आज २८ ऑक्टोबर कर्जत येथे टोरेंट कंपनीच्या वीज प्रकल्पासाठी जी बेसुमार जंगलतोड सुरु केली आहे त्या जागेला भेट दिली. गुजरातमधल्या एका कंपनीला काम मिळावं म्हणून हा सारा खटाटोप सुरु आहे .
बाकी आज संध्याकाळच्या कर्जत येथील पोलीस ग्राउंडवरच्या सभेत सविस्तर बोलेनच.
"एकवेळ बायको सोडेन, पण साहेब, तुम्हाला सोडणार नाही!"
असे बोलून भिंतीवर डोके आपटणाऱ्या लांडेंनी साहेबांना सोडले आणि तत्कालीन शिवसेनेत प्रवेश केला; पण तिथेही निष्ठा कमीच पडली. तिथेही आमदार झाल्यावर गद्दारांच्या टोळीत गेले; म्हणजेच उद्धव ठाकरेंना सोडून बंडखोरांच्या पक्षात प्रवेश केला.
आज निष्ठेचे व गद्दारीचे फळ मिळाले असून, ११ मतांपैकी ९ मते त्यांच्या मुलाच्या विरोधात पडली आहेत. भाजप आणि शिंदे गटाच्या लोकांनीच त्यांच्या मुलाच्या निवडीला विरोध केला आहे.
मनसेतून गेले तेव्हा ५ कोटी घेतल्याचे आरोप होत होते, तर गद्दारांच्या टोळीत गेले तेव्हा ५० कोटी घेतल्याचे आरोप झाले.
असो, स्वतःच्या मित्रपक्षातील आणि स्वतःच्या पक्षातील लोकांनीच जागा दाखवली, हे बरे झाले!
@YKilledar@SandeepDadarMNS
भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏
आज जे घडतंय, तो केवळ अपघात नाही तर एका गलिच्छ राजकारणाचा बळी आहे. दुर्दैवाने, भाजपने उत्तर भारतातील हिंसक आणि गलिच्छ राजकारण महाराष्ट्राच्या मातीत रुजवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला लागलेली ही कीड वेळीच ओळखायला हवी. जर आपण आजही सावध झालो नाही, तर उद्या आपल्या सर्वांच्या घरादारावर हा 'सत्तेचा वरवंटा' फिरायला वेळ लागणार नाही.
सावध व्हा... महाराष्ट्र वाचवा! 🚩
#MaharashtraPolitics #SavdhanMaharashtra #MarathiAsmita #Justice
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची आज जयंती. आज या जयंतीनिमीत्त संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला बाबासाहेबांनी या लढ्याला कसा पाठींबा दिला होता आणि इतकंच नाही तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र नको म्हणून जे काही तर्क पुढे केले जात होते त्याला त्यांनी कसं सडेतोड उत्तर दिलं होतं, याचं स्मरण होणं आवश्यक आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या सुरुवातीच्या काळात, कॉम्रेड डांगे, एस.एम. जोशी, आचार्य अत्रे आणि संयुक्त महाराष्ट्र समितीच्या इतर नेत्यांनी, बाबासाहेबांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली होती आणि या लढ्यासाठी त्यांचं आणि त्यांच्या अनुयायांचे सहकार्य मागितलं होतं. यावेळेस बाबासाहेबांनी देखील माझा शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठीशी जिब्राल्टरच्या खडकासारखा उभा राहील असं सांगितलं होतं. इतकंच नाही तर पुढे मुंबईतील राजगृह हे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या बैठकांचे केंद्र बनलं. या बैठकांमध्ये आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे देखील उपस्थित असायचे.
स्वतः बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९४८ रोजी धार कमिशनला मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य असावं या मागणीला पाठींबा देणारं निवेदन दिलं होतं. या निवेदनात मुंबई हा महाराष्ट्राचाच अविभाज्य भाग कसा आहे याचं विस्तृत विवेचन आहे. आणि हे विवेचन Maharashtra As A Linguistic Province मध्ये वाचता येईल.
हे सगळं सविस्तर सांगायचं कारण असं की बाबासाहेबांनी पुढे जाऊन मुंबई हा महाराष्ट्राचा भाग कधीच नव्हता किंवा मुंबईत फक्त मराठी भाषिकांची लोकसंख्या अधिक आहे म्हणून मुंबई महाराष्ट्राचा भाग कसा होऊ शकतो असे जे तर्क पुढे केले जात होते त्याला सडेतोड उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते की मुसलमानांनी भारतावर-हिंदूंवर आक्रमणं केली म्हणून हिंदू-मुसलमानांची मूळ ओळख पुसली गेली नाही. मुंबईत गुजराती किंवा इतर भाषिक आले म्हणजे मुंबईची मूळ ओळख पुसली गेली असं होत नाही, मुंबईची मूळ ओळख ही मराठी भाषिकांचा प्रांत अशीच आहे आणि ती बदलता येणार नाही.
पुढे बाबासाहेबांचं निधन झालं. पण त्यानंतर दादासाहेब गायकवाड, बॅरिस्टर बी.सी. कांबळे यांच्यासारखे नेते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्वेषाने उतरले. बॅरिस्टर बी.सी. कांबळे यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलकांवर होणाऱ्या पोलिसी कारवायांवर विधानसभेत प्रश्न उपस्थित करून मोरारजी देसाईंना जेरीस आणलं होतं.
पुढे १९६० ला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. हा प्रसंग पहायला बाबासाहेब नव्हते. पण या लढ्यातील बाबासाहेबांचं योगदान हे विसरता येणार नाही.
आज पुन्हा एकदा मुंबईत मराठी भाषेला, मराठी माणसाला दुय्यम दर्जा दिला जात असताना, या लढ्यासाठी किती उत्तुंग माणसांनी आपली शक्ती खर्ची केली होती, हे मराठी माणसाने विसरू नये. आणि हे जर आपण विसरलो आणि मराठी म्हणून एकत्र नाही आलो तर या लढ्याला काय अर्थ?
आपण मराठी म्हणून एकत्र येणं, मराठी समाजाने जातीच्या भिंती उध्वस्त करणं आणि या प्रांताला वैभव प्राप्त करून देण्याची शपथ घेणं हे आजच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं योग्य स्मरण ठरेल.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे या युगपुरुषाला कोटी कोटी प्रणाम !
राज ठाकरे ।
"म म्हणजे मराठी,महाराष्ट्र,मुंबई आणि मनसे"
ह्या महाराष्ट्रावर परप्रांतियांचे जेव्हा जेव्हा मराठीवर हल्ले झाले तेव्हा तेव्हा फक्त मनसेनी त्याचे उत्तर दिले.
आज दक्षिण मुंबईत एका महिलेवर दादागिरी करणाऱ्या परप्रांतीयला मनसेनी चोप दिला.
मराठीला हात लावला तर खळखट्याक होईल!
#Mumbai
महाराष्ट्रात मराठीच हा कायदा आहे आणि हे गृहीतच धरलं पाहिजे. पण असं असताना मध्ये मध्ये काही मूठभर अमराठी व्यक्तींना मराठी भाषेचा अपमान करण्याची खुमखुमी येतेच. अशांना हात मोकळे करून मनसे दणका द्यावा लागतो, जो मुंबईतील मलबार हिल मतदारसंघातील महाराष्ट्र सैनिकाने दिला... आमच्या भाषेचा सन्मान नाही राखलात तर मनसे दणका मिळणारच...
#मराठी #महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना
#MNSAdhikrut
सामान्य नागरिकांचे स्टॉल्स हटवले गेले, पण वरळीच्या आमदारांनी एकही भेट दिली नाही. न्यायाच्या शोधात फिरणाऱ्या ताईंच्या कष्टांची कदर झाली नाही. वरळीकरांनो, संदीप देशपांडे तुमच्यासोबत आहे. काळजी नका करू.
आता निर्धार पक्का; ५ वर्षांत दुर्लक्ष करणाऱ्या आमदाराला देणार धक्का.
बोरीवली मधून मनसे ने उच्च शिक्षित आणि विशेष म्हणजे स्थानिक उमेदवार दिला आहे.
अतिशय सामान्य घरातून आलेल्या आणि कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या कुणाल माईनकर नावाच्या तरुणाला मनसे ने संधी दिलीय. त्यांची निशाणी आहे #रेल्वे_इंजिन 🚂🚂🚂🚂
#VoteForMNS@BorivaliInfo
माणसं कशी जपावी हे राजसाहेबांकडून शिकावं...
वडिलांचं छत्र हरवलेल्या श्री.सुधीर साळवींची लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी लाखोंच्या गर्दीतही जवळ बोलावून राजसाहेबांनी आस्थेने विचारपूस केली होती.
संवेदनशील नेता..
मनसेच्या बाळा नांदगावकरांना हरवायला दस्तुरखुद्द अनंत अंबानीची दमछाक होतेय…
शिवडीतून चौधरी ऐवजी लालबागफेम सुधीर साळवींना तिकीट देण्यासाठी,असा त्याने अट्टाहास लावलाय.
त्यामुळे आपलं बहुमूल्य मत हे उबाठा गटामार्फत अंबानीला न देता मनसेला द्या !!!
नाहीतर शिवडीही गुजरात्याला विकतील.
दोन्ही लेकरांचे ‘मृतदेह’ खांद्यावर घेऊन चिखलातून वाट शोधत पुढे जात असलेले हे दाम्पत्य गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आहे.
आजोळी आलेल्या दोन भावंडांना ताप आला. वेळेत उपचार मिळाले नाही. दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली व दीड तासांच्या अंतराने दोघांनीही अखेरचा श्वास घेतला.
रुग्णालयातून मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका नव्हती. आईवडिलांनी दोन्ही भावंडांचे मृतदेह खांद्यावर घेतले. चिखलातून वाट शोधत १५ किलोमीटर दूर अंतरावरचे अहेरी तालुक्यातील पत्तीगाव पायीच गाठले.
गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे एक भीषण वास्तव आज पुन्हा पुढे आले.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेला हा जिल्हा. हेलिकॉप्टरने विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणारे महायुतीतील कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा हा मतदारसंघ. दोघेही महाराष्ट्रभर रोज इव्हेंट घेऊन आम्हीच कसा विकास करू शकतो हे सांगत असतात.
दोघांनी एकदा जमिनीवर उतरून आपल्या गडचिरोली जिल्ह्यात लोकं कसे जगतात, जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरणयातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघावे.
@mieknathshinde@CMOMaharashtra
सर्वप्रथम आजच्या महापरिनिर्वाण दिनी, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. इतिहासात डोकावून बघताना अगदी मोजकेच महापुरुष आढळतात की त्यांच्यानंतर सुद्धा त्यांचे विचार तळपत राहतात आणि त्यातून बदलाच्या लाटा पुढे अनेक दशकं येत राहतात, ते विचार समाजाला प्रेरित करत राहतात.
महाराष्ट्राचं अहोभाग्य आहे की छत्रपती शिवाजी महाराज ते महात्मा ज्योतिबा फुले, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे महापुरुष ह्या भूमीत होऊन गेले.
स्वराज्याची मुहूर्तमेढ ह्याच राज्यात झाली, स्त्रीशिक्षणासारखं पवित्र कार्य ह्याच राज्यात आकाराला आलं आणि शिक्षण, संघटन, संघर्ष आणि धम्मचक्र प्रवर्तन यांच्या सहाय्याने हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या व गुलामगिरीच्या खाईत लोटल्या गेलेल्या लाखो दलित - पीडितांचे पुनरुत्थान करणारा महामानव पण ह्याच भूमीतील.
हे सगळं आजच्या दिवशी लिहिताना त्या सोबत एक फोटो इथे मुद्दामून टाकला आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत्र असलेला हा फोटो.
तीन उत्तुंग कार्य करून गेलेली आणि एकेमकांबद्दल पराकोटीचा आदर असणारी ही माणसं. हा आपला महाराष्ट्र होता. ह्याचा विसर आपल्याला कदाचित पडायला लागला आहे असं वाटावं अशी परिस्थिती आहे.
ह्यातून महाराष्ट्राने एकच बोध घ्यावा तो म्हणजे देशाला आकार देणारं, स्वभान देणारं हे राज्य आहे ह्याचं भान गमावू नये.
उत्तर आणि दक्षिण अशा संस्कृतींना जोडणारा सांधा म्हणजे महाराष्ट्र आहे. अशा महाराष्ट्राने आपल्या राजकारणाचा, समाजकारणाचा जो चिखल होऊ दिलाय तो वेळीच थांबवावा. कारण महाराष्ट्ररूपी सांधा निखळला आणि आपण पण वाहवत गेलो तर हे फक्त राज्याचं नाही तर देशाचं अपरिमित नुकसान ठरेल.
आजचा महापरिनिर्वाण दिन ह्यासाठी महत्वाचा आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्मरून आपल्यातले सगळे भेद गाडून हा देश, हे राज्य पुन्हा एकसंध करण्यासाठी सगळ्यांनी शपथ घेण्याचा हा दिवस.
पुन्हा एकदा महामानवाच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन
राज ठाकरे
#babasahebambedkarar #MahaparinirvanDiwasnirvanDiwas #महापरिनिर्वाण_दिवस #Maharashtra