उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार ही महसूल विभागाची पदे MPSC मार्फत भरती करण्यासाठी मागणीपत्रक पाठवण्यास विलंब होण्याचे एकमेव कारण "तात्पुरत्या पदोन्नती."
हा MPSC करणाऱ्या विद्यार्थांवरती अन्याय आहे.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@cbawankule
सरकार आणि MPSC चे अध्यक्ष बोलतात 2026 मध्ये 50 ते 60 हजार पद भरती होणार.2026 मधील जुलै महिना संपत आला. 2026 मेगाभरतीचे वर्षे नसून फक्त घोषणाचे वर्षे असे विद्यार्थ्यांना वाटत आहे. लवकरात लवकर सरळसेवेची परीक्षा योजना जाहीर करा
@mpsc_office@Dev_Fadnavis@bhimanwar@AbhiPawarBJP
आज आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी शिष्टमंडळाने माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन परीक्षा पूर्ववत ऑफलाईन पद्धतीनेच व्हावी अशी विनंती केली.
तसेच ऑनलाईन परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना असलेला संभ्रम देखील त्यांच्या निदर्शनास आणून दिला.
यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, या निर्णयाबाबतीत पुनर्विचार करावा, अशी विनंती आयोगाला करेल असे आश्वासन विद्यार्थी शिष्टमंडळाला दिले असं समजत आहे..🙏
यानंतर आमदार अभिमन्यू पवार साहेब सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठपुरावा करणार आहेत..
ऑफलाईन परीक्षेबाबत मा. आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब यांनी स्वतः लक्ष घातले असून मा. मुख्यमंत्री सुद्धा याबाबत सकारात्मक वाटले..
शासनाने व आयोगाने #MPSC परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करून सर्व स्पर्धा परीक्षा घेण्याचा निर्णय #OFFLINE करावा.. ही नम्र विनंती..
#mpscexamoffline @CMOMaharashtra@mpsc_office@bhimanwar@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
MPSC ऑनलाइन परीक्षेच्या विरोधात छत्रपती संभाजी येथे विद्यार्थ्यांचा आक्रोश... हीच गर्दी निर्णय बदलायला भाग पाडेल. आता तरी या निर्णयाचे गांभीर्य MPSC ने समजून घ्यावे @CMOMaharashtra#mpscexamoffline@mpsc_office
राज्यसेवा पूर्व परीक्षा निकाल: २२ दिवसांत
गट ब पूर्व परीक्षा निकाल: १७ दिवसांत हे दोन्ही
ऑफलाईन पद्धतीने घेतलेल्या परीक्षांचे निकाल मा. आयोगाने अतिशय गतिमान पद्धतीने लावले आहेत याबद्दल @mpsc_office चे खूप खूप आभार.
ऑफलाईन बाबत आयोग एवढा गतिमान असताना "ऑनलाईन" चा अट्टाहास नको.
मा.@bhimanwar@mpsc_office ही परीक्षा 23 सप्टेंबर 2025 ला घेतली होती..अजून निकाल नाही याच कारण म्हणजे ऑनलाईन पेपर असून सुद्धा मुंबई मध्ये तुमच्यातील काही लोकांनी पेपर फोडला म्हणे बरोबर का? जे ऐकलं ते सत्य आहे का?8 महिन्यापासून निकाल नाही उमेदवार संख्या केवळ 1000-2000 तरीही अस का?
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करा
आज विधानपरिषदेमध्ये MPSC ची ऑनलाईन CBT परिक्षा विद्यार्थ्यासाठी Computer Based Torture ठरणार असल्याने ती रद्द करावी अशी मागणी केली. या परीक्षेमुळे नॉर्मलायझेशन, सर्व्हर डाऊन, पेपरफुटी, परीक्षा केंद्रांवरील गैरव्यवहार आणि तांत्रिक अडचणी येणार आहेत. UPSC सह अनेक राज्यांमध्ये स्पर्धा परीक्षा ऑफलाईन होत असताना महाराष्ट्रात ऑनलाईनचा हट्ट का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच सरकारने सर्व सरकारी भरती परीक्षांसाठी 'वन टाइम परीक्षा फी' लागू करून विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करावा अशी मागणी केली.
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇
https://t.co/X0BRMCjGLC
लाखो विद्यार्थ्यांची एकच मागणी!
MPSC परीक्षा ऑफलाईन घ्या.
ऑनलाईन परीक्षांतील तांत्रिक अडचणी आणि पारदर्शकतेवरील प्रश्न लक्षात घेता विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळवायचा असेल तर ऑफलाईन परीक्षा हाच योग्य पर्याय आहे
विद्यार्थ्यांचा आवाज दाबू नका! @mpsc_office@bhimanwar@Dev_Fadnavis
माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला.
अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली. अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले, तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली.
१९९० च्या दशकांत महाराष्ट्रात शहरीकरणाने वेग पकडला. ग्रामीण भाग अर्धशहरीपणाकडे झुकू लागला, तरी तिथल्या राजकारणाचा बाज हा ग्रामीणच होता, जरी तिथल्या प्रश्नांचं स्वरूप हे काहीसं शहरी होत चाललं असलं तरी. या पद्धतीच्या राजकारणाचा पूर्ण अंदाज आणि ते उत्तम पद्धतीने कसं हाताळायचं याचं कसब अजित पवारांकडे होतं. पिंपरी चिंचवड आणि बारामती ही त्याची दोन उत्तम उदाहरणं. पिंपरी चिंचवड असेल की बारामती असेल अजित दादांनी या भागांचा कायापालट केला हे त्यांचे राजकीय विरोधक पण मान्य करतील.
प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाईलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे.
अजित पवार हे कमालीचे स्पष्टवक्ते होते. काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचं आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. आश्वासनं देऊन स्वतः भोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते, त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांना पण किती मोजायला लागली असेल याचा अंदाज करता येतो.
अजित पवारांच मला आवडणारं अजून एक वैशिट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकरणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं. सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारेच नेते कमी उरलेत, त्यात अजित पवार हे अग्रणी होते हे नक्की.
राजकारणातला विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत नसतो. त्यामुळे एकमेकांवरची जहरी टीका ही व्यक्तिगत घ्यायची नसते, हे भान असलेले नेते महाराष्ट्रात कमी होत चालले आहेत. राजकारणातले दिलदार विरोधक एका मागे एक जाणे हे महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान आहे.
मी आणि माझं कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अजित पवारांना भावपुर्ण श्रद्धांजली.
राज ठाकरे ।
ASO च्या 239 जागांपैकी 139 जागा रिक्त!
पण महाराष्ट्र अराजपत्रित गट ‘ब’ परीक्षा 2025 साठी MPSC कडे मागणीपत्र अद्याप पाठवलेले नाही.
या पदांवरील भरती न झाल्याने परीक्षेची तयारी करणाऱ्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे मौल्यवान वर्ष वाया जात आहे.
....
मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ,
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त परीक्षा 2025 तसेच गट क परीक्षा या जाहिरातीमध्ये SR, ASO, STI, EXCISE SI व AMVI पदांचे अतिरिक्त मागणी पत्र पाठवून जागावाढ करण्यात यावी.
धन्यवाद.🙏
@CMOMaharashtra#MPSC#Combine_जागा_वाढ_2025
माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री
खालील मागण्यांकडे विशेष लक्ष घालावे
1) दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक (SR/SI) आणि सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO) रिक्त जागांचे मागणीपत्र संयुक्त गट ब 2025 साठी तात्काळ आयोगाकडे पाठवावे
2) राज्य कर निरीक्षक (STI) आणि कर सहाय्यक या पदांचे सर्वसाधारण प्रवर्गासाठी शून्य जागा आल्या आहेत त्यात वाढ करावी.
3) Excise Sub Inspector ची 200+ रिक्त पदे आहेत. ते संयुक्त गट क 2025 साठी पाठवावे.
4) Assistant Motor Vehicle Inspector (AMVI ) ची 300+ पदे रिक्त आहेत ते पण संयुक्त गट क 2025 मध्ये समाविष्ट करावीत.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@Maha_GoodGovern@maharevenue