विषय सातत्याने शासन, मुख्यमंत्री, MPSC आणि विधिमंडळात प्रभावीपणे मांडत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यांच्या या नेतृत्वाला विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसेच महाविकास आघाडीच्या आमदारांनी संपूर्ण ��धिवेशनभर भक्कम साथ देत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आवाज शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचला.
या लढ्याचे सर्वात मोठे श्रेय महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना, विविध विद्यार्थी संघटनांना आणि मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, नांदेड, यवतमाळ, वर्धा यांसह राज्यभर आंदोलन उभारणा��्या प्रत्येक कार्यकर्त्याला जाते. या सामूहिक संघर्षामुळेच शासनाला विद्यार्थ्यांचा आवाज ऐकावा लागला.
हा केवळ परीक्षा पद्धतीचा प्रश्न नाही, तर लाखो मेहनती विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा लढा आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने स्पर्धा परीक्षा, पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी आवाज उठवत आहेत. त्याच विद्यार्थी न्यायाच्या भूमिकेला बळ देणारा हा संघर्ष आहे.
��ात्र ही बाब राज्यसेवा परीक्षा पद्धतीतील पूर्वीच्या अनुभवाचीही आठवण करून देते. विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर Objective परीक्षेचे दो�� प्रयत्न वाढवून देण्यात आले; पण नंतर Descriptive पद्धत लागू करण्यात आली. आयोगाकडे पेपर तपासणीसाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने पुढे Optional विषयही काढून टाकावे लागले.
त्यामुळे केवळ मुदतवाढ हा कायमस्वरूपी तोडगा नाही. आज २०२७ पर्यंत स्थगिती आणि उद्या पुन्हा ऑनलाइन परीक्षा रेटून नेण्याचा प्रयत्न होणार नाही, याची स्पष्ट हमी आवश्यक आहे.
आमची भूमिका स्पष्ट आहे. MPSCच्या सर्व भरती परीक्षा कायमस्वरूपी ऑफला���न (OMR) पद्धतीनेच व्हाव्यात. पारदर्शकता, वेळेत निकाल आणि पेपरफुटीमुक्त भरती प्रक्रिया हीच विद्यार्थ्यांवरील खरी न्यायाची भूमिका आहे.
आता MPSC ने विद्यार्थ्यांच्या भावनांचा आदर करून ऑफलाइन (OMR) परीक्षा पद्धतीबाबत अधिकृत आणि कायमस्वरूपी निर्णय जाहीर करावा. अंतिम निर्णय होईपर्यंत काँग्रेसचा आणि विद्यार्थ्यांचा हा लढा सुरूच राहील.
लडेंगे, जितेंगे..... !
@RahulGandhi @INCHarshsapkal@satejp @VijayWadettiwar @DalviAaba @INCMaharashtra @bhimanwar @mpsc_office @degree_holders @Mpsc_Andolan @VastavKatta
#MPSC #OfflineExam #StudentJustice #RahulGandhi #Congress
मुख्यमंत्री महोदय ,
विद्यार्थ्यांचा केवळ आणि केवळ ऑफलाईन परीक्षेवरच पूर्णत: विश्वास आहे. विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे तो म्हणजे ऑनलाइन आणि नॉर्मलाइझेशन मधून होणारे घोळ! विद्यार्थ्यांची कुठलीही मागणी नसताना, यूपीएससी सह बहुतांश राज्ये ऑफलाईन परीक्षा घेत असताना आपले सरकार ऑनलाईनसाठी इतके आग्रही का ?
दोन दिवसांपूर्वी आप�� विद्यार्थ्यांना ‘कुठलीही शिफ्ट न करता एकाचवेळी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जात नाही तोपर्यंत ऑनलाइन परीक्षा न घेण्याचा’ शब्द दिला होता. आज मात्र एकाच वेळी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात तुम्ही ब्र सुद्धा उच्चारलेला नाही.
एकाच शिफ्ट मध्ये एकाचवेळी परीक्षा घेण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर एका वर्षात उभारले जाणार नाही, हे माहीत असताना सुद्धा ऑ��स्ट २०२७ ची टाइमलाईन देण्याचे कारण काय ? आयोगाने दिलेल्या लिंकवर क्लिक करताच TCS च्या साईटला लिंक जाते याचा अर्थ काय ? तसंच कुठलही कारण नसताना, कोणाचीही मागणी नसताना बळजबरीने ऑनलाइन परीक्षा लादण्यामागील कारणे काय? या प्रश्नांची उत्तरे न कळायला विद्यार्थी दुधखुळे नाहीत .
त्यामुळे ऑगस्ट २०२७ काय ऑगस्ट २०४७ उजाडला तरी कोणालाही विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन परीक्षा बळजबरीने लादू ��ेणार नाही.
@Dev_Fadnavis
@mpsc_office
ऑनलाइन (CBT) परीक्षा घेण्याचा #MPSC चा निर्णय कुठल्याही प्रकारे विद्यार्थ्यांच्या हिताचा नाही. त्यामुळं कुठलेही किंतु परंतु न करता तत्काळ सर��ारने आणि आयोगाने हा निर्णय रद्द करणं गरजेचं आहे. यासंदर्भात गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली असता विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन चर्चा करून त्यानंतरच निर्णय घेण्यासंदर्भात त्यांनी आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आज मुख्यमंत्री महोदयांची विद्यार्थ्यांसोबत चर्चा झाल्याचं कळतंय.
सरकार चर्चा करत असेल तर सरकारलाही वेळ देणं गरजेचं आहे, परंतु सरकारने एवढ्या आठवड्याभरात निर्णय न घेतल्यास ज्याप्रमाणे शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून कर्जमाफीच्या अटी रद्द करण्यास सरकारला भाग पाडलं त्याचप्रमाणे विद्यार्थी एकजूट होऊन सरकारला निर्णय रद्द करण्यास भाग पाडतील. सरकार आठवडाभरात सकारात्मक निर्णय घेईल, ही अपेक्षा आहे…
अन्यथा #लढणार_आणि_जिंकणार_सुद्धा...!
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#MPSC #OnlineExam
MPSC मुख्यालय, CBD बेलापूर | ऑफलाइन परीक्षा आंदोलन : दिवस ७
📢 महत्त्वाचे अपडेट
MPSC परीक्षा ऑफलाइन (OMR) पद्धतीने घेण्याच्या मागणीसंदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळासोबत आज सायंकाळी ४:०० वाजता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने बैठकीचे आयोजन केले आहे.
या बैठकीत विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या आयोगासमोर ठामपणे मांडल्या जाणार आहेत.
बैठकीनंतर झालेल्या चर्च���चा सविस्तर तपशील आणि पुढील भूमिका सर्वांना अधिकृतपणे कळविण्यात येईल.
@RahulGandhi
@INCHarshsapkal @TusharG @satejp @VijayWadettiwar
@DalviAaba @CongressRojgar
#MPSC #OfflineExam #OMR #StudentsFirst #MPSCProtest
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अचानकपणे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहिर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम झाला आहे. विद्यार्थ्यांची ही भावना लक्षात घेता आज MPSC विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळा���ह मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन MPSC परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीनेच घेणेबाबतची आग्रही मागणी केली. यावर मा. मुख्यमंत्री महोदय सकारात्मक असून त्यांनी आयोगाला याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. उद्यापर्यंत आयोग विद्यार्थ्यांना अपेक्षित असा निर्णय जाहिर करेल असा विश्वास आहे. यावेळी श्री. राजेश पांडे यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
#devendrafadnvis #abhimanyupawar #mpsc
@Dev_Fadnavis
राज्यसेवा आयोगाने मनमानीपणे लादलेल्या ऑनलाईन परीक्षा (CBT) पद्धतीविरोधात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष असून वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून विरोध करूनही पाठपुरावा करूनही आयोगाने विद्यार्थ्यांची दखल घेतलेली नाही.
सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही. एवढ्या ८-१० दिवसात सरकारने आणि आयोगाने निर्णय न घेतल���यास मी स्वतः विद्यार्थ्यांच्या लढ्यात विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरेन...
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा यशस्वी ��ाला आता पुढचा लढा स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी...!
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#लढणार_आणि_जिंकणार #OnlineExam
#MPSC #विद्यार्थी_प्रश्न #लढा_विद्यार्थ्यांचा
MPSC ची CBT परीक्षा रद्द करा... ऑफलाईन परीक्षा कायम ठेवा..!
बेलापूर येथील MPSC कार्यालयासमोर सुरू असलेल्या काँग्रेसच्या साखळी उपोषणाला भेट देत विद्यार्थ��यांच्या संघर्षाला जाहीर पाठिंबा दिला.