आज गुरू पौर्णिमा....!
भारतात सर्वात जास्त विश्वास ठेवला तो म्हणजे "शिक्षकच " आज शासनाच्या विरोधात बदल न केल्याने नवनिर्वाचित 2000 पासून शिक्षकांना "शिक्षण सेवक" या नावाखाली वेठबिगारी करावी लागत आहे #शिक्षणसेवक_रद्द करून त्यांना कायम करण्यात यावे अस नव्या शैक्षणिक धोरण सांगितल.
शिक्षण सेवकांचे वेतन अजूनही वाढवण्याचा विचार शिक्षण विभागाचा आहे, असे आश्वासन शिक्षण मंत्री दीपक केसरकर @dvkesarkar यांनी दिले.
सावंतवाडी येथे अखिल प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा मंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते.
अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे !
शिक्षण सेवक म्हणून मिळणारे मानधन हे अतिशय तटपुंजे आहे. वाढलेल्या महागाईमुळे राज्यातील अनेक शिक्षण सेवकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. घरभाडे, प्रवास खर्च यातच मोठा खर्च होत असल्याने कुटुंब चालविणे देखील अवघड आहे. त्यातच ३० ते ३५ वयोगटातील अधिकाधिक उमेदवारांची निवड झाली असल्याने त्यांचा सेवाकाळ देखील कमी असणार आहे. तरी राज्य शासनाने शिक्षण सेवक रद्द करून नियमित पगार सुरू करावा. तसेच प्रलंबित भरती Phase -२ देखील विधानसभा आचारसहिंतेपूर्वी पूर्ण करावी.
@Mpsc_Andolan@mieknathshinde@VijayWadettiwar@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@dvkesarkar
शिक्षक होऊन चूक केली का❓
राज्यात ८००००+ शिक्षकांची पदे रिक्त असताना शालेय विभागाने फक्त किमान पदांची भरती सुरु करून सुशिक्षित भावी शिक्षकांना गाजर दाखवले आणि #शिक्षण_सेवक या जाचक अटीमुळे तूटपुंज्या पगारावर नोकरी करावी लागते! @dvkesarkar हक्काची लढाई! चलो मुंबई @CMOMaharashtra
गत २ वर्षांपासून सरकार शिक्षक भरतीच्या नावावर केवळ चालढकलपणा करत असल्याचे दिसून येत आहे. ६७ हजारांच्या आसपास जागा रिक्त असताना पूर्ण क्षमतेने भरती करण्याऐवजी २०-२५ हजार पदे भरताना देखील टप्पे केले आहेत. परिणामी राज्यभरातील शिक्षक भरतीची वाट पाहणारे युवा आज चिंतेत आहेत.. तरी सरकारने पूर्ण रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवावी, ही विनंती..
@mieknathshinde@Dev_Fadnavis@dvkesarkar
#Maharashtra | #शिक्षक_भरती | #प्रलंबित_शिक्षकभरती_पूर्णकरा |
@dvkesarkar मा. शिक्षण मंत्री एक शिक्षक भरती पुर्ण करण्यास जर २-३ वर्ष लागत असतील तर हे खरंच महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, फक्त बुलेटिन काढून उमेदवारांना शांत करण्याचा मानस आहे, संयमाचा बांध तुटलेला आहे, त्वरित उर्वरित राऊंड पुर्ण करा अन्यथा रोष आवळला तर शासन आणि प्रशासन जबाबदार.