ही आहे विद्यार्थ्यांच्या एकजुटीची ताकद आणि #विद्यार्थी_एकजुटीचा_Impact!
२६ तारखेपासून आंदोलन करण्याची काल सकाळी विद्यार्थ्यांनी घोषणा करताच सरकारने काल संध्याकाळी ६५ हजार पदभरतीच्या हालचाली सुरू केल्या. परंतु केवळ कागदोपत्री घोडे हलवून चालणार नाही, तर प्रत्यक्षात पदभरतीची जाहिरात काढून ��ृती हवी आहे.
भ्रष्ट अध्यक्षांचा राजीनामा, ७० हजार पदांच्या मेगाभरतीला सुरुवात आणि १०० रुपयांत वर्षभर परीक्षा या मागण्यांसाठी २६ सप्टेंबर रोजी होणारे आंदोलन अभूतपूर्व असेल....ही एकजूट अशीच राहू द्या. विद्यार्थ्यांची हीच एकजूट सरकारला विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडेल.
#MPSC #विद्यार्थी_एकजूट #पदभरती #विद्यार्थी_आंदोलन
भ्रष्ट अध्यक्षांचा राजीनामा हीच MPSCच्या विद्यार्थ्यांची मूळ मागणी होती.. आहे.. आणि राहणार! गणेशोत्सवात नागरिकांची गैरसोय आणि सुरक्षा यंत्रणेवर ताण नको म्हणून आम्ही थांबलोय. सरकारकडं अजून एक आठवडा आहे. सरकारनं भ्रष्ट अध्यक्षांचा राजीनामा न घेतल्यास, तसंच २०२६ मध्ये ७० हजार पदांची मेगाभरती करण्याच्या द���लेल्या शब्दाप्रमाणे मेगाभरती सुरू न केल्यास, गणेश विसर्जन होताच आम्ही पु��्यात आंदोलन सुरू करू.
वेळ, स्थळ आणि दिनांक लवकरच जाहीर केला जाईल.
आता SIT आणि कृतीगटाचे कागदी घोडे नकोयत. भीमनवार यांची हकालपट्टी आणि मेगाभरतीची कृती हवीय.
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#MPSC #विद्यार्थी_आक्रोश_मोर्चा #पेपरफुटी
#पदभरती #StudentsProtest
पेपर पुढे ढकलला आहे तर सर��व तांत्रिक संवर्ग ( जलसंपदा, जलसंधारण, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर) या पदभरती मध्ये समाविष्ट करून परीक्षा घेण्यात यावी ही नम्र विनंती.....!
@CMOMaharashtra @SanjayDRathods @RVikhePatil @mieknathshinde
काल पुण्यात दिसली तशीच MPSC च्या विद्यार्थ्यांची एकजूट आज छत्रपती संभाजीनगरमध्येही दिसत असून विद्यार्थ्यांच्या या मागण्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आतातरी सरकारने MPSC चे अध्यक्ष आणि सचिवांना पदावरून हटवावं आणि पेपरफुटीप्रकरणात अटक झालेल्या आरोपींच्या कार्यकाळात झालेल्या सर्व परीक्षांची सखोल चौकशी करावी. अन्यथा आज दिसत असलेला विद्यार्थ्यांचा आक्रोश हळूहळू रोषात रुपांतरीत होईल आ��ि ते सरकारला परवडणार नाही. त्यामुळं सरकारने एमपीएससीच्या परीक्षेत भ्रष्टाचाराची भेसळ करणाऱ्यांना तातडीने खड्यासारखं बाजूला सारून तिथं स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी आणि त्यांच्या इतरही मागण्यां��डं लक्ष द्यावं.
महत्त्वाचं म्हणजे राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांचे असे विराट मोर्चे निघत आहेत. आता लिहून दिलेला मजकूर कॉपी करुन ट्विट करणारे भाजपाचे नेते आणि ४० पैसे कमेंटवर पोट भरणारे बाजारू मोर्चातील या सामान्य परिवारातील मुलांच्या आक्रोशालाही नौटंकी म्हणणार का? मी कालच बोलताना स्पष्ट केलं की, विद्यार्थ्यांचा हा आक्रोश पुण्यापुरता मर्यादित राहणार नाही तर प्रत्येक जिल्ह्यात तो दिसेल आणि आज लगेचच तो छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसला. सरकारने तरीही दुर्लक्ष केलं तर हा आक्रोश थांबेल असं नाही तर यापुढं तो प्रत्येक जिल्ह्यात दिसल्याशिवाय राहणार नाही.
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#MPSC_आक्रोश_मोर्चा #MPSC_Protest #छत्रपती_संभाजीनगर #पेपरफुटी
नमस्ते विक्रम दादा,
विद्यार्थ्यांची प्रतिकूल परिस्थिती हे आपणच म्हणाला म्हणून बरे झाले. ग्रामीण भागात सोयी सुविधा नाहीत आणि त्यात रोजगार निर्मितीबाबत दिलेले आश्वासन देखील पूर्ण होत नाहीत म्हणुन ग्रामीण भागातला तरुण स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडतो. आमदार रोहित पवारजी यांनी ग्रामीण भागातील याच तरुणांची व्यथा मांडली आहे. आपण मांडलेले मत बघता पेपर फुटला तर त्याबाबतीत प्रश्न सरकारला किंवा प्रशासनाला विचारायला नको का?
या एकूण परिस्थि��ी मध्ये रोहित दादांनी मांडलेली भूमिका याबाबतीत आम्हाला सर्वांना अभिमान आहे आणि "ते राजकारण करत आहेत" असे आपले मत असेल तर व्यवस्थेला प्रश्न विचारायचे की नाही याबाबत देखील आम्हाला तुम्ही शिकवणी द्यावी ही विनंती...!
@RRPSpeaks
विद्यार्थी बंधू-भगिनींनो तयारीला लागा…
सोमवारी तुमच्या हक्काच्या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा….
आज रस्त्यावर उतरला नाही तर कायम रस्त्यावर रहावं लागेल आणि घोटाळे करणारे महत्त्वाच्या पदांवर जाऊन तुमच्या डोक्यावर बसतील.
म्हणूनच जिंकण्यासाठी हक्काचा लढा लढू आणि न्याय मिळवू…!
#विद्यार्थी_हक्काचा_लढा
इसी ज्वलंत मुद्दे पर एमपीएससी के छात्रों, शिक्षकों और आम नागरिकों का कल (सोमवार, ता. ७) पुणे में एक विशाल 'आक्रोश मोर्चा' आयोजित किया है। इस मोर्चे को अपना समर्थन देने और इस विषय को राष्ट्रीय स्तर पर उठाने के लिए आपका बहुत-बहुत धन्यवाद!
भरोसा खो चुकी इसी भ्रष्ट व्यवस्था (सिस्टम) के खिलाफ हम भी प���छले कई दिनों से छात्रों के साथ मिलकर लड़ रहे हैं। आपके इस समर्थन से छात्रों के इस संघर्ष को निश्चित रूप से और अधिक ताकद मिलेगी..!
#लडेंगे_और_जितेंगे
महाराष्ट्र में हजारों छात्र सड़कों पर हैं, शांतिपूर्ण तरीके से आंदोलनरत हैं - इसकी वजह सिर्फ एक परीक्षा या भर्ती नहीं, पूरे सिस्टम से टूट चुका भरोसा है।
चाहे वो केंद्र की हो या राज्य की, BJP सरकार से हर छात्र त्रस्त है। पेपर लीक, रुकी हुई भर्तियां, शिक्षा ���ी असहनीय लागत, हॉस्टल में अमानवीय हालात, ज़हर जैसा खाना, DBT में धोखाधड़ी...
...और अब MPSC जैसी संवैधानिक संस्था पर कब्ज़ा कर उसकी विश्वसनीयता बर्बाद कर दी है।
अपने सफल भविष्य के लिए छात्रों की हर मांग जायज़ है। सरकार उनकी आवाज़ सुनकर तुरंत कार्रवाई करे - वरना न्याय मिलने तक ये छात्रों की गूंज बढ़ती ही जाएगी।
#ChhatronKiGoonj
संशयाच्या सावटाखाली नियुक्त्या नकोत, स्वतंत्र चौकशी करून फेरपरीक्षा घ्या!
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती परीक्षेतील गैरप्रकाराबाबत ३ उमेदवारांवर कारवाई करून प्रश्न संपणारा नाही. परीक्षेतील प्रश्न बाहेर कसे आले ? परीक्षा केंद्रातील यंत्रणा कुठे अपयशी ठरली आणि या गैरप्रकारामागे आणखी कोण आहे का? याची स्वतंत्र चौकशी, डिजिटल ऑडिट आणि पारदर्शक प्रक्रिया राबवली गेली पाहीजे. भरती प्रक्रियेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी संशयाच्या सावटाखाली नियुक्त्या करण्याऐवजी संपूर्ण प्रकरणाच्या स्वतंत्र चौकशी करून फेरपरीक्षा घ्यावी.
@CMOMaharashtra@mieknathshinde@PMCPune
मा. महोदय,
आपले स्पष्टीकरण वाचले. पण “Paper leak नाही, individual cheating आहे” असे म्हणणे हा या प्रकरणाचा शेवटचा निष्कर्ष असू शकत नाही. २०,७३४ उमेदवारांनी परीक्षा दिली. परीक्षा केंद्रात कथित गैरप्रकार झाला. मग सर्वात पहिला प्रश्न हा आहे:
मोबाईल/छायाचित्र काढण्याचे साधन परीक्षा केंद्रातील सुरक्षा तपासणी पार करून आत गेले कसे? Invigilators नेमके काय करत होते? हा प्रकार real-time मध्ये का पकडला गेला नाही आपण IBPS report सार्वजनिक केल्याचे सांगता. पण त्या अहवालातील निष्कर्षांचे स्वतंत्र forensic audit झाले आहे का?
आणखी महत्त्वाचे प्रश्न:
• ३ उमेदवारांची उमेदवारी रद्द केल्यानंतर normalization आणि अंतिम merit वर त्याचा परिणाम तपासला का?
• CCTV, biometric records आणि complete audit logs ची स्वतंत्र तज्ज्ञांकडून पडताळणी झाली का?
• FIR ची संपूर्ण माहिती सार्वजनिक का नाही?
• परीक्षा केंद्रातील सुरक्षा आणि supervision मधील त्रुटींसाठी कोणाची जबाबदारी निश्चित केली?
• नियुक्त्यांपूर्वी सर्व पात्रता, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त आणि क्रीडा प्रमाणपत्रांची स्वतंत्र पडताळणी केली आहे का?
“ज्यांना आक्षेप आहे त्यांनी सरकार किंवा न्यायालयात जावे” हे उत्तर समाधानकारक नाही.
PMC ही परीक्षा घेणारी संस्था आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शंका दूर करण्याची प्राथमिक जबाबदारीही PMC चीच आहे. ३ उमेदवार दोषी असतील तर कारवाई झालीच पाहिजे. पण प्रश्न फक्त “कोणी गैरप्रकार केला?” एवढाच नाही. “गैरप्रकार घडण्याची संधी निर्माणच कशी झाली?” हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.
२०,७३४ विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. PR Statement नको, पूर्ण पारदर्शकता आणि स्वतंत्र पडताळणी हवी.
@INCHarshsapkal@INCMaharashtra@mpsc_office@PMCPune@prajytnair @degree_holders @PunyachiMPSC@INCRojgar
#PMCJE #PMCRecruitment #विद्यार्थीन्याय #DhananjayShinde #Dhananjay_Shinde #Justice
Mr. Commissioner Sir,
I have read your statement. But saying “there was no paper leak, only individual cheating” cannot be the end of the accountability process. 20,734 candidates appeared for this examination. An alleged malpractice occurred inside an examination centre.
The first question is therefore:
1. How did a device capable of photographing the question paper get past the security checks?
2. What were the invigilators doing?
3. Why was it not detected in real time?
4. You say the IBPS report has been published. But has its methodology and conclusion been subjected to a genuinely independent forensic audit?
There are several unanswered questions:
• Was the impact of cancelling the three candidates’ scores on normalization and final merit independently assessed?
• Were CCTV footage, biometric records and complete audit logs independently verified?
• Why has the complete FIR not been made public?
• Who has been held accountable for the security and supervision failure at the examination centre?
• Were all eligibility, disability, project-affected and sports certificates independently verified before appointments?
Telling aggrieved candidates to approach the Government or the Courts is not an adequate answer. PMC conducted this recruitment process. PMC therefore has the primary responsibility to address the legitimate concerns of the candidates.
If three candidates cheated, action against them is necessary. But the question is not merely:
“Who cheated?”
It is also: “How did the system allow the alleged malpractice to happen in the first place?” This concerns the future of 20,734 young aspirants.
They don't need a PR defence. They need independent scrutiny, evidence, transparency and accountability.
अतिरिक्त आयुक्त @prajytnair साहेब "परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका हाती लागली असती तर त्याला पेपरफुटी म्हण���ा येते, परंतु परीक्षा सुरू असताना छायाचित्र काढून ते परीक्षा सुरू झाल्यावर बाहेर पाठवणे याला गैरप्रकार, फसवणूक असल्याचे सांगितले" साहेबांना काही बेसिक प्रश्न आम्ही विचारू इच्छितो की १०००/९०० रुपये घेऊन परीक्षा फॉर्म भरले जातात परंतु परीक्षा केंद्रावर तपासणी वेळी सदरील उमेदवार आतमध्ये छायाचित्र करणारी वस्तू घेऊनच कस काय गेला? छायाचित्र काढून बाहेर देईपर्यंत पुणे मनपा ने नियुक्ती ��ेलेले Invigilator काय करत होते? ज्या तीन उमेदवारांवर गुन्हे दाखल केले आहेत त्याची FIR अद्याप सार्वजनिक का नाही केली? तीन उमेदवारांच्या उमेदवारी रद्दचा Normalisation वरील परिणामाची तपासणी IBPS ने केली आहे का याची माहिती घेतली का?
गैरप्रकार झालाच नाही तर नियुक्ती द्यायची एवढी घाई का?
नियुक्ती देताना बोगस दिव्यांग, बोगस प्रकल्पग्रस्त किंवा बोगस स्पोर्ट्स प्रमाणपत्र धारक लोकांसाठी पुणे मनपा ने काय Action Plan आहे?
कनिष्ठ अभियंता भरतीत मोठा गै���प्रकार; पेपर फुटल्याचे महापालिकेने मान्य केले, मग नियुक्त्या का सुरू ठेवल्या?
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेत मोठा गैरप्रकार झाल्याचे समोर आले असून, परीक्षेचा पेपर फुटल्याचे खुद्द पुणे महानगरपालिकेनेही मान्य केले आहे. विद्यार्थ्यांनी या गैरप्रकाराचे पुरावे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर महापालिकेने तीन विद्यार्थ्यांवर कारवाई केली. मात्र, पेपर फुटला होता हे मान्य केल्यानंतर हा गैरप्रकार केवळ तीन विद्यार्थ्यांपुरताच मर्यादित होता, हे महापालिकेने कशाच्या आधारे ठरवले? फुटलेला पेपर आणखी किती उमेदवारांपर्यंत पोहोचला? किती उमेदवारांनी त्याचा लाभ घेतला? या प्रश्नांची उत्तरे न शोधताच इतर उमेदवारांना नियुक्त्या देण्याची घाई का करण्यात आली?
तीन विद्यार्थ्यांवर कारवाई झाली, मग संपूर्ण भरती प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी का झाली नाही? पेपर फुटल्याचे मान्य असताना त्याच परीक्षेच्या निकालावर आधारित नियुक्त्या वैध कशा ठरू शकतात? हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असेल, तर त्यांना पुन्हा समान आणि निष्पक्ष संधी देणे ही महापालिकेची जबाबदारी नाही का? त्य���मुळे कनिष्ठ अभियंता भरतीतील सर्व नियुक्त्या तात्काळ स्थगित करून, संपूर्ण प्रक्रिया रद्द करावी आणि पारदर्शक पद्धतीने फेरपरीक्षा घ्यावी, अशी शिवसेनेची ठाम मागणी आहे.
या प्रकरणात पुणे महानगरपालिका प्रशासनातील काही ब���्या व्यक्तींच्या सहभागाबाबत शिवसेनेकडे खात्रीदायक माहिती आणि महत्त्वाचे पुरावे उपलब्ध असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. त्यामुळे मोठ्या माशांना वाचवून केवळ तीन विद्यार्थ्यांवर कारवाई करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? संपूर्ण रॅकेटची चौकशी कोण करणार? आणि दोषी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई होणार का? या प्रश्नांची उत्तरे महापालिका प्रशासनाने द्यावीत. वेळप्र��ंगी शिवसेनेकडे उपलब्ध असलेले पुरावेही जनतेसमोर मांडले जातील. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि या प्रकरणातील प्रत्येक दोषीवर कारवाई होईपर्यंत शिवसेना हा लढा आक्रमकपणे लढणार आहे.
@PMCPune @pmccarepune @PMCCare
#PMC #shivsena #punecity #hadapsar
एकीकडे पुणे महापालिकेने परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं मान्य केलं आणि दुसरीकडे अतिशय जलद गतीने मनपा प्रशासन उमेदवारांना न���युक्ती आदेश देत आहे. या सर्व गोष्टी संशयास्पद आहेत, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त, आयुक्त यांना प्रश्न आहे की नियुक्तीची एवढी घाई नक्की कोणाला वाचवायला करत आहात?
कनिष्ठ अभियंता भरती - पुणे महानगरपालिकेस खुले प्रश्न:
PMC ने कनिष्ठ अभियंता (स्थाप��्य) पदांसाठी १४६ उमेदवारांना नियुक्ती आदेश दिले आहेत. फक्त काही उमेदवारांची उमेदवारी रद्द केल्याचे सांगितले आहे. महानगरपालिकेने स्वतः म्हटले आहे की IBPS चा अहवाल पारदर्शकतेसाठी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे / आला आहे. तरीही हजारो उमेदवारांमध्ये संशय आणि असंतोष कायम आहे.
PMC ला थेट प्रश्न:
१. IBPS अहवाल पूर्ण स्वरूपात (सर्व परिशिष्टे व विश्लेषणासह) अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दि���ा आहे का?
२. ज्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात आली, त्यांना रद्दीकरणापूर्वी औपचारिक सुनावणी आणि स्वतःचे म्हणणे मांडण्याची संधी दिली होती का?
३. परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही, ऑडिट लॉग आणि इतर पुरावे स्वतंत्र तपासणीसाठी उपलब्ध कराल का?
४. संपूर्ण प्रक्रियेची तटस्थ व स्वतंत्र तांत्रिक तपासणी करण्यास तयार आहात का?
पारदर्शकता म्हणजे फक्त निवड यादी लावणे नव्हे. उमेदवारांच्या आणि जनतेच्या मनातील संशय दूर करण्यासाठी पूर्ण माहिती आणि पुरावे समोर आणा. शांततापूर्ण आणि कायदेशीर मार्गाने न्याय्य भरती प्रक्रिया हि आमची मागणी आहे.
@INCMaharashtra @degree_holders @prajytnair @PMCPune @navalMH @MDNagpure
पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता परिक्षेत तिघे जण पकडले आहेत. पण प्रश्न हजारो विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा आहे..!
पुणे महापालिका कनिष्ठ अभियंता भरतीतील हायटेक कॉपी प्रकरणानंतर केवळ दोषींवर कारवाई करून प्रशासनाची जबाबदारी संपत नाही. काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित होत आहे. संपूर्ण परीक्षेची विश्वासार��हता तपासली का? इतर उमेदवारांना फायदा झाला नाही, याची खात्री कोण आहे देणार.? प्रामाणिक विद्यार्थ्यांना संशयाच्या वातावरणात निकाल का स्वीकारावा लागतो.? पुणे महानगरपालिका प्रशासनाने उत्तर द्यावे. नसता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आक्रमक आंदोलन करुन महापालिका प्रशासनाला धारेवर धरणार
#विद्यार्थीन्याय #PMC #भरती #पारदर्शकता
@bbcnewsmarathi
@LokshahiMarathi
@saamTVnews
@News18_marathi
@abpmajhatv
@zee24taasnews
पुणे महापालिकेच्या ज्युनिअर इंजिनिअर भरतीचा पेपर फक्त ३ विद्यार्थ्यांना मिळाला हे मान्य करुन पेपरफुटीचा प्रकार घडल्याचा स्पष्ट निर्वाळा महापालिकेने दिला आहे. परंतु तरीही महापालिका ही भरती प्रक्रिया रद्द करण्यास तयार नाही. हा गैरप्रक��र केवळ ३ जणांपुरताच मर्यादित होता याची हमी महापालिका देऊ शकते का? पेपरफुटीच्या प्रकरणाचे स्वरुप आणि त्याचे धागेदोरे स्पष्ट होण्यासाठी सखोल चौकशी आवश्यक आहे. परंतु तत्पूर्वीच महापालिका निवड झालेल्या उमेदवारांना रुजू करुन घेत आहे. यामुळे इतर अनेक पात्र आणि प्रामाणिक उमेदवारांच्या कष्टावर पाणी फेरले गेले आहे. माझी महापालिका आयुक्तांना विनंती आहे की ही सदोष भरतीप्रक्रिया रद्द करुन स��पूर्ण प्रक्रिया नव्याने पारदर्शक पद्धतीने राबविण्यात यावी.
@CMOMaharashtra
@PMCPune
@navalMH