#ठाकरे आणि ठाकरेंचे #शिलेदार कधीच कोणाकडेही दुर्लक्ष करत नाहीत..
25 जानेवारीला माझे बाबा स्वर्गवासी झाले. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या दुःखात सगळेजण सहभागी झाले, सगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी जवळपास 2 महिने गावी आले. मी मुंबईत आल्यावर मला मुंबईत आणि आईला भेटायला गावी ठाकरेंमुळे कमावलेली माणसं भेटायला आली..
उद्धवजी साहेबांचा परभणी दौरा आहे त्या अनुषंगाने जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्रदीपकुमार खोपडे जी दौरा करत असताना माझ्या आईला भेटायला गेले. सोबत परभणीचे जिल्हाप्रमुख सह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक आईला भेटायला गेले.. आज माझ्या बाबाला जाऊन बरोबर 5 महिने झाले, ठाकरेंमुळे कमावलेली माणसं माझ्या व घरच्यांच्या सोबत खंबीरपणे उभे आहेत..
"बायको मेली उद्धव साहेबांनी विचारपुस केली नाही म्हणुन नाराज झालो, बायकोचा अपघात झाला उद्धव साहेबांनी विचारपुस केली नाही म्हणुन नाराज झालो" ही गद्दार लोकांकडची कारणं थोतांड आहेत कारण एका गरीब घरातील शिवसैनिक मुलीची विचारपुस मागच्या 5 महिन्यांपासून ठाकरेंपासून ते शिवसैनिकांपर्यंत सर्वजण करत आहेत तिथे खोटी कारणं देणाऱ्या लोकप्रतिनिधींना ठाकरेंनी विचारले नसेल का?
ठाकरे आणि ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक शिलेदार दुःखात, संघर्षात कधीच एकटं सोडत नाहीत हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले.. प्रदीप दादा आपले आणि या 5 महिन्यात जे जे सोबत आहेत त्या सर्वांचे खुप खुप आभार..
मोजुन 4 माणसं बसतील इतकंच माझ्या आईबाबाचं घर आहे, 25 जानेवारीपासुन भेटायला आलेल्या मंडळींना त्रास झाला त्याबद्दल क्षमस्व..🙏🏻
टीप : मला फोटो पाठवत "आयद्याबाई/ताई/आत्याबाई तु गावात नसलीस तरी गंगाकाकुची काळजी घेणारे तुझे नेते गावाकडे येऊन भेट घेत आहेत, काळजी घेत आहेत, तु लढ बिंधास्त" असा निरोप दिला.. घरात जागा नाही म्हणुन घरच्या बाहेर फोटो काढला आहे गावकरी मंडळींनी. सर्वांच्या सदैव ऋणात असेल....🙏🏻😊
#ठाकरे
#शिवसैनिक
#जिवाभावाचीमाणसं
@OfficeofUT .@AUThackeray@mieknathshinde@rautsanjay61@iambadasdanve@DrSEShinde
- सुनिल दत्त मुस्लीम वस्त्यांमध्ये जास्त मदत करतात म्हणून हिंदुत्ववादी गटाकडून त्यांना धमक्या येत होत्या. आपल्या वडिलांच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे हिंदुत्ववाद्यांपासून बापाला वाचवण्यासाठी आपण एके-५६ मिळवली आणि बाळगली. अतिरेकी कारवायांशी आपला संबंध नाही असं सिद्ध करण्यात संजय दत्त यशस्वी झाला. त्याला टाडा तून मुक्ती मिळाली, आर्म्स ॲक्ट मध्ये तो दोषी ठरला.
- सुनिल दत्त यांनी धमक्यांनंतरही दंगलग्रस्त भागांमध्ये मदत कार्य सुरू ठेवलं. या सगळ्या गदारोळात संजय दत्त आणि सुनिल दत्त यांच्या बचावासाठी बाळासाहेब ठाकरे सोडलं तर कोणी उभं राहिलं नाही.
- आज हिंदुत्ववाद्यांना मारण्यासाठी रायफल बाळगणाऱ्या संजय दत्त कडून RSS ची तारिफ होत आहे. संजय दत्त नावाचा नवा हिरो भारताच्या क्षितीजावर यापुढे चमकताना दिसेल. कदाचित पुढच्या खेपेस मंत्री ही असू शकेल.
- सर्व शोकांतिकांचंही स्वतःचं एक वर्तुळ असतं.