पुणे महानगर पालिका कनिष्ठ अभियंता परीक्षा घोटाळ्याप्रकरणी २८ ऑगस्टला गुन्हे दाखल होऊन तब्बल १७ दिवस उलटले, तरी या प्रकरणातील एकाही आरोपीला महाराष्ट्र पोलिस अटक करू शकलेले नाहीत असे समजते.
हे जर खरं असेल तर मग प्रश्न गंभीर आहे,
महाराष्ट्र पोलीस आरोपींपर्यंत पोहोचू शकत नाहीत, की कोणाच्या दबावामुळे कारवाईला जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे? जर आरोपी खुलेआम फिरत असतील, तर कायदा कुणासाठी आहे?
सरकारने तातडीने उत्तर द्यावे आणि सर्व आरोपींना अटक करून निष्पक्ष तपास करावा ही विनंती.
@CPPuneCity@INCMaharashtra@DGPMaharashtra@CMOMaharashtra@PMCPune
@CMOMaharashtra मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांचे विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. आता मा. आयुक्त @navalMH@prajytnair यांनी PMC JE बाबत ठोस निर्णय घ्यावा. नियुक्त्या तात्काळ थांबवा! CCTV, डिजिटल लॉग्स व संपूर्ण प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी होऊ द्या. चौकशीपूर्वी नियुक्त्या नकोत.
पेपर पुढे ढकलला आहे तर सर्व तांत्रिक संवर्ग ( जलसंपदा, जलसंधारण, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर) या पदभरती मध्ये समाविष्ट करून परीक्षा घेण्यात यावी ही नम्र विनंती.....!
@CMOMaharashtra@SanjayDRathods@RVikhePatil@mieknathshinde
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis
महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा केवळ परीक्षा घेणारी संस्था नसून, राज्यातील लाखो युवक-युवतींच्या कठोर परिश्रमांचा, त्यांच्या स्वप्नांचा तसेच त्यांच्या कुटुंबांच्या भविष्याचा विश्वासाचा आधार आहे. वर्षानुवर्षे परिश्रम करून विद्यार्थी या व्यवस्थेवर विश्वास ठेवून स्पर्धा परीक्षांना सामोरे जातात.
मात्र आपल्या सरकारच्या कार्यकाळात MPSC संदर्भात, विशेषतः ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांसह, परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता व विश्वासार्हता याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सदर आरोपांची निष्पक्ष, स्वतंत्र व वेळबद्ध चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे तसेच दोषींवर कठोर कारवाई करणे ही सरकारची जबाबदारी आहे.
आज पुणे येथे हजारो विद्यार्थी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत, त्यांच्या मागण्या रास्त व स्पष्ट आहेत. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, निष्पक्ष चौकशी, वेळबद्ध भरती प्रक्रिया, गैरप्रकारांविरुद्ध कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीला न्याय मिळावा एवढच त्यांचं म्हणणं आहे.
केवळ आश्वासनांद्वारे हा प्रश्न मार्गी लागणार नाही. या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधावा, त्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा आणि संबंधित निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करावी.
कनिष्ठ अभियंता पदभरतीतील गैरप्रकाराविरोधात विद्यार्थ्यांचे पुणे महापालिका प्रवेशद्वारावर आंदोलन; शिवसेनेचा आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा..!!
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराच्या विरोधात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून परीक्षा देणारे विद्यार्थी आज पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर समोर आंदोलन केले. गुणवत्तेच्या आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर परीक्षा देणाऱ्या या विद्यार्थ्यांनीच भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे पुरावे पुणे महानगरपालिका प्रशासनासमोर मांडले. या पुराव्यांच्या आधारे पुणे महानगरपालिकेने तीन विद्यार्थ्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, गैरप्रकार झाल्याचे समोर आल्यानंतर केवळ तीनच विद्यार्थी दोषी असल्याचे प्रशासन कोणत्या अधिकृत तपासाच्या आधारे सांगत आहे, हा गंभीर प्रश्न आहे.
एकीकडे गैरप्रकाराचे पुरावे समोर येऊन गुन्हे दाखल झाले असताना दुसरीकडे उर्वरित परीक्षार्थींना सेवेत रुजू करून घेण्याची प्रक्रिया सुरू ठेवणे म्हणजे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार आहे. प्रश्नपत्रिका नेमकी किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली किंवा किती जणांना त्याचा फायदा झाला नाही, याबाबत पुणे महानगरपालिकेकडे अधिकृत आणि अंतिम स्वरूपाचा स्पष्ट निष्कर्ष नसताना संपूर्ण भरती प्रक्रिया पुढे रेटली जात असेल, तर या भरतीची पारदर्शकता आणि विश्वासार्हता संशयाच्या भोवऱ्यात येते. प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या करिअरचा वाटोळा करण्याचा अधिकार पुणे महानगरपालिका प्रशासनाला नाही.
या विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शिवसेनेने यापूर्वीच आवाज उठवला असून, या संपूर्ण प्रकरणाची माहिती माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनाही देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेचा पूर्णपणे पाठिंबा असून, कनिष्ठ अभियंता पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया तात्काळ रद्द करून नव्याने, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने फेरपरीक्षा घेण्यात यावी, ही शिवसेनेची स्पष्ट मागणी आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या हक्कासाठी शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असून, प्रशासनाने हा प्रश्न गांभीर्याने न घेतल्यास अधिक तीव्र अंदोलन करू.
@PMCPune@navalMH
#punecity #shivsena #PMC #students #peparleak
धक्कादायक! स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023, सदर परीक्षेचे पेपर तपासण्याकरिता कक्ष अधिकारी व सहाय्यक कक्ष अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती अशी बाब निदर्शनास येत आहे. कक्ष अधिकारी यांचा Technical Subjects शी काय संबंध?@mpsc_office@Dev_Fadnavis@RRPSpeaks
फसवणुकीने भरलेली #PMC_JE_Scam परीक्षा रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष श्री. धनंजय शिंदे यांच्या नेतृत्वात व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले.
या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं सिद्ध झालं असून आणि याप्रकरणी सखोल चौकशीची गरज असल्याचं चौकशी अहवालात स्पष्टपणे नमूद केलेलं तरीही सखोल चौकशी करण्यापूर्वीच महापालिका प्रशासन या परीक्षेतून निवड झालेल्यांना नियुक्त्या देण्याची घाई का करतंय? त्यासाठी कुणाचा दबाव आहे का? प्रामाणिकपणे अभ्यास करुन विद्यार्थी परीक्षा देतात आणि परीक्षेत गैरकृत्य करणाऱ्या रॅकेटच्या माध्यमातून भलत्यांचीच निवड केली जाते, हे विद्यार्थ्यांनी अजून किती दिवस खपवून घ्यायचं?
भरती प्रक्रियेतील पारदर्शकता, निष्पक्षता आणि विद्यार्थ्यांचा विश्वास अबाधित राखण्यासाठी, ही परीक्षा रद्द करून पारदर्शक पद्धतीने नव्याने आणि निष्पक्ष परीक्षा घेणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या या न्यायाच्या लढाईत कॉंग्रेस पक्ष नेहमीच विद्यार्थ्यांसोबत आहे.
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) परीक्षेचा पेपर लीक झाल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर, संतप्त विद्यार्थी आपल्या हक्क आणि न्यायासाठी पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर उपोषणाला/आंदोलनाला बसले आहेत.
या कठीण प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या मागण्यांना खंबीर पाठिंबा दर्शवण्यात आला. रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्या महापालिकेच्या कारभाराचा आम्ही तीव्र निषेध करतो.
3/3
तेव्हा त्यांच्या प्रश्नांनाही असा अहंकार, अशी दारं बंद करणारी वृत्ती आणि “आम्ही सांगू तेच अंतिम” अशी राजेशाही भेटू नये, एवढीच देवाकडे प्रार्थना.
लोकशाहीत अधिकारी जनतेचे सेवक असतात, राजे नाहीत. हे विसरणं हीच आजची सर्वात मोठी शोकांतिका आहे.
@navalMH@prajytnair
1/3
आज प्रत्यक्ष पाहिलं की लोकशाहीत काही मोजक्या खुर्च्यांवर बसलेल्या लोकांकडून राजेशाही कशी चालवली जाते!
विद्यार्थी PMC JE भरतीतील गंभीर प्रश्नांची उत्तरं मागत होते. पण उत्तर देण्याऐवजी त्यांना मिळालेली वागणूक आणि प्रशासनाची rigid भूमिका संतापजनक व लाजिरवाणी होती.
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठीचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यात! ⚖️✊
MPSC,एमएमआरडी आणि पुणे महानगर पालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरतीतील गैरप्रकाराविरोधात आज पुण्यात विद्यार्थ्यांसोबत ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. असीम सरोदे यांची भेट घेतली.
विविध अहवाल, भरती प्रक्रियेतील गंभीर प्रश्न आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आंदोलनासोबतच आता कायदेशीर लढाईचीही तयारी सुरू झाली आहे. पुढील कायदेशीर कारवाईबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
महायुती सरकारने विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करू नये.
प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही!
@AsimSarode@INCHarshsapkal@satejp
#PMCJE #PMCRecruitment #StudentsJustice #RojgarNyay #IBPS #Congress
पुणे मनपा कनिष्ठ अभियंता भरतीतील गैरप्रकार सिद्ध झाल्यावरही घाईघाईने नियुक्त्या का?
या घोटाळ्याची सखोल चौकशी करून परीक्षा रद्द करा, अन्यथा विद्यार्थ्यांचा हा लढा अधिक तीव्र होईल.
प्रामाणिक उमेदवारांना न्याय मिळेपर्यंत आमचा पूर्ण पाठिंबा!
#पुणे_महापालिका#भरती_प्रक्रिया
साहेब पुणे महापालिकेच्या Junior Engineer Civil चा पेपर फुटलेला आहे त्यामुळे सदर भरती प्रक्रिया रद्द करून पुन्हा पारदर्शक पद्धतीने घ्यावी ही विनंती..साहेब कृपया पुणे महापालिकेच्या आयुक्त साहेबाना आपण बोलावे ही विनंती करतो 🙏
@mieknathshinde@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar
The fraudulent #PMC_JE_Scam should be cancelled
To uphold transparency, fairness, & public trust in the recruitment system, it is imperative that the examination be cancelled & a fresh, fair examination be conducted through a transparent process
-@Dhananjay4INC@INCMaharashtra