Remembering Maharashtra’s former Deputy Chief Minister Ajitdada Pawar, known for his forthrightness, strong leadership, and administrative efficiency, on his Birth Anniversary!
महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी उपमुख्यमंत्री, स्पष्टवक्ते, कणखर व कार्यक्षम नेतृत्व 'अजितदादा पवार' यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
@AjitPawarSpeaks
#अजित_पवार #अजितदादा_पवार #AjitPawar #Maharashtra
Tributes to Maharashtra’s former DCM Ajitdada Pawar, on his Birth Anniversary!
His visionary, inclusive, and people-centric leadership has made a lasting contribution to Maharashtra.
दूरदर्शी, सर्वसमावेशक व लोकाभिमुख नेतृत्व, महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी उपमुख्यमंत्री 'अजितदादा पवार' यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#अजित_पवार #अजितदादा_पवार #AjitPawar #Maharashtra
दादा...
एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला...
घर , कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा..
पण आज तुमचा हाच दिवस 'जयंती' म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय.
हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही दादा...
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद बनून सोबत राहिलात.
तुमचा तो भक्कम आधार, कठीण प्रसंगात पाठीवर पडणारी तुमची विश्वासू थाप आणि मला दिलेली साथ...
आज हे सगळं अचानक हरवून गेलंय, सगळं सगळं पोरकं झालंय यावर विश्वासच बसत नाही.
काळाने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून नेईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
आज तुमचा हा दिवस साजरा करताना काळीज पिळवटून निघतंय, डोळ्यांतील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत.
दादा, तुम्ही भलेही आज माझ्यासोबत शारीरिकदृष्ट्या नसलात, तरी तुमचे विचार, तुमच्या आठवणी , तुमचा लोकांप्रती सेवाभाव, शिस्त आणि तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहील...
माझ्या आयुष्याच्या साथीदाराला, तुमच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण आणि आदरपूर्वक प्रणाम...!
आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. मा. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे.
दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि लोकांशी असलेले आत्मीय नाते, हेच बळ घेऊन मी पुढील वाटचाल करणार आहे. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणे, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे, हीच माझी प्राथमिकता असेल.
दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन. या कठीण प्रसंगी जनतेने दिलेले प्रेम, आधार आणि विश्वास हेच माझे सामर्थ्य आहे. त्यांच्या स्मृतीपुढे आज मी एकच वचन देते की, महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेने आणि समर्पणाने कार्य करत राहीन.
आशिष शेलार यांच्या वक्तव्यासंबंधी एबीपीचं नाव असलेली पोस्ट फेक होती असे कळते. अनेकांप्रमाणे मलाही ती फेक आहे हे लक्षात आलं नाही. क्षमस्व.
सोशल मिडीयावर काय खरं आणि काय फेक हेच कळेनासं झालं आहे. काळजी घ्या.
@ShelarAshish@Dev_Fadnavis
बारामतीच्या बेसबॉल खेळाडू रेश्मा पुणेकर यांची 'भारतीय महिला बेसबॉल संघा'च्या कर्णधार पदी निवड झाल्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा!
#Baramati
अतिशय दुःखी अंतःकरणाने कळविते की, माझ्या काकी सौ भारती प्रतापराव पवार यांचे थोड्या वेळापूर्वी निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद घटना आहे. याक्षणी काकींच्या असंख्य आठवणींनी मनात घर केले आहे. त्या माझ्यासाठी आईसमान होत्या. त्यांनी आम्हा सर्व भावंडांवर सदैव खुप प्रेम केले. आम्हा सर्व भावंडांना त्यांनी दिलेली प्रेमळ साथ सदैव लक्षात राहील.काकी, भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🏻
Heartbroken to share that my dearest aunt, my mother - Bharati Pratap Pawar has passed away. This is an immense personal loss for our family & words cannot truly express the grief. She will forever be in our hearts. May her soul rest in peace!
आम्ही पवार कुटुंब आज अत्यंत दुःखद प्रसंगाला सामोरे जात आहोत. आमच्या परिवारातील माझ्या धाकट्या काकी सौ. भारती प्रतापराव पवार यांच्या निधनाने आमच्या कुटुंबाची मोठी हानी झाली आहे. आईसमान असणाऱ्या माझ्या काकींबद्दलच्या लहानपणापासूनच्या अनेक आठवणी आणि त्यांचा लाभलेला सहवास माझ्या डोळ्यांसमोर तरळत आहे. काकींचा हसतमुख चेहरा, उत्साही आणि सतत कार्यशील राहण्याचा स्वभाव आमच्या नेहमी स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने प्रतापकाका, आम्ही सर्व बहीण-भावंडे आणि सर्व पवार कुटुंबियांच्या जीवनात कायमची पोकळी निर्माण झाली आहे. आमच्या लाडक्या भारतीकाकींना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
हे विश्व अनेक अश्या अद्भुत रहस्यांनी भरलेले आहे. मेक्सिकोमधील अश्याच एका अद्भुत टियोटिहूआकान पिरॅमिडला भेट दिली. टियोटिहूआकान चा अर्थ 'देवांची निर्मिती ज्या ठिकाणी झाली' असे ठिकाण. इसवी सन पूर्व १०० ते इसवी सन ७५० दरम्यान हे मेसो-अमेरिकन शहर भरभराटीस आले. या ठिकाणी असलेले सूर्य पिरॅमिड व चंद्र पिरॅमिड हे स्थापत्यकला व अभियांत्रिकीचे उत्तम उदाहरण आहे. प्राचीन काळात पिरॅमिड हे धार्मिक व आध्यात्मिक घडामोडींचे केंद्रस्थान मानले जायचे. विटा किंवा दगडांनी बांधलेल्या या प्रचंड इमारती त्या काळातील अस्तित्वात असलेल्या मानवी संस्कृतीच्या पाऊलखुणा म्हणून आजही आपल्याशी संवाद साधतात कि काय असे वाटते. त्रिकोणी आकाराच्या उत्तम वास्तुकला व अविश्वसनीय अभियांत्रिकीच्या माध्यमातून उभारण्यात आलेले हे पिरॅमिड बघून मन भारावून गेले.
--
This world is full of many such incredible mysteries. I visited one such amazing Teotihuacan pyramid in Mexico. Teotihuacan means 'the place where the gods were created.' This Meso-American city flourished between 100 BC and 750 AD. The Pyramid of the Sun and the Pyramid of the Moon are excellent examples of architecture and engineering. In ancient times, pyramids were considered the center of religious and spiritual activities. These huge buildings, built of bricks or stones, seem to communicate with us even today as the footprints of the human civilization that existed at that time. I was overwhelmed to see these pyramids, which were built through excellent triangular architecture and incredible engineering.
#mexico #teotihuacan #mesoamerica #pyramidsofmexico #mexicanculture #teotihuacanpyramids
@Meta @MetaBusinessHelp @Meta I’ve been waiting for over a week to get my issue (Case ID: 1797473194409064) resolved. My ads are affected, and I need urgent assistance. Can you please escalate this and provide an update? #MetaSupport#FacebookAds
@MetaBusinessHelp @Meta I’ve been waiting for over a week to get my issue (Case ID: 1797473194409064) resolved. My ads are affected, and I need urgent assistance. Can you please escalate this and provide an update? #MetaSupport#FacebookAds