नगरविकास विभागातील काही उच्च अधिकारी यांची लॉबिंग करून सहायक नगररचनाकार पदाची पात्रता बदल करण्याबाबत हालचाली सुरू आहेत यामध्ये अभियांत्रिकी उमेदवारांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा आम्हाला उमेदवारांना घेऊन राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल.
@mieknathshinde
सहाय्यक नगर रचनाकार पदासाठी चाळणी परीक्षा होऊन सात महिने उलटून गेले पण निकाल नाही.
दोन वर्षातून एकदा जाहिरात प्रसिद्ध होते आणि त्यातही निकालासाठी उमेदवारांनी अजून किती प्रतिक्षा करायची ?
@mpsc_office आपण लवकरात लवकर निकाल जाहीर करावा ही विनंती.
@mieknathshinde#ATP#mpsc
@mpsc_office आपल्या अखत्यारीत येत असलेल्या सहाय्यक नगररचनाकार (गट ब,राजपत्रित) या पदाचे निकाल ६ महिने उलटूनही प्रलंबित आहेत तर लवकरात लवकर निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती @CMOMaharashtra@Dev_Fadnavis
भूमिअभिलेख विभागांमधील भूकरमापक (Surveyor) Group-C परीक्षेचा निकाल तात्काळ प्रसिद्ध करण्याचे आदेश मा. मंत्री महोदयांनी भूमिअभिलेख विभागाला द्यावे ही नम्र विनंती.
@cbawankule@iYogeshRKadam@maharevenue
#MPSC द्वारे घेण्यात येणाऱ्या सहाय्यक नगररचनाकार पदाची परिक्षा होऊन ६ महिने होत आले तरी अद्यापही निकाल मात्र प्रसिद्ध करण्यात आला नाही. अगोदरच परिक्षेला विलंब त्यात आता निकाल देखील लागत नसल्याने विद्यार्थ्यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळं आयोगाने तत्काळ सहाय्यक नगररचनाकार पदाचा निकाल प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, ही विनंती!
@mpsc_office
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहायक नगररचनाकार पदाची यावर्षी 28 जून रोजी परीक्षा घेण्यात आली होती. परंतु या परीक्षेचा अद्यापही निकाल लावण्यात आलेला नाही. या परीक्षेच्या प्रक्रियेत सुरवातीपासून विलंब होत आहे असे ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे म्हणणे आहे. या विलंबामुळे त्यांना नाहक मानसिक तथा आर्थिक ताणाला सामोरे जावे लागत आहे. शासनाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करीत असतानाच निकालाची तारीख देखील जाहीर करणे गरजेचे आहे. यामुळे उमेदवारांना विनाकारण ताणतणावाचा सामना करावा लागणार नाही. तसेच निश्चित तारीख माहित असेल तर त्यांना त्याप्रमाणे नियोजन करणे सोपे जाईल.
@CMOMaharashtra@mpsc_office
#MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या सहायक नगररचनाकार पदाची परीक्षा यावर्षी 28 जून रोजी घेण्यात आली होती.परंतु या परीक्षेचा अद्यापही निकाल लावण्यात आलेला नाही.सदर परीक्षेचा निकाल तात्काळ लावावा.नम्र विनंती.@mpsc_office@CMOMaharashtra@mieknathshinde
जलसंधारण खात्यातील सुमारे ८ हजार ६६७ पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया राबविण्याची घोषणा मृद व जलसंधारण मंत्री महोदयांनी वर्षभरापुर्वी केली होती. या भरतीसाठी 'इंजिनिअरींग असोसिएशन' ही अभियंत्यांची संघटना सातत्याने पाठपुरावा करीत आहे. या मागणीसाठी सदर संघटनेच्या वतीने आंदोलन देखील करण्यात आले. वाढते वय आणि बेरोजगारी यामुळे अभियंते चिंतेत आहेत. पदभरतीची जाहिरात वेळेत प्रसिद्ध होऊन ही प्रक्रिया पार पडली तर अनेक अभियंत्यांना रोजगार मिळू शकेल. हे लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री आणि मृद व जलसंधारण मंत्री यांनी या विभागातील ही भरती तातडीने जाहिर करुन वेळेत पुर्ण करावी.
@CMOMaharashtra@SanjayDRathods
"तरुणांच्या रोजगारासाठी काँग्रेस रस्त्यावर"
आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पार पडलेला रोजगार सत्याग्रह उत्स्फूर्त आणि यशस्वी ठरला.
२०१९ पासून रखडलेली जलसंपदा विभाग (WRD) आणि जलसंवर्धन विभाग (WCD) मधील एकूण ४६००+ अभियंता पदांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, या मागणीसाठी राज्यभरातील अभियंते रस्त्यावर उतरले होते. पुण्यातील आंदोलनात ३५० पेक्षा अधिक बेरोजगार अभियंत्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या आंदोलनाचं नेतृत्व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि रोजगार विभागाचे राज्य संयोजक मा. धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी केलं, तर @degree_holders संघटनेने सक्रिय साथ दिली.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. गोपाळ तिवारी यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून युवकांना मार्गदर्शन केलं.
प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी व्हिडीओ कॉलद्वारे आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला आणि आगामी पुणे दौऱ्यात या तरुण अभियंत्यांशी प्रत्यक्ष भेट घेण्याचं आश्वासन दिलं.
त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, रोजगाराचा प्रश्न हा राजकारणाच्या पलीकडचा असून काँग्रेस पक्ष संविधान मार्गाने शेवटपर्यंत लढा देईल.
हा रोजगार सत्याग्रह राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये समांतरपणे पार पडला.
📌 काँग्रेस पक्षाने सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
या मुदतीत ठोस निर्णय न झाल्यास WALMI, संभाजीनगरच्या मुख्य गेटसमोर अनिश्चितकालीन सत्याग्रह करण्यात येईल.
🔔 या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संबधित मंत्री यांनी येत्या आठवड्यात या विषयावर बैठक घेण्याचं आश्वासन दिलं आहे.
✊ काँग्रेसचा हात, तरुणांना साथ!
@INCHarshsapkal@INCIndia@Dhananjay4INC
#INCMaharashtra #IndianNationalCongress #Congress #MaharashtraPolitics #RojgarSatyagraha #EngineerRecruitment #PuneProtest #CongressForYouth #WRD #WCD #MaharashtraYouth
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
सार्वजनिक बांधकाम विभाग:1000+
जलसंपदा विभाग:1500+
जलसंधारण विभागाने #२००० तरी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांची जाहिरात प्रसिद्ध करणे अपेक्षित आहे कारण अद्याप स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ची एकही पदभरती #WCD मध्ये झालेली नाही. @SanjayDRathods
माननीय जलसंपदा मंत्री@RVikhePatil यांना भेटून सहकारी विद्यार्थ्यांनी #WRD_JE#WRD_RR बाबत निवेदन दिले,लवकरच साहेब एक वर्षापासून रखडलेली भरती संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन पुढील एक महिन्यात सर्व प्रक्रिया मार्गी लावतील अशी आशा करूयात, वेळ दिल्याबद्दल साहेबांचे आभार #WRD_JE
Wishing a very happy Parshuram Jayanti to all! May we draw strength from Lord Parshuram’s wisdom, courage and righteousness to walk the path of truth and justice.
भगवान परशुराम जयंतीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
#परशुराम_जयंती#ParshuramJayanti#Maharashtra