केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितजी शाह यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज सारस बाग, पुणे येथे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
@AmitShah@Dev_Fadnavis#लोकशाहीर_अण्णाभाऊ_साठे #AnnaBhauSathe
परभणी जिल्हा रुग्णालयाने राज्यस्तरीय हॉस्पिटल सर्वेक्षणात सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांक पटकावत संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान उंचावला आहे. ही कामगिरी केवळ पुरस्कार नसून, जनतेला दर्जेदार आणि रुग्णकेंद्रित आरोग्यसेवा देण्याच्या आपल्या सामूहिक वचनबद्धतेचे यश आहे.
या उल्लेखनीय यशामागे अथक परिश्रम घेणारे सर्व डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, अधिकारी आणि प्रशासनाचे मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या सेवाभावी वृत्तीमुळे परभणीची ओळख राज्यात अधिक उज्ज्वल झाली आहे.
यापुढेही जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला अधिक सक्षम, आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हीच अपेक्षा. सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
#Parbhani #DistrictHospitalParbhani #HealthcareExcellence #Maharashtra
Blessed to welcome and interact with spiritual leader Gauranga Das ji, Director of Govardhan Ecovillage and Governing Body Commissioner of ISKCON, at Varsha Bungalow in Mumbai today.
Had an inspiring exchange on the enduring relevance of spirituality, sustainable living and service to humanity. His remarkable efforts in advancing environmental conservation, rural development and value-based education continue to inspire a path where inner transformation goes hand in hand with building a compassionate, sustainable and resilient society.
@GaurangaDas
#Maharashtra #Mumbai
आज छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेजच्या दयोतन हॉलमध्ये आयोजित 'रजोनिवृत्ती (Menopause) क्लिनिक व पीसीओडी/पीसीओएस (PCOD/PCOS) क्लिनिक' राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन करून मार्गदर्शन केले.
रजोनिवृत्ती आणि पीसीओडी/पीसीओएस सारख्या समस्यांबाबत वेळेवर निदान, उपचार आणि जनजागृती वाढविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
रजोनिवृत्ती क्लिनिकच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी, आवश्यक तपासण्या, औषधोपचार, मानसिक आरोग्य समुपदेशन, आहार व जीवनशैलीविषयक मार्गदर्शन, हाडांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन तसेच नियमित फॉलो-अप अशा सर्वसमावेशक सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याची माहिती महिलांना पोहविण्यात यावी जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ व्हावा यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहन यावेळी केले.
या यावेळी पुणे संचालक डॉ. विजय करेवाड,उपसंचालक कैलास बाविस्कर, प्राचार्य डॉ कडले यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
#pcod #छत्रपतीसंभाजीनगर
@Dev_Fadnavis@Devendra_Office@BJP4India@BJP4Maharashtra
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, देवगिरी प्रदेश कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्यास आज उपस्थित राहिले.
राष्ट्रनिर्माणाच्या विचारांना समर्पित असलेले हे नवीन कार्यालय विद्यार्थी शक्ती, सामाजिक बांधिलकी आणि सकारात्मक राष्ट्रकार्यास नवी दिशा देणारे ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
यावेळी मा. इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री श्री.अतुल सावे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-सरकार्यवाह मा. अतुलजी लिमये, सीईओ टॉरेंट इंडिया श्री. भरत गिते, अभाविपचे राष्ट्रीय संघटन मंत्री श्री. आशिष चव्हाण, श्री. राहुल पांगारिया, श्री. मनीष पाटील, प्रा. डॉ. सुरेश मुंडे, डॉ. वरुणराज ननवरे, वस्त्रोद्योग मंत्री ना. श्री. संजय सावकारे, डॉ. भागवत कराड, आमदार सौ. अनुराधाताई चव्हाण, आमदार श्री. सुहास शिरसाट, श्री. हरिष कुलकर्णी, श्री. अनिल भालेराव, श्री. देवदत्तजी जोशी तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#ABVP #AkhilBharatiyaVidyarthiParishad #DevgiriPradesh #Bhoomipujan #NationBuilding
@Dev_Fadnavis@Devendra_Office@RaviDadaChavan@save_atul@DrBhagwatKarad
आज मुंबई येथील एम.एस.आर.डी.सी. कार्यालय, निर्मल भवन येथे आवताडे स्पिनिंग मिल्स, मंगळवेढा येथील वीजपुरवठ्याच्या प्रश्नासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
उद्योगांच्या प्रगतीसाठी अखंड, दर्जेदार आणि सुरळीत वीजपुरवठा अत्यावश्यक आहे. याच दृष्टीने आवताडे स्पिनिंग मिल्ससमोरील वीजपुरवठ्यातील अडचणींचा सखोल आढावा घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याबाबत महावितरण व महापारेषणच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
उद्योगाचा वीजपुरवठा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहावा, उत्पादनावर परिणाम होऊ नये आणि स्थानिक रोजगाराला चालना मिळावी, यासाठी आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
यावेळी आमदार श्री. समाधान आवताडे, महावितरण व महापारेषणचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक, प्रकल्प, वित्त व वाणिज्य संचालक, पुणेचे मुख्य अभियंता, बारामतीचे मुख्य अभियंता, सोलापूरचे अधीक्षक अभियंता तसेच विषयाशी संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#AwtadeSpinningMills #mangalwedha #powersupply
@Dev_Fadnavis@Devendra_Office@CMOMaharashtra@MahaDGIPR@BJP4India@BJP4Maharashtra
मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत सातत्याने ठोस आणि निर्णयक्षम पावले उचलत आहे. शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत सरकारची भूमिका आणि शेतकरी हिताचे धोरण जनतेसमोर स्पष्ट करण्यासाठी आज परभणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
यावेळी शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत पक्षाची भूमिका, शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि शासनाने शेतकरी कल्याणासाठी घेतलेल्या विविध निर्णयांची सविस्तर माहिती दिली. शासनाच्या लोकहितकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा आणि शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे, हा या पत्रकार परिषदेमागील प्रमुख उद्देश होता.यावेळी महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे, किसान मोर्चा प्रदेश चिटणीस रंगनाथ सोळंके यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सक्षम नेतृत्वामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि शेती अधिक सक्षम करण्यासाठी महायुती सरकार शेतकऱ्यांच्या विश्वासाला न्याय देणारे निर्णय आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीचे प्रयत्न यापुढेही अशाच पद्धतीने सुरू राहतील असे आश्वासन दिले.
#DevendraFadnavis #BJP #Parbhani #PressConference #शेतकरी_कर्जमुक्ती
@Dev_Fadnavis@Devendra_Office@RaviDadaChavan@BJP4Maharashtra@BJP4India
आज परभणी येथे रेशीम संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, आत्मा, केंद्रीय रेशीम बोर्ड, जिल्हा रेशीम कार्यालय व अग्रणी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "शाश्वत शेतीकडे वाटचाल, सिल्क व मिलेट, NDKSP 2.0 व मेरा रेशीम मेरा अभिमान 2.0 शेतकरी कार्यशाळा" या उपक्रमास उपस्थित राहून शेतकरी बांधवांशी संवाद साधला.
रेशीम शेती, भरडधान्य उत्पादन आणि आधुनिक शेती पद्धतींच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अशा कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शाश्वत शेतीकडे वाटचाल करावी, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे.
#parbhani #कृषी #मेरा_रेशम_मेरा_अभिमान
विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित आणि परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार सातत्याने ठोस निर्णय घेत आहे.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई, फास्ट ट्रॅक न्यायालयांची व्यवस्था आणि कडक कायद्यांच्या दिशेने पावले उचलल्यानंतर आता श्री. नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती परीक्षा प्रणाली अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
@narendramodi@AmitShah@NitinNabin@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@BJP4Maharashtra@BJP4India
आज भारताची नवी ओळख म्हणजे, गावोपवस्तीत पोहोचलेले रस्ते, मेट्रो, एक्सप्रेसवे, प्रत्येक छोट्या शहरात असणारे विमानतळ आणि शिक्षणासाठी दुप्पट झालेली आयआयटी, आयआयएम, एम्स आणि मेडिकल सीटची कवाडे. ज्या गोष्टी बदलायला पूर्वी दशके लागायची, त्या पंतप्रधान मोदींच्या कणखर आणि प्रभावी नेतृत्वामुळे अवघ्या काही वर्षांत प्रत्यक्षात उतरल्या आहेत.
तरुण पिढीला भविष्यासाठी सक्षम बनवत, देशाच्या विकासाचा मजबूत पाया रोवण्याचे महान काम मोदीजींनी केले आहे.
#NarendraModi #NewIndia #ViksitBharat #ModiJi #Development #IndiaProgress
@narendramodi@AmitShah@NitinNabin@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@BJP4India@BJP4Maharashtra
आज नागपूर येथील रविभवन शासकीय निवासस्थानी आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे श्रवण केले. कारगिलच्या वीर जवानांना विनम्र अभिवादन करत त्यांनी राष्ट्रनिर्मितीसंबंधी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
#KargilVijayDiwas#MannKiBaat@narendramodi
‘मिसाईल मॅन ऑफ इंडिया’, ‘जनतेचे राष्ट्रपती (People’s President)’, ‘भारतरत्न’, भारताच्या स्वप्नांना विज्ञानाची पंखं देणारे दूरदर्शी शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! 🇮🇳
#APJAbdulKalam#MissileManOfIndia#PeoplesPresident#BharatRatna
छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘टाईम्स आयकॉन्स ऑफ हेल्थकेअर २०२६’ या प्रतिष्ठित कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी लाभली.
या प्रसंगी विविध वैद्यकीय क्षेत्रांत उत्कृष्ट व उल्लेखनीय आरोग्यसेवा देणाऱ्या मान्यवर डॉक्टरांचा माझ्या हस्ते सन्मान करण्यात आला, याचा विशेष आनंद वाटला.
समाजाच्या आरोग्यदायी भविष्यासाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या सर्व सन्मानित डॉक्टरांचे मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या सेवाभावी कार्यातून निरोगी, सक्षम आणि सशक्त महाराष्ट्र घडविण्यात आपण असेच मोलाचे योगदान देत राहाल, हीच अपेक्षा.
आपल्या सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
@timesofindia@mataonline@CMOMaharashtra@MahaDGIPR
From expressways and airports to world-class railways India is transforming the way its people connect travel and grow. Under the visionary leadership of PM @narendramodi Ji 75 redeveloped railway stations have been dedicated to the nation under the Amrit Bharat Station Scheme marking another milestone in India’s infrastructure journey. Built at a cost of nearly ₹1,570 crore across 20 States these stations combine modern passenger amenities with local culture and architectural heritage truly embodying the vision of “Virasat Bhi Vikas Bhi.”
आपल्या धारदार लेखणीतून असंख्य कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या, लिहिणारे साहित्य सम्राट लोक शाहीर अण्णाभाऊ साठ यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन.
#aanabhausathi#lokshahir#socialjusties
महापुरुषांच्या चरित्रास काळाची सीमा नसते; ते जनमानसाच्या चेतनेत अमरत्व प्राप्त करतात. शोषितांच्या वेदनेला वाणी, उपेक्षितांच्या संघर्षाला गौरव, समतेच्या संकल्पनेला वाङ्मयीन वैभव प्रदान करणारे लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना स्मृतिदिनी कोटीशः विनम्र अभिवादन.