One candidate went from 60 and 80 in recent exams to 200 out of 200 in MMRDA JE Civil. 😳
Another reportedly jumped from single digits to 196. And 13 of 16 toppers came from one Nagpur centre.
Abhijit Dipke: What magic was happening there? If jobs are being managed by setting, stop this exam drama and auction government jobs like IPL.
Aspirants: We protest for advertisement, centre, result and joining. If students fight for every basic step, when will they study?
Hundreds of aspirants and NSUI members protested outside PMC headquarters, alleging question paper leakage and irregularities in the Junior Engineer (JE) recruitment examination conducted by IBPS in three shifts in April. Candidates claimed that photographs of exam questions, carrying PMC and IBPS markings, were circulated on Telegram during the computer-based test, and alleged the images were genuine rather than AI-generated.
The protest was temporarily suspended after Municipal Commissioner Navalkishore Ram met a student delegation and assured them of an inquiry, though protesters warned they would resume agitation on a larger scale if their demands weren't met. PMC Additional Commissioner Prajit Nair said no appointments would be made until IBPS submits its report, expected within a week, and that the exam would be re-conducted if fraud is established. Several Congress leaders also visited the protest site in support of the candidates.
#Punetimesmirror #PMCRecruitment #PuneNews #NSUI #PaperLeak
आज ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमानिमित्त पुणे येथे उपस्थित असताना विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील उमेदवारांनी भेट घेऊन त्यांच्या विविध प्रलंबित मागण्या व समस्या माझ्या निदर्शनास आणून दिल्या.
👉सदर उमेदवारांनी निदर्शनास आणून दिल्यानुसार, मागील काही वर्षांपासून राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील पदे रिक्त असूनही सदर रिक्त पदांच्या भरतीसाठी आवश्यक त्या जाहिराती अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत. विशेषतः जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग, नगरपरिषद प्रशासन तसेच इतर संबंधित विभागांमध्ये उपलब्ध असलेल्या रिक्त पदांमुळे पात्र उमेदवारांना शासकीय सेवेत संधी उपलब्ध होण्यास विलंब होत आहे.
👉जलसंधारण विभागातील भरतीबाबत संबंधित विभागाचे मा. मंत्री महोदय यांच्याकडून वेळोवेळी घोषणा करण्यात आल्याचे उमेदवारांनी निदर्शनास आणून दिले आहे. तथापि, प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक जाहिरात अद्याप प्रसिद्ध झालेली नसल्याने उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.
👉त्यामुळे संबंधित विभागांनी उपलब्ध रिक्त पदांची वस्तुनिष्ठ आकडेवारी निश्चित करून, पदांची आवश्यक मंजुरी व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत कालबद्ध कार्यवाही करणे आवश्यक आहे.
👉MMRDA सहाय्यक अभियंता-२ परीक्षेच्या निकालाबाबत
नुकत्याच पार पडलेल्या MMRDA सहाय्यक अभियंता-२ पदाच्या परीक्षेच्या निकालाबाबत काही उमेदवारांनी गंभीर स्वरूपाचे आक्षेप उपस्थित केले आहेत.
काही उमेदवारांच्या प्राप्त गुणांमध्ये असामान्य स्वरूपाची तफावत असल्याचे तसेच काही विशिष्ट परीक्षा केंद्रांशी संबंधित निकालांच्या स्वरूपाबाबत शंका उपस्थित करण्यात आल्याचे उमेदवारांनी निदर्शनास आणून दिले आहे.
सदर आक्षेपांची सत्यता अथवा वस्तुस्थिती अधिकृतरीत्या पडताळून पाहणे आवश्यक असून, कोणत्याही निष्कर्षापूर्वी संबंधित परीक्षा यंत्रणेमार्फत संपूर्ण परीक्षा प्रक्रियेचे तांत्रिक व स्वतंत्र परीक्षण करण्यात यावे.
यामध्ये आवश्यकतेनुसार परीक्षा केंद्रांवरील CCTV चित्रीकरण, बायोमेट्रिक नोंदी, सर्व्हर लॉग, उमेदवारांची उपस्थिती नोंद, प्रश्नपत्रिका वितरण व संकलन प्रक्रिया, उत्तरपत्रिका/डिजिटल प्रतिसाद, गुणांकन प्रक्रिया तसेच इतर संबंधित इलेक्ट्रॉनिक नोंदींची पडताळणी करण्यात यावी.
सदर पडताळणीअंती वस्तुस्थिती स्पष्ट करून पात्र उमेदवारांच्या हिताचे संरक्षण होईल, अशा पद्धतीने आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.
👉पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेबाबतही काही उमेदवारांनी आक्षेप नोंदविले असून, सदर प्रकरणाची चौकशी/परीक्षण करण्यासाठी IBPS कडून अहवाल प्राप्त होणे अपेक्षित असल्याचे निदर्शनास आले आहे.
अशा परिस्थितीत संबंधित अहवाल प्राप्त होऊन त्यातील निष्कर्षांचा विचार होण्यापूर्वीच नियुक्ती प्रक्रियेबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतला जात असल्यास, त्याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे IBPS चा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील निष्कर्षांचा सखोल विचार करूनच पुढील नियुक्तीविषयक कार्यवाही करण्यात यावी, अशी उमेदवारांची मागणी आहे.
👉वरील सर्व बाबींच्या अनुषंगाने शासन व संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी
1. राज्यातील विविध विभागांमधील स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदांची अद्ययावत संख्या जाहीर करावी.
2. आवश्यक प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून रिक्त पदांच्या भरतीसाठी कालबद्ध पद्धतीने जाहिराती प्रसिद्ध कराव्यात.
3. MMRDA सहाय्यक अभियंता-२ परीक्षेच्या निकालाबाबत उमेदवारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची स्वतंत्र व तांत्रिक पद्धतीने पडताळणी करावी.
4. आवश्यकतेनुसार CCTV, बायोमेट्रिक, सर्व्हर लॉग, परीक्षा केंद्रनिहाय माहिती व गुणांकन प्रक्रियेची तपासणी करावी.
5. पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रियेबाबत IBPS चा अंतिम अहवाल प्राप्त करून त्यातील निष्कर्षांच्या आधारे पुढील कार्यवाही करावी.
6. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व गुणवत्ताधारित राहील याची दक्षता घ्यावी.
7. उमेदवारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांबाबत संबंधित प्राधिकरणाने अधिकृतरीत्या वस्तुस्थिती स्पष्ट करावी.
ही मागणी कोणत्याही विशिष्ट उमेदवाराच्या विरोधात नसून, पात्र उमेदवारांना न्याय मिळावा, भरती प्रक्रिया पारदर्शक राहावी आणि शासकीय सेवेत गुणवत्तेच्या आधारे निवड व्हावी, या व्यापक उद्देशाने करण्यात येत आहे.
राज्यातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या भवितव्याचा विचार करून शासनाने सदर बाबींवर तातडीने सकारात्मक व कालबद्ध कार्यवाही करावी, ही अपेक्षा.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, महाराष्ट्र काँग्रेस श्री. धनंजय शिंदे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या ‘रोजगार न्याय यात्रा’ अंतर्गत आज पुणे महानगरपालिका येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या न्याय्य मागण्यांना ठाम पाठिंबा दिला.
पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेतील पेपरफुटीच्या आरोपांच्या निषेधार्थ शेकडो विद्यार्थी आंदोलन करत आहेत. वर्षानुवर्षे अभ्यास करून सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी पेपरफुटी, परीक्षा गैरव्यवहार आणि भरतीतील अनियमितता करून खेळ केला जात आहे.
क्लाऊड आणि एआयच्या युगात पेपरफुटी होणे हे महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आणि लज्जास्पद आहे. PMC आणि MMRDA पेपरफुटीच्या प्रकरणात विद्यार्थ्यांनी दीड महिन्यापूर्वीच पुरावे दिले असून, आयुक्तांची भेट घेऊन चौकशीची मागणीही केली होती. मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना केली.
पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे राबवून विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, ही काँग्रेसची ठाम भूमिका आहे.
रोजगार न्याय यात्रेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठीचा हा संघर्ष काँग्रेस ठामपणे पुढे नेणार आहे.
#PMC #JrEngineer #PaperLeak
पुण्याकडे निघालोय…
विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला आणखी बळ देण्यासाठी! 🇮🇳✊
MMRDA भरती प्रकरणात विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नांना काँग्रेसने सातत्याने आणि आक्रमकपणे आवाज दिला. Normalisation मधील विसंगती, गुणांबाबतचे गंभीर प्रश्न आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मागणीची दखल घेत अखेर ३ सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आली. हा विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा ऐतिहासिक विजय आहे. मात्र हा केवळ पहिला टप्पा आहे. निष्पक्ष चौकशी, सत्य समोर येणे आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील.
🚩 आज पुण्यात ‘रोजगार न्याय यात्रा’
📅 २१ ऑगस्ट २०२६
⏰ सकाळी १० वाजता
📍 छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पुणे महानगरपालिका
या रोजगार न्याय यात्रेचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा सपकाळ आणि अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा. अलका लांबा यांच्या हस्ते होणार आहे.
यात्रेच्या माध्यमातून विद्यार्थी व युवकांच्या रोजगार, भरती आणि परीक्षा व्यवस्थेशी संबंधित प्रश्नांसाठी सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या :
🔹 MPSC व इतर सरकारी भरती परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाइन/OMR पद्धतीने घेण्यात याव्यात.
🔹 परीक्षांमधील Normalisation पद्धत रद्द करण्यात यावी.
🔹 पेपरफुटी, कॉपी, परीक्षा गैरप्रकार आणि भरती घोटाळ्यांवर कठोर कारवाईसाठी प्रभावी कायदा करावा.
🔹 जलसंपदा व जलसंधारण विभागातील प्रलंबित स्थापत्य अभियंता भरती तातडीने सुरू करावी.
🔹 विविध सरकारी विभागांतील प्रलंबित भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.
🔹 MMRDA प्रकरणातील चौकशी समितीने Normalization Formula, Raw व Normalized Scores, CCTV, Server Logs आणि Digital Records यांची सखोल तांत्रिक तपासणी करावी.
🔹 गैरप्रकार सिद्ध झाल्यास दोषींवर कठोर कारवाई करून प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देऊ नये.
📚 त्यानंतर थेट विद्यार्थ्यांमध्ये…
रोजगार न्याय यात्रेनंतर आज संध्याकाळपासून आणि उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत पुण्यातील विविध स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व लायब्ररींना भेट देऊन विद्यार्थ्यांशी तसेच संघटना आणि क्लास चालकांसोबत प्रत्यक्ष संवाद साधणार आहे. त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि मागण्या जाणून घेण्यासोबतच एका ऐतिहासिक कार्यक्रमासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला सहभागी होण्याचे आवाहन करणार आहे :
🇮🇳 ‘छात्रों की गूंज’ - राहुलजी गांधी पुण्यात!
📅 २२ ऑगस्ट २०२६
📍 AISSMS कॉलेज ग्राउंड, पुणे
देशातील विद्यार्थी आणि युवकांच्या शिक्षण, रोजगार, परीक्षा व्यवस्था आणि भविष्याशी संबंधित प्रश्नांवर थेट संवाद साधण्यासाठी राहुलजी गांधी पुण्यात येत आहेत.
‘छात्रों की गूंज’ ही केवळ सभा नाही; हा विद्यार्थ्यांच्या आवाजाला राष्ट्रीय व्यासपीठ देण्याचा प्रयत्न आहे. पुण्यातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा विद्यार्थी, पदवीधर युवक, अभ्यासिका-लायब्ररीतील विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
तुमचा प्रश्न घेऊन या.
तुमचा आवाज घेऊन या.
तुमच्या मित्रांना घेऊन या.
@MMRDAOfficial प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या लढ्याने दाखवून दिले आहे की, विद्यार्थी एकजूट झाले, संघर्ष केला आणि आवाज बुलंद केला तर सरकारलाही उत्तर द्यावे लागते!
चला, या संघर्षाला पुढची दिशा देऊया.
चला, रोजगाराचा अधिकार बुलंद करूया.
चला, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आवाज बनूया. 🇮🇳✊
रोजगार न्यायासाठी संघर्ष सुरूच राहणार!
@RahulGandhi@INCHarshsapkal
#RojgarNyay #रोजगारन्याय #ChhatronKiGoonj #छात्रोंकीगूंज #StudentsJustice #YouthVoice #MMRDA #Pune #RahulGandhi #HarshawardhanSapkal #AlkaLamba #MaharashtraCongre #DhananjayShinde #Dhananjay_Shinde
I have been informed by several aspirants about serious allegations of irregularities in the MMRDA JE recruitment exam.
Candidates who couldn’t even secure decent marks in other exams have reportedly emerged as toppers in the MMRDA exam.
Interestingly, many of the toppers are reportedly from the same exam centre.
This raises serious questions and must be thoroughly investigated!
MMRDA भरतीतील गोंधळानंतर चौकशी समिती नेमली जाते.
मग PMC JE भरतीत विद्यार्थ्यांनी आंदोलन करून पुरावे दिले, गंभीर तक्रारी केल्या, तरी PMC अजूनही गप्प का?
पुरावे समोर असताना चौकशी न करण्यामागे नेमकं कारण काय? PMC ने तातडीने स्वतंत्र चौकशीचे आदेश द्यावेत.
@navalMH@PMCPune#PMCJE
@MMRDAOfficial सारख्या अत्यंत्य महत्वाच्या अशा पदभरती मध्ये घोटाळे होणे ही अत्यंत गंभीर बाब असून याचा देशाच्या जडघडणीत अतिशय विपरीत परिणाम होणार आहे. लवकरात लवकर न्यायालीन चौकशी समिती स्थापन करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत @DrSanMukherjee
MMRDA मार्फत सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता यांसह इतर काही पदांच्या भरती प्रक्रियेत निगेटिव्ह मार्किंग पद्धत असतानाही काही विद्यार्थ्यांना १९२ ते १९६ गुण मिळाले आहेत. यावरून या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं असून याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही शिंदे साहेब यांच्याकडं यावेळी केली. त्यावर तत्काळ चौकशी करण्याचे आदेश त्यांनी MMRDA च्या आयुक्तांना दिले.
@mieknathshinde
MMRDAच्या स्पष्टीकरणातील प्रश्न अनुत्तरित; काँग्रेसची ७ थेट प्रश्नांची सरबत्ती !
“TCSचे नाव पुढे करून MMRDAची जबाबदारी झटकता येणार नाही; स्वतंत्र चौकशीला घाबरण्याचे कारण काय?”
.@MMRDAOfficial ने आज काँग्रेस पक्षाच्या पत्रकार परिषदेनंतर दिलेले स्पष्टीकरण पाहिले. परीक्षा @TCS_iON मार्फत झाली, ३४० objections निकाली काढले आणि प्रक्रिया शासनाच्या चौकटीत झाली, एवढे सांगून हजारो विद्यार्थ्यांच्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत.
TCSने २०२३ची तलाठी भरती परीक्षाही घेतली होती. त्या भरती प्रक्रियेबाबत न्यायालयीन प्रक्रियेत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे “TCS ही शासनमान्य संस्था आहे” हा मुद्दा विद्यार्थ्यांच्या शंकांचे अंतिम उत्तर होऊ शकत नाही. आम्ही कोणत्याही उमेदवाराला पुराव्याशिवाय दोषी ठरवत नाही. मात्र चौकशीपूर्वीच “कोणताही गैरप्रकार झालेला नाही” असे जाहीर करणे हा पारदर्शकतेचा पर्याय होऊ शकत नाही.
MMRDA आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांना ७ थेट प्रश्न !
१. ११ व १२ मेच्या परीक्षेचे सर्व CCTV Footage सुरक्षित आहे का? ते tamper-proof पद्धतीने जतन केले आहे का?
२. सर्व Server Logs, IP Logs, Login/Logout Records आणि Digital Audit Trails सुरक्षित आहेत का? त्यांचे स्वतंत्र Cyber Forensic Audit झाले आहे का?
३. २०,४५९ परीक्षार्थींचा Biometric आणि Candidate Response Data स्वतंत्रपणे तपासण्यात आला आहे का?
४. परीक्षा प्रक्रियेत सहभागी TCS व इतर तांत्रिक सेवा प्रदात्यांच्या भूमिकेचे स्वतंत्र Audit करण्यास MMRDA तयार आहे का?
५. सर्व डिजिटल पुरावे सुरक्षित ठेवण्याचे लेखी आदेश MMRDAने दिले आहेत का? नसतील तर का नाही?
६. विद्यार्थ्यांकडून प्राप्त तक्रारींची स्वतंत्र Cyber Forensic चौकशी करण्यास MMRDA तयार आहे का?
७. जर परीक्षा पूर्णपणे निर्दोष असेल, तर High Court-Monitored SIT चौकशीला MMRDA लेखी समर्थन देणार का?
३४० objections चा दाखला पुरेसा नाही!
प्रश्नपत्रिका किंवा उत्तरांवरील objections निकाली काढणे ही नियमित प्रक्रिया आहे. त्यामुळे CCTV, Server Logs, IP Records, Biometric Data आणि Digital Audit Trailची स्वतंत्र चौकशी झाली, असे सिद्ध होत नाही. ३४० objections निकाली काढले म्हणून संपूर्ण परीक्षा प्रक्रिया निर्दोष ठरत नाही.
“TCSमार्फत परीक्षा झाली” हा बचाव नाही! TCSने परीक्षा घेतली म्हणून MMRDAची जबाबदारी संपत नाही. TCS शासनमान्य संस्था असू शकते; मात्र परीक्षा प्रक्रियेतील कोणतीही अनियमितता झाली नसल्याचे स्वतंत्रपणे सिद्ध करण्याची जबाबदारी MMRDAची आहे.
आमची मागणी स्पष्ट आहे:
१. सर्व Digital Evidence तातडीने सुरक्षित करा.
२. स्वतंत्र Technical आणि Forensic Audit करा.
३. विद्यार्थ्यांच्या तक्रारींची स्वतंत्र चौकशी करा आणि
४. Court-Monitored SIT मार्फत संपूर्ण सत्य बाहेर आणा.
MMRDA ला जर आपल्या परीक्षेवर पूर्ण विश्वास असेल, तर स्वतंत्र चौकशीपासून पळण्याचे कारण काय? दावे नकोत, पुरावे द्या.
आश्वासन नको, स्वतंत्र चौकशी द्या. बचाव नको, सत्य समोर आणा. ही लढाई कोणत्याही उमेदवाराविरोधात नाही. ही लढाई हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आहे.
@INCHarshsapkal@DrSanMukherjee@satejp@VijayWadettiwar@INCMaharashtra@Dev_Fadnavis@VijayWadettiwar@TV9Marathi@aajtak@airnews_mumbai@Marathiebatmya@degree_holders@Mpsc_Andolan @CongressRojgar #DhananjayShinde #Dhananjay_Shinde #MMRDA
MMRDA चे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी आज पत्रकार परिषदेत आम्ही उपस्थित केलेल्या गंभीर मुद्द्यांवर स्पष्ट स्पष्टीकरण देऊन राज्यातील हजारो परीक्षार्थींच्या शंकांचे निरसन करणे गरजेचे आहे.
हजारो परीक्षार्थींना खऱ्या अर्थाने “न्याय” मिळवून द्यायचा असेल, तर केवळ स्पष्टीकरण पुरेसे नाही. MMRDA अभियांत्रिकी भरती परीक्षेतील गंभीर प्रश्नांची न्यायालयाच्या देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, MMRDA चे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे आणि आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी तातडीने एकत्र चर्चा करून या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायालयीन चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घ्यावा, ही आमची स्पष्ट मागणी आहे.
हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. सत्य समोर आलेच पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@INCMaharashtra@MahaChiefSec@MMRDAOfficial@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@DrSanMukherjee@MMMOCL_Official @CongressRojgar @degree_holders@Mpsc_Andolan@gajabhauX@MahaDgipr@PIBMumbai@PIB_India
https://t.co/8fKpKS3f8g