लिपिक टंकलेखक 2023 chi जाहिरात होती 7006 जागेंची पण प्रत्यक्षात जॉईन झाले फक्त 4265.. तब्बल 2741 जागा रिकाम्या आहेत. पात्र उमेदवार असूनही MPSC प्रतीक्षा यादी लागणार नाही म्हणतेय. मग एवढ्या जागा रिक्त ठेऊन परीक्षा घेण्याचा उपयोग काय. प्रतीक्षा यादी लावून उमेदवारांना न्याय द्यावा . @mpsc_office
प्रति,
मा. रजनीश शेठ
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
बेलापूर
नवी मुंबई.
विषय: महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा 2023 – निकालातील अस्वीकार्य विलंबाबद्दल विद्यार्थ्यांच्या भावनांचा आदर करत निषेध आणि तात्काळ अंतिम निकाल जाहीर करण्याची मागणी.
महोदय,
दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आलेली पूर्व परीक्षा आणि 17 डिसेंबर 2023 रोजी लिपिक-टंकलेखक पदांसाठी मुख्य परीक्षा पार पडली. परंतु, आज 06 जून 2025 पर्यंत, म्हणजे पूर्व परीक्षेनंतर 25 महिन्यांहून अधिक आणि मुख्य परीक्षेनंतर 18 महिन्यांहून अधिक काळ लोटूनही अंतिम निवड यादी जाहीर झालेली नाही. यामुळे महाराष्ट्रातील हजारो तरुण विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष, मानसिक ताण आणि निराशा निर्माण झाली आहे.
आज 6 जून 2025 रोजी आयोगाने प्रसिद्ध केलेले पत्र केवळ औपचारिक आणि दिशाभूल करणारे आहे. त्यात ना ठोस तारीख आहे, ना जबाबदारी स्वीकारली आहे, ना पारदर्शकता दिसते. हे विद्यार्थ्यांच्या भावनांचा अवमान करणारे आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख व्यथा:
1प्रदीर्घ प्रतीक्षा: अथक परिश्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ अद्याप मिळालेले नाही.
2मानसिक अस्थिरता: निश्चित तारीख नसल्याने विद्यार्थी पुढील परीक्षांच्या तयारीत लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.
3वयोमर्यादेचा अन्याय: विलंबामुळे काही विद्यार्थ्यांची नोकरीसाठीची वयोमर्यादा ओलांडली जाण्याचा धोका आहे.
4विश्वासघात: सरकार आणि आयोगाची ही ढिलाई विद्यार्थ्यांशी विश्वासघातासारखी आहे.
काँग्रेस पक्षाच्या ठाम मागण्या:
1लिपिक-टंकलेखक मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल तात्काळ आणि निश्चित तारखेसह जाहीर करावा.
2या विलंबाची स्पष्ट आणि पारदर्शक कारणे जनतेसमोर मांडावीत.
3या विलंबास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
4विद्यार्थ्यांच्या मानसिक आधारासाठी समुपदेशन केंद्रे आणि सहाय्यता यंत्रणा त्वरित सुरू करावीत.
जर 10 दिवसांत अंतिम निकाल जाहीर न झाल्यास, काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयासमोर संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन करेल. विद्यार्थ्यांचा संयम आता संपुष्टात येत आहे. सरकारने त्यांच्या भावनांशी आणि भविष्याशी खेळणे त्वरित थांबवावे.
“तरुणांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही!”
“निकाल तात्काळ जाहीर करा, अन्यथा आंदोलन अटळ आहे!”
आपला नम्र, धनंजय रामकृष्ण शिंदे
@mpsc_office@INCHarshsapkal
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ७००६ लिपिक - टंकलेखक पदांसाठी २०२३ ला मुख्य परीक्षा घेण्यात आलेली होती. या परीक्षेची अंतिम निवड यादी अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे निवड यादीतील महाराष्ट्रभरातील विद्यार्थी हे संभ्रमावस्थेत आहेत. दोन दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील काही विद्यार्थी याच संदर्भात येऊन भेटले होते. या विषयासंदर्भात आज विधानपरिषद विरोधी पक्ष नेते मा. अंबादासदादा दानवे यांची भेट घेतली. यावेळी सोबत विद्यार्थीही उपस्थित होते. जूनच्या शेवटच्या आठवड्यात ही अंतिम निवड यादी जाहीर होईल असे आयोगाने कळविले आहे. आता पुन्हा पुढची तारीख न मिळता अंतिम निवड यादी जाहीर व्हावी अशा सूचना मा. विरोधी पक्षनेते यांनी संबंधित विभागाला दिल्या!
#FightForRight
#MPSCStudents #लिपिक_टंकलेखक_भर्ती #विद्यार्थ्यांचा_हक्क #Transparency #JusticeForAspirants #ClerkRecruitmentDelay
मा. रजनीश सेठ
अध्यक्ष,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
बेलापूर, नवी मुंबई.
विषय: लिपिक-टंकलेखक भरती 2023 च्या अंतिम निवड यादी जाहीर करण्याबाबत विनंती
महोदय,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेली लिपिक-टंकलेखक भरती 2023 ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. आयोगानेच जून 2025 च्या पहिल्या आठवड्यात अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल, असे जाहीर केले होते. परंतु आजपर्यंत ती यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
या भरती प्रक्रियेसाठी हजारो विद्यार्थी गेली अनेक महिने प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यावर मानसिक, आर्थिक व सामाजिक तणाव वाढत आहे. भरतीची प्रक्रिया विलंबाने होत असल्यामुळे अनेक उमेदवारांचे पुढील शैक्षणिक, कौटुंबिक व नोकरीसंदर्भातील निर्णय रखडले आहेत.
आपल्याकडे नम्र मागणी आहे की:
1. लिपिक-टंकलेखक भरती 2023 ची अंतिम निवड यादी तात्काळ जाहीर करण्यात यावी.
2. निकाल प्रक्रियेमध्ये आणखी विलंब होणार असल्यास, त्याबाबत अधिकृत स्पष्टीकरण व निश्चित तारीख जाहीर करण्यात यावी.
3. आयोगाने भविष्यात अशा भरती प्रक्रियांबाबत वेळापत्रकांचे काटेकोर पालन करावे, ही नम्र अपेक्षा आहे.
आपण विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ही बाब गांभीर्याने घेऊन त्वरित निर्णय घ्याल, अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती (रोजगार विभाग) करिता,
धनंजय रामकृष्ण शिंदे
प्रत: मा. हर्षवर्धन सपकाळ, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस समिती
@mpsc_office@INCHarshsapkal
मा.@mpsc_office लिपिक टंकलेखक 2023 फायनल यादी जून च्या पहिल्या आठवड्यात लागेल असे आपण जाहीर केलेलं आहे.
उद्या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. कृपया आज निकाल जाहीर करावा..
@Drsuvarnas@RRPSpeaks@AbhiPawarBJP
आज महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची तळमळ असणारे माननीय आमदार रोहित (दादा) पवार @RRPSpeaks यांची मा. प्रमोद पाटील सर यांच्या मार्फत भेट घेतली. त्यांना 393 जागा आयोगाने Provisional List मधून रिक्त ठेवलेल्या आहेत त्यामुळे अनेक विद्यार्थी नोकरीपासून वंचित राहिलेले आहेत.
सन्माननीय आयोग🙏
30 एप्रिल रोजी 'संयुक्त पूर्व परीक्षा 2023' ला दोन वर्ष पूर्ण झाली, तरीही अजून लिपिक टंकलेखक पदाचा अंतिम निकाल जाहीर झाला नाही.
तात्पुरत्या निवड यादीमधून बाहेर ठेवलेल्या 393 जागांसहीत आयोगाने तत्काळ अंतिम निवड यादी जाहीर करावी ही नम्र विनंती🙏
@mpsc_office
@mpsc_office ग्रूप C 2023 result प्रक्रियाच इतकी निर्ढावली आहे की प्रत्येक वेळी विद्यार्थांनी यांना जाग आणून द्यायची मग यांनी कामाला लागायचं हे किती दिवस चालणार हे माहिती नाही.UPSC 15 दिवसात 10 लाख विद्यार्थी असताना निकाल लावून मोकळा होतो;इथे 30महिने झाले तरी लागेल की नाही याची खात्री नाही
प्रति,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
बेलापूर, नवी मुंबई
विषय: लिपिक टंकलेखक जाहिरात क्र. 111/2023 रिक्त राहिलेल्या 393 जागा समाविष्ट करून तात्पुरती निवड यादी
मेरिट नुसार पूर्णतः Revised करून पुन्हा 3 दिवस ऑप्टिंग आऊट ची संधी देण्याबाबत.
महोदय,
उपरोक्त विषयास अनुसरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक टंकलेखक जाहिरात क्र. 111/2023 ची तात्पुरती निवड यादी दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी जाहीर करण्यात आली. या भरतीमध्ये एकूण लिपिक टंकलेखक पदांची 7006 पदे भरावयाची होती, परंतु आयोगाने 6613 पदे भरली आहेत. उर्वरित 393 पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत.
जेव्हा मोठ्या संख्येने उमेदवार उपलब्ध असताना आयोगाने या जागा रिक्त का ठेवल्या? याबाबत आयोगाने स्पष्टीकरण द्यावे व या जागा त्वरित भराव्यात. आयोगाने लिपिक टंकलेखक 2021, 2022 आणि PSI 2023 बाबतही याच पद्धतीने काम केले होते. परंतु जागा रिक्त असल्याकारणाने माननीय कोर्टाने आयोगाला या जागा भरण्यासंदर्भात कार्यवाही करण्याची शिफारस केली होती. यामुळे मुख्य परीक्षेचा कट ऑफ कमी झाला होता व बऱ्याच उमेदवारांना संधी मिळाली होती. त्याचप्रमाणे लिपिक टंकलेखक 2023 भरतीबाबतही आयोगाने कार्यवाही करावी.
यानुसार लिपिक टंकलेखक भरतीमधून बाहेर पडण्यासाठी (Opting Out) ची लिंक ही दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी सुरु करण्यात आली. परंतु Opting Out लिंक सुरु झाल्यानंतर काही उमेदवारांना Opting Out करण्यात तांत्रिक अडचण येत होती. यामध्ये "Record Not Found" असा संदेश Opting Out विंडोवर येत होता. यामुळे बऱ्याच Opting Out करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना Opting Out करता आले नाही.
आयोगाने ही तांत्रिक अडचण दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी दूर केली व Opting Out करण्याची शेवटची तारीख ही दिनांक 24 एप्रिल 2025 अशी होती. यामुळे अवघ्या दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवारांना Opting Out करता आले नाही.
आयोगाने उमेदवारांच्या विनंतीला मान देऊन रिक्त राहिलेल्या 393 जागा समाविष्ट करून तात्पुरती निवड यादी मेरिट नुसार पूर्णतः Revised करून 3 दिवस पुन्हा ऑप्टिंग आऊट ची संधी उपलब्ध करून द्यावी व ही भरतीप्रक्रिया तातडीने पूर्ण करून तत्काळ जॉइनिंग देण्यात यावी ही नम्र विनंती..
धन्यवाद!
मा. @mpsc_office लिपिक टंकलेखक OPTING OUT लिंक रविवार पर्यंत सुरू ठेवावी जे काही इच्छुक असतील शेवटच्या दिवसापर्यंत विचार करणारे OPTING OUT बाबत चा ते बाहेर पडतील,आणि अस पण शनिवार रविवार तुम्हाला सुट्टीच असते मग काय समस्या तर नाही रविवार पर्यंत लिंक सुरू ठेवायला .
#OPTआऊट23लिपिक
मा. @mpsc_office आपण 17 एप्रिल ला लिपिक टंकलेखक 2023 ची तात्पुरती निवड यादी जाहीर केली. लिपिक च्या 7006 पदांपैकी 6616 पदे भरली आहेत. त्याचे कारण आपण एखादे प्रसिद्धी पत्रक काढून जाहीर करावे.
विद्यार्थ्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
@Drsuvarnas@AbhiPawarBJP@CMOMaharashtra
MPSC Clerk 2023/Advt No. 111/2023
Merit List 2 महिने लागून
Final Selection List अजूनही नाही
@mpsc_office आयोगाने याचं भान ठेवायला हवं,विद्यार्थ्यांच्या संयमाचा आता अंत पाहू नये.
मा.CM @Dev_Fadnavis@CMOMaharashtra कृपया हस्तक्षेप करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा ही विनंती
वाट पाहता पाहता आम्हीच नाही तर आमच्या घरचेही थकले
MPSC च्या मंदिरात जणू आयूष्यच फसले
मायबाप आयोगा, एवढीच विनंती खरी
निकाल लावुन द्या ओ लवकर, खुप उपकार होईल भारी 🙏🥹
#Declareclerk2023result
@mpsc_office@Drsuvarnas
मॅडम तुम्ही 11 एप्रिल तारीख दिली होती. आज आम्ही सर्व तुमच्याकडे आशा लावून बसलो आहोत. आज तुम्ही तत्परतेने निकाल लावणारच याची आम्हाला खात्री आहे.
#Declareclerk2023result
लिपिक टंकलेखक 2023
जाहिरात येऊन 27 महिने पूर्ण झाले आहेत. अजून निवड यादीचा पत्ता नाही.
आतापर्यंत उमेदवारांचे उमेदीची जेवढे दिवस वाया घालवले तेवढ्या दिवसाला 365 ने गुणून संबंधित जबाबदार असणाऱ्यांची वेतन कपात करावी किंवा सक्तीच्या रजेवर पाठवायला हव.
#DeclareClerk2023result
📍लिपिक टंकलेखक 2023
📍जाहिरात येऊन 27 महिने पूर्ण झाले आहेत. अजून निवड यादीचा पत्ता नाही.
📍आतापर्यंत उमेदवारांचे उमेदीची जेवढे दिवस वाया घालवले तेवढ्या दिवसाला 365 ने गुणून संबंधित जबाबदार असणाऱ्यांची वेतन कपात करावी किंवा सक्तीच्या रजेवर पाठवायला हव.
#DeclareClerk2023result
📍MPSC Clerk 2023 | Advt No. 111/2023
▪️एकूण प्रक्रिया – 27 महिने
▪️Mains – 15 महिने
▪️Skill Test – 8 महिने
▪️Merit List – 2 महिने
Final Selection List अजूनही नाही!
📍एखाद्या भरती प्रक्रियेला इतका कालावधी लागणं हे अन्यायकारक आहे.
@mpsc_office