माझ्या एका मित्राचे व्हॉट्स ऍप स्टेटस आहे
तो आज MPSC पास होऊन नगरपालिकेचा CO आहे 😊
आजचे आंदोलन करणारे पुढच्या वेळी पण असणार आहेत 😉
#MPSC#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
पुण्याच्या रस्त्यांवर आज विद्यार्थ्यांचा संताप उफाळून आलाय!
पेपरफुटी, रखडलेल्या भरत्या, हॉस्टेलची दुरवस्था, निकृष्ट जेवण आणि DBT मधील घोटाळ्यांनी विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत पाहिला आहे.
MPSC चा कारभार सुधारून पारदर्शकता आणा, असे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठणकावून सांगितले होते. पण या बहिऱ्या सरकारने काहीच ऐकले नाही. म्हणूनच आज विद्यार्थ्यांवर पुण्यात 'सत्याग्रह' करण्याची वेळ आली आहे.
आमच्या मागण्या सडेतोड आहेत:
MPSC अध्यक्षांचा तत्काळ राजीनामा: या पदावर एका प्रामाणिक आणि सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती व्हावी.
७०,०००+ रिक्त पदे भरा: राज्यातील सर्व प्रलंबित सरकारी पदे विनाविलंब भरली जावीत.
आम्हाला आता पोकळ आश्वासने नकोत, थेट कारवाई हवी! युवक काँग्रेस आणि NSUI या लढ्यात विद्यार्थ्यांच्या सोबत खंबीरपणे उभे आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या आणि त्यांच्या भविष्याची दिशा ठरवणाऱ्या संस्थांवर ताबा मिळवणाऱ्या प्रवृत्तींना आम्ही खपवून घेणार नाही. न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील!
#Satyagraha #MPSC_Students #PuneProtest
MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला ठाम पाठिंबा!
पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी कालपासून उपोषणाला बसलेले युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज मोरे, युवक काँग्रेस सचिव प्रियांका चौधरी तसेच विद्यार्थी चळवळीतील सहकारी डॉ. ओंकार पाटील, ऋषिकेश आणि गजानन शेळके यांची काल भेट घेतली.
यावेळी उपोषणकर्त्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांच्या आरोग्याची माहिती घेतली. तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्या, त्यांच्या अडचणी आणि सुरू असलेल्या आंदोलनाबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न हा केवळ विद्यार्थ्यांचा नसून संपूर्ण समाजाच्या भवितव्याचा प्रश्न आहे. MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य होईपर्यंत हा संघर्ष अधिक ताकदीने पुढे नेऊ!
@imshivrajmore
#MPSCStudentsProtest #Mpscpune #mpsc
महाराष्ट्राच्या राजकारणात रोहित पवार नावाचा नवीन आणि अत्यंत कष्टाळू नेता उदयास आला आहे.
पोस्ट करून नेता होता येत नाही 24/7 लोकांमध्ये राहावं लागेल तेव्हाच तुम्हाला किंमत राहील.
आणि रोहित पवार तेच करत आहे.
विद्यार्थी मित्रांनो, जरा विचार करा! MPSC राज्यसेवा, ग्रुप 'बी' आणि ग्रुप 'सी' या परीक्षा आतापर्यंत एकत्र similarly, homogeneously चालत आल्या आहेत. पण आज दिल्लीवरून '६ अटेंप्ट फेल' होऊन परत आलेला तो सो-कॉल्ड क्लासवाला काय म्हणतोय? "ऑब्जेक्टिव्हच्या आंदोलनात सगळी ग्रुप 'बी' आणि ग्रुप 'सी'चीच पोरं आहेत, त्यांना एकाच झटक्यात क्लास १ व्हायचंय म्हणून ऑब्जेक्टिव्ह हवंय!"
अरे, या अशा विकृत मानसिकतेच्या माणसाला दिल्लीत राहून बिगर-मराठी माणसाने MPSC ची तयारी केलेली चालते, पण आपल्या मराठी पोराने क्लास १ चं स्वप्न पाहिलं, तर यांच्या पोटात लगेच जळजळ सुरू होते!
OBJECTIVE 2027 🔥
@GaneshgSpeaks@BaliramDoleyINC
निवडणूक आयोगाने फॉर्म क्रमांक ६ बदलला यास सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी नाही ... सर्वोच्च न्यायालयाने आज हे स्पष्ट केले ..
याचा अर्थ निवडणूक आयोगाने प्रेस नोट काढून जे म्हटले ते खोटे होते हे सिद्ध झाले आहे ...
ज्ञानेश कुमार याचा अजूनही भाजप ला बचाव करायचा आहे का ?
इतका खोटारडा निवडणूक आयुक्त देशाची निवडणूक घेणार ,मतदार ठरवणार हे या देशाचे दुर्दैव ...
“Rahul… Rahul…” 🔥🔥
ही ‘छात्रों की गूंज’ नाही.
हा Youth Congressचा मोर्चाही नाही.
हा MPSC विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा आवाज आहे—आणि त्यात राहुल गांधींच्या नावाचा जयघोष घुमतोय.
ज्यांनी विद्यार्थ्यांचा आवाज संसदेत बुलंद केला, त्यांच्यापर्यंत विद्यार्थ्यांचा हा आवाज पोहोचतोय. 🇮🇳
📍 पुणे, महाराष्ट्र
तरुणांनी बोलू नये, शिक्षित होऊ नये, आपल्या हक्कांबद्दल आवाज उठवू नये असे सत्ताधाऱ्यांना वाटते. पण हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे, फुले शाहू आंबेडकरांचा आहे. अन्यायाविरोधात वेळोवेळी पेटून उठणे ही ही या मातीची शिकवण आहे - संजय राऊत
#sanjayraut#ShivsenaUBT#mpscstudentprotest #viral
महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आपण सुरू केलेला हा लढा निश्चितच कौतुकास्पद आहे. या संघर्षात आम्ही आपल्या सोबत आहोत. न्याय्य मागण्यांसाठीचा हा लढा निश्चितच यशस्वी ठरेल!