महाराष्ट्रात नांदेड, सोलापूर, सिंधुदुर्ग इथली विमानतळं चालू होण्याची नितांत गरज आहे.
या एकविसाव्या शतकात, २०२४ सालातही इतर राज्यातून सोडा, राज्यातल्या राज्यात महाराष्ट्राच्या राजधानीत, देशाच्या आर्थिक राजधानीत यायला जर कमीतकमी १० ते १२ तास रस्त्याने किंवा ट्रेनने लागणार असतील तर इथले नागरिक म्हणून आपण कर्तृत्वशून्��� आहेत.
आज आपण मुंबईहून भारतातल्या इतर कोणत्याही राज्यात किंवा अगदी परदेशात यापेक्षा कमी वेळात पोहचतोय पण आपल्याच राज्यात इतका वेळ जातो की इथे प्रवास नकोसा होतो.
दळणवळणाच्या सुविधा असणं, रस्ते, रेल्वे, विमानतळं यांनी सुसज्ज इंन्फ्रास्ट्रक्चर असणं ही विकासाची बेसिक सूरूवात आहे.
हे मी फक्त उद्योग - व्यवसायाच्या दृष्टीकोनातून लिहतोय असे नाही. मुंबईतून जर या भागात किंवा इकडून मुंबईत जलद जाता आलं तर कितीतरी आरोग्याचे प्रश्न मार्गी लागतील. चांगले, हुशार डॅाक्टर्स त्या भागात जावू - येऊ शकतील.
शाळा -कॅालेजातून चांगली मंडळी व्याख्यानं-प्रयोग किंवा शिकण्या-शिकवण्यासाठी सहज ये-जा करतील. शेती किंवा त्यासाठी पुरक वस्तूंची सहज ने -आण शक्य होईल.
देशांतर्गत आणि परदेशी पर्यटकही विमानतळं असेल तर तिकडे भेट देण्याचं प्रमाण सहजी वाढवतात हे सत्य आपण नाकारणार आहोत का? पर्यटक आले तर चांगली हॉटेल्स येतील, रेस्टॅारेंट्स येतील.
बरं यासोबत इथल्या इकोसिस्टममधे त्यामुळे अनेक नो��ऱ्या उपलब्ध होऊ शकतात त्याचाही फायदा आहे.
महाराष्ट्र हा इंटरनल कनेक्टीव्हीटीने चांगल्या प्रकारे जोडला जाणं ही काळाची गरज आहे.
मुंबई - पुणे - नाशिक - औरंगाबाद - नागपूर यापलीकडचा महाराष्ट्र - महाराष्ट्राशी नीट जोडला जाणं ही काळाची गरज बनलेली आहे.
डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे जर आपण काळासोबत बदललो नाही तर आज ना ऊद्या हमखास संपून जावू.
जय महाराष्ट्र!
If you simply manage to stay physically healthy and mentally stable over the course of a decade, and steadily invest in yourself, in loving relationships, in your financial freedom, one day you will step back, look around, realize there is no competition, and that life is good.
Earth already receives about the same energy from the Sun in an hour than humanity consumes in a year.
Solar panels just need to catch a tiny amount of it to power our entire civilization!