@CMOMaharashtra@Dev_Fadnavis Tait -3 निकाल तत्काळ लावा व नवीन संच मान्यता धोरण रद्द करा व 100% रिक्त जगाची शिक्षक भरती करा,व शिक्षण सेवक कालावधी रद्द करा
Sunday Wisdom!#MPSC च्या भरतीप्रक्रियेतील विलंबाचा फटका केवळ उमेदवारांनाच नव्हे तर लोकसेवांना सुद्धा. यासाठी प्रभावी व कालबद्ध नियोजन जसे महत्वाचे तशीच अंमलबजावणी सुद्धा.ORTची तत्वे व पद्धतींनुसार आयोगाच्या अंतर्गत कार्यप्रणालीची समीक्षा करून विलंबाची कारणे शोधणे व दूर करणे शक्य!
परभणी केसापुरी येथील जिल्हा परिषद शाळेतील एका विद्यार्थिनीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली. "दादा, कागदावर शाळा चकाचक दिसते, पण प्रत्यक्षात पिण्यासाठी पाणीही नाही. भ्रष्टाचारामुळे आमचं भविष्य टांगणीला लागलंय. आम्ही काय आयुष्यभर ऊसतोड मजूरच बनायचं का? आम्हालाही अधिकारी व्हायचंय!", असे पत्रात नमूद केले आहे.
#LokmatNews #MarathiNews #AjitPawar #Parbhani #School
#JusticeForMPSCStudent
मा. मुख्यमंत्री महोदय,
एवढं आडमुडी आणि अहंकारी धोरण नको!
लवकर निर्णय घ्या!
गेली ६ महिने विद्यार्थी संयम ठेवून वाट पाहत होते, तेव्हा शासनाला वेळ नव्हता.
आता अचानक म्हणता — GR काढू, पण link open करणार नाही, नवीन फॉर्म भरू देणार नाही, आणि ४ जानेवारीलाच परीक्षा घेणार!
मग प्रश्न असा आहे👇
👉 ज्यांची शेवटची संधी हुकली त्यांनी काय करायचं?
STI Open – 0 जागा
ASO Open – 1 जागा
SR – 0 जागा
ही परीक्षा आहे की विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ?
🔹 गेल्या वर्षीप्रमाणे link open करा
🔹 विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यास वेळ द्या
🔹 परीक्षा काही दिवस पुढे घ्या
इतकीच साधी आणि न्याय्य मागणी आहे!
सरकारचे दोन तर्क — आणि त्यांची वस्तुस्थिती
१) “१० हजार मुलांसाठी २.५–३ लाख मुलांचे नुकसान कसे करू?”
➡️ खरं तर एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ न देणे हेच शासनाचे कर्तव्य आहे!
➡️ परीक्षा १५–२० दिवस किंवा १ महिना पुढे गेल्याने नुकसान नाही,
उलट २.५–३ लाख मुलांना अभ्यासासाठी जास्त वेळ मिळेल!
२) “आचारसंहितेमुळे GR काढता येत नाही”
➡️ मग आचारसंहितेच्या २ तास आधी बिहारमध्ये योजना कशी जाहीर झाली?
➡️ निवडणूक काळात दर शुक्रवारी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कसा टाकला गेला?
➡️ तेव्हा आचारसंहिता कुठे गेली होती?
जर खरंच आचारसंहिता अडचण आहे,
➡️ १ महिना थांबा, आचारसंहिता संपल्यावर GR काढा, मग परीक्षा घ्या!
आमचे थेट सवाल 🔥
1️⃣ १५–२० दिवसांनी परीक्षा ढकलली तर ३ लाख मुलांचे नुकसान कसे होईल?
— उलट सर्वांना समान संधी मिळेल!
2️⃣ MPSC निकाल लावायला २–२ वर्षे घेते, तेव्हा मुलांच्या आयुष्याचे नुकसान होत नाही का?
3️⃣ जाहिरात ७ महिने उशिरा काढली — ही चूक विद्यार्थ्यांची की शासनाची?
मग शिक्षा विद्यार्थ्यांना का?
4️⃣ ज्याचे वय संपले, ज्याचं संपूर्ण भविष्य या एकाच संधीवर अवलंबून आहे —
त्याचं उद्ध्वस्त होणारं आयुष्य मोठं की इतरांचे १५–२० दिवस?
5️⃣ ७ महिने उशीर, तुटपुंज्या जागा, शून्य भरती…
तेव्हा मुलांचं नुकसान आठवत नाही आणि आता अचानक हा कसला हट्ट?
“१० हजारांसाठी ३ लाखांचे नुकसान करणार नाही”
➡️ हे उत्तर नाही, हा निर्दयी अहंकार आहे!
“अनंत काळ अन्याय सहन करणे हा न्याय मिळवण्याचा मार्ग नसून,
अन्यायाविरुद्ध बंड करणे हाच खरा न्यायाचा मार्ग आहे.”
— डॉ. बाबासाहेब आंबेडकर
⚠️ विद्यार्थ्यांच्या जिव्हारी लागेल एवढा अहंकार सत्तेसाठी घातक ठरेल!
आज विद्यार्थी शांत आहेत, पण न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाहीत!
#StudentJustice
#MPSC_अन्याय
#LinkOpenKara
#ExamPostponeKara
#विद्यार्थ्यांचा_संयम_संपतोय
@Dev_Fadnavis
ऑल इंडिया पँथर सेना विद्धार्थ्यांच्या बाजूने आहे!
“१० हजारांसाठी ३ लाखांचे नुकसान करणार नाही” हे विधान म्हणजे संधीसाधू “फडणवीस पवार शिंदे” सरकारचा उद्धट अहंकार, प्रशासकीय अपयश आणि विद्यार्थ्यांविषयीचा तिरस्कार उघड करणारे आहे. हे उत्तर नाही तर ही राज्यातील अन्यायग्रस्त परीक्षार्थींच्या थेट मानसिक छळाची कबुली आहे.
आमचे सवाल टाळू नका, उत्तर द्या :
🔥 १५–२० दिवस परीक्षा पुढे ढकलली तर ३ लाखांचे नुकसान होते, पण MPSC २–२ वर्षे निकाल लटकवते तेव्हा नुकसान होत नाही?
🔥 जाहिरात ७ महिने उशिरा काढणे तुमची चूक, आणि शिक्षा विद्यार्थ्यांना? ही कसली मस्ती?
🔥 ज्यांचे वय संपले, त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार - त्यापेक्षा इतरांचे १५ दिवस मोठे?
🔥 तुटपुंज्या जागा, शून्य नियोजन, शून्य जबाबदारी-तरीही सरकार येवढ्या माजात?
अन्याय सहन करणे नव्हे, त्याविरुद्ध उभे राहणे हाच न्याय असतो. विद्यार्थ्यांच्या भविष्यावर पाय देणारा सत्तेचा अहंकार तुम्हाला भोवणार आहे हे नक्की!
जाहीर निषेध!
@INCHarshsapkal@VijayWadettiwar@satejp@prithvrj@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
#MPSC #PuneProtest #MPSC_Postpone #StopMentalTorture
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात 29 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीला ७ महिन्यांचा प्रशासकीय विलंब झाला, यामध्ये विद्यार्थ्यांचा काय दोष? सरकारच्या या दिरंगाईमुळे आणि गलथान कारभारामुळे अनेक पात्र गुणवत्ताधारक परीक्षार्थी 'ओव्हरएज' होऊन संधी गमावत आहेत. हा त्यांच्या भविष्यावर झालेला अन्याय आहे. अनेक विद्यार्थी डिप्रेशनमध्ये आले आहेत.
सरकारने प्रशासकीय चुकीची शिक्षा उमेदवारांना देऊ नये. गेल्या सहा महिन्यांपासून विद्यार्थी वयोमर्यादेत वाढ करण्यासाठी सरकार दरबारी विनंती करत आहेत मात्र अजूनही सरकारने याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. परीक्षार्थींच्या मागणीनुसार सरकारने तत्काळ वय मर्यादा कालावधी 1 जानेवारी 2025 गृहीत धरून परीक्षार्थी उमेदवारांना न्याय द्यावा.
परीक्षेची तारीख जवळ आलेली असताना विद्यार्थ्यांना कोणताही ठोस निर्णय न देता आशेवर झुलवत ठेवणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांनी कित्येक वर्षांपासून केलेली मेहनत वाया जात आहे. सरकारने या सगळ्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, अन्यथा युवकांचा स्पर्धा परीक्षा यंत्रणेवरील विश्वास पूर्णपणे उडेल.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office
विद्यार्थ्यांना नाईलाजास्त आंदोलन करण्याची वेळ आली आहे त्यामुळे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपण लवकरात लवकर #PSI वय वाढ बाबत निर्णय घेऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती. @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@PawarSpeaks
संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अवघ्या काही दिवसांवर आली असतानाही PSI वय वाढीचा निर्णय होत नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अगोदरच जाहिरात 7-8 महिन्यांनी उशिरा त्यात वय वाढीचा मुद्दा देखील सोडवायची तसदी घेतली गेली नाही.
याबाबतच पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थांच्या आंदोलनावर सरकारने बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न न करता विद्यार्थ्यांशी संवाद साधून समन्वयाने हा प्रश्न निकाली काढावा.विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर येत असून विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होणार नाही, याची दक्षता पोलीस प्रशासनानेही घ्यावी ही विनंती
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC
#PSI वयोमर्यादा वाढीसाठी :
१०० हून अधिक आमदार/खासदार तसेच परीक्षार्थींकडून शेकडो पत्रे, निवेदने आणि विनंत्या देऊनही मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार अजूनही शांत आहे.
आज सकाळपासून राज्यभरातून परीक्षार्थींची शिष्टमंडळे मुंबईत दाखल झाली असून, प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. सकाळी मा. मुख्यमंत्र्यांची भेटही झाली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिले, तरीहि अद्याप कोणताही स्पष्ट निर्णय नाही, ही अत्यंत गंभीर आणि असंवेदनशील बाब आहे.
अवघ्या ४ दिवसांवर परीक्षा आलेली असताना, लाखो परीक्षार्थी आजही मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा उद्यापासून विद्यार्थ्यांसमोर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.
लाखो परीक्षार्थींच्या हक्कांच्या या न्याय्य लढ्यात काँग्रेस पक्षाचा पूर्ण, ठाम आणि सक्रिय पाठिंबा राहील. ✊📢
@INCHarshsapkal@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@VijayWadettiwar@satejp@mpsc_office
#MPSC #PSI_AgeRelaxation #JusticeForMPSCStudents
PSI वयोमर्यादा वाढीसाठी शेकडो पत्रे आणि विनंत्या देऊनही सरकार ढिम्म आहे. ४ दिवसात परीक्षा असताना विद्यार्थी आजही निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. विद्यार्थ्यांच्या या लढाईत माझा त्यांना पूर्ण पाठिंबा असेल! 📢
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#MPSC #PSI_AgeRelaxation #JusticeForMPSCStudents
BJP IT सेलच्या सदस्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा पॅकेज घेऊन, निसर्गप्रेमी वृक्ष मित्र "सयाजी शिंदे" यांना सोशल मिडियावर ट्रोल करणं सोप्पं आहे..!!
पण त्यांच्या सारखा विचार करणं आणि ते प्रत्यक्षात उतरवनं अशक्य नाही पण खडतर आहे...😊
शिक्षकांच्या रिक्त हजारो जागा,पात्र उमेदवारांची लाखो गर्दी…आणि महाराष्ट्र सरकार अजूनही कंत्राटी भरतीच्या हट्टावर?
ही शिक्षणाची उध्वस्त नीती की विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ?
कमी पट दाखवून शाळा बंद →आणि आता तिथेच कंत्राटी शिक्षक?
हा सरळ सरळ विद्यार्थ्यांवर अत्याचार आहे!
#TET पेपरफुटीचा प्रयत्न4,75,668 विद्यार्थ्यांच्या भविष्यावर वार!
या घोटाळ्यात शिक्षकांसह भाजपा पदाधिकाऱ्याचा भाऊ मिळून 18 जण सहभागी.
सरकार बघ्याची भूमिका घेईल पण प्रसार माध्यमंही शांत दुर्देव 🥲
2019 प्रमाणे हे प्रकरण तडीस जाणे आवश्यक,नाहीतर उद्या विद्यार्थ्यांचे भविष्यच फुटेल!
भावपूर्ण श्रद्धांजली💐
नवनियुक्त शिक्षण सेवक अभिषेक किरणापुरे सर यांचे अपघाती निधन सेवा संरक्षण नसल्यामुळे कुटुंबावर भीषण संकट
शासनाची वर्षानुवर्षांची भरतीबाबत उदासिनता
या अन्यायाची किंमत निर्दोष कुटुंबाला चुकवावी लागत आहे
#CM@dadajibhuse तत्काळ न्याय द्या
#शिक्षणसेवक_रद्द_करा
शिक्षकभरतीची परीक्षा होऊन सहा महिने पूर्ण झाले पण शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली नाहीत. दररोज नवीन नवीन घोटाळे आणि करोडो रुपयांची संपत्ती हडपली जाते तर दुसरीकडे निवडणुकीसाठी लाभाच्या हजारो करोडोच्या योजना सुरू आहेत.
मात्र समाज घडवणाऱ्या शिक्षकांची भरती होत नाही उलट जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्यात येत आहे.
हिवाळी अधिवेशनात एल्गार आंदोलन करण्यात येणार.
लोकमत टीम आभार.!!
@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR@Prksh_Ambedkar@RRPSpeaks
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या पोरांच्या कितीतरी दिवाळ्या पुण्यात गेल्यात. कारण परीक्षा आहे अभ्यास करायचा हा विषय नाहीच. प्रश्न असतो गावाकडे गेल्यावर नातेवाईक, पै पाहुणे, गावकी-भावकी यांना तोंड कसे दाखवावे? त्यांच्या प्रश्नांना तोंड कसे द्यावे? या पोरांना या फेज मधून बाहेर काढण्याची नितांत गरज आहे.
#MPSC
आज लातूर शिक्षण उपसंचालक कार्यालयात भेट देऊन समूह शाळा योजना तात्काळ बंद करण्याची मागणी केली असून तसे पत्र शिक्षण आयुक्त कार्यालयात सादर करण्यासंदर्भात सांगितल...
कंत्राटशिक्षक भरती रद्द करून मोठ्या प्रमाणात कायम शिक्षकांची भरती करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान लातूर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने भावी शिक्षक उपस्थित होते.
त्यानंतर विजय स्पर्धा परीक्षा केंद्र लातूर ठिकाणी भावी शिक्षकांना सखोल मार्गदर्शन करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व पुढील दिशा ठरवली..
उपस्थित
गुट्टे सर, लक्ष्मी मॅडम, कोमल मॅडम ललिता मॅडम, शेख सर,योगेश सर,राजे सर, अशोक सर,होळकर सर,भिंगे सर अगंद सर, रंगनाथ सर,मयुरी मॅडम, कांबळे सर, अजर सर,दिगंबर सर, विशाल सर, किरण सर,सुमित सर,तुकाराम सर इत्यादी
अचानक कमी वेळात केलेल्या नियोजनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद होता.
@dadajibhuse@mieknathshinde@Dev_Fadnavis@DRPANKAJBHOYAR@Prksh_Ambedkar@RRPSpeaks@satyajeettambe@Sujat_Ambedkar@AnandrjAmbedkar@NCPspeaks@AjitPawarSpeaks