स्पर्धा स्वतःशी..
स्वप्न स्वतःच..
दुर्बळ & स्रीया वरील अपमान सहन केला जाणार नाही...
Humanity is the first religion and first choice..
#Agricos#दैवत छत्रपती
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेली ‘व्ही. राधा समिती’ची बैठक ही लाखो स्पर्धा परीक्षार्थींच्या मूलभूत मागण्यांकडे दुर्लक्ष करणारी आणि विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी सरकारपुरस्कृत प्रशासकीय ‘औपचारिकता’ ठरली आहे.
हजारो विद्यार्थ्यांनी एकमुखाने #ObjectivePattern व सर्व एक्साम #offline ची ठाम मागणी लावून धरलेली असताना, समितीच्या अध्यक्षा मा. व्ही. राधा यांनी या अत्यंत महत्त्वाच्या आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी थेट संबंधित मागणीबाबत एकही स्पष्ट भूमिका मांडली नाही. या प्रमुख मुद्द्यावर त्यांनी सोयीस्कर मौन का बाळगले, हा प्रश्न लाखो विद्यार्थ्यांना पडला आहे.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी आणि त्यांचे मत जाणून घेण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असेल, तर विद्यार्थ्यांची सर्वाधिक आग्रही मागणी असलेल्या #ObjectivePattern या मुद्द्यावर सविस्तर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, तसे न होता आधीच निश्चित करण्यात आलेल्या डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑनलाइन परीक्षा पद्धतीचाच आग्रह धरला जात असेल, तर ही प्रक्रिया नेमकी कोणाच्या हितासाठी राबवली जात आहे, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने देणे आवश्यक आहे.
‘शिक्षणाचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीचे समर्थन करणाऱ्या खासगी क्लासचालकांचे म्हणणे ऐकून घेणे आणि दुसरीकडे उन्हातान्हात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना पुरेसा संवाद व प्रतिनिधित्वाची संधी न देणे, हा कोणता न्याय?
पहिल्याच डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेले असताना, त्याच परीक्षा पद्धतीचा पुनर्विचार न करता तिचाच आग्रह का धरला जात आहे? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित निर्णय घेताना पारदर्शकता, निष्पक्षता आणि विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
जर या समितीचा दौरा आणि बैठक केवळ विशिष्ट घटकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी आयोजित करण्यात आली असेल, तर त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.
ही समिती विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आहे की केवळ त्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी, याचे स्पष्ट उत्तर प्रशासनाने द्यावे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित निर्णय विद्यार्थ्यांना विश्वासात न घेता आणि त्यांच्या प्रमुख मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून घेतले जाणार असतील, तर हा अन्याय आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याचा हा प्रकार तात्काळ थांबवावा आणि #ObjectivePattern बाबत स्पष्ट, पारदर्शक व लेखी भूमिका जाहीर करावी. अन्यथा, प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला आणि जनतेच्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल.
@maha_governor@MahaDGIPR@bhimanwar@mpsc_office@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@RahulGandhi@PawarSpeaks@NANA_PATOLE@INCHarshsapkal@supriya_sule@vishwajeetkadam@satejp@atullondhe@Jayant_R_Patil@VijayWadettiwar@TV9Marathi@abpmajhatv@zee24taasnews@saamTVnews
@News18lokmat
@SakalMediaNews@LoksattaLive@lokmat@mataonline@ashish_jadhao@waglenikhil@_prashantkadam@aajtak@mumbaitak@pudharionline@LokshahiMarathi@bolbhidu@RahulAsks@omkarasks@sahiljoshii
मा. भिमनवार साहेब,
‘वस्तूस्थिती स्पष्ट करुनही सातत्याने वैयक्तिक आणि प्रतिमा मलिन करणारे राजकीय आरोप होत असल्याने व्यथित असल्याची’ आपली प्रतिक्रिया असल्याचं समजलं. ज्या आयोगावर अढळ विश्वास ठेवून 45 लाख विद्यार्थी दिवसरात्र कष्ट करतात आणि आपल्या कार्यकाळात झालेल्या परीक्षेचा पेपर फुटत असेल तर ती आपली नैतिक जबाबदारी नाही का?
“औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीचा घटनाक्रम माझ्या रुजू होण्यापूर्वीचा” ही आपली प्रतिक्रिया वस्तुस्थिती आहे का? आपण रुजू होण्यापूर्वी जानेवारीत पेपर फुटला होता तर मार्चमध्ये पेपर घेतलाच का? हे आपलं अपयश नाही का? “पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून MPSC मध्ये अनेक गुणात्मक आणि रचनात्मक सुधारणा केल्याचं आपण म्हणत आहात मग पेपर कसा फुटला?
“तक्रार प्राप्त होताच पोलिसात तक्रार केली” ही आजची आपली प्रतिकिया आहे. जेंव्हा विद्यार्थ्यांनी FDA च्या पेपरफुटीची तक्रार केली तेंव्हा आपली प्रतिक्रिया काय होती? आठवून बघा. “पुरावा नसताना मोघम ई-मेल मिळाला, तक्रारकर्त्याने माघार घेतली, दुसरा तक्रारकर्ता नापास झाला म्हणून त्याने तक्रार केली’’ ही आपली प्रतिक्रिया होती, तेंव्हा तुम्ही आणि तुमचा आयोग तक्रारकर्त्या विद्यार्थ्यांवरच कारवाई करायला निघाला होतात, हे आपण विसरलात का?
राहिला विषय तुमच्या कार्यकाळातील सुधारणांचा, तर ऑनलाइन परीक्षा घेण्याची आयडिया कुणाच्या सुपीक डोक्यातली होती? ऑनलाइन घेण्यामागे काय डाव होता? हे पण सांगा. पुरव्यांबाबत बोलायचं तर FDA पेपरलीकचं जसं भलं मोठं प्रेझेंटेशन केलं होतं तसं भलं मोठं प्रेझेंटेशन लवकरच करणार आहे आणि तेही पुराव्यासकट… त्यामुळं राजीनामा देण्यास विलंब करू नका..!
खऱ्या अर्थाने व्यथित झाला असाल तर नैतिकता दाखवा आणि विद्यार्थ्यांना मोकळं करा.!
#MPSCपेपरफुटी #राजीनामा_द्या #विद्यार्थ्यांना_न्याय_द्या
MPSC गट क ची भरती तोंडावर आहे,
सरकार गंभीरतेने विचार करत आहे की पेपर फोडायचा कसा?
एवढे गुंतवणूकदार चे पैसे घेतलेत, करायचे कसे?
त्यात MPSC च्या अध्यक्षाचा राजीनामा?
पूर्ण Board बरखास्त?
झेपणार नाही.
पोरांचे वाटोळे houdya, आपला पैसा महत्वाचा.
#एमपीएससी
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठीचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यात! ⚖️✊
MPSC,एमएमआरडी आणि पुणे महानगर पालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरतीतील गैरप्रकाराविरोधात आज पुण्यात विद्यार्थ्यांसोबत ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. असीम सरोदे यांची भेट घेतली.
विविध अहवाल, भरती प्रक्रियेतील गंभीर प्रश्न आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आंदोलनासोबतच आता कायदेशीर लढाईचीही तयारी सुरू झाली आहे. पुढील कायदेशीर कारवाईबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
महायुती सरकारने विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करू नये.
प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही!
@AsimSarode@INCHarshsapkal@satejp
#PMCJE #PMCRecruitment #StudentsJustice #RojgarNyay #IBPS #Congress
MPSC पेपर फुटी मध्ये आता फक्त अध्यक्ष व सचिवाची हकालपट्टी नाही तर सर्व सदस्य व MPSC मधील सर्व अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष व सचिव यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व परीक्षांची चौकशी व्हायला हवी. जे आरोपी पकडले आहेत त्यांच्या नातेवाईकांची चौकशी व्हावी. @CMOMaharashtra
Sunday Wisdom!दिवंंगत डाॅ.कर्णिक मलोआ चे अध्यक्ष असतांनाच्या कार्यकाळात घडलेल्या खान्देशातील उमेदवारांच्या एका प्रकरणानंतर आता पुन्हा खान्देशातील दुसर्या प्रकरणी आयोगाची अब्रु धुळीत.मधल्या काळात महत्प्रयासाने #MPSC ची विश्वासार्हता उंचावून ती जपण्याच्या जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांवर या पेपरफूटी प्रकरणाने पाणी.
औषध निरीक्षक पदाच्या चाळणी परीक्षेसाठी पेपर सेटर्सच्या निवडीमधे अवलंबली गेलेली कार्यपद्धत,पेपर सेटींग सारख्या संवेदनशील व गोपनीय कामकाजासाठी विषयतज्ञ व संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांकरीता घालूून दिलेली आचार संहिता व अंगभूत सुरक्षा प्रणाली यांचे या प्रकरणी काटेकोर अनुपालन,याबाबतची वस्तुस्थिती व प्रश्नपत्रिका तयार करण्याचे कामकाज प्रत्यक्ष सुरु झाल्याच्या दिवसापासून ते पेपर्स परीक्षा केन्द्रांकडे (दूरवरच्या व स्थानीय सुद्धा) रवाना होईपर्यंतच्या संपूूर्ण कालावधीतील,आयोगाचा कार्यालयीन परीसर व गोपनीय परीक्षा कक्षाचे सीसीटीव्ही चित्रिकरण,यांच्या सखोल अंतर्गत पडताळणी अंती आयोगाला निश्चीत निष्कर्षांप्रत पोहोचणे शक्य.
पूर्वपरीक्षा+लेखी परीक्षा वा केवळ लेखी/चाळणी परीक्षा या दोहोंसाठी विषयतज्ञांच्या निवडीचे निकष व कार्यपद्धती,पेपर सेटींगचे संवेदनशील कामकाज,छपाई,साठवणूक, वाहतूक व आनुषंगिक सुरक्षा प्रणाली आणि संवेदनशील परीक्षा विभागात अधिकारी/कर्मचारी नियुक्तीस्तव योग्यता या बाबींचा आयोगाने "सर्वांप्रती अविश्वास" या तत्वावर संर्वकष फेेरआढावा घेत कार्यनियम व मानक कार्यपद्धतीतील उणीवा तातडीने दूर करून ती अधिक सक्षम करणे गरजेचे!
आधीच जाहीर केल्याप्रमाणे उद्या (मंगळवार, दि. १ सप्टेंबर) सकाळी १०:३० वाजता MPSC कार्यालय, बेलापूर, नवी मुंबई..!
यावेळी पेपरफुटीमुळं विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्या अध्यक्षांऐवजी नवीन अध्यक्षांची भेट होईल, अशी अपेक्षा आहे. जर जुनेच अध्यक्ष खुर्चीला चिकटून बसले तर त्यांना भेटण्यात कोणताही रस नाही त्यांच्याऐवजी सचिवांना भेटून विद्यार्थ्यांच्या इतर काही विषयांवर चर्चा करू. अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थ्यांशी चर्चा करून, योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी संविधानिक मार्गाने अंतिम लढा उभारण्याचं नियोजन लवकरच केलं जाईल आणि याचा श्रीगणेशा पुण्यातून होईेल.
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC #पेपरफुटी
शेतकरी आणि गोरगरिबांच्या लेकरांसाठी MPSC हा परिस्थिती बदलण्याचा आशेचा किरण होता. पण सत्तेच्या सावलीत पोसलेल्या फितुरांनी इथेही भ्रष्टाचाराचा खेळ करून हजारो तरुणांच्या स्वप्नांची राख केली. 💔💔
#MPSC_महाघोटाळा@mpsc_office
@AbhiPawarBJP आधी ते अध्यक्ष आणि बाकीचे अधिकारी यांच्यावर आधीपासूनच आरोप होतात, भ्रष्ट असल्याचा ,तरी तुम्ही त्यांना तुम्ही अध्यक्ष करता.... अस कसं????? त्याचं काय करणार आता??
MPSC पेपर फुटीची जबाबदारी कोणाची?
MPSC अध्यक्ष व सचिव राजीनामा देणार का?
MPSC मार्फत घेण्यात आलेला "औषध निरीक्षक" / Drug Inspector पदाचा पेपर फुटला या बातम्या समोर येत आहेत, एक तर MPSC चा पेपर बाहेरील व्यक्ती फोडूच शकत नाही पण हा पेपर फुटला कसा? MPSC सचिव एकदा म्हणतात अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करू आणि पुन्हा म्हणतात चौकशी करू.
मागील वीस वर्षात कधीच MPSC चा पेपर फुटला नाही मग तो आत्ताच कसा फुटला? वेळोवेळी MPSC ऑफलाईन पेपर ची पारदर्शकता दाखवून ऑनलाइन परीक्षेला विरोध केला म्हणून हे तर सिद्ध करायचं नाही ना की MPSC चाही पेपर फुटतो म्हणून आम्ही ऑनलाईन कडे वळलो.
MPSC चा पेपर फुटला हे जर सिद्ध झाले तर मात्र MPSC सचिव व MPSC अध्यक्ष यांना राजीनामा द्यावाच लागेल.
मागील वीस वर्षात कधीच पेपर फुटला नाही मात्र हा पेपर जर फुटला असेल तर विद्यमान अध्यक्ष व सचिव यांच्या कृपेनेच हा पेपर फुटला असावा ही शंका नाकारता येणार नाही.
@Dev_Fadnavis साहेब, @maha_governor साहेब जर हा पेपर फुटला असेल तर आपण यांना पाठीशी घालू नये. MPSC अध्यक्ष व सचिव यांना हटवून MPSC ऑनलाईन चा घाट बंद करा आणि पारदर्शकपणे परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यासाठी लायक अध्यक्ष व सचिव निवडा.
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@RRPSpeaks@RealBacchuKadu@satejp@AbhiPawarBJP@DrSEShinde@uddhavthackeray@abpmajhatv@TV9Marathi@ibn_lokmat@SakalMediaNews@abhijeet_dipke@mpsc_office
अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा....
आता MPSC ऑफलाइन परीक्षेसाठी एमपीएससी परीक्षार्थींचा उद्रेक पाहायचा नसेल तर लवकरात लवकर संपूर्ण ऑफलाईन ची घोषणा करावी. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विद्यार्थ्यांची ताकद लक्षात घेऊन तसेच पुणे आणि मुंबई येथील मोर्चे पाहून आणि MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा इतिहास पाहून हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा.
विद्यार्थी ना आता दबावाला घाबरत आहेत ना लाठीचार्जला... विद्यार्थ्यांची भीती तुम्हीच घालवलेली आहे.
विद्यार्थ्यांचा हा जनआक्रोश रस्त्यावर येण्यापूर्वीच निर्णय घ्या? विद्यार्थी रस्त्यावर आले तर तुम्ही निर्णय घेताच पण विनंती ही आहे की विद्यार्थ्यांचा तो वेळ वाया जाण्याच्या आधी तो ऑनलाइन परीक्षेचा निर्णय रद्द करा आणि सरळ सेवा तसेच इतर ज्या पदांच्या जाहिराती रखडलेले आहेत त्या लवकरात लवकर काढा हेच सरकारच्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे.
राज्य सरकारने जंतर-मंतर वरील आंदोलनातून शिकावे हीच विनंती...
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@RealBacchuKadu@RRPSpeaks@Dhananjay4INC@satejp@mpsc_office
अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा....
आता MPSC ऑफलाइन परीक्षेसाठी एमपीएससी परीक्षार्थींचा उद्रेक पाहायचा नसेल तर लवकरात लवकर संपूर्ण ऑफलाईन ची घोषणा करावी. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विद्यार्थ्यांची ताकद लक्षात घेऊन तसेच पुणे आणि मुंबई येथील मोर्चे पाहून आणि MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा इतिहास पाहून हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा.
विद्यार्थी ना आता दबावाला घाबरत आहेत ना लाठीचार्जला... विद्यार्थ्यांची भीती तुम्हीच घालवलेली आहे.
विद्यार्थ्यांचा हा जनआक्रोश रस्त्यावर येण्यापूर्वीच निर्णय घ्या? विद्यार्थी रस्त्यावर आले तर तुम्ही निर्णय घेताच पण विनंती ही आहे की विद्यार्थ्यांचा तो वेळ वाया जाण्याच्या आधी तो ऑनलाइन परीक्षेचा निर्णय रद्द करा आणि सरळ सेवा तसेच इतर ज्या पदांच्या जाहिराती रखडलेले आहेत त्या लवकरात लवकर काढा हेच सरकारच्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे.
राज्य सरकारने जंतर-मंतर वरील आंदोलनातून शिकावे हीच विनंती...
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@RealBacchuKadu@RRPSpeaks@Dhananjay4INC@satejp@mpsc_office
@CJP_for_India अब आया तेरा असली चेहरा सामने, यही चाहिए था तुम्हे. लडको को भडकायां, शांती से आंदोलन कर शकते थे, देश मे अस्थिरता पैदा की, अब अगला प्रधानमंत्री किसे बनाना है
मा. मुख्यमंत्री साहेब @Dev_Fadnavis जी, ऑनलाइन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र आमची सर्वांचीच आपणास नम्र विनंती आहे की, MPSC च्या सर्व परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाइन पद्धतीनेच घ्याव्यात. विद्यार्थ्यांचा विश्वास, पारदर्शकता आणि समान संधी यासाठी ऑफलाइन हाच सर्वोत्तम पर्याय आहे. सर्वांच्या वतीने या निर्णय बद्दल आपले खुप खुप आभार.. 🙏🙏 @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@mpsc_office
लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर तांत्रिक प्रयोग आम्हाला मान्य नाही!
आमची स्पष्ट आणि ठाम मागणी आहे,
✅ MPSC च्या सर्व भरती परीक्षा फक्त ऑफलाईन (OMR) पद्धतीनेच घ्याव्यात.
✅ CBT (ऑनलाईन) परीक्षा पद्धतीचा निर्णय तात्काळ रद्द करावा.
✅ समान संधी, पारदर्शकता आणि विश्वासार्ह भरती प्रक्रिया कायम ठेवावी.
हा लढा केवळ MPSC विद्यार्थ्यांचा नाही, तर महाराष्ट्रातील लाखो तरुण, त्यांच्या कुटुंबीयांच्या आशा-आकांक्षा आणि स्वप्नांचा आहे.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणात सहभागी व्हा आणि या लढ्याला बळ द्या. ✊
#MPSC #OfflineExam #OMR #CongressWithStudents #JusticeForStudents
पूर्ण सहमत.
विद्यार्थ्यांचा लढा कोणत्याही एका परीक्षेपुरता मर्यादित नाही. राज्यसेवा, गट-ब, गट-क, प्रशासकीय, तांत्रिक आणि सर्व सरळ सेवा भरती परीक्षा, प्रत्येक परीक्षा फक्त ऑफलाईन (OMR) पद्धतीनेच झाली पाहिजे.
अर्धवट निर्णय किंवा दिशाभूल करणारी आश्वासने मान्य नाहीत. एकच मागणी, एकच निर्धार , सरसकट सर्व MPSC भरती परीक्षा ऑफलाईन (OMR) पद्धतीनेच घ्या.
#MPSC #OfflineExam #OMR #JusticeForStudents #CongressWithStudents
यापुढच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याच्या #MPSC ने काढलेल्या परिपत्रकाचा मुद्दा सभागृहात उपस्थित करुन हा निर्णय तातडीने मागे घेऊन या परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने घेण्याबाबत सरकारने प्रयत्न करण्याची मागणी केली. तसंच नॉर्मलायझेशनचा मुद्दाही उपस्थित करुन विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी ही पद्धत हटवण्याची मागणी केली. सरकारने #MPSC च्या माध्यमातून हा निर्णय बदलला नाही तर विद्यार्थ्यांचं अधिक मोठं आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी दिला.
#पावसाळी_अधिवेशन_२०२६
#MPSC #विद्यार्थी_प्रश्न